• माध्यमांसाठी लेखन व संवाद कौशल्य

    माध्यमांसाठी लेखन व संवाद कौशल्य

    भारतात वृत्तपत्र, आकाशवाणी, दूरचित्रवाणी इ. माध्यमं ही प्रभावी प्रसारमाध्यमं म्हणून ओळखली जातात. या तिनही प्रसारमाध्यमांचा विचार केला तर जागतिकीकरणाच्या या कालखंडात मुद्रित आणि श्राव्य माध्यमांमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. यात वृत्तपत्र हे मुद्रित प्रसारमाध्यम आहे तर आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी हे अनुक्रमे श्राव्य व दृकश्राव्य प्रसारमाध्यमं आहेत. विशेषतः आकाशवाणी व दूरचित्रवाणी यांचा विचार केला तर चोवीस तास चालणार्‍या या माध्यमांनी चकचकीतपणा, आकर्षक मांडणी, व तांत्रिकतेमुळे सर्वसामान्यांवर भुरळ पाडली. या माध्यमांचा आवाका व वेग इतका प्रचंड आहे की, त्यांच्या स्पर्धेत वृत्तपत्र हे मुद्रित प्रसारमाध्यम टिकणार नाही अशी एक भीती निर्माण झालेली होती. परंतु ही भीती फोल ठरली. वृत्तपत्रांनी ऑनलाईन रूप धारण केलेले आहे तर श्राव्य माध्यमे ही चोवीस तास याप्रमाणे प्रसारित होत आहे. म्हणजेच या माध्यमांमधून व्यवसायाची मोठी संधी निर्माण झालेली दिसते. परंतु या माध्यमामध्ये काम करावयाचे असेल तर या माध्यमांसाठी आवश्यक असणारे लेखन कौशल्य हस्तगत करणे गरजेचे आहे. या माध्यमांसाठी लेखन कसे करायचे? या लेखनाचा आकृतिबंध कसा आहे? त्यासाठी कोणते तंत्र? व कोणती पथ्य पाळायची? यासाठी सदर पुस्तक मार्गदर्शकाची भूमिका बजावेल यात शंका नाही.

    Madhymasanthi Lekhan and Sanvad Kaushalya

    Rs.95.00
    Add to cart
  • लेखनकौशल्य मुद्रितशोधन व सर्जनशील लेखन

    लेखनकौशल्य मुद्रितशोधन व सर्जनशील लेखन

    ‘लेखनकौशल्य – मुद्रितशोधन व सर्जनशील लेखन’ हा ग्रंथ अनेकांगांनी महत्त्वपूर्ण आहे. मुद्रितशोधन हे लेखन कौशल्याचे महत्त्वाचे अंग आहे. किंबहुना ती भाषासंवर्धन व संरक्षण करणारी महत्त्वाची भाषिक संस्था आहे. प्रस्तुत ग्रंथ यशस्वी, उत्तम मुद्रितशोधक घडविण्यासाठीच्या प्रयत्नांचा महाप्रयत्न आहे. मुद्रितशोधन कौशल्यासाठी आवश्यक ज्ञानाच्या बाजू म्हणजे मुद्रितशोधनाचे स्वरूप, मुद्रितशोधनाचा सातत्यपूर्ण सराव यांचा समावेश या ग्रंथात असल्याने मुद्रितशोधन कौशल्याबाबतचे अ ते ज्ञ म्हणजे हा ग्रंथ होय. मुद्रितशोधनाची प्रक्रिया, विरामचिन्हांचे मुद्रितशोधनातील महत्त्व, अचूक शब्दलेखन, लेखनातल्या चुकांमुळे होणारे अर्थबदल, प्रात्यक्षिकांसाठी भरपूर उतारे ही या ग्रंथाची केवळ जमेचीच बाजू नसून मुद्रितशोधनासंदर्भातला ग्रंथ कसा कमाल स्तरावर पूर्णत्व पावलेला असावा, याची साक्ष देणाराही आहे.
    सर्जनशील लेखनाचे स्वरूप, त्याची अंत: व पृष्ठ स्तरावरून सिद्ध होणारी वैशिष्ट्ये वाचक व अभ्यासकांस अवगत व्हावीत, कथालेखनाची, नाट्यलेखनाची निर्मितिप्रक्रिया नेमकी कशी घडून येते हे त्यांस आकलन व्हावे, या विशुद्ध सारस्वतीय भूमिकेतून या ग्रंथाचे लेखन झाले आहे. सर्जनशील लेखनामागील निर्मितिप्रक्रिया, प्रेरणा, याबद्दल फारशी माहिती उपलब्ध होत नाही, ही मोठी उणीव या ग्रंथाने भरून काढली आहे. सर्जनशील लेखनाची पृथगात्मता, सर्जनशीलतेसंदर्भातील संभावित पैलूंची मीमांसा, भाषेतील सर्जनशीलता, कलावंतांची सर्जनशीलता, विज्ञानातील सर्जनशीलता, साहित्यातील सर्जनशीलता, सर्जनशीलतेची वैशिष्ट्ये, सर्जनशीलतेची अभिव्यक्ती, सर्जनशील लेखन करताना येणार्‍या अडचणी असा बहुआयामी सर्जनविचार हा ग्रंथ मांडतो.
    भाषा पदवीधरांना रोजगार मिळणे ही बाब भाषा अध्यापनाच्या अस्तित्वाशी निगडित आहे. त्यासाठी भाषिक कौशल्ये अवगत असणारा विद्यार्थी घडविणे हे सांस्कृतिक कर्तव्य आहे. हे कर्तव्य तत्परतेने पार पाडण्यासाठी डॉ. संदीप माळी आणि प्रा. समाधान पाटील लिखित ‘लेखनकौशल्य : मुद्रितशोधन व सर्जनशील लेखन’ या ग्रंथाचे स्वागत आहे.

    – प्रा.डॉ. फुला बागूल

    Lekhan Kaushalya Mudritshodhan V Sarjanshil Lekhan

    Rs.120.00
    Add to cart