-
सामान्य नकाशाशास्त्र
Rs.95.00भूगोलशास्त्रातील एक महत्त्वाची शाखा म्हणून नकाशाशास्त्र ओळखली जाते. नकाशा हा भूगोलाचा आत्मा असतो. प्राचीन काळापासून नकाशाशास्त्राचा उपयोग व्यवहारात केला जातो. भूगोलशास्त्राप्रमाणेच नकाशाशास्त्र देखील गतिमान स्वरुपाचे आहे. विवि. कालखंडात नकाशाशास्त्राचा विकास होत आलेला असून आजच्या आधुनिक काळात नकाशाशास्त्राचे स्वरूप डीजीटल झालेले आहे.
मानवाच्या उत्क्रांतीच्या काळापासूनच नकाशाशास्त्राचा देखील टप्प्याटप्प्याने क्रमशः होत आलेला आहे. भारतातदेखील नकाशाचा वापर खूप पूर्वीपासून केला जात आहे. परंतु तत्कालीन नकाशाचे स्वरूप हे उद्दिष्टापुरते व अवगत ज्ञानाएवढेच मर्यादित होते. नकाशा तयार करण्याच्या तंत्रात अचूकपणा नव्हता. तरीदेखील भारतीय नकाशाशास्त्राला मोठा इतिहास होता. आधुनिक कालखंडात इ.स. अठराव्या शतकात ब्रिटीशांच्या अखत्यारित भारतीय नकाशाशास्त्राचा विकास झालेला दिसून येतो. भारताचा पहिला अचूक नकाशा इ.स. 1752 मध्ये तयार करण्यात आला. इ.स.1769 मध्ये लॉर्ड क्लाईव्ह यांनी बंगालचे सर्वेअर जनरल म्हणून नियुक्त केलेले जेम्स रेनेल यांनी त्रिकोणीकरण पद्धतीवर आधारित भारताचा अचूक नकाशा तयार केला.
इ.स.1905 मध्ये भारत सरकारच्या सर्वेक्षण विभागाने भारताचे 1 इंचास 1 मैल या प्रमाणावरील 3000 नकाशे तयार केले. हे नकाशे भारतीय स्थलनिर्देशक नकाशे म्हणून ओळखले जातात. असे नकाशे तयार करतांना त्यामध्ये अनेक सांकेतिक खुणा व चिन्हांचा वापर करण्यात आलेल आहे. पुढे जाऊन ब्रिटीश तसेच मेट्रीक मापन पद्धतीत या नकाशांची अधिकाधिक उत्तम निर्मिती होऊ लागली. भारतीय अवकाश संशोधन संस्थाच्या माध्यमातून अनेक उपग्रह अवकाशात सोडून त्यांच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने (दूर संवेदन) उपग्रह प्रतिमांद्वारे आधुनिक व वैशिष्ट्यपूर्ण नकाशांची निर्मिती केली जात आहे.
Samanya Nakashashastra
-
सेट/नेट भूगोल (पेपर 2 व 3)
Rs.595.00भूगोल विषयाच्या सर्वच उपशाखांची दर्जेदार व अचूक माहिती असलेले ग्रंथ प्रत्येक विद्यार्थ्याला विकत घेवून अभ्यासणे तसेच एकाच ग्रंथालयात ही सर्व ग्रंथसंपदा उपलब्ध असणे दुरापास्त आहे. तसेच भूगोलशास्त्रातील बहुसंख्य ग्रंथ इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत. त्यामुळे नेट/सेट/जे.आर.एफ. भूगोल विषयाची तयारी करणार्या मराठी भाषिक विद्यार्थ्यांंना अनेक अडचणींंना तोंंड द्यावे लागते. या सर्व अडचणींंचा सखोल विचार करुन एकाच ग्रंथात नेट/सेट परीक्षेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या भूगोल विषयाच्या सर्वच उपशाखांची माहिती प्रासादात्मक भाषेत अचूकपणे उपलब्ध करुन देणे हा या पुस्तक निर्मितीचा प्रमुख उद्देश आहे. सदर पुस्तकात भूगोलशास्त्राच्या विविध शाखांतील संकल्पना व पाठयांश मांडणी अभ्यासकाला सहज अवगत होईल अशी करण्याचा परिश्रमपूर्वक प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच आवश्यक त्या संकल्पना आकृतींंच्या साहाय्याने स्पष्ट केलेल्या असून त्या स्वत:लेखकांनी संगणकावर तयार केलेल्या आहेत. त्यामुळे त्या अधिक अचूकपणे तयार केलेल्या आहेत. सर्वांंना ज्ञात असलेल्या भूमीच्या भूगोलाची व्याप्ती अतिशय व्यापक असून त्यातील पाठयाशाची मांडणी मर्यादित पृष्ठांत करणे ही अशक्यप्राय बाब आहे. त्यामुळे सदर पुस्तकात नेट/सेट परीक्षेच्या अभ्यासक्रमातील सर्वच घटक विस्ताराने स्पष्ट करण्याऐवजी स्वयंअध्यापनानुभव व नेट/सेट परीक्षेतील प्रश्नांचे स्वयंअध्ययन व अवलोकन करुन अचूक पध्दतीने संक्षेपाने स्पष्ट करण्यावर भर देण्यात आलेला आहे. प्रत्येक घटका नंतर नेट/सेट प्रश्नसंचातील काठीण्य पातळीचा विचार करुन वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले असल्यामुळे विद्यार्थ्यांंना स्वअध्ययन करण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांंचा प्रश्नसंच सोडविण्याचा सराव व्हावा म्हणून 900 प्रश्नांचा समावेश असलेले चार सराव प्रश्नसंचासह नेट व सेट परीक्षांचे दुसर्या व तिसर्या पेपरचे प्रश्नसंच उत्तरांसह समाविष्ट केले आहेत.
Set-Net Bhugol (Pepar 2 V 3)