Welcome to Prashant Publications

Rs. 150.00 10% OFF
Availability: 10 left in stock

प्रिया तेंडुलकरांनी देखील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रीनायिका आपल्या साहित्यातून रंगवलेल्या आहेत; परंतु त्या कितीही आधुनिक असल्या तरीही त्या संसार, मूल, नवरा यांच्यात गुंतलेल्या आहेत. स्त्रीजीवनातील नवरास सार हा अपरिहार्य भाग असतो. याची...

  • Name : समकालीन स्त्री लेखिका : गौरी देशपांडे आणि प्रिया तेंडुलकर
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Women Studies
  • Manufacturing : March 2015
  • Barcode : 9789385021367

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

समकालीन स्त्री लेखिका : गौरी देशपांडे आणि प्रिया तेंडुलकर
- +

प्रिया तेंडुलकरांनी देखील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रीनायिका आपल्या साहित्यातून रंगवलेल्या आहेत; परंतु त्या कितीही आधुनिक असल्या तरीही त्या संसार, मूल, नवरा यांच्यात गुंतलेल्या आहेत. स्त्रीजीवनातील नवरास सार हा अपरिहार्य भाग असतो. याची स्त्रीला आवड असते त्यातून तिला कितीही दु:ख मिळाले तरी त्यापासून ती दूर जात नाही किंवा पळ काढण्याचाही प्रयत्न करीत नाही. हे प्रिया तेंडुलकरांनी आपल्या साहित्यातून व्यक्त केले आहे. मराठी साहित्यात प्रिया तेंडुलकरांना बंडखोर स्त्रीलेखिका असा शिक्का मिळालेला आहे. परंतु प्रस्तुत ग्रंथात हे मत खोडण्याचा मी प्रयत्न केला आहे. प्रिया तेंडुलकरांनी लग्नसंस्थेविषयी बंडखोर भूमिका घेतली असे म्हटले जाते. परंतु एक संशोधक अभ्यासक म्हणून त्यांच्या साहित्याचा अभ्यास करतांना मला असे काहीच दिसून आले नाही. प्रिया तेंडुलकरांनी लग्नसंस्थेविषयी बंडखोर भूमिका घेतली असती तर त्यांच्या नायिकांनी लग्नाला नकार दिला असता किंवा नवऱ्याला दुय्यम स्थान दिले असते; परंतु या स्त्रीनायिका लग्नाला नकार देत नाही. नवऱ्याच्या जाचाला सहन करणाऱ्या त्या आहेत. म्हणून प्रिया तेंडुलकरांना बंडखोर लेखिका म्हणता येणार नाही. त्यांनी केवळ स्त्रीदु:खाचा पसारा मांडून ठेवलेला आहे.स्वतंत्र स्त्रीजीवन त्यांनी उभे केलेले दिसून येत नाही; परंतु त्यांच्या साहित्यातील स्त्रीनायिकांनी स्वातंत्र्याकडे पहिलं पाऊल टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे असे येथे म्हणता येईल. पदव्युत्तर अभ्यासक्रम अभ्यासतांना प्रिया तेंडुलकरांचा ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ हा कथासंग्रह अभ्यासक्रमात होता. त्याद्वारे प्रिया तेंडुलकरांच्या साहित्याशी ओळख झाली. त्यांना एक अभिनेत्री, सामाजिक कार्यकर्ती म्हणून ओळखत होते;
परंतु त्यांच्या कथा वाचून त्या एक उत्तम लेखिका असल्याची जाणीव झाली. प्रिया तेंडुलकरांच्या कथा या काल्पनिक न वाटता आपल्या समाजातच घडणाऱ्या घटना असल्याचा भास होतो. त्यामुळे प्रिया तेंडुलकरांनी खऱ्या अर्थाने वास्तविक स्त्रीजीवन आपल्या कथांधून चित्रित केले आहे असे म्हटल्यास अतिशोयोक्ती ठरणार नाही. त्यानंतर गौरी देशपांडेंचे साहित्यही वाचण्यात आले. एखादी स्त्री एवढ्या धैर्यशील वृत्तीने समाजाची पर्वा न करता धाडसाने लेखन करते असे गौरी देशपांडेंचे साहित्य वाचून आश्चर्य वाटले. पुरुषकेंद्री समाज व्यवस्थेने मांडून दिलेल्या स्त्रीजीवनविषयक नीतीनियमांना त्यांनी झटकून लावून स्त्रीजीवनातील ‘लैंगिक स्वातंत्र्या’चा किंवा ‘लिव्ह इन टुगेदर’ या संकल्पनेचा विचार मांडलेला आहे याचे आश्चर्य वाटले. आजपर्यंत अनेक स्त्रीलेखिकांची लढाई ही समकालीन स्त्रीलेखिका : गौरी देशपांडे आणि प्रिया तेंडूलकर स्त्रीस्वातंत्र्याची होती. परंतु गौरी देशपांडेंनी लैंगिक जीवनातील स्त्री-पुरुष समानतेची मांडलेली विचारसरणी पुरुषकेंद्री समाजव्यवस्थेला धक्का देणारी आहे.

मनोगत .............................................................. 06
प्रकरण 1. 1980-90 या दशकातील स्त्रीवादी साहित्य .......... 09
1.1 गौरी देशपांडे आणि प्रिया तेंडुलकर या स्त्रीलेखिकांच्या साहित्याचा परिचय
1.2 दोन भिन्न संस्कृती प्रवाहातील या स्त्रीलेखिकांचा वारसा आणि वसा
1.3 गौरी देशपांडे आणि प्रिया तेंडुलकर यांच्या साहित्याचे विश्लेषण

प्रकरण 2. गौरी देशपांडेंच्या साहित्यातील स्त्रीजीवन .............. 54
2.1 गौरी देशपांडेंच्या साहित्यातील स्त्रीव्यक्तीरेखा
2.2 गौरी देशपांडेंच्या साहित्यातून व्यक्त होणारा पाश्चात्य संस्कृतीचा दृष्टीकोन
2.3 गौरी देशपांडेंची भाषाशैली
2.4 गौरी देशपांडेंच्या कथा-कांदबऱ्यांमधील बदललेली पारंपरिक प्रेमसंकल्पना
प्रकरण 3. प्रिया तेंडूलकरांच्या साहित्यातील स्त्रीजीवन ............ 98
3.1 प्रिया तेंडुलकरांच्या साहित्यातील स्त्रीव्यक्तीरेखा
3.2 प्रिया तेंडुलकरांच्या साहित्यातून व्यक्त होणारा भारतीय संस्कृतीचा दृष्टीकोन
3.3 प्रिया तेंडुलकरांची भाषाशैली

उपसंहार ................................................. 137

परिशिष्टे ................................................... 143

संदर्भग्रंथ

नियतकालिके, मासिके व इतर

💬

Chat with us