Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

विचार आणि विचारवंत

सद्यस्थितीत महात्मा गांधी, पंडीत नेहरु आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची गरज

Rs.475.00

भारतावर ब्रिटीशांचे सुमारे दिडशे वर्ष राज्य होते, भारत पारतंत्र्यात होता. या पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करुन सामाजिक स्वातंत्र्य, मानवी स्वातंत्र्य मिळण्यासाठी राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, लाला लजपतराय, बिपीन चंद्रपाल, उमेशचंद्र बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, नामदार गोखले, फिरोज शहा मेहता आदिंनी मोठे योगदान दिले. 1920 नतरंच्या काळात भारतीय स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधींकडे नेतृत्व आले. त्यांनी सत्य, अहिंसा, प्रेम, असहकार, हरताळ, उपोषण, स्वदेशी, परदेशी मालावर बहिष्कार, मिठाचा सत्याग्रह अशा विविध अंगांनी महात्मा गांधींनी जनतेचं वैचारिक प्रबोधनाबरोबर कृतीयुक्त सहभाग करुन घेतला त्यामुळे राजकीय चळवळीत अधिकाधिक जनता सामिल होऊन आंदोलने तीव्र झालीत व ब्रिटीश राजवटीच्या चळवळीला शह दिला. पुढे अनेकांच्या प्रयत्नातून देशास 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. महात्मा गांधींवर ‘रस्कीन’च्या ‘Un to the Last’ या पुस्तकातील विचारांचा प्रभाव होता. तसेच टॉलस्टायच्या “तुमच्या हृदयात परमेश्वराचा निवास आहे” या विचारांचा प्रभाव होता. या तत्वज्ञानातच मानवतावाद आपणांस दिसतो. महात्मा गांधींनाही मानवतेचे पुजारी संबेधले जाते.

सर्वच जगाने दुसज्या महायुध्दाचे भिषण परिणाम अनुभवलेले आहेत. विज्ञान व तंत्रज्ञानाने केलेल्या प्रगतीचा उपयोग केवळ मानवी कल्याणासाठीच व्हावा, विनाशासाठी नाही असे पंडित जवाहरलाल नेहरुंचे धोरण होते. म्हणून त्यांनी जागतिक शांततावाद, अलिप्ततावाद स्विकारुन पंचशिल तत्व जगासमोर ठेवलीत व साम्राज्यवादाला विरोध केला. यातून पंडित नेहरुंचे वैश्विक शांततेचं धोरण समाजाला त्यांच्यातील मानवतावाद लक्षात येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटनेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, प्रेम, न्याय व हक्क ही तत्वे सर्वांना दिलीत. त्यांनी सर्व धर्म, पंथं व जात यासाठी न्याय राज्यघटना बहाल केली. यातून त्यांची मानवतावादी दृष्टी लक्षात येते.
महात्मा गांधी, पंडित नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तिनही व्यक्ती मानवतावादी होत्या. मानवहित हेच त्यांचे जीवन होते. आज सर्व जगाला दहशतवादाने जेरीस आणले आहे. भारतात दहशतवादा बरोबरच नक्षलवादानेही तोंड वरती काढले आहे. तेव्हा सर्वच राष्ट्रांनी अशा विघातक शक्ती घालविण्यासाठी प्रयत्नशील राहून शांततामय जीवन जगणे आवश्यक आहे. म्हणून संयुक्त राष्ट्र संघाच्या (णछज) जबाबदारी बरोबर प्रत्येक राष्ट्राचीही मोठी जबाबदारी आहे. सर्वच राष्ट्रांनी सत्य, अहिंसा, प्रेम व मानवतावाद याचा अवलंब केला तरच जागतिक शांतता स्थापित होईल, अन्यथा अखिल मानवजात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या अयोग्य, अविचारी वापराने धोक्यात येईल. म्हणून महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन चरित्र व कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी, विद्यार्थी व सुजाण नागरिक घडविण्यासाठी ते अभ्यासून अधिकाधिक कृतीत येणे गरजेचे वाटते.

Sadyasthitita Mahatma Gandhi, Pandit Nehru Aani Dr. Babasaheb Ambedkar

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सद्यस्थितीत महात्मा गांधी, पंडीत नेहरु आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची गरज”
WordPress › Error

There has been a critical error on this website.

Learn more about troubleshooting WordPress.