
वर्णनात्मक भाषाविज्ञान
Rs.175.00प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथील मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ. प्रभाकर ज. जोशी हे भाषाविज्ञानाचे अभ्यासक आहेत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मराठी विषयांच्या अभ्यासक्रम पुर्नरचनेत त्यांचा सक्रीय सहभाग असतो. ‘भाषाविज्ञान’ हे त्यांचे अभ्यासक्षेत्र! प्रस्तूत ग्रंथात पदवी व पदव्युत्तर स्तरावर सर्वच विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेले भाषेचे स्वरुप व लक्षणे, स्वनविन्यास, रुपिमविन्यास, वाक्यविन्यास, अर्थविन्यास इत्यादी वर्णनात्मक भाषाविज्ञानाशी संबंधित विविध घटकांचे अभ्यासपूर्ण विवेचन आहे. डॉ. जोशी यांच्या प्रदीर्घ अध्यापनातील अनुभवांवर आधारित अशी भाषाविज्ञानाची ही नाविन्यपूर्ण मांडणी अभ्यासकांना मार्गदर्शन ठरणारी आहे. एवढेच नव्हे तर स्पर्धा परीक्षा, नेट-सेट परीक्षा यासाठीही प्रस्तूत ग्रंथाची उपयुक्तता आहे. मराठी विषयातील अभ्यासकांना ‘वर्णनात्मक भाषाविज्ञान’ हा अभ्यासपूर्ण संदर्भ ग्रंथ प्रा. डॉ. प्रभाकर जोशी यांनी उपलब्ध करुन दिला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! भाषाविज्ञानाचे अभ्यासक त्यांच्या वा ग्रंथाचे स्वागत करतीलच!
-डॉ. शिरीष पाटील
Varnanatmak Bhashavidnyan

समाजभाषाविज्ञान
Rs.165.00‘समाजभाषाविज्ञान’ ही अलीकडच्या काळात विकसित झालेली भाषाविज्ञानाची एक अभ्यासशाखा आहे. भाषा ही सामाजिक निर्मिती असल्याने भाषिक अभ्यासाच्या कक्षा या सामाजिक अभ्यासाशी नाते सांगणार्या ठरल्या आहेत. अशा अभ्यासाचे स्वरूप, त्याची व्याप्ती याबाबत अधिकाधिक मांडणी करण्याची निकड आजही कायम आहे. किंबहुना भाषेचे समाज आणि संस्कृती यांच्याशी असलेले नाते स्पष्ट करण्यासाठी अशा अभ्यासदृष्टीची नितांत निकड आहे. यादृष्टीने डॉ. प्रभाकर जोशी यांचे हे पुस्तक लक्ष वेधून घेणारे आहे. समाजभाषाविज्ञान या विषयाचे स्वरूप व व्याप्ती या मुद्यांपासून सुरू होणारे हे पुस्तक या विषयातील मूलभूत संकल्पनांची विस्ताराने मांडणी करणारी आहे. समाजभाषा व संस्कृती, समाज-संस्कृती स्तरांवरील भाषाभेद, पाश्चात्य भाषावैज्ञानिकांचे प्रमुख सिध्दांत, भाषानिर्मितीचे सिध्दांत या तात्विक मुद्यांसंबंधीची विस्ताराने केलेली मांडणी हे या पुस्तकाचे एक प्रधान वैशिष्ट्य आहे. त्यानंतर भाषिक प्रश्न आणि लिपी या दोन निराळ्या मुद्यांसंबंधी विवेचन आलेले आहे. सातत्याने या अभ्यासविषयासंबंधी चिंतन-अभ्यास करणार्या डॉ. जोशी यांनी अध्यापक-विद्यार्थी यांच्यासाठी सुलभपणे केलेली मांडणी हे या पुस्तकाला संदर्भमूल्य प्राप्त करून देणारी आहे.
Samaj Bhasha Vidnyan


