Your cart is empty now.
अर्थशास्त्र स्पेशल पेपर - 4 करिता सार्वजनिक आयव्यय
(र्झीलश्रळल ऋळपरपलश) हा पेपर लागू केलेला आहे. या नवीन सुधारित
अभ्यासक्रमानुसार लिहिलेले हे पुस्तक सादर करण्याचा मला अतिशय
आनंद होत आहे. या पुस्तकात विद्यापीठाच्या नव्या अभ्यासक्रमानुसार
पहिल्या प्रकरणात सरकाराची भूमिका, सार्वजनिक आयव्ययाचे स्वरूप,
व्याप्ती व महत्त्व स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे डॉ. डाल्टन यांच्या महत्तम
सामाजिक लाभाच्या सिद्धान्ताचे विवेचन केले आहे. प्रकरण दोन मध्ये
सार्वजनिक खर्चाचा, अर्थ, वर्गीकरण, तत्त्व, त्याची प्रवृत्ती, वाढीची
कारणे आणि परिणामाची माहिती देण्यात आली आहे. प्रकरण तीन
मध्ये सार्वजनिक उत्पन्नाचे मार्ग, यात कर, कराचे उद्दिष्टे, तत्त्व, कराचे
प्रकार, कर आकारण्याची तत्त्वे आणि करासंबंधीत विविध संकल्पनाचे
विश्लेषण दिलेले आहे. प्रकरण चार मध्ये सार्वजनिक कर्ज, त्याचा
अर्थ, भूमिका, प्रकार, त्यानुसार विश्लेषण, सार्वजनिक कर्जाचा भार,
परतफेडीचे मार्ग इत्यादीचे विश्लेषण देण्यात आले आहे.