Welcome to Prashant Publications

Rs. 185.00
Availability: 10 left in stock

स्थूल अर्थशास्त्र हे पुस्तक चार घटकांत विभागले असून पहिला घटक हा समग्रलक्षी अर्थशास्त्राचा परिचय देणारा आहे. दुसरा घटक हा राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित आहे. तिसरा घटक उपभोग फलन आणि चौथा...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

स्थूल अर्थशास्त्र
- +

स्थूल अर्थशास्त्र हे पुस्तक चार घटकांत विभागले असून पहिला घटक हा समग्रलक्षी अर्थशास्त्राचा परिचय देणारा आहे. दुसरा घटक हा राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित आहे. तिसरा घटक उपभोग फलन आणि चौथा घटक गुंतवणूक फलनाचा आहे.

लेखकाने वरील चारही घटकांची मुद्देसूद मांडणी केली आहे यात राष्ट्रीय उत्पन्न संकल्पना, राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती, उपभोग फलन, केन्सचा उपभोग विषयक मानसशास्त्रीय नियम, निरपेक्ष उत्पन्न परिकल्पना, सायमन कुझनेटचे अनुभवाधिष्ठित विवेचन, ड्युसेनबेरीची सापेक्ष उत्पन्न परिकल्पना, मिल्टन फ्रीडमनची स्थायी उत्पन्न परिकल्पना, मोदिग्लियानी यांची जीवन चक्र परिकल्पना, गुंतवणूक फलन, भांडवलाची सीमांत कार्यक्षमता, गुंतवणूक गुणक तत्व यांची विस्तृत मांडणी केली आहे. संपूर्ण मांडणी विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत केली आहे.

१. समग्रलक्षी अर्थशास्त्राचा परिचय...................................५
(Introduction to Macroeconomics)
१.१ समग्रलक्षी : अर्थ, स्वरूप आणि उद्दिष्ट्ये
१.२ समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती, महत्त्व आणि मर्यादा
१.३ समग्रलक्षी अर्थशास्त्राचा विकास
१.४ सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्रातील फरक

२. राष्ट्रीय उत्पन्न...................................................३०
(National Income)
२.१ राष्ट्रीय उत्पन्न : अर्थ आणि व्याख्या
२.२ राष्ट्रीय उत्पन्न संकल्पना व त्यांचे मापन
२.३ राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह
२.४ राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती

३. उपभोग फलन..................................................७२
(Consumption Functions)
३.१ उपभोग फलनाचा अर्थ आणि उत्पन्न यांच्यातील संबंध
३.२ केन्सचा उपभोगविषयक मानसशास्त्रीय नियम
३.३ केन्सच्या नियमाचा सूचितार्थ
३.४ उपभोग फलनाचे वैकल्पिक सिद्धांत/परिकल्पना
३.५ उपभोग फलनात वाढीसाठी उपाय

४. गुंतवणूक फलन...............................................१०३
(Investment Function)
४.१ गुंतवणूक फलन : अर्थ
४.२ गुंतवणुकीचे प्रकार
४.३ भांडवलाची सीमांत कार्यक्षमता
४.४ भांडवलाची सीमांत कार्यक्षमतेवर प्रभाव टाकणारे घटक
४.५ गुंतवणूक गुणक तत्त्व