Your cart is empty now.
दैनंदिन जीवनात अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन चालत नाही. उलट ते प्रश्न सोडविण्यासाठी सदोदीत प्रयत्न करावे लागतात. प्रश्न जसे व्यक्तिसमोर निर्माण होतात. तसे सार्वजनिक संस्थापुढे, निरनिराळ्या संघटनापुढे, देशाच्या व राज्याच्या अथवा जिल्ह्याच्या अनेक विभागापुढे निर्माण होतात. तसेच ते विचारवंतापुढे, अभ्यासकांपुढे व विद्यार्थ्यांपुढे उभे राहतात.
एखाद्या देशासमोर विषाणूजन्य व जीवाणूजन्य आजारांचे प्रश्न पुढे उभे राहतात, ते आजार बरे होण्यासाठी तो देश सतत प्रयत्न करीत असतो इ. प्रकारचे प्रश्न असतात. सरकारपुढे बेरोजगारी, शासकीय यंत्रणा कशी सुधारावी? धान्य उत्पादन कसे वाढवावे? कौशल्यपूर्ण शिक्षण कसे द्यावे? देशाला संरक्षणक्षम कसे ठेवावे? इत्यादी सारखे प्रश्न असतात. याउलट विचारवंतापुढे व विद्यार्थ्यांसमोर व्यक्तिव्यक्तित अपप्रवृत्ती का उफाळून येतात? असा प्रश्न उभा राहतो. या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पुष्कळ प्रकारे माहिती जमवून तिचे सूक्ष्म अवलोकन करुन एकंदर परिस्थितीचा साधक-बाधक विचार करून कारणे शोधावी लागतात व उपाययोजना करावी लागते, हे सारे ‘संशोधन’ असते.