• आधुनिक सामान्य मानसशास्त्र

    आधुनिक सामान्य मानसशास्त्र

    19 व्या शतकाच्या उत्तरार्धापासून मानसशास्त्र हे स्वतंत्र शास्त्र म्हणून ओळखले जाऊ लागले. मानसशास्त्राचे आजचे स्वरुप हे अत्यंत शास्त्रीय दिसून येते. मानसशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय ‘वर्तन’ हा आहे. वर्तनाचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारे शास्त्र म्हणून आज जगात सर्वत्र मानसशास्त्राला मान्यता मिळाली आहे. मानसशास्त्राच्या या प्रवासात अनेक तत्ववेत्त्यांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. आधुनिक मानसशास्त्राच्या विकासाचे श्रेय द्यावे लागेल ते म्हणजे जर्मन शरीरशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी विल्यम वुडण्ट यांना. विल्यम वुडण्ट यांनी जर्मनीतील लाईपझिंग विद्यापीठात मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा (1879) स्थापन करून मानसशास्त्राला शास्त्रीय दर्जा प्राप्त करून दिला आणि मानसशास्त्राला एक नवीन ओळख प्राप्त करून दिली. मानसशास्त्र वर्तनाचा अभ्यास आणि वर्तनासंदर्भात अनेक पैलूंची माहिती मानसशास्त्रातील संशोधनामुळे आपल्याला मिळत आहे; ती माहिती शास्त्रशुद्ध स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सदरील पुस्तकाचे प्रयोजन केले आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मानसशास्त्रात जे वेगाने बदल होत आहे त्यांचीही दखल घेतली गेली आहे. पुस्तकातील भाषा साधी, सोपी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सदरील पुस्तक विद्यार्थी, प्राध्यापक, मानसशास्त्राचे वाचक तसेच सर्वांना निश्चितच उपयुक्त ठरेल याची खात्री आहे.

    Adhunik Samanya Manasshastra

    Rs.195.00
    Add to cart
  • आरोग्य मानसशास्त्र

    आरोग्य मानसशास्त्र

    मानवी मनोव्यापारांचा परिणाम व्यक्तीच्या शारीरिक स्वास्थ्यावर होत असतो. व्यक्तीचे विचार, भावना आणि दैनंदिन जीवनामध्ये इतरांशी होणार्‍या आंतरक्रिया जेवढ्या व्यापक, परिपक्व आणि प्रगल्भ असू शकतील तेवढे त्या व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असेल तर निरोगी आणि निरामय जीवन व्यक्तीच्या वाट्याला येते. मानवाच्या या मनोव्यापारांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करण्याचे कार्य आरोग्य मानसशास्त्राच्या क्षेत्रात आरोग्य मानसशास्त्रज्ञ करीत आहेत. हे अभ्यास केवळ सर्वेक्षण, व्यक्तिवृत्त अभ्यास आणि क्षेत्रीय अभ्यासापुरते मर्यादित राहिले नसून ते प्रायोगिक, सहसंबंधात्मक अभ्यास, जैवरासायनिक व न्यूरोट्रान्समीटर यांच्यामध्ये होणार्‍या बदलांमधील सूक्ष्म निरीक्षणापर्यंत पोहोचले आहेत.
    प्रस्तुत पुस्तकात आरोग्य मानसशास्त्राची ओळख, शरीर-मन संबंध, आरोग्य क्षेत्रात मानसशास्त्राची भूमिका, ताण आणि साधक वर्तन, ताणाला प्रतिसाद/प्रतिक्रिया, तणावाचा सामना करण्यासाठी सामाजिक संपर्क वाढविणे, दिर्घकालीन आरोग्य विकृतींशी (जुनाट आजारांशी) निगडीत व्यक्तिगत बाबी, प्रमुख दिर्घकालीन आरोग्य समस्या, प्राथमिक प्रतिबंध आणि आरोग्य प्रसार, जीवन गुणवत्ता आणि आरोग्य वर्तन, आरोग्य प्रसार वर्तन इ. मुद्द्यांचे सविस्तर विवेचन केलेले आहे.

    Arogya Manasshastra

    Rs.150.00
    Add to cart