Your cart is empty now.
संत आणि महाराष्ट्र हे नातं अतूट आहे. वारकरी संप्रदायाच्या आचारविचारांनी अखिल मराठी जगताचं जगणं समृद्ध अन् सुगंधित केलं. संत विचार कालातीत आहेत. प्रत्येक काळात त्यांनी सकारात्मक मार्ग दाखविला. भेदाभेदाला तिलांजली देत माणसाला माणूसपण दिलं. कीर्तन परंपरेनं तर संत विचारांची पताका कायम फडकवत ठेवली. संतनगरी शेगाव येथील निवासी ह.भ.प. डॉ. श्री. हरिदास आखरे यांनी केवळ उक्तीच नव्हे, तर कृती आणि लेखणीतूनही सद्विचार मांडला. त्यांच्या दैनंदिन जगण्यातून वारकरी जीवनपद्धतीला प्रकट केलं. वारकरी तत्त्वज्ञान त्यांनी अतिशय तन्मयतेनं प्रस्तुत केलं. जगण्याचा भाग बनविलं.
विविध माध्यमांमध्ये वेळोवेळी लेखणीतून पसरलेला हा सुगंध या पुस्तक रूपात एकत्र आला आहे. अतिशय सुलभ व लाघवी भाषालंकारानं नटलेला हा संग्रह एक विचारकस्तूरी आहे!
– संदीप भारंबे,
कार्यकारी संपादक, सकाळ, विदर्भ