Welcome to Prashant Publications

Rs. 235.00 10% OFF
Availability: 10 left in stock


भूगोल ही पृथ्वी, पर्यावरण आणि मानव यांच्यातील परस्परसंबंधांचा व्यापक अभ्यास करणारी ज्ञानशाखा आहे. त्यामध्ये हवामानशास्त्र ही वातावरणातील विविध प्रक्रिया, हवामानातील बदल आणि त्यांचा मानव व पर्यावरणावर होणारा परिणाम यांचा अभ्यास...

  • Name : हवामानशास्राची मूलतत्त्वे आणि प्रात्यक्षिके (Fundamentals of Climatology and Practicals)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : TYBA | Sem - V | Arts
  • Manufacturing : July 2026
  • Total Pages : 150 Pages

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

हवामानशास्राची मूलतत्त्वे आणि प्रात्यक्षिके (Fundamentals of Climatology and Practicals)
- +


भूगोल ही पृथ्वी, पर्यावरण आणि मानव यांच्यातील परस्परसंबंधांचा व्यापक अभ्यास करणारी ज्ञानशाखा आहे. त्यामध्ये हवामानशास्त्र ही वातावरणातील विविध प्रक्रिया, हवामानातील बदल आणि त्यांचा मानव व पर्यावरणावर होणारा परिणाम यांचा अभ्यास करणारी अत्यंत महत्त्वाची शाखा आहे. आज हवामान बदल, जागतिक तापमानवाढ, अतिवृष्टी, दुष्काळ, चक्रीवादळे आणि इतर तीव्र हवामान घटनांमुळे हवामानशास्त्राचे महत्त्व अधिक वाढले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या विषयाचा अभ्यास केवळ परीक्षेपुरता मर्यादित न ठेवता वैज्ञानिक दृष्टिकोनातून करणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) नुसार कौशल्याधारित आणि अनुभवाधारित शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर “हवामानशास्त्राची मूलतत्त्वे आणि प्रात्यक्षिके” हे पुस्तक पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहे. या पुस्तकात हवामानशास्त्राच्या मूलभूत संकल्पना, वातावरणाची ऊर्जा प्रणाली, वातावरणीय अभिसरण, आर्द्रता, वृष्टी, हवामान बदल, जागतिक तापमानवाढ यांसारख्या विषयांचे शास्त्रीय व सोप्या भाषेत विवेचन केले आहे. तसेच हवामान निरीक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांची माहिती, त्यांचा वापर, हवामान नकाशांचे वाचन व विश्लेषण, समभार रेषा प्रारूपे आणि भारतीय हवामान विभागाच्या (IMD) हवामान अहवालांचा अभ्यास यांचा प्रात्यक्षिक स्वरूपात समावेश करण्यात आला आहे.
हे पुस्तक तयार करताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचा, विविध संदर्भग्रंथांचा, भारतीय हवामान विभागाच्या साहित्याचा तसेच अध्यापन व संशोधनातील अनुभवाचा आधार घेतला आहे. विषयाची मांडणी विद्यार्थ्यांना सहज समजेल, त्यांची संकल्पना स्पष्ट होईल आणि प्रात्यक्षिक कौशल्यांचा विकास होईल.

विभाग पहिला
हवामानशास्राची मूलतत्वे
प्रकरण 1.......................................................................9
हवामानशास्त्राची ओळख
(Introduction to Climatology)
1.1 हवामानशास्त्र व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती
(Definition, Nature and Scope)
1.2 हवा आणि हवामान
(Weather and Climate)
1.3 हवा आणि हवामानाचे अंगे
(Elements of Weather and Climate)
1.4 हवामानशास्त्राच्या शाखा
(Branches of Climatology)

प्रकरण 2.....................................................................22
पृथ्वीच्या वातावरणाची ऊर्जा प्रणाली
(Energy System of Earth Atmosphere)
2.1. सौर प्रारण आणि पृथ्वी सूर्य संबंध
(Solar radiation and Earth-Sun relationship)
2.2. सौरशक्ती आणि तिची स्थलपरत्वे विविधता
(Insolation and its spatial variation)
2.3 भू - उत्सर्जन
(Terrestrial Radiation)
2.4 पृथ्वीच्या उष्णतेचा ताळेबंद
(Earth's Heat Budget)

प्रकरण 3.....................................................................47
वातावरणीय अभिसरण आणि हवा प्रणाली
(Atmospheric Circulation and Weather Systems)
3.1 वातावरणीय वायुभार पट्टे
(Atmospheric Pressure Belts)
3.2 ग्रहीय वारे प्रणाली
(Planetary wind systems)
3.3 वातावरणाचे सामान्य अभिसरण
(General Circulation of the Atmosphere)

प्रकरण 4.....................................................................62
वातावरणीय आर्द्रता आणि वृष्टी
(Atmospheric Moisture and Precipitation)
4.1 आर्द्रता: संकल्पना आणि मोजमाप
(Humidity: Concept and Measurement)
4.2 सांद्रीभवन क्रिया
(Condensation Process)
4.3 मेघांचे/ढगांचे प्रकार आणि वर्गीकरण
(Cloud types and classification)
4.4 वृष्टीची रूपे
(Forms of precipitation)
4.5 पर्जन्य निर्मिती क्रिया : आरोह, प्रतिरोध व आवर्त पर्जन्य
(Mechanisms of rainfall: Convectional, Orographic and Cyclonic)

प्रकरण 5.....................................................................84
हवामान बदल
(Climate Change)
5.1. हवामान विविधता आणि हवामान बदल
(Climate Variability vs. Climate Change)
5.2 हवामान बदलाचे पुरावे
(Evidence of Climate Change)
5.3. हवामान बदलाची नैसर्गिक व मानवी करणे
(Natural and Anthropogenic Causes of Climate Change)
5. 4. जागतिक तापमान वाढ
(Global Warming)

विभाग दुसरा
हवामानशास्राची प्रात्यक्षिके
प्रकरण 1....................................................................108
हवेच्या स्थितीदर्शक उपकरणांची ओळख
(Introduction to Weather Instruments)
1.1 हवेची स्थितीदर्शक उपकरणे : रचना, कार्य आणि उपयोग
(Weather Instruments: Mechanisms, Functions and Usage)
1.1.1 साधे तापमापक (Simple Thermometer)
1.1.2 आर्द्रतालेखक (Hygrograph)
1.1.3 पर्जन्य मापक (Rain Guage)
1.1.4 वायुभारलेखक (Barograph)
1.1.5 वायु दिशादर्शक (Wind Vane)
1.1.6 वायुवेगमापक (Cup Anemometer)
1.2 प्रात्यक्षिक कार्ये
(Practical Activities)
1.2.1 हवेच्या स्थितीदर्शक उपकरणांचे प्रात्यक्षिक (Demonstrating the use of Weather Instruments)
1.2.2 हवामानशास्त्रीय नोंदी आणि अर्थान्तरण (Recording and Interpreting Climatological Reading)

प्रकरण 2....................................................................119
समभार रेषा प्रारूपे
(Isobaric Patterns)
2.1 समभार रेषा प्रारूपे व त्यांच्याशी संबंधित हवेची स्थिती
(Drawing of Isobaric Patterns and associated Weather)
2.1.1 आवर्त (Cyclone)
2.1.2 प्रत्यावर्त (Anticyclone)
2.1.3 हवेच्या जास्त भाराची पाचर (Ridge or Wedge)
2.1.4 हवेच्या कमी भाराची गर्ता (Trough)
2.2 दुय्यम आवर्त आणि कोल
(Secondary depression and Col)

प्रकरण 3....................................................................127
हवेची स्थितीदर्शक नकाशा
(Weather Map)
3.1 भारतीय हवामान विभागाच्या दैनंदिन हवेच्या स्थितीदर्शक नकाशाची आळख
(Introduction to IMD Weather Maps/Reports)
3.2 भारतीय दैनंदिन हवेच्या स्थितीदर्शक नकाशातील सांकेतिक चिन्हे व खुणा
(Conventional Signs and Symbols in Daily Weather Report used by IMD)
3.3 भारतीय दैनंदिन हवेच्या स्थितीदर्शक नकाशाचे वाचन
(Interpretation of Indian Daily Weather Maps)
3.3.1 उन्हाळा ऋतू (Summer Season)
3.3.2 पावसाळा ऋतु (Monsoon Season)
3.3.3 हिवाळा ऋतू (Winter Season)
3.4 हवेची स्थितीदर्शक ॲपस्‌‍
(Weather Applications)
3.4.1 मौसम (Mausam)
3.4.2 मेघदूत (Meghdoot)
3.4.3 दामिनी (Damini)

संदर्भ ग्रंथसूची .............................................................149

💬

Chat with us