Your cart is empty now.
“1991 पासूनची भारतीय अर्थव्यवस्था’ हा विषय ज्यांनी Minor म्हणून निवडला आहे. त्यांना भारतीय अर्थव्यवस्थेच्या दोन कालखंडाची अभ्यासपूर्ण माहिती समजून घेता येणार आहे. त्यात पहिला कालखंड हा 1951 ते 1990 व दुसरा कालखंड 1991 ते आतापर्यंत. हे दोन कालखंड भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाची व्युहरचना कशी आहे यांची अभ्यासपूर्ण माहिती देतात. त्यात नियोजन आयोग व निती आयोग महत्त्वाच्या संस्थाची भूमिका अभ्यासायला मिळते. कारण भारतीय अर्थव्यवस्थेसाठी 1991 हे वर्ष एक ऐतिहासिक “संरचनात्मक बदलांचा वळणबिंदू” म्हणून अधोरेखित केले गेले आहे. कारण 1990-91 मध्ये निर्माण झालेल्या गंभीर आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने आर्थिक उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरण या त्रिसूत्रीवर आधारीत आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम स्वीकारला व यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची रचना, कार्यपद्धती, वित्तीय संस्था, चलनविषयक धोरण, परकीय व्यापार, आणि केंद्र-राज्य आर्थिक संबंध 4 | प्रशांत पब्लिकेशन्स
अर्थव्यवस्थेचा अभ्यास हा केवळ आर्थिक धोरणाचा अभ्यास न राहता भारताच्या विकास प्रवासातील संरचनात्मक परिवर्तन समजून घेण्याचे हे क्रमिक पुस्तक महत्वाची भूमिका बजावेल.
या पुस्तकात आपण चार महत्त्वाच्या प्रकरणाची सविस्तर व सोप्या भाषेत अद्ययावत आकडेवारीसह मांडणी केली आहे. त्यात भारतीय वित्तिय प्रणालीची ओळख, भाववाढ आणि मध्यवर्ती बँकेचे चलन विषयक धोरण, भारताच्या विदेशी व्यापार आणि जागतिकीकरण आणि वित्तीय संघवाद आणि वित्त आयोग इत्यादी. या क्रमिक पुस्तकाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे आर्थिक संकल्पना, धोरणे आणि संस्थात्मक बदल यांची मांडणी सोप्या, शास्त्रीय आणि विश्लेषणात्मक पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांना विषयाचे मूलभूत आकलन होण्याबरोबर स्पर्धापरीक्षा, संशोधन आणि अध्यापनासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.