Welcome to Prashant Publications

Rs. 110.00 10% OFF
Availability: 10 left in stock


कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार अभ्यासक्रम लागू झाला आहे. त्या अनुषंगाने अभ्यासक्रमाची पुर्नरचना विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाकडून करण्यात आला. तृतीय वर्ष कला मराठी विषयाच्या...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

‌‘सूड‌’ - एक आकलन
- +


कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार अभ्यासक्रम लागू झाला आहे. त्या अनुषंगाने अभ्यासक्रमाची पुर्नरचना विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाकडून करण्यात आला. तृतीय वर्ष कला मराठी विषयाच्या अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेला असून पाचवे सत्रासाठी वाङ्मय प्रकार - कांदबरी (सूड - बाबुराव बागूल) याचा समावेश करण्यात आलेला आहे. 
कांदबरी हा वाङ्मय प्रकार जीवन प्रवाह बरोबर चालणारा, बदलत जाणारा साहित्य प्रकार आहे. त्यामुळेच कांदबरीचा अनेक दिशांनी आपणास अभ्यास करता येतो. कांदबरीच्या घडणीमध्ये जीवनविषयक जाणिवांचा सहभाग स्पष्ट होतो. त्यामुळेच कांदबरी हा वाङ्मय प्रकार सर्वात महत्वाचा प्रमुख वाङ्मय प्रकार मान्य झाला आहे. कांदबरीची लोकप्रियेतेची अनेक कारणे आहेत. ती म्हणजे कांदबरीने कविता, कथा, नाटक चरित्र, आत्मचरित्र विविध आदी या सर्व वाङ्मय प्रकाराची आणि वाङ्मय वाचकांची एकात्मता साधलेली आहे. त्यातून कांदबरीने आपले स्थान निश्चित केले आहे. कादंबरी वाङ्मय प्रकाराचा अभ्यास करताना लेखकाची जीवनदृष्टी महत्वाची मानली जाते, या जीवनदृष्टीच्या व्यापकतेवर, सखोलपणावर आणि मौलीकतेवर कादंबरीचे महत्व अवलंबून असते. लेखक कादंबरीत काही व्यक्तीच्या द्वारा जीवनाचे आपले निरीक्षण व आकलन प्रकट करीत असतो. समाजजीवनाचे दीर्घकालिन जीवनचित्रण करण्याकडे कादंबरीकार प्रयत्न करीत असतो. साहित्यातील एक समृद्ध दालन म्हणजे मराठी कादंबरीचे विश्व होय.
बाबुराव बागूलांनी ‘मरण स्वस्त होत आहे, जेव्हा मी जात चोरली आहे ‘सूड’ इत्यादी कथा, कविता, कांदबऱ्याच्या माध्यमातून समाजातील वास्तव जीवनाचा वेध घेतला आहे. त्याच्या लिखाणाची गुणात्मक उंची व मूल्ये हि आजच्या साहित्यात सर्वोच्च आहेत. त्यापूर्वी साहित्यातील दलित साहित्य प्रवाहाचे ते शिल्पकारही ठरतात. मराठी साहित्यातील आपल्या वैशिष्ट्येपूर्ण नवप्रवाहातल्या धगधगत्या विचारांनी वेगळा चिंतनशील प्रवाह निर्माण करणारे नवे आक्रमक सर्जनशील साहित्य जगाला ओळख करून देणारे बाबुराव बागूल श्रेष्ठ लेखक ठरले आहेत. लेखक विचारवंत, साहित्यिक, समिक्षक असे त्यांना गौरविण्यात आले आहे. बाबुराव बागूल यांची ‘सूड’ कादंबरी मार्च 1970 मध्ये प्रकाशित झाली असून कथा, कांदबरीचा एक दुसरा नमुना आहे. ‘सूड’ हि कांदबरी वाड्मयातील 
एक अंत्यत परिणामकारक जहाल अशी कांदबरी आहे. निरागस, निष्पाप, कोवळ्या जानकीच्या शारीरिक शोषणाची व त्यातून निर्माण झालेल्या सुडाच्या प्रवासाची तसेच अत्याचारामुळे पिळलेल्या जानकीच्या उध्वस्त मनाची व आत्मशोधाची एक कहाणी आहे. कांदबरीत शोषित, उपेक्षित झोपडपट्टीतील फुथपाथ वरील भणंग जनजीवनाचे चित्रण करणारे लेखक म्हणून त्याची ओळख होते. प्रभावी व विद्रोही भाषाशैली जीवन प्रसंग चित्रण, कारुण्य आणि क्रूरता रेखाटन हे त्याच्या लेखनाचे विशेष गुण होते. त्यांनी लिहिलेल्या कथा व कांदबरीत गावकुसाबाहेर राहणाऱ्या समाजाच्या सामाजिक जाणिवांच व वेदनांचे वर्णन करणारे आहेत. स्रीप्रधान लेखन हा देखिल त्याच्या लिखाणाचा महत्वाचा भाग आहे. ‘सूड’ कांदबरीने बाबूराव बागूल यांनी तीच्यावर ओढवलेल्या प्रसंगाच चित्रण केलेलं आहे. या कांदबरीतील स्री व्यक्तिरेखा हे समाजातील स्रीयांच्या शोषित पीडित स्रीच्या सामाजिक स्थितीचे चित्रण करणारे आहे. 

1. कादंबरी : संकल्पना व स्वरूप ..........................................11
1.1 कादंबरी : संकल्पना व स्वरूप
1.2 कादंबरी : व्याख्या
1.3 कादंबरी : उत्पत्ती
1.4 कादंबरी : वाटचाल

2. मराठी कादंबरी : घटक .................................................30
2.1 कादंबरी : घटक
2.2 कादंबरी : इतर वाङ्मयप्रकार
2.3 कांदबरी : प्रकार
2.4 कादंबरी : वेगळेपण व भाषाशैली

3. ‌‘सूड‌’ - बाबुराव बागूल.................................................38
3.1 बाबुराव बागूल : परिचय
3.2 ‌‘सूड‌’ कादंबरी : आशय
3.3 ‌‘सूड‌’ कादंबरी : व्यक्तिरेखा
3.4 ‌‘सूड‌’ कादंबरी : वेगळेपण
4. ‌‘सूड‌’ कादंबरी : घटक ..................................................66
4.1 ‌‘सूड‌’ कादंबरी : कथानक
4.2 ‌‘सूड‌’ कादंबरी : संवाद
4.3 ‌‘सूड‌’ कादंबरी : संघर्ष
4.4 ‌‘सूड‌’ कादंबरी : भाषाशैली

💬

Chat with us