Your cart is empty now.
वैदिक काळात स्त्रीला कुटुंबात व समाजात उच्च स्थान होते. नंतरच्या काळात मात्र स्त्रीला दुय्यम स्थान प्राप्त झाले. विविध समाजसुधारकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याने स्त्री शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटले. आज स्त्रिया शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात झेप घेत आहेत. हे जरी सत्य असले तरी आजही लाखो स्त्रिया शिक्षणापासून वंचित आहेत. बलात्कार, कुमारीमाता, स्त्रीभृणहत्या, हुंउाबळी, घटस्फोट, मारझोड अशा अनंत संकटांशी स्त्री लढा देत आहे. याचा कारणे समाज व संस्कृतीच्या मूळाशी आहेत. स्त्रीला मासिक पाळी, गर्भधारणा, प्रसुती, रजोनिवृत्ती या स्थित्यंतरांमधून जावे लागते. प्रत्येक अवस्थेत स्त्रवणार्या संप्रेरकांमुळे तिला पुरुषांपेक्षा कितीतरी पटीने अधिक शारीरिक, मानसिक व भावनिक ताण-संघर्षांचा सामना करावा लागतो. त्यादृष्टीने स्त्री-पुरुषांची शरीर रचना, तिचे शारीरिक व मानसिक आरोग्य, आरोग्यावर परिणाम करणारे घटक, स्त्री आणि पुरुष दोघांनीही समजून घेऊन स्त्रीला प्रत्येक टप्प्यावर समजून घेतले, तिला आधार दिला तर तिचा त्रास, येणारा ताण ती सहजपणे यांचा सामना करु शकेल हा विचार या पुस्तक लेखनामध्ये केलेला आहे. स्त्रियांची मनोसामाजिक भूमिका, स्त्री-स्वभावाची वैशिष्ट्ये आणि वर्तन, स्त्रियांची विविध क्षेत्रातील संपादणूक, आधुनिक स्त्री व नैतिकता-बदलते संदर्भ इत्यादी मुद्यांवर येथे विवेचन केले आहे.