Welcome to Prashant Publications

Rs. 220.00 10% OFF
Availability: 10 left in stock

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी पदवी अभ्यासक्रमासाठी नवीन शैक्षणिक धोरण श्रेयांक आणि सत्र पद्धतीचा अवलंब केला आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी मानवविद्या शाखेअंतर्गत ‘द्वितीय अर्थशास्त्र’...

  • Name : स्थूल अर्थशास्त्र
  • Vendor : Prashant Publication
  • Type : SYBA
  • Manufacturing : December 2025
  • Barcode : 9789347157530
Categories:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

स्थूल अर्थशास्त्र
- +

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी पदवी अभ्यासक्रमासाठी नवीन शैक्षणिक धोरण श्रेयांक आणि सत्र पद्धतीचा अवलंब केला आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी मानवविद्या शाखेअंतर्गत ‘द्वितीय अर्थशास्त्र’ विषयामध्ये Major - Major Core म्हणून सत्र -4 साठी ‘स्थूल अर्थशास्त्र’Eco 251 MJ(Th) हा विषय 4 क्रेडीटसाठी लेखी पेपर म्हणून पदवी स्तरावर निश्चित केलेला आहे. ‘स्थूल अर्थशास्त्र’ या पुस्तकातील प्रकरण-1 समष्टी अर्थशास्त्राची ओळख : स्थूल/ समष्टी अर्थशास्त्र: अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती, स्थूल/ समष्टी अर्थशास्त्राचे महत्त्व आणि मर्यादा, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल/ समष्टी अर्थशास्त्र यातील फरक याची माहिती देलेली आहे. तर या पुस्तकातील प्रकरण- 2 रे उपभोग, बचत आणि गुंतवणूक : उपभोग फलन: अर्थ, विविध संकल्पना APC, MPC, उपभोग फलनाचा मानसशास्त्रीय नियम आणि उपभोग फलनावर परिणाम करणारे घटक, बचत अर्थ: विविध संकल्पना APC, MPC, गुंतवणूक अर्थ आणि गुंतवणुकीचे प्रकार, भांडवलाची सीमांत कार्यक्षमता, गुणकाची संकल्पना, प्रवेगक तत्त्व या मुद्यांचे स्पष्टीकरण दिलेले आहे. तसेच प्रकरण- 3 पैसा: पैशाचा अर्थ आणि कार्ये, पैशाची मागणी: पारंपरिक दृष्टिकोन आणि केनेशियन दृष्टिकोन, पैशाचा पुरवठा: व्यापारी बँकांद्वारे पतनिर्मिती, पत नियंत्रणाच्या पद्धती, रिझर्व्ह बँकेचा पैशाच्या पुरवठ्याच्या मापनाचा दृष्टिकोन, पैशाचे मूल्य: पैशाचा संख्यात्मक सिद्धांत, रोख शिल्लक दृष्टिकोन यासबंधी सविस्तर माहिती स्पष्टीकरण केले आहे.
तसेच शेवटचे प्रकरण 4 थे व्यापार चक्र: मध्ये व्यापार चक्राचा अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्ये, व्यापार चक्राचे टप्पे, व्यापार चक्राचे परिणाम, व्यापार चक्रावर नियंत्रण: मौद्रिक उपाययोजना आणि राजकोषीय उपाययोजना याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे, तसेच प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाने मुल्यांकन नमूद केलेल्या आकृतीबंधानुसार परिक्षेच्या तयारीच्या दृष्टीने प्रश्न दिलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक विद्यापीठातील कार्य क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल हा प्रामाणिक हेतू समोर ठेवून पुस्तकाचे आम्ही लिखाण केले आहे.     

1. समग्रलक्षी अर्थशास्त्राची ओळख.........................................7
1.1 स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ व व्याख्या, स्वरुप आणि व्याप्ती
1.2 समग्रलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व आणि मर्यादा
1.3 सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल/समष्टी अर्थशास्त्र यातील फरक

2. उपभोग, बचत आणि गुंतवणूक.........................................34
2.1 उपभोग फलन : अर्थ, विविध संकल्पना, अझउ, चझउ, उपभोग फलनाचा मानसशास्त्रीय नियम आणि उपभोग फलनावर परिणाम करणारे घटक
2.2 बचत फलन : बचत - अर्थ; विविध संकल्पना - अझड, चझड
2.3 गुंतवणूक : अर्थ आणि गुंतवणुकीचे प्रकार, भांडवलाची सीमांत कार्यक्षमता, गुणकाची संकल्पना, प्रवेगक तत्त्व

3. पैसा......................................................................80
3.1 पैशाचा अर्थ आणि पैशाची कार्ये
3.2 पैशाची मागणी: पारंपरिक दृष्टिकोन आणि केन्सशियन दृष्टिकोन
3.3 पैशाचा पुरवठा: व्यापारी बँकांद्वारे पतनिर्मिती, पत नियंत्रणाच्या पद्धती, रिझर्व्ह बँकेचा (ठइख) पैशाच्या पुरवठ्याच्या मापनाचा दृष्टिकोन
3.4 पैशाचे मूल्य: पैशाचा संख्यात्मक सिद्धांत, रोख शिल्लक दृष्टिकोन

4. व्यापारचक्र ........................................................127
4.1 व्यापारचक्राचा अर्थ व व्याख्या आणि व्यापारचक्राची वैशिष्ट्ये
4.2 व्यापारचक्राच्या अवस्था
4.3 व्यापारचक्राचे नियंत्रण : चलनविषयक साधने व वित्तीय साधने

संदर्भ ग्रंथसूची...............................................................160

💬

Chat with us