Welcome to Prashant Publications

Rs. 195.00 10% OFF
Availability: 10 left in stock

प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल ह्या भूगोलाच्या दोन मुख्य शाखा आहेत.
प्राकृतिक भूगोलामध्ये पृथ्वी व पृथ्वीशी संबंधित सर्व बाबींचा अभ्यास केला
जातो. तर मानवी भूगोल या विषयामध्ये मानव व पर्यावरण यामध्ये असणाऱ्या
सहसंबंधांचा...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

व्यापारी भूगोल
- +

प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल ह्या भूगोलाच्या दोन मुख्य शाखा आहेत.
प्राकृतिक भूगोलामध्ये पृथ्वी व पृथ्वीशी संबंधित सर्व बाबींचा अभ्यास केला
जातो. तर मानवी भूगोल या विषयामध्ये मानव व पर्यावरण यामध्ये असणाऱ्या
सहसंबंधांचा अभ्यास केला जातो. मानव व मानवाचे विविध व्यवसाय या
संदर्भात विविध व्यापार विषयक संकल्पना व्यापारी भूगोलात अभ्यासल्या जातात.
व्यापारी भूगोलाचा अर्थ आणि व्याख्या, व्यापारी भूगोलाचे स्वरूप, व्याप्ती आणि
विकास, उपयोजित व्यापारी भूगोलाचे महत्त्व, मानवाचा उद्योग, व्यवसाय त्यासाठी
आवश्यक बाबी या सर्व घटकांची माहिती व्यापारी भूगोलात प्राप्त होते. शिवाय
भौगोलिक पर्यावरणातील मानवी आर्थिक व्यवसाय, आर्थिक साधनसंपत्ती, मानवी
साधनसंपत्ती, औद्योगिक आणि आर्थिक विकास, पर्यटन आणि पर्यटक, व्यापार
वाहतूक व दळणवळण इत्यादी घटकांची माहिती या विषयातून प्राप्त होते. इत्यादी
दृष्टीने अनेक बाबींचा ऊहापोह या विषयात विविध उदाहरणांच्या सहाय्याने करण्यात
आला आहे. भूगोल विषयाव्यतिरिक्त इतर अनेक स्पर्धा परीक्षा, नेट/सेट परीक्षा,
यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल असाही एक प्रयत्न केला आहे.

व्यापारी भूगोलाची ओळख : 1.1 व्यापारी भूगोल-व्यापारी भूगोलाचा अर्थ आणि व्याख्या, 1.2 व्यापारी भूगोलाचे स्वरूप, व्याप्ती आणि विकास 1.3 उपयोजित व्यापारी भूगोलाचे महत्त्व 1.4 व्यापारी भूगोलाच्या अभ्यास पद्धती
भौगोलिक पर्यावरणातील आर्थिक व्यवसाय : 2.1 मानवाचे पायाभूत आर्थिक व्यवसाय- प्राथमिक व्यवसाय, द्वितीय व्यवसाय, तृतीय व्यवसाय, चतुर्थ व्यवसाय, पंचम व्यवसाय 2.2 मानवाच्या आर्थिक व्यवसाय व परिणाम करणारे घटक- अ) प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटक ब) संस्कृतिक किंवा मानवनिर्मित घटक
आर्थिक साधनसंपत्ती : 3.1 साधनसंपत्तीचा अर्थ आणि प्रकार 3.2 साधनसंपत्तीचे वर्गीकरण – नैसर्गिक, मानव निर्मित साधनसंपत्ती, संख्यात्मक व गुणात्मक 3.3 महत्वाची किवा मोठी साधनसंपत्ती – पाणी, मृदा, जंगले, ऊर्जा (मानवाच्या आर्थिक व व्यापारी कृतीशी निगडीत)
मानवी साधनसंपत्ती : 4.1 अर्थ, वैशिष्टे, फायदे आणि तोटे- अधिकत्तम लोकसंख्या, न्यूनतम लोकसंख्या, पर्याप्त लोकसंख्या 4.2 लोकसंख्येच्या सध्यकालीन घडामोडी आणि विकास – अवलंबन भार, मानवी विकास निर्देशांक, स्थलांतर आणि त्याचे परिणाम 4.3 भारतातील लोकसंख्येची प्रमुख वैशिष्टे
औद्योगिक आणि आर्थिक विकास : 5.1 आर्थिक विकासातील औद्योगिकरणाची भूमिका- अ)औद्योगिकरणाचे वर्गीकरण ब) औद्योगीकरणाच्या स्थान निश्चितीवर परिणाम करणारे घटक क) उद्योगाच्या स्थाननिश्चितीवरील वेबरचा सिद्धांत 5.2 भारतातील काही मोठे व्यवसाय – अ) शेतीवर आधारित उद्योग ब) भारतातील अ‍ॅटोमोबाईल उद्योग क) भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योग 5.3 औद्योगिक प्रदूषण.
व्यापार वाहतूक व दळणवळण : 6.1 व्यापारः व्याख्या, प्रकार, व्यापारावर परिणाम करणारे घटक, महत्वाचे व्यापारी केंद्र आणि जागतिक व्यापार संघटनेची असणारी भूमिका 6.2 वाहतुकीच्या विविध माध्यमांचे वर्गीकरण , फायदे आणि तोटे, भारतातील अलिकडील विकास- जमीनीवरील वाहतूक (रस्ते व रल्वे), जल वाहतूक -(अंतर्गत आणि सागरी), हवाई वाहतूक 6.3 दळणवळणाचे प्रकार आणि त्याचा व्यापारात होणारा उपयोग – दूरसंदेश वहन, इंटरनेट (महाजाल), भ्रमणध्वनी संच (मोबाईल).
पर्यटन व पर्यटक : 7.1 पर्यटनावर परिणाम करणारे घटक (प्राकृतिक आणि सांस्कृतिक घटक) 7.2 जग आणि भारत – पर्यटनात उद्योगात होणारी वाढ. 7.3 महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची- महाराष्ट्र पर्यटन विकासामध्ये भूमिका ग्रामीण भाग. 7.4 पर्यटन उद्योगासमोर येणार्‍या समस्या
नकाशे : 8.1 आलेख – रेषालेख व स्तंभालेख 8.2 विभाजित वर्तुळ 8.3 नकाशे – व्याख्या, नकाशाचे मूलभूत घटक,लोकसंख्या आणि छाया पद्धतीचे नकाशे, सममूल्य रेषा पद्धती.

💬

Chat with us