-
‘देव’ भेटलेला विद्यार्थी
Rs.75.00एक कविता अनुभवण्याजोगी
गोष्ट सांगतो तुझ्या हिताची, भल्या मुला तू ध्यानी धरीं,
प्रथम प्रयत्नीं यश नच आले, फिरुनि एकदा यत्न करी ॥धृ॥
धीर धरुनी यत्न करीतां, बळ तुजला येईल बरे
भिऊ नको तू मुळी कधीही, जिंकशील तू हेच खरे
एक-दोनदा अपयश आले, यत्न कराया कचरु नको
यत्नामध्ये लाज नसे यश जरि स्पर्धेमध्ये नसे,
अशा प्रसंगी वागू कसे?
यत्न करी तू यत्न लाडक्या फिरुनि एकदा यत्न करी,
प्रथम प्रयत्नी यश नच आले, फिरुनि एकदा यत्न करी ॥1॥
जरी तुज वाटे अवघड अपुले काम मुला तू यत्न करी
काळ तुला देईल तयाचे इमान खासे धीर धरी
जे जे सारे शक्ती सारे कार्य कराया इतरजन
ते ते तुजला शक्य का नसे धीराने करिता यत्न?
नियम मात्र हा ध्यानी धरी, फिरुनि एकदा यत्न करी
प्रथम प्रयत्नी यश नच आले फिरफिरुनी तू यत्न करी,
यत्न करी तू यत्न लाडक्या फिरुनि एकदा यत्न करी ॥2॥ -
‘देव’ माणसं अन् ‘गुणी’ लेकरं
Rs.125.00भाग : 2 – चंदाकाकांची वही
सहज संवाद…सर्वांच्या भल्यासाठी!सूर्यकांत अन् त्याची प्रेमळ, कष्टाळू, मेहनती ‘टोळी’…
अनेकोत्तम आशीर्वाद!
सूर्यकांत मला भेटला. खूप गप्पा झाल्या. आनंद वाटला. ‘टोळी’बद्दल त्याने जे जे सांगितलं ते ऐकून खूप समाधान वाटलं. असो.
बालगोपाळांसाठी तसेच छोट्या-मोठ्यांसाठी मी काही लिहून ठेवलेय. ते सारं मी तुम्हाला देतोय. ते तुम्ही सर्वांनी एकत्र बसून वाचावं. त्याचं मनन करावं वा त्यावर चर्चा करावी. जिथे मदत लागेल तिथे विनयसर आहेतच.
छोट्या दोस्तांनो, विनयसरांसारखी शिक्षकमंडळी अन् आईबाबा वा अनुभवी माणसं तुमच्या आसपास बोलायला, सांगायला, मार्गदर्शन करायला, शाबासकी द्यायला आहेत, ही किती मोठी व महत्त्वाची गोष्ट आहे.
असो. एकेक पान मन लावून, तेही मोठ्याने वाचा. वेळ मिळेल तेव्हा मला प्रत्यक्ष भेटा वा फोन करत माझ्याशी गप्पा मारा.
सर्वांना सर्व कामांसाठी शुभेच्छा, आशीर्वाद
तुमचा,
चंदाकाका
(टीप : काही गोष्टी मराठीत, हिंदीत आहेत तर काही इंग्रजीत. आणि हो, जे ‘खास पालकांसाठी’ म्हणून लिहिलेय ते त्यांना अवश्य वाचायला द्या. लेखच नव्हे तर पूर्ण पुस्तक त्यांना वाचू द्या. कळलं?)Dev Manas An Guni Lekar