Welcome to Prashant Publications

Rs. 295.00 10% OFF
Availability: 10 left in stock

प्रस्तुत पुस्तकात अभ्यासक्रमानुसार घटकनिहाय, संदर्भ साहित्यांच्या आधारे ‘मौद्रिक अर्थशास्त्र’ यांचे सविस्तर विवेचन करण्यात आलेले आहे. अर्थशास्त्राचे विद्यार्थी व अर्थशास्त्राचे अभ्यासक यांना विषयाची जाणीव निर्माण होऊन त्यांची विविध संकल्पनांची मांडणी सोप्या...

  • Name : मौद्रिक अर्थशास्त्र (Monetary Economics)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : SYBCOM | Sem - IV
  • Manufacturing : January 2026
  • Total Pages : 224 Pages
  • Barcode : 9788199751002

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

मौद्रिक अर्थशास्त्र (Monetary Economics)
- +

प्रस्तुत पुस्तकात अभ्यासक्रमानुसार घटकनिहाय, संदर्भ साहित्यांच्या आधारे ‘मौद्रिक अर्थशास्त्र’ यांचे सविस्तर विवेचन करण्यात आलेले आहे. अर्थशास्त्राचे विद्यार्थी व अर्थशास्त्राचे अभ्यासक यांना विषयाची जाणीव निर्माण होऊन त्यांची विविध संकल्पनांची मांडणी सोप्या भाषेत केलेली आहे. अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक व संकल्पनेची क्रमबद्ध, व विस्तृतपणे मांडणी केली आहे. त्यासंदर्भातील अलिकडील अद्ययावत माहितीचे संदर्भ, आवश्यक तेथे सूची, तक्ते, आकृत्यांची मांडणी केलेली आहे. या पुस्तकाचे लिखाण करतांना अर्थशास्त्र अभ्यास मंडळाने सूचविलेल्या उपयुक्त संदर्भग्रंथाचा आवर्जून वापर केलेला आहे. विविध तज्ज्ञांचे संशोधन लेख, मुक्त विद्यापीठ पुस्तके, संकेतस्थळावरील उपलब्ध माहितीचाही अवलंब केलेला आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाने मूल्यांकनासाठी नमुद केलेल्या आकृती बंधानुसार परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न ही दिलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक सर्व विद्यापीठातील विद्यार्थ्यांनाही उपयुक्त ठरेल हा प्रामाणिक हेतू समोर ठेवून पुस्तकाचे आम्ही लिखाण केले आहे.      

1. पैशाची ओळख...........................................7
1.1 पैशाची व्याख्या आणि अर्थ
1.2 वैदिक काळापासून पैशाची उत्क्रांती
1.3 पैशाची कार्ये
1.4 पैशाच्या मागणीची ओळख
1.5 पैशाच्या मागणीचे सिद्धांत
1.5.1 सनातनवादी सिद्धांत
1.5.2 केन्स यांचा सिद्धांत
1.5.3 फ्रीडमनचा सिद्धांत
1.6 पैशाचे मूल्य : संकल्पना आणि व्याख्या
1.7 पैशाचा संख्यात्मक सिद्धांत (फिशर आणि केंब्रिज समीकरण)

2. पैशाचा पुरवठा............................................63
2.1 जवळजवळ पैसा, प्रमाणित आणि प्रातिनिधिक पैशाच्या संकल्पना
2.2 व्यापारी बँकांद्वारे पत निर्मिती आणि त्याच्या मर्यादा
2.3 पत नियंत्रण साधने
2.4 पैशाचा पुरवठा आणि उच्च शक्तीच्या पैसा
2.5 आरबीआयची पैशाचे मापके
अ) एम1, एम2, एम3 आणि एम4 आणि (M1, M2, M3
and M4 and)
ब) एम0, एम1, एम2, एम3. (M0, M1, M2, M3.)

3. चलनविस्तार.............................................107
3.1 चलनविस्तार व्याख्या
3.2 वास्तविक चलनविस्तार आणि नाममात्र चलनविस्तार
3.3 घाऊक किंमत निर्देशांक (WPI) आणि ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) यांची संकल्पना आणि मापन
3.4 खर्च वाढ चलनविस्तार आणि मंदीयुक्त चलनवाढ (डींरसषश्ररींळेप)
3.5 चलनविस्तारची कारणे आणि परिणाम
3.6 फिलिप्स वक्र (Phillips Curve) : अल्पकाळ आणि दीर्घकाळ
3.7 चलनसंकोच : व्याख्या आणि परिणाम

4. पैसाविषयक धोरण............................................173
4.1 स्थूल आर्थिक धोरणाची उद्दिष्टे (वाढ, रोजगार आणि किंमत स्थिरता)
4.2 अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी चलनविषयक धोरण आणि राजकोषीय धोरण (आढावा)
4.3 नियमानुसार चलनविषयक धोरण (MPC) : चलनवाढ लक्ष्यीकरण
4.4 अल्पकालीन आणि दीर्घकालीन व्याजदर व बचत आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजना

संदर्भ ग्रंथसूची...................................................219

💬

Chat with us