Your cart is empty now.
आजपर्यंत बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, सावित्रीबाई
फुले पुणे विद्यापीठ, पुणे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
यांच्या अभ्यासक्रमानुसार अर्थशास्त्राची 66 क्रमिक व संदर्भ पुस्तके लिहिली. संत
गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासाठी ‘शेअर
बाजार परिचय’ हे पहिलेच पुस्तक वाणिज्य शाखेच्या F.Y.B.Com. या वर्गासाठी
लिहीले आहे. अभ्यासक्रमाच्या रचनेनुसार प्रस्तुत पुस्तक चार घटकांमध्ये विभाजित
आहे. पहिला घटक बचत-गुंतवणूकीचा आहे. यात बचत-गुंतवणूक संकल्पना,
रोखता संकल्पना व रोखता गुणोत्तर, गुंतवणूकीतील जोखीम व परतावा, गुंतवणूक
व्यूहरचना, रोखा बाजाराचा आहे. यात भांडवल बाजाराचा अर्थ, भूमिका, घटक,
रचना, सेबी यांचा समावेश आहे. तिसरा घटक भारतीय स्टॉक एक्सचेंजचा आहे.
ज्यात शेअर बाजार, त्याचे प्रकार, खझज, ऋझज, शेअरचे प्रकार, डिबेंचर, बाँडचा
समावेश आहे. चौथे युनिट डिमॅट अकाऊंट आणि डिपॉझिटरीचे आहे.