Welcome to Prashant Publications

Rs. 325.00 10% OFF
Availability: 10 left in stock

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या NEP च्या FYBCom VEC च्या अभ्यासक्रमानुसार ‘भारतातील सांविधानिक मूल्ये, मुलभूत कर्तव्ये व राजकीय व्यवस्था’ या पुस्तकांचे लेखन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना व वाचकांना भारतातील सांविधानिक मूल्यांची, मुलभूत...

  • Name : भारतातील सांविधानिक मूल्ये, मूलभूत कर्तव्ये आणि राजकीय व्यवस्था (Constitutional Values, Fundamentals Duties and Political System in India)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : FYBcom | VEC
  • Barcode : 9789349325838

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भारतातील सांविधानिक मूल्ये, मूलभूत कर्तव्ये आणि राजकीय व्यवस्था (Constitutional Values, Fundamentals Duties and Political System in India)
- +

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या NEP च्या FYBCom VEC च्या अभ्यासक्रमानुसार ‘भारतातील सांविधानिक मूल्ये, मुलभूत कर्तव्ये व राजकीय व्यवस्था’ या पुस्तकांचे लेखन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना व वाचकांना भारतातील सांविधानिक मूल्यांची, मुलभूत कर्तव्याची ओळख करुन देण्याच्या उद्देशाने प्रस्तुत पुस्तकाचे लेखन करण्यात आले आहे. भारतीय संविधानाची निर्मिती, संविधान सभेची रचना व भारतीय संविधानाची अंमलबजावणी, भारतीय संविधानाचे वैशिष्ट्ये व मुलभूत संरचना, संघीय गणराज्य, सत्तेचे विभाजन, कायद्याचे शासन, भारतीय संविधान प्रस्तावनेचा परिचय, भारतीय राजकीय व्यवस्थेतील केंद्रीय व राज्यविधिमंडळाची रचना, अधिकार व कार्ये, केंद्रीय कार्यकारीमंडळ व राज्याच्या कार्यकारी मंडळाचे अधिकार, कार्य व भूमिका, भारतातील निर्वाचन आयोग व निवडणूक सुुधारणा, भारतातीय राजकीय व्यवस्थेसमोरील धोके व आव्हाने, प्रादेशिक पक्ष, आघाडीचे राजकारण व पक्षांतराचे राजकारण ह्या रूपात भारतीय राजकीय व्यवस्थेतील समकालीन प्रवृत्ती, जातीयवाद, सांप्रदायिकतवाद व प्रादेशिकवाद हे राजकीय व्यवस्थेचे विभाजन करणारे घटक, मुलभूत कर्तव्य उदयविकास, मूल्याचे महत्त्व, मुलभूत कर्तव्याची वैधानिक स्थिती, मर्यादा व न्यायिक धारणा, नितिमत्ता व कर्तव्य जाणीव याबद्दलचा प्राचीन व आधुनिक भारतीय व जागतिक राष्ट्रांचा दृष्टीकोन यांचे सविस्तर विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे.
भारतीय संविधान, सांविधानिक मूल्ये व भारतीय राजकीय व्यवस्था या विषयावर उपलध असलेल्या विविध संदर्भ ग्रंथाचा, माहिती स्त्रोताचा व विविध वेबसाईटचा आधार घेवून प्रस्तुत पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रस्तुत पुस्तकाचे लेखन करतांना विविध संदर्भ ग्रंथांचा आधार घेण्यात आला त्या लेखकांचेही आभार व्यक्त करतो.  

प्रकरण पहिले............................................. 7
भारतीय संविधानाचा व सांविधानिक मूल्याचा परिचय
1.1. भारतीय संविधानाचा व संवैधानिक मूल्याचा परिचय
1. भारतीय संविधानाची निर्मिती
2. संविधान सभेची रचना व संविधानाची अंमलबजावणी
3. भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये मुलभूत संरचना
4. संघीय गणराज्य
5. सत्तेचे विभाजन.
6. कायद्याचे राज्य
1.2 सांविधानिक मूल्य
1. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचा परिचय
2. सार्वभौमत्व
3. समाजवादी
4. लोकशाही
5. धर्मनिरपेक्षता
6. न्याय - सामाजिक, आर्थिक, राजकीय
7. समानता - संधीची समानता, कायद्यासमोर समानता व कायद्याचे समान संरक्षण
8. बंधूता - प्रतिष्ठा, एकता व एकात्मता

प्रकरण दुसरे........................................................51
भारतातील राजकीय व्यवस्था व मुलभूत कर्तव्ये
1. भारतातील राजकीय व्यवस्थेचा परिचय
2. केंद्रीय विधीमंडळ :
* केन्द्रीय विधीमंडळ-रचना अधिकार व भूमिका
* राज्य विधीमंडळ-रचना अधिकार व कार्ये
3. केंद्रीय कार्यकारी मंडळ
* राष्ट्रपती व उपराष्ट्रपती-अधिकार कार्य व भूमिका
* पंतप्रधान-अधिकार, कार्ये व भूमिका
* मंत्रीमंडळ, अधिकार कार्ये व भूमिका
4. राज्याचे कार्यकारी मंडळ :
* राज्यपाल : अधिकार कार्ये व भूमिका
* मुख्यमंत्री : अधिकार कार्ये व भूमिका
* मंत्रीमंडळ : अधिकार कार्य व भूमिका
5. भारताचा निर्वाचन आयोग, निवडणूक सुधारणा,
6. भारतीय राजकीय व्यवस्थेसमोरील धोके व आव्हाने.
7. भारतीय राजकीय व्यवस्थेतील समकालीन प्रवृत्ती - प्रादेशिक राजकीय पक्ष, आघाडीच्या राजकारणाचे युग, पक्षांतराचे राजकारण
8. भारतातील राजकीय व्यवस्थेचे विभाजन-जातीयवाद, सांप्रदायिकतावाद, प्रादेशिकता वाद
9. धर्म आणि कर्तव्य जाणीवेबाबत प्राचीन आणि आधुनिक भारतीय आणि जागतिक राष्ट्राचा दृष्टीकोन
10. मुलभूत कर्तव्ये : उदय, मूल्ये आणि महत्व
11. भारतीय संविधानाचे अनुच्छेद 51 अ
12. मुलभूत कर्तव्ये: वैधानिक स्थिती, मर्यादा आणि न्यायीक धारणा

संदर्भ सूची........................................................237

💬

Chat with us