-
समग्र भूगोल
Rs.395.00कोविड-19 च्या वाढत्या प्रसारामुळे भविष्यातील विद्यापीठीय परीक्षा ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ वा बहुपर्यायी स्वरूपाचे असेल ही शक्यता गृहित धरून प्रस्तुत पुस्तकाची रचना करण्यात आली. नेट-सेट आणि स्पर्धा परीक्षेच्या परीक्षेतदेखील बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात म्हणून पुस्तकाची रचना करतांना महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील भूगोल विषयाच्या पदवी आणि पदव्युतर वर्गाच्या अभ्यासक्रम, नेट/सेट अभ्यासक्रम, संघ आणि राज्यलोकसेवा आयोग परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षेच्या राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमाचा विचार करण्यात आला. भूगोल विषयावर विविध तज्ञांनी लिहिलेल्या संदर्भ ग्रंथांचा आधार घेऊन तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणीत लक्षात घेऊन प्रस्तुत पुस्तकांची रचना वैशिष्ट्यपूर्णरित्या करण्यात आली.
प्रस्तुत पुस्तकात भारताचा भूगोल, हवामान, वनस्पती, प्राणी, वन/जंगले, जल, मृदा, खनिजे, वाहतुक व दळणवळण, उद्योगधंदे, जैवविविधता, सामान्य भूगोल, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन, प्रात्यक्षिक भूगोल इ. विविधांगी मुद्द्यांचा घटकनिहाय समावेश केला आहे.Samgra Bhugol
-
साधन व जलसंपदा भूगोल
Rs.350.00मानव हा पृथ्वीवरील नैसर्गिक पर्यावरणाचा एक महत्त्वाचा घटक असून त्याचे जीवन व अस्तित्व निसर्गावरच अवलंबून आहे. आपले जीवन अधिक सुखसोयीचे व सुरक्षीत होण्यासाठी मानव सतत प्रयत्नशील असतो. त्यासाठी तो निसर्गातील विविध प्रकारच्या वस्तू वापरतो. मानवाला निसर्गातून उपलब्ध झालेल्या विविध वस्तू किंवा पदार्थ म्हणजेच नैसर्गिक साधने होत. मानवाचे पर्यावरणाविषयी जसजसे ज्ञान वाढत गेले आणि त्याची तांत्रिक प्रगती होत गेली तसतसा पर्यावरणातील विविध घटकांचा वापर वाढला. आधुनिक काळात साधनसंपत्तीची संकल्पना अधिक व्यापक झाली असून त्यात संपूर्ण नैसर्गिक पर्यावरणाचा समावेश होतो.
पृथ्वीचा सुमारे तीन चतुर्थांश भाग म्हणजे सुमारे 71 टक्के भागावर जल तर 29 टक्के क्षेत्रावर भूभाग आहे. भूपृष्ठावरील एकूण जलसंपदेपैकी सुमारे 97 टक्के पाणी समुद्रात सामावले आहे. सागराचे पाणी खारट असल्याने त्याचा फारसा वापर करता येत नाही तर सुमारे 3 टक्के जलसाठा नद्या, तलाव, सरोवर व भूमीगत पाण्याचा म्हणजे गोड पाण्याचा आहे. पृथ्वीच्या निर्मिती/उत्पत्तीसोबत पाणी व पाण्यामुळे सजीव सृष्टीची निर्मिती झाली. जलसंपदेचा योग्य वापर व संवर्धन होण्यासाठी सन 2004 हे वर्ष ‘जल वर्ष’ म्हणून घोषित केले गेले.
सदरील पुस्तकात प्रत्येक मुद्यांचे विस्तृत विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे. विषयाच्या आकलनासाठी आवश्यक तेथे आकृत्यांचा वापर केला आहे. संज्ञा व संकल्पना सर्वांना समजतील अशा भाषेत मांडल्या आहेत.
Sadhan v Jalsampada Bhugol