Your cart is empty now.
प्रस्तुत पुस्तक याच अद्ययावत अभ्यासक्रमाला केंद्रस्थानी ठेवून रचले गेले आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ सांख्यिकीय माहिती नसून, लोकसंख्येचा सामाजिक आणि आर्थिक परिप्रेक्ष्यातून घेतलेला धांडोळा आहे.
पुस्तकाच्या पहिल्या भागात लोकसंख्याशास्त्राची व्याप्ती आणि जनगणनेची प्रक्रिया स्पष्ट केली आहे, तर दुसऱ्या भागात माल्थसपासून ते लोकसंख्या संक्रमणापर्यंतच्या जागतिक सिद्धांतांचे विश्लेषण केले आहे. प्रकरण तिसरे प्रजनन क्षमता आणि मृत्यूदर तर चौथ्या प्रकरणात स्थलांतरासारख्या लोकसंख्याशास्त्रीय बदलांच्या कारणांचा आणि परिणामांचा सूक्ष्म अभ्यास समाविष्ट आहे.
शेवटच्या पाचव्या आणि सहाव्या प्रकरणात आधुनिक काळातील ‘लोकसंख्या गुणवत्ता’ (Population Quality) आणि ‘मानव संसाधन विकास’ या संकल्पनांवर विशेष भर देण्यात आला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना भारतातील लोकसंख्या धोरणाचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करता येईल.
विद्यार्थ्यांना हा क्लिष्ट वाटणारा विषय सोप्या, ओघवत्या भाषेत आणि तक्त्यांच्या माध्यमातून समजावून सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न या पुस्तकात केला आहे. हे पुस्तक परीक्षेतील यशासोबतच विद्यार्थ्यांची विषयाप्रती वैचारिक प्रगल्भता वाढवण्यास निश्चितच सहाय्यभूत ठरेल. प्रत्येक घटकाच्या शेवटी अभ्यासासाठी प्रश्नसंच दिला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करतांना या प्रश्नसंचाचा निश्चितच उपयोग होईल. विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.