Welcome to Prashant Publications

Rs. 120.00 10% OFF
Availability: 10 left in stock

समाजातील प्रत्येक जाती, धर्म तसेच आर्थिक आणि सामाजिक स्तरातील
कुटूंबामध्ये स्त्रियांवर हिंसाचार होतो. मारहाण करणे, शारिरीक दुखापत करणे
म्हणजेच हिंसाचार अशी आपल्याकडे समजुत आहे. परंतु महिलांवरील हिंसा
केवळ शारिरीक दुखापत किंवा मारहाणीपुरती मर्यादित...

  • Name : महिला आणि कौटुंबिक हिंसाचार
  • Vendor : Prashant Publication
  • Type : MARATHI | Reference
  • Manufacturing : January 2015
  • Total Pages : 114 Pages
  • Barcode : 9789382528784
Categories:
Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

महिला आणि कौटुंबिक हिंसाचार
- +

समाजातील प्रत्येक जाती, धर्म तसेच आर्थिक आणि सामाजिक स्तरातील
कुटूंबामध्ये स्त्रियांवर हिंसाचार होतो. मारहाण करणे, शारिरीक दुखापत करणे
म्हणजेच हिंसाचार अशी आपल्याकडे समजुत आहे. परंतु महिलांवरील हिंसा
केवळ शारिरीक दुखापत किंवा मारहाणीपुरती मर्यादित नसून त्याबरोबरच मानसिक,
भावनिक, शाब्दीक, लैंगिक, आर्थिक अशा प्रकारची हिंसा देखील केली जाते.
कुटूंबाचा केंद्रबिंदू असलेली महिला आज घरगुती छळाच्या ओझ्याखाली दबलेली
दिसून येते. पतीची व्यसनाधिनता, त्याने घातलेले निर्बंध, पितृसत्ताक पद्धतीमुळे
आलेली अरेरावी, पुरूषप्रधान संस्कृतीमुळे दुखावलेला पुरूषी अहंकार आणि
आपल्या समाजात अजुनही कमीपणा घेण्याची स्त्रियांची मानसिकता, स्त्रीयांची
सहनशील वृत्ती हे सर्व घटक महिलांवर कौटुंबिक हिंसाचार वाढण्यास कारणीभूत
आहेत. स्त्रियांना त्यांच्या ‘स्त्रित्वामुळे’ म्हणजे स्त्री असण्यामुळेच निकटवर्तिंयाकडून
होणाऱ्या अनेक प्रकारच्या शारिरीक, मानसिक, लैंगिक, भावनिक, शाब्दीक
तसेच आर्थिक छळाला सामोरे जावे लागते. त्यामुळे आज आपल्या समाजात
दिवसेंदिवस स्त्रीयांचे एकुण लोकसंख्येतील प्रमाण घटत चालले आहे. याशिवाय
परिव्यक्ता, घटस्फोटीत, संकटग्रस्त, हुंडाग्रस्त महिलांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत
आहे. परिणामी स्त्रीयांवर होणारा घरगुती हिंसाचाराची ‘सामाजिक समस्या’ म्हणून
व्याप्ती वाढतेच आहे.
सदर विषयावर आजवर फारसे संशोधन झालेले नाही. त्यामुळे नवीन तथ्य,
पैलू उजेडात आणणे गरजेचे आहे. ‘महिला आणि कौटूंबिक हिंसाचार’ या पुस्तकाने
नवीन पैलू उजेडात येऊन महिलांच्या समस्यांची गुंतागुंत समाजासमोर परिपूर्णरित्या
येईल. संशोधन करू इच्छिणारे संशोधक, जिज्ञासू विद्यार्थी, प्राध्यापक, स्वयंसेवी
संस्था, सामाजिक कार्यकर्ते, शासन अधिकारी, पोलीस यंत्रणा, समुपदेशक
यांचेबरोबर सर्वसामान्य जनमानसाला देखील सदरील पुस्तकाचा उपयोग होईल
याची खात्री आहे.

कौटुंबिक हिंसाचाराविषयी / 7-30

कौटुंबिक हिंसाचारग्रस्त महिलांची पार्श्वभुमी / 31-43

कौटुंबिक हिंसाचाराची कारणमिमांसा / 44-69

कौटुंबिक हिंसाचारग्रस्त महिलांची सद्य:स्थिती / 70-83

कौटुंबिक हिंसाचारग्रस्त महिलांच्या विविध समस्या / 84-103

कौटुंबिक हिंसाचाराबाबत पिडीत महिलांचा दृष्टिकोन / 104-110

संदर्भ ग्रंथसूची / 111-112

💬

Chat with us