-
अपसामान्य । मनोविकृती मानसशास्त्र
Rs.225.00दिवसेंदिवस शारीरिक आजारासोबत मानसिक आजार सुद्धा वाढत आहे. या मानसिक आजाराला अपसामान्य विकृती किंवा मानसिक विकृती असे म्हणतात. सामान्य माणसापेक्षा एखादा व्यक्ती वेगळे वर्तन करायला लागल्यास त्याला आपण सर्रासपणे ‘मॅड’ या संकल्पनेत टाकतो. परंतु खरे पाहता कोणत्या प्रकारचा मानसिक आजार त्या व्यक्तीला जडलेला आहे याची साधी माहिती सुद्धा आपल्याला नसते. विद्यार्थी, शिक्षकांना हे पुस्तक मोलाचा संदर्भग्रंथ ठरणार आहे. त्यासोबतच दैनंदिन जीवनामध्ये वावरणार्या प्रत्येकच व्यक्तीसाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरणार आहे. कारण मानसिक समस्या प्रत्येक घरात तसेच प्रत्येक व्यक्तीत निर्माण होत आहे. या पुस्तकाच्या माध्यमाने मानसिक विकृती समजणे, ओळखणे सोपे जाईल यातून मानसिक विकृतीची कारणे माहिती झाल्याने ती उद्भवूच नये यासाठी पुरेपूर प्रयत्न करता येतील. या पुस्तकामध्ये कारणासोबतच उपचार सुद्धा प्रत्येकच मानसिक विकृतीवर स्पष्ट केलेले आहे, त्यातून मानसिक विकृतीला दूर ठेवणे सहज शक्य होईल म्हणूनच या पुस्तकाचा ‘ठेवा’ हा प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठीच अमूल्य असाच ठरणार हे नक्कीच.
Apsamanya | Manovikruti Manasshastra
-
आधुनिक उपयोजित मानसशास्त्र आणि मानवी जीवन
Rs.210.00आजच्या काळात मानसशास्त्राचे स्वरूप प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे. व्यक्ती जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये मानसशास्त्राचे कार्य वाढलेले आहे असे म्हणता येईल. मानवी वर्तनाशी संबंधित प्रत्येक क्षेत्रात मानसशास्त्राच्या उपयोजित शाखा निर्माण झालेल्या आहेत. या शाखाद्वारे मानवी जीवन अधिकाधिक सुसह्य कसे करता येईल याकडे लक्ष दिले जाते. वाढते औद्योगिकरण आणि तंत्रज्ञान यामुळे मानवी व पर्यावरणीय समस्याही वाढलेल्या आहेत. या समस्या सोडविण्याचा प्रयत्न उपयोजित मानसशास्त्रज्ञ करतात. उपयोजित मानसशास्त्राचा आढावा घेतल्यास असे लक्षात येते की, सैद्धांतिक व उपयोजित मानसशास्त्रीय संशोधन आणि मानसशास्त्रीय सेवा यांच्या दिर्घकाळ योगदानामुळेच आज उपयोजित मानसशास्त्राचे क्षेत्र खुप विस्तृत झालेले आहे. मानसशास्त्राचा प्रचंड आवाका लक्षात घेता सर्व समस्यांचा एकत्रित अभ्यास करणे कठीण झालेले आहे. म्हणूनच उपयोजित मानसशास्त्राच्या विविध शाखा उदयास आलेल्या आहे. सदर पुस्तकात उपयोजित मानसशास्त्राच्या अभ्यासपद्धती, प्रायोगिक व अप्रायोगिक आणि प्रदत्त संकलनाची तंत्रे, मुलाखत, निरीक्षण, सर्वेक्षण, मानसशास्त्रीय चाचण्या, व्यक्तीवृत्त याचप्रमाणे मानसशास्त्राच्या विविध शाखांचाही यथायोग्य परामर्श घेतला आहे.
Adhunik Upyojit Manasshastra Ani Manvi Jeevan