-
स्त्री मानसशास्त्र
Rs.350.00वैदिक काळात स्त्रीला कुटुंबात व समाजात उच्च स्थान होते. नंतरच्या काळात मात्र स्त्रीला दुय्यम स्थान प्राप्त झाले. विविध समाजसुधारकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याने स्त्री शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटले. आज स्त्रिया शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात झेप घेत आहेत. हे जरी सत्य असले तरी आजही लाखो स्त्रिया शिक्षणापासून वंचित आहेत. बलात्कार, कुमारीमाता, स्त्रीभृणहत्या, हुंउाबळी, घटस्फोट, मारझोड अशा अनंत संकटांशी स्त्री लढा देत आहे. याचा कारणे समाज व संस्कृतीच्या मूळाशी आहेत. स्त्रीला मासिक पाळी, गर्भधारणा, प्रसुती, रजोनिवृत्ती या स्थित्यंतरांमधून जावे लागते. प्रत्येक अवस्थेत स्त्रवणार्या संप्रेरकांमुळे तिला पुरुषांपेक्षा कितीतरी पटीने अधिक शारीरिक, मानसिक व भावनिक ताण-संघर्षांचा सामना करावा लागतो. त्यादृष्टीने स्त्री-पुरुषांची शरीर रचना, तिचे शारीरिक व मानसिक आरोग्य, आरोग्यावर परिणाम करणारे घटक, स्त्री आणि पुरुष दोघांनीही समजून घेऊन स्त्रीला प्रत्येक टप्प्यावर समजून घेतले, तिला आधार दिला तर तिचा त्रास, येणारा ताण ती सहजपणे यांचा सामना करु शकेल हा विचार या पुस्तक लेखनामध्ये केलेला आहे. स्त्रियांची मनोसामाजिक भूमिका, स्त्री-स्वभावाची वैशिष्ट्ये आणि वर्तन, स्त्रियांची विविध क्षेत्रातील संपादणूक, आधुनिक स्त्री व नैतिकता-बदलते संदर्भ इत्यादी मुद्यांवर येथे विवेचन केले आहे.
Stri Manasshastra
-
स्त्रीवादी कविता आस्वाद आणि समीक्षा
Rs.125.00स्त्रीवादी साहित्याचा उदय पुरुषप्रधान संस्कृतीच्या कडेलोटातून झाला आहे. त्यामुळे तो मराठी माणसाला आणि मराठी साहित्याला टाळता येणार नाही. उलट स्त्री जाणीव आता मानवकल्याणाकडे झेपावते आहे. आपल्या आग्रही भूमिकेतून सृजन, पोषण, संवर्धन, परस्पर सहकार्य यांचा एक वेगळा दृष्टिकोन मांडते आहे. जर त्याचा अंगिकार आपल्या समाजाने केला तर निश्चितच बदल घडून येईल. कारण हिंसा, द्वेष, आक्रमकता, संकुचित स्वार्थ ह्या विनाशकारी वृत्तीशी स्त्री-शक्ती लढा देते आहे. त्यामुळेच अशावेळी खेड्यापाड्यातील स्त्रियांचे आतून आलेले हुंकार ऐकणे, समजून घेणे आवश्यक आहे. खेड्यापाड्यातून शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, आणि त्यांच्या विधवा स्त्रिया नव्याने संघर्ष करोत लढत आहेत. आपले जगणे सावरण्यासाठी, सुधारण्यासाठी, परिस्थितीशी दोन हात करीत आहेत. रुढी व परंपरेच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ पाहत आहेत. खचून न जाता कुटुंब व समाजाने लादलेल्या क्लेशदायक अनिष्ट सांस्कृतिक बेड्या तोडू पाहत आहेत. अशा स्त्रियांचा शोध घेऊन त्यांच्या जीवनगाथा समाजापुढे आपणण्याचे नवे आव्हान स्त्रीवादी साहित्यापुढे आहे. डॉ. मारोती कोल्हे यांनी स्त्रीवादी कवितेवरील केलेल्या संपादनाने या नव्या साहित्य प्रवाहास पुष्टी प्रदान केली आहे. हे स्तुत्य आहे.
– प्राचार्य डॉ. प्रतिमा इंगोले, दर्यापूर जि. अमरावती
Strivadi Kavita Aaswad Ani Samiksha