Welcome to Prashant Publications

Rs. 270.00 10% OFF
Availability: 10 left in stock

भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्थेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्रामीण भागातील बहुतांश लोकांचे जीवन शेती, शेतीपूरक व्यवसाय, ग्रामीण उद्योग, सेवा आणि नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती, समस्या...

  • Name : ग्रामीण अर्थशास्त्र (Rural Economics)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : TYBA
  • Manufacturing : October 2026
  • Total Pages : 174 Pages

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

ग्रामीण अर्थशास्त्र (Rural Economics)
- +

भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्थेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्रामीण भागातील बहुतांश लोकांचे जीवन शेती, शेतीपूरक व्यवसाय, ग्रामीण उद्योग, सेवा आणि नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती, समस्या आणि विकासाच्या संधी यांचा अभ्यास करणे अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक ठरते.
‘ग्रामीण अर्थशास्त्र’ या पुस्तकाची निर्मिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.ए. पदवीच्या अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांकरिता मेजर/मायनर अभ्यासक्रमानुसार करण्यात आली आहे. अभ्यासक्रमातील संकल्पना विद्यार्थ्यांना सहज समजाव्यात आणि त्या प्रत्यक्ष ग्रामीण जीवनाशी जोडता याव्यात, या उद्देशाने विषयाची मांडणी साध्या व स्पष्ट भाषेत करण्यात आली आहे.
या पुस्तकामध्ये ग्रामीण अर्थशास्त्राचा परिचय, ग्रामीण संसाधने व पायाभूत सुविधा, ग्रामीण दारिद्य्र व बेरोजगारी, ग्रामीण बाजारपेठ व पतपुरवठा, ग्रामीण उद्योग व उद्योजकता तसेच ग्रामीण विकासाचे कार्यक्रम या सहा घटकांचा समावेश करण्यात आला आहे. विषयाची मांडणी शक्य तितक्या सोप्या, सरळ आणि विद्यार्थीकेंद्रित भाषेत करण्याचा प्रयत्न केला आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्थेतील बदलत्या परिस्थितीचा विचार करून शेतीबरोबरच ग्रामीण पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती, ग्रामीण उद्योग, उद्योजकता, स्वयं-सहाय्यता गट आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका यांनाही या पुस्तकात महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे हे पुस्तक केवळ परीक्षेपुरते मर्यादित न राहता ग्रामीण भारत समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल.

1. ग्रामीण अर्थशास्त्राचा परिचय.....................................9
(Introduction to Rural Economics)
1.1 ग्रामीण अर्थशास्त्र: अर्थ, स्वरूप, व्याप्ती व महत्त्व
(Rural Economics: Meaning, Nature, Scope and Importance)
1.2 ग्रामीण अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये
(Characteristics of Rural Economy)
1.3 ग्रामीण विकासामध्ये कृषीची भूमिका
(Role of Agriculture in Rural Development)

2. ग्रामीण संसाधने आणि पायाभूत सुविधा........................25
(Rural Resources and Infrastructure)
2.1 ग्रामीण संसाधने: जमीन, पाणी आणि वन संपत्ती
(Rural Resources: Land, Water and Forest)
2.2 ग्रामीण पायाभूत सुविधा: रस्ते, वाहतूक आणि ऊर्जा
(Rural Infrastructure: Road, Transport and Energy)
2.3 ग्रामीण विकासामध्ये पायाभूत सुविधांची भूमिका
(Role of Infrastructure in Rural Development)

3. ग्रामीण दारिद्य्र व बेरोजगारी....................................54
(Rural Poverty and Unemployment)
3.1 ग्रामीण दारिद्य्र: अर्थ व प्रकार
(Rural Poverty: Meaning and Types)
3.2 ग्रामीण दारिद्य्र: कारणे, परिणाम व उपाययोजना
(Rural Poverty: Causes, Effects and Remedies)
3.3 ग्रामीण बेरोजगारी: प्रकार, कारणे व उपाययोजना
(Rural Unemployment: Types, Causes and Remedies)

4. ग्रामीण बाजारपेठ व ग्रामीण पतपुरवठा.........................81
(Rural Market and Credit)
4.1 ग्रामीण बाजारपेठ: अर्थ, प्रकार व महत्त्व
(Rural Market: Meaning, Types and Importance)
4.2 कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) व खरेदी-विक्री संस्था: उद्दिष्टे, कार्ये, अडचणी व उपाययोजना
(APMC & Sale Purchase Society: Objectives, Functions, Difficulties and Remedies)
4.3 ग्रामीण पतपुरवठा: संकल्पना, स्रोत (संस्थात्मक व असंस्थात्मक) आणि समस्या
(Rural Credit: Concept, Sources (Institutional & Non- Institutional Credit) and Problems)

5. ग्रामीण उद्योग व उद्योजकता...................................126
(Rural Industry and Entrepreneurship)
5.1 ग्रामीण उद्योग: अर्थ व प्रकार
(Rural Industry: Meaning and Types)
5.2 लघुउद्योग: महत्त्व, अडचणी व उपाययोजना
(Small Scale Industry:Importance, Difficulties & Remedies)
5.3 ग्रामीण उद्योजकता: संधी व आव्हाने
(Rural Entrepreneurship: Opportunities and Challenges)

6. ग्रामीण विकासाचे कार्यक्रम....................................150
(Rural Development Programmes)
6.1 पंचायतराज संस्था व ग्रामीण प्रशासन
(Panchayati Raj Institutions and Rural Governance)
6.2 स्वयं-सहाय्यता बचत गट (SHGs): संकल्पना, उद्दिष्टे आणि ग्रामीण विकासातील भूमिका
(Self-Help Groups: Concept, Objectives and SHGs' Role in Rural Development)
6.3 भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेतील आव्हाने व भविष्यातील संधी
(Challenges & Future Prospects of Rural Economy in India)

💬

Chat with us