Your cart is empty now.
विद्यापिठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाने 2024-25 या शैक्षणिक सत्रापासून पदवी स्तराला नवीन शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) नुसार अभ्यासक्रम लागू केला आहे. त्याअंतर्गत बी. कॉम. प्रथम वर्ष पहिले सत्रकरिता प्रमुख विषय म्हणून भारतीय प्रसंविदा अधिनियम-1 या अभ्यासक्रमाची निवड केली आहे. विद्यापिठाने निश्चित केलेल्या अभ्यासक्रमानुसार या पुस्तकाची मांडणी केली आहे.
कायद्यासारखा किचकट विषय विद्यार्थ्यांना सहजपणे समजावा, या हेतूने विषयाची सोपी व सुटसुटीत मांडणी करुन प्रस्तृत पुस्तकाचे लिखाण केले आहे. कायद्याची भाषा बोजड, क्लिष्ट वाटू नये म्हणून विविध संकल्पना, नियम तरतुदीचे मुद्देसूद विश्लेषण सोप्या भाषेत स्पष्ट करण्यात आले आहे. आवश्यक तिथे व्याख्या व स्पष्टीकरणेसुद्धा दिलेली आहेत. तसेच सहज समजतील अशी उदाहरणे देऊन संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. प्रस्तुत पुस्तकाची रचना भाषा आणि विवेचन पद्धती सरळ व सुलभ अशी आहे. प्रत्येक घटकाच्या शेवटी प्रश्नसंग्रह दिलेला आहे. मला खात्री आहे की, विद्यार्थ्यांना या पुस्तकाच्या माध्यमातून वाणिज्य कायद्याशी संबंधित विषय सोपा वाटेल.