-
‘घुमान’ मधील बाबा नामदेवजी
Rs.120.00घुमान आणि संत नामदेव यांचे पारस्परिक नाते असे विलक्षण आहे. नामदेवांच्यामुळेच घुमान वसले. काही एक विशिष्ट जीवनकार्य मनाशी निश्चित करुन चांगले वीस वर्षे नामदेव तिथे राहिले. तिथल्या जनसमुदायाशी समरस झाले. तिथली भाषा त्यांनी आत्मसात केली. त्या भाषेत पदरचना करुन आपली आध्यात्मिक अनुभूती त्यांनी शब्दांकित केली. समाजात नवे क्रांतिकारी विचार पेरले. तिथे त्यांना महंतपद प्राप्त झाले. त्यांचा शिष्यपरिवार वाढत गेला. त्यांचे मंदिर बनले. महाराष्ट्रात विठ्ठलाच्या भक्तीने वेडा होऊन नाचणारा एक भावुक भक्त दूरदेशी पंजाबात जाऊन ख्यातकीर्त महात्मा बनला. घुमान या सगळ्याचे साक्षी बनून राहिले.
– डॉ. निशिकांत मिरजकर
‘Ghuman’ Madhil Baba Namdevji
-
‘दासबोधा’तील मानवी मूल्ये
Rs.150.00मानवी जीवनाच्या साफल्यासाठीच ‘दासबोधा’ची रचना समर्थांनी केली. ‘दासबोधा’तील समर्थांनी सांगितलेली चतु:सूत्री म्हणजे सुखी, संपन्न, समर्थ व सफल जीवनाची गुरुकिल्लीच होय. समर्थकृत ‘दासबोध’ हा समर्थ संप्रदायाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. ‘दासबोधा’सारखा सार्वकालिक श्रेष्ठ ग्रंथ लिहून संत रामदासांनी स्वत:ची नाममुद्रा मराठी संतसाहित्यात उमटवली. सध्याच्या धावपळीच्या काळात मानवी नातेसंबंधात आलेला दुरावा, अत्याधिक भोगवादाकडे झुकलेले समाजमन, त्यागसमर्पणादि मूल्यांचा ऱ्हास, माणसांची पशुत्वाकडे होणारी वाटचाल या घटना पाहून सर्वंच बाबतीत भ्रमनिरास होत चालला आहे. अशा पार्श्वभूमीवर ‘दासबोध’ हा ग्रंथ एक पायवाट दाखवतो. या पायवाटेवरून चालल्यावर माणसे खऱ्या अर्थाने समाधानी होणार आहेत. यातली मानवी मूल्ये मानवाला सातत्याने तो मानव असल्याची जाणीव करून देणार आहेत.
Dasbodhatil Manvi Mulye