Welcome to Prashant Publications

Rs. 180.00 10% OFF
Availability: 10 left in stock


‘वनराई’ हा माझा आठवा काव्यसंग्रह आपल्या हाती देतांना मला विशेष आनंद होत आहे. माझ्या विनंतीस मान देऊन या काव्य संग्रहास साहित्य क्षेत्रातील भीष्माचार्य महान साहित्यिक श्री.वा. ना. आंधळे सरांची प्रस्तावना...

Categories:
Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

वनराई
- +


‘वनराई’ हा माझा आठवा काव्यसंग्रह आपल्या हाती देतांना मला विशेष आनंद होत आहे. माझ्या विनंतीस मान देऊन या काव्य संग्रहास साहित्य क्षेत्रातील भीष्माचार्य महान साहित्यिक श्री.वा. ना. आंधळे सरांची प्रस्तावना लाभली आहे. हे माझे परम भाग्य मी समजतो. 
संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेली कविता ‘आई मला जन्म घेऊ दे’ आतापर्यंत वेगवेगळ्या 45 भाषांमध्ये अनुवादित झालेली आहे. सर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विचारधारा प्रशाळेत ऍडवायझरी समिती सदस्य आहेत. तसेच सर मध्यप्रदेश मराठी अभ्यास मंडळात प्रमुख मार्गदर्शक सुध्दा आहेत. 
प्रा.वा.ना. आंधळे सरांच्या कवितांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथून व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथून दोन संशोधक प्राध्यापकांनी पीएच.डी. केलीय. सर शालेय व विद्यापीठीय अभ्यास क्रमातील कवी आहेत. सरांनी काही मराठी मालिकांसाठी शिर्षक गीते सुध्दा लिहिली आहेत. 
संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना व्याख्यानांसाठी आमंत्रित केले जाते. एवढ्या धकाधकीत त्यांनी माझ्या कविता संग्रहास प्रस्तावना देऊन मला उपकृत केले.हा माझा सर्वोच्च सन्मान मी समजतो. आदरणीय श्री. आंधळे सरांचे आभार न मानता आजंन्म त्यांच्या ऋणांत राहू ईच्छितो. 
माझा जन्मच मुळात लोणी, ता.जामनेर सारख्या खेडे गावात शेतकरी कुटुंबात झाला असल्यामुळे सहाजिकच शेताचा पिकांचा आणि गाई गुरांचा संबंध फार जवळून आलेला आहे. मातीशी जुळलेली नाळ आजतागायत टीकून आहे. आज सुध्दा शेती हाच माझा प्रमुख व्यवसाय आहे. बालपणीच्या असंख्य आठवणी मनात घर करून आहेत. 
प्राथमिक शाळेत असतांना शाळा सुटल्यावर किंवा सुटीच्या दिवशी शेतात जाणे, खळ्यात वासरांना पाणी पाजणे. सुटीत गूरे राखण्यासाठी, त्यांना चारण्यासाठी शेत बांधावर, माळरानावर घेऊन जाणे. आईला घरकामात संपूर्ण मदत करणे. हा माझा आवडता छंद होता. 1955 ते 1972 जुन्या मॅट्रिक 11 वी पर्यंतचा काळ लोणी सारख्या खेड्यात निसर्गात आनंदात गेला आणि विशेष म्हणजे इयत्ता आठवी पासून निसर्गरम्य कच्च्या रस्त्याने 5 की मी ये-जा फत्तेपूर पर्यंत पैदल 
प्रवास. रस्त्यात आडवी नदी. हे सर्व सांगायचे कारण म्हणजे सानिध्य निसर्ग निसर्ग आणि निसर्गच...!! 
सभोवतालच्या छोट्या मोठ्या गोष्टींचे अवलोकन, पक्षांचे आवाज, नदीतील वाळूत कुस्ती खेळणे. गवताचे बोरू तयार करणे व त्यानेच अक्षरे गिरवणे हे सर्वच आज स्वप्नवत वाटते. आजही एकटे निवांतपणे झाडाखाली बसले म्हणजे चित्त प्रसन्न होते.. चिंतन, मनन केल्यामुळे मन प्रसंन्न, आनंदी होते व सहजपणे कल्पना सुचतात. सहजपणे शब्द येतात. त्यांचे टीपण वेळीस करतो. घरात सुध्दा चिंतन, मनन, आणि एकाग्रता साधली म्हणजे शब्द सूचून कविता जन्माला येते. हा माझा स्वानुभव आहे. 
जास्त पावसामुळे खेड्यातील जीवन पूर्वी कष्टप्रद होते आज ती वस्तुस्थिती नाही. आज खेडे सुध्दा शहरा सोबत धावता आहेत. 
प्रगतीचा मार्ग आज खेडोपाडी गवसला आहे. गावागावात अभ्यासिका तयार झाल्या आहेत. खेड्यातील मुले मुली डॉक्टर इंजिनिअर तसेच स्पर्धा परीक्षेद्वारे अधिकारी होत आहेत. शिक्षणाची गंगा घरासमोरून वाहते आहे. त्याचाच प्रत्यय आज येत आहे.
पावसाळ्यात सृष्टी हिरव्यागार सौंदर्याने अधिक श्रीमंत होते. नव्या नवरी सारखी सुंदर दिसते. त्यामुळेच मला भावते.. असे वनराई मध्ये म्हटले आहे.
माझ्या कवितेतून सर्वांना तृप्तीचा आनंद मिळत राहो. निसर्ग सौंदर्याचा आस्वाद सर्वांनी घ्यावा. 
चुकीच्या ठिकाणी तोषेरे ओढले आहेत.सत्याची परिभाषा समजून घेतली जावी. सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार कवी लेखकांना नुसते मुक साक्षीदार होता येत नाही. सामाजिक बांधिलकी जपावी लागते.

नटली वनराई..............13

श्रीफळ.....................14

कार्यमग्न...................15

येती भेटीसाठी.............16

सळसळ...................17

संसाराचा गाडा.............18

पक्ष्यांची सृष्टीं.............19

ठेवा जपून.................20

चाणाक्ष कावळे............22

वर्मी घाव..................24

वेड फुलांचे................25

फळांचा राजा..............26

जागवी चैतन्य..............27

बहीर ससाणा..............28

दशा अवतार...............29

आनंदी पाखरे..............30

पाऊस रूसला.............31

पिंडी गुणधर्म...............32

पिंडाचे सावट..............33

मातृ वात्सल्य..............34

सृष्टीं मोह माया............35

जेष्ठ नागरिक...............36

बघा विचारून.............37

निवास ईश्वर...............38

भुकेचे डोहाळे.............39

जन्माचे सोहळे.............40

तिजोरी धनाची.............41

बालगीत...................42

गावाबाहेर कुस.............43

कास्तकार धन.............44

निसर्ग साक्ष................45

बळीराजा व्यथा............46

सुंदर रूपडे.................47

दुर्गम ध्येय.................48

वेडी स्वप्ने.................49

फुलांचा प्रवास.............50

पुनर्जन्म....................51

नभ भरपाई.................52

मित्र उभा दत्त म्हणोणी.....53

सृष्टींक्रम...................54

पक्षी दाना पाणी............55

कास्तकार लढाई...........56

बांधावर बोरी..............57

मनाची श्रीमंती.............58

हिरवी स्वप्ने...............59

कोठे मजा कोठे सजा......60

जगण्याचे बळ.............61

बारव आणि आड..........62

अहंकार वाळवी...........63

पक्ष्यांची भाषा.............64


मातीची कुस..65

कृष्ण निती..66

पसरतो झोळी..67

सुंदर महाल..68

सुंदर सकाळ..69

बिबटे आणि कुत्रीं..70

खरे गाढव..71

सृष्टी चक्र..72

बा तथागता..73

कर्करोग..74

अंधविश्वास..75

ढोंगी बक................. 76

पायमल्ली..77

चालावे पाहून..78

दर्जा अभिजात..79

क्षमा याचना..81

तापीच्या काठी..82

सूटता उंबरठा..83

प्रौढ संध्याकाळ..84

वेगळी चूल..86

समाजभान..87

आशेचा किरण..88

कुणास ठाव..89

संविधान कंकण..90

तृप्तीचा ढेकर..91

लेकीची घुसमट..92

युद्धखोर..93

वृक्ष आणि जेष्ठ..94

सुंदर ललना..95

मामाच्या गावात..96

फुलांची आरास..98

घेऊ मुखीं नाम..99

रूप तुझे..100

दुष्काळ झळा..101

नको अशी ओढ..102

मनी माऊ..103

रावजी बुवा..104

ठेव शिल्लक..105

होलिका उत्सव..106

उंच उड्डाण..107

मुक्या वेदना..108

मन पाखरू..109

उन्हाच्या झळा..110

मृता संजीवनी..112

सृष्टीचे भाट..113

झाले वाळवंट..114

काळी माय..116

सारेच विपरीत..117

वृथा भास..118

वनराई..119

💬

Chat with us