
काव्यतरंग
Rs.60.00मानवी समाज व्यवस्थेत अनेक प्रकारचे जगण्याचे दृष्टीकोन असतात. व्यवस्थेबद्दल काही बोलताना कवीची कविता ही व्यवस्थेशी निगडीत असलेल्या अनेक पैलूंमधून वाचकांसमोर येत असते. कवीच्या काव्यातील जाणिवांचा अपरिहार्य भाग काव्यरुपाने रसिक वाचकांसमोर येत असतो. त्यातून कवीचे भावविश्व व एकंदर परिस्थितीचे आकलन होताना दिसते. भोवतालच्या बदललेल्या वास्तवाचे केवळ वर्णन न करता कवी आजच्या माणसासमोरचे जगण्याचे प्रश्न टोकदारपणे मांडताना दिसतात. वाड्या-वस्त्या, ग्रामीण, निमशहरी, शहरी या परिसरातील मानवी जीवनाचे जगण्याचे ताणे-बाणे, अंतर्गत व बाह्य संघर्ष, कवींच्या लेखणीतून अपरिहार्यपणे येतात. भावनांनी ओथंबलेल्या कवी मनाचे अविष्कार विविध विषयांना थेटपणे भिडतात.
नव्या कवींकडे असलेली सर्जनात्मक प्रतिभा मानवी समाजव्यवस्थेला आस्वादात्मक पातळीवर कशा प्रकारे आकृष्ट करते यावर त्या कवीच्या कवितेचे मूल्यमापन होते. या कसोटीवर खानदेशच्या कवींनी लिहिलेल्या कविता एक नव्या दिशेकडे नेणार्या आहेत हे निश्चित.Kavyatarang

काव्यधारा
Rs.85.00एखादी व्यक्ती कवी आहे; म्हणजे आयुष्यातील प्रत्येक क्षण ती कवितेतच जगते असे नाही, तर प्रतिभेचा झटका यावा आणि कविता लेखनाला प्रारंभ करावा, हा प्रारंभ रात्री अपरात्री, सकाळ, दुपार, सायंकाळी केव्हावी कुठेही असू शकतो किंवा होऊ शकतो. एकतानतेमधून निर्माण झालेला हा प्रारंभ कवितेच्या निर्मितीची अस्सलपणाची नांदीच दर्शवित असतो. कविता प्रारंभ होते तो क्षण ते कविता समारोपाचा क्षण येथपर्यंतच प्रत्येक कवी हा कवी असतो. नंतर त्याची कविता ही त्याची न राहता लोकांची बनून जाते; ज्यावेळी रसिक वाचकांच्याच अनुभवाचं, स्पंदनांचं आणि जीवनाशयाचं संगीत बनून जाते!
Kavyadhara


