
आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत
Rs.275.00आधुनिक भारताचा प्रारंभच मुळात ब्रिटिशांच्या आगमनानंतरचा आहे. ब्रिटिशांनी सोबत आणलेली नवीन पुष्ये व नवीन विचार भारतीयांसाठी नवीन होते. त्यातून सामाजिक आर्थिक, धार्मिक सुधारणांना प्रारंभ झाला व या नवीन बदलाचे पडसाद एकूण भारतीय जीवनावर पडले व त्यामुळे विचारमंथनालाही चालना मिळाली. राजा राम मोहन रॉय यांनी त्यास वैचारिक आधार देऊन प्रबोधनकालाचा प्रारंभ केला. महात्मा जोतिराव फुले, स्वामी दयानंद सरस्वती, नामदार गोखले, आगरकर, न्यायमूर्ती रानडे, दादाभाई नवरोजी, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरु, अरविंद घोष, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, एम. एन. रॉय, मौलाना आझाद, राम मनोहर लोहिया इत्यादी विचारवंतांनी भारतातील बदलत्या परिस्थितीला अनुरुप व भविष्यकालीन उपाययोजना म्हणून तत्कालीन आवश्यकतेतून व जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या विषयांवर चिंतन करुन वैचारिक मांडणी केली आहे.
आधुनिक भारतीय विचारवंतांनी भारताचे स्वातंत्र्य, भारताचा राजवाद, आंतराष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, भारतातील आर्थिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय प्रश्न त्यासाठी करावयाची उपाययोजना, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा भारत, शासनाचे परराष्ट्र धोरण, अंतर्गत योजना, राज्यघटना शासन पद्धत इत्यादी संदर्भात वेळोवेळी व्यक्त करण्यात आलेले राजकीय विचार हाच भारताचा राजकीय विचाराचा वारसा आहे व त्याचा आधार घेऊन या देशाची राजकीय जडण-घडण संपन्न झाली असून, भारताचा राजकीय विकास होत आहे. म्हणूनच आधुनिक भारतीय राजकीय विचारांचा अभ्यास हा आवश्यक ठरतो.
Aadhunik Bharatiya Rajkiya Vicharwant

