Welcome to Prashant Publications

Rs. 250.00 10% OFF
Availability: 10 left in stock

लोकसंख्या एक महत्त्वाची साधनसंपत्ती आहे तसेच अलीकडील काळात वाढत्या लोकसंख्येमुळे नगरांची वाढ होत आहे. ही बाब विचारात घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल अभ्यासमंडळाने लोकसंख्या व वस्ती भूगोल या विषयाचा...

  • Name : लोकसंख्या व वस्ती भूगोलाची ओळख प्रात्यक्षिकांसह (Introduction to Population and Settlement Geography with Practicals)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : SYBA | SEM - IV | Geography |
  • Manufacturing : January 2026
  • Total Pages : 176 Pages
  • Barcode : 9788199734739

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

लोकसंख्या व वस्ती भूगोलाची ओळख प्रात्यक्षिकांसह (Introduction to Population and Settlement Geography with Practicals)
- +

लोकसंख्या एक महत्त्वाची साधनसंपत्ती आहे तसेच अलीकडील काळात वाढत्या लोकसंख्येमुळे नगरांची वाढ होत आहे. ही बाब विचारात घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल अभ्यासमंडळाने लोकसंख्या व वस्ती भूगोल या विषयाचा पदवी स्तरावरावरील अभ्यासक्रमात समावेश केला आहे. भूगोल विषयाच्या विद्यार्थांना लोकसंख्या व वस्ती भूगोलाचे महत्त्व समजून देण्याच्या दृष्टीने या क्षेत्रातील जाणकार, अभ्यासक, व्यावसायिक, संशोधक यांच्याशी सखोल चर्चा करून तसेच लोकसंख्या व वस्ती भूगोलाशी निगडीत संदर्भ ग्रंथ, नियतकालिके, इंटरनेटवर उपलब्ध असलेली माहिती, वर्तमानपत्रातील लेख, अहवाल, चर्चासत्रे, परिषदा, शोध निबंध यांचा आधार घेऊन सदर पुस्तकाचे लिखाण करण्यात आले आहे. लोकसंख्या व वस्ती भूगोलाचे स्वरूप व महत्त्व, लोकसंख्या विषयक संकल्पना, लोकसंख्या वाढ, लोकसंख्या वाढीचे घटक, अतिरिक्त लोकसंख्या, लोकसंख्याविषयक धोरणे, वस्त्यांच्या वितरणावर परिणाम करणारे घटक, वस्ती भूगोलातील संकल्पना, ग्रामीण वस्त्यांचे प्रकार व कार्य, शहरी वस्तीविषयक संकल्पना, नागरीकरण व त्याच्याशी संबंधित समस्या तसेच प्रात्याक्षिकांमध्ये जनन, मर्त्यता व लोकसंख्येची घनता यांचे मापन, लोकसंख्या प्रक्षेपण, व त्यांचे मापन, गुरुत्वाकर्षण प्रतिमान, लॉरेन्झ वक्र, गिनी गुणांक व ग्रामीण वस्तीचे व्यष्टी अध्ययन यांचा अभ्यास या पुस्तकाच्या लिखाणात समाविष्ट करण्यात आला आहे.         

प्रकरण- 1 लोकसंख्या भूगोलाची ओळख...............................9
1.1 लोकसंख्या भूगोलाची व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती
1.2 लोकसंख्या भूगोलाचा इतर विद्याशाखांशी संबंध
1.3 लोकसंख्येच्या संकल्पना
1.3.1 लोकसंख्या: एक साधनसंपदा
1.3.2 अतिरिक्त लोकसंख्या
1.3.3 पर्याप्त लोकसंख्या
1.3.4 न्यूनतम लोकसंख्या

प्रकरण- 2 लोकसंख्येचे घटक आणि वाढ...........................33
2.1 लोकसंख्या वाढ संकल्पना
2.2 लोकसंख्या वाढीवर परिणाम करणारे घटक
2.3 लोकसंख्या वाढीचे घटक
2.3.1 जन्मदर
2.3.2 मृत्युदर
2.3.3 स्थलांतर
2.4 लोकसंख्या वाढीतील स्थलकालसापेक्ष बदल
2.5 भारतातील अतिरिक्त लोकसंख्येचे परिणाम

प्रकरण- 3 लोकसंख्या सिद्धांत आणि धोरणे........................55
3.1 माल्थसचा लोकसंख्या सिद्धांत
3.2 भारताचे लोकसंख्या धोरण
3.3 नॉर्वेचे लोकसंख्या धोरण

प्रकरण- 4 वस्ती भूगोलाची ओळख..................................69
4.1 वस्ती भूगोलाची व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती
4.2 वस्तीच्या वाढ आणि वितरणावर परिणाम करणारे घटक
4.3 वस्ती भूगोलातील संकल्पना
4.3.1 वस्त्यांचे स्थान व स्थिती
4.3.2 वस्त्यांची वाढ
4.3.3 पुनर्वसित वसाहती
4.3.4 आदर्श गाव
4.3.5 नियोजित शहर

प्रकरण- 5 ग्रामीण वस्ती...........................................92
5.1 ग्रामीण वस्तीची प्रारूपे
5.2 ग्रामीण वस्तीची वैशिष्ट्ये आणि कार्य

प्रकरण- 6 नागरी वस्ती.....................................................106
6.1 नागरी वस्तीच्या संकल्पना
6.1.1 नगर
6.1.2 शहर
6.1.3 महानगर
6.1.4 प्रमहानगर
6.1.5 संकलित नगर
6.1.6 स्मार्ट शहर
6.1.7 केंद्रीय व्यवहार विभाग
6.2 ग्रामीण - नागरी संक्रमण पट्टा
6.3 किंग्सले डेव्हीस यांचे शहरीकरणाचे प्रतिमान
6.4 भारतातील नागरीकरण
6.5 भारतातील नागरीकरणाशी संबंधित समस्या

प्रकरण- 7 लोकसंख्या वाढीचे मापन.................................126
7.1 जननाचे मापन
7.1.1 ढोबळ जन्मदर
7.1.2 साधारण जन्मदर
7.1.3 वय सापेक्ष जन्मदर
7.2 मर्त्यतेचे मापन
7.2.1 ढोबळ मृत्युदर
7.2.2 अर्भक मृत्युदर
7.2.3 वय सापेक्ष मृत्युदर

प्रकरण- 8 लोकसंख्या घनतेचे मापन आणि लोकसंख्या प्रक्षेपण.......140
8.1 लोकसंख्या घनतेचे मापन
8.1.1 लोकसंख्येची गणितीय घनता
8.1.2 लोकसंख्येची प्राकृतिक घनता
8.1.3 लोकसंख्येची कृषी घनता
8.2 लोकसंख्या प्रक्षेपण
8.2.1 एकूण लोकसंख्या प्रक्षेपण व प्रादेशिक लोकसंख्या प्रक्षेपण
8.2.2 उच्च, मध्यम व लघु लोकसंख्या प्रक्षेपण
8.3 लोकसंख्या प्रक्षेपणाचे मापन
8.3.1 गणितीय पद्धती
8.3.2 वाढ घटक पद्धती

प्रकरण- 9 वस्ती भूगोलातील प्रात्यक्षिके..........................157
9.1 गुरुत्वाकर्षण प्रतिमान
9.2 वस्त्यांमधील सुविधांच्या मूल्यांकनासाठी लॉरेन्झ वक्र व गिनी गुणांक
9.3 शहरीकरण वक्र

प्रकरण- 10 व्यष्टी अध्ययन .................................164
10.1 जवळच्या गावाचे लोकसंख्याशास्त्रीय व्यष्टी अध्ययन
10.2 जवळच्या गावाचे सुविधाविषयक व्यष्टी अध्ययन
10.3 व्यष्टी अध्ययन - अहवाल लेखन

संदर्भ ग्रंथसूची...............................................................176

💬

Chat with us