• उपयोजित मराठी (F.Y.B.Com.)

    उपयोजित मराठी (F.Y.B.Com.)

    विद्यापीठाच्या नव्या अभ्यासक्रमाच्या रचनेनूसार प्रथम सत्रात मराठी (ऐच्छिक) विषयासाठी ललित वाङ्मयाचा अभ्यास करणार्‍या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी दुसर्‍या सत्रासाठी पत्रलेखन, संवाद लेखन, वृत्तपत्रीय लेखन, पारिभाषिक संज्ञा इत्यादी घटक अभ्यासक्रमाचे घटक निश्चित करण्यात आले आहेत. वाङ्मयाची आवड असलेल्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना या पुस्तकामुळे व्यावसायिक संज्ञापनाची जाणीव अधिक वृद्धींगत होईल अशी अशा आहे.
    वाङ्मयातून जीवन जाणीवाच्या वृद्धीसोबत व्यापक संस्कृतीचे आकलन होते. व्यावसायिक गरजेतून भाषिक कौशल्यांचा अभ्यास केल्याने नोकरी-व्यवसायाच्या नव्या संधी प्राप्त होतात. शैक्षणिक सन्ननिहाय कालावधीत इतर अवधानांसोबत मराठीचा अभ्यासक्रम अधिक आकलन सुलभ व्हावा यासोबतच नोकरी व्यवसायासाठी भाषिक संज्ञापन कौशल्यांच्या परिचयातून विद्यार्थ्यांना मौखिक आणि लिखित स्वरुपातील परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाऊन जीवनात यशस्वी कसे होत होईल, याचे आत्मभान देणारे हे पुस्तक प्रथम वर्ष वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा परीक्षेत मराठी ऐच्छिक विषय घेणार्‍यांनाही दिशादर्शक ठरेल, यात शंका नाही.

    – प्रा. एल. जी. सोनवणे

    Upyojit Marathi (F.Y.B.Com.)

    Rs.95.00
    Add to cart
  • उपयोजित मराठी (भाग - 1) (SGBAU)

    उपयोजित मराठी (भाग – 1) (SGBAU)

    भाषा व वाङ्मय हे सौंदर्य निर्मिती करत असतात, जीवनमूल्यांची शिकवण देत प्रगत जीवन जगण्यास प्रेरणा देतात. त्यातून वाचकाला आनंद प्राप्त होतो. हे सत्य असले तरी आजच्या या स्पर्धेच्या युगात सौंदर्यनिर्मितीच्या आनंदप्राप्तीबरोबरच व्यावहारिक जीवनात उदरनिर्वाह करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपजत गुणांना प्रोत्साहन देणेही गरजेचे आहे. म्हणूनच पोट भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी सक्रिय राहावे म्हणून ‘उपयोजित मराठी’ या अभ्यासक्रमाला विद्यापीठाने प्राधान्य दिले आहे. आजच्या जागतिकीकरणात प्रादेशिक भाषा अस्तित्वासाठी संघर्ष करीत असतानाच्या काळात हा अभ्यासक्रम अधिक उपयुक्त आणि गरजेचा आहे. या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना भाषिक – लेखन कौशल्ये आत्मसात करून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास साधता येतो.
    विद्यार्थ्यांनी लेखनात विरामचिन्हांचा वापर व लेखनाचे नियम, मुद्रितशोधन, कार्यालयीन संज्ञापन व पत्रव्यवहार, अर्ज लेखन – नोकरीसाठी अर्ज, स्वपरिचय पत्र, भाषिक कौशल्ये, पत्रलेखन कौशल्य व नोकरीसाठी अर्जलेखन ही कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करून त्यांचे व्यावहारिक जीवन सुकर करता येते. त्यावर आधारीत प्रस्तुत ग्रंथाची रचना आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला ही कौशल्ये उपयुक्त ठरणारी आहेत. डॉ. प्रभाकर जोशी यांनी परिश्रमपूर्वक वरील कौशल्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीतून या पुस्तकाचे संपादन केले आहे.
    मराठीच्या जिज्ञासू अभ्यासक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रस्तुत पुस्तक उपयुक्त व मार्गदर्शनपर ठरेल असा विश्वास आहे.

    Upayojit Marathi (Bhag 1) (SGBAU)

    Rs.150.00
    Add to cart