Your cart is empty now.
शक्षण ही आजीवन चालणारी प्रक्रिया असून ती सतत नवीन ज्ञान, नवीन विषय
आणि नव्या अध्यापन पद्धतींमुळे विकसित होत राहते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा
पूर्ण करण्यासाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020
च्या अनुषंगाने वाणिज्य शाखेतील पदवीच्या द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात सुधारणा
केली आहे.
या पार्श्वभूीवर, द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले
“विपणन संप्रेषण” हे पाठ्यपुस्तक सादर करताना मला अत्यंत आनंद होत आहे.
हे पुस्तक सोप्या आणि स्वअभ्यासास उपयुक्त अशा शैलीत लिहिलेले असून यात
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ तसेच इतर प्रख्यात विद्यापीठांच्या परीक्षांसाठी
महत्त्वपूर्ण प्रश्नांचा समावेश केला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यास
नक्कीच मदत होईल.