Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

मराठी

कंदीलक्लब… आठवणींचं गाठोडं

  • ISBN: 9789390483976
  • KandilClub Athavaninch Gathod
  • Published : January 2021
  • Book Language : Marathi
  • Edition : First
  • Format : Paperback
  • Pages : 108
  • Category:
  • Download Book Ebook Link

Rs.150.00

शुभेच्छांपर चार शब्द…

चंद्रकांत (चंदा) भंडारी… शिक्षणासह साहित्यक्षेत्रात रमणारा माझा बाल/वर्गमित्र. गेल्या पन्नास / पंचावन्न वर्षांपेक्षा जास्त काळ आम्ही ‘एकत्र’ आहोत, जरी आमची नोकरी वेगळी असली तरी ! असो. तर चंद्रकांतने ‘कंदीलक्लब’ (आठवणींचं गाठोडं) ही कादंबरी ‘सस्नेह भेट’ म्हणत, जो मान मला दिला तो खरंच आनंद देणारा आहे.
कादंबरी पूर्ण वाचून झाली अन् मित्राच्या लेखनाची ‘धार’ कळली. नायक सूर्यकांतमध्ये मी खूपदा चंद्रकांत शोधत राहिलो अन् एकदोन कॅरेक्टरमध्ये स्वत:सह माझी आई.
खरं सांगू जिथे जिथे ‘आई’ समोर आली तिथे तिथे माझे डोळे भरून आले. अन् चंद्रकांतने तिच्या बद्दल जे जे टिपलं ते ते वाचून मन थक्क झाले.
आमचं अन् ‘कंदीलक्लब’मधील अनेक भिडूंचे शालेय अन् नंतरचे भावविश्व, ज्या घटना प्रसंगांमध्ये टिपलेय ते वाचताना मी सारखा भूतकाळात जात एक वेगळाच आनंद उपभोगत होतो.
हिंदी सिनेमा, किशोर-मुकेश-रफीची गाणी, मनाचे श्लोक, कबीरवाणी आणि एकूणच विविध खेळ यांच्यावरचं ‘प्रेम’ चंद्रकांतने खूपच छान रंगवलेय. सर्वात आवडलं ते कुंदाचं कॅरेक्टर.. जे वाचताना मी रंगून गेलो. तिची ‘डायरी’ तर भन्नाटच, तिचं अन् सूर्यकांतचं नातं तर फारच तरल !
‘कंदीलक्लब’ मधील अनिल, कुंदा, युसुफ, इम्रान, श्रुती, जगन्नाथ या सर्व भिडूंबद्दल मी काय सांगावं? वाचकांनी मनापासून वाचत त्यांचं ‘विश्व’ अनुभवावं. कादंबरीत ‘साने गुरुजी’ ज्या शब्दांमध्ये मला भेटले तेव्हा गुरुजींचे (व एकूणच सर्व शिक्षकांचे) कार्य डोळ्यासमोर येत, ‘गुरुजी आमच्या गल्लीतले एक होते’ याचाही अभिमान वाटला.
पन्नासएक वर्षांपूर्वी जे ‘शालेय जीवन’, आम्ही आनंदात अनुभवले ते ‘कंदीलक्लब’ द्वारा पुन्हा शब्दांतून उभे करण्याची छानशी कला चंद्रकांतला जी जमली ती सुरेख, छान !
शुभेच्छांसह…

– अनिल बाबुराव शिंपी (खैरनार)
निवृत्त उपविभागीय अभियंता,
पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र शासन

KandilClub Athavaninch Gathod

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कंदीलक्लब… आठवणींचं गाठोडं”
WordPress › Error

There has been a critical error on this website.

Learn more about troubleshooting WordPress.