
पाश्चिमात्य राजकीय विचारवंत
Rs.295.00पाश्चिमात्य देशामध्ये प्रामुख्याने युरोपीयन देशातील राजकीय विचारांची प्राचीन परंपरा राहिलेली आहे. पश्चिमी विचार हे सॉक्रेटीस पासून सुरु झाल्याचे मानले जाते. त्यांचा प्रभाव प्लेटो, अॅरिस्टॉटल या ग्रीक विचारवंतावर दिसून येतो. प्लेटोपासून ही परंपरा सुरु होऊन हॅराल्ड लास्की व त्यानंतरही सुरु आहे. या विचारपंरपरेची फार मोठी शृंखला आहे. त्या सर्व विचारवंताचा परामर्श मार्यादित स्वरुपाच्या ग्रंथात मांडणे अशक्य आहे. म्हणून त्या त्या काळातील प्रतिनिधी म्हणून निवडक विचारवंत घेऊन मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. पाश्चिमात्य विचारवंतांचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व विचारवंत समाजाच्या सर्व घटक अंगांना स्पर्श करतात. त्यामुळे त्यांनी मांडलेल्या सर्व स्पर्शी विचारांचा परामर्श घेणे आवश्यक असले तरी ग्रंथाच्या मार्यादेमुळे ते अशक्य आहे. म्हणून प्रतिनिधिक विचारवंत आणि त्यांचे निवडक विचार यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्राचीन ग्रीक परंपरेतील प्लेटो, अॅरिस्टॉटल, मध्ययुगाचा प्रतिनिधी म्हणून मॅकियान्हॅली, सामाजिक करार सिद्धांत मांडणार्या हॉब्ज, लॉक, रुसो उपयोगितावादी विचारवंत म्हणून जे. एस. मिल, आदर्शवादी विचारवंत टी.एच. ग्रीन, समाजवादी विचारवंत म्हणून कार्ल मार्क्स आणि 20 व्या शतकांचा प्रतिनिधी म्हणजे हॅरॉल्ड लास्की यांचा समावेश या ग्रंथात करुन त्यांचे महत्त्वपूर्ण असणारे विचार यांची ओळख प्रस्तुत ग्रंथात करण्याचा हा प्रयत्न केला आहे.
Pachimatya Rajkiya Vicharvant

पाश्चिमात्य राजकीय विचारवंत
Rs.235.00राजकीय तत्वज्ञानाची पायाभरणी ही राजकीय विचारांच्या माध्यमातून होत असते. राज्यशास्त्रातील विविध घटकांमध्ये राजकीय विचारांच्या अभ्यासाला महत्वाचे स्थान असून आजही पाश्चिमात्य राजकीय तत्वज्ञानाची प्रेरणा जगभरातील विचारवंतांना, अभ्यासकांना आणि राष्ट्रांना नेहमीच मिळत राहील. पाश्चिमात्य देशातील राजकीय विचारांचा प्रारंभ हा प्राचीन ग्रीक तत्वज्ञानापासून झाल्याचे सर्वजण मान्य करतात. ग्रीक विचारवंत अॅरिस्टॉटल यांना राज्यशास्त्राचे जनक म्हटले जाते. युरोपियन देशातील राजकीय विचारांची प्राचीन परंपरा सॉक्रेटिसपासून सुरू झाली असून त्याचा प्रभाव प्लेटो, अॅरिस्टॉटल या ग्रीक विचारवंतांवर तसेच युरोपीय देशातील राजकीय विचारांवरही दिसून येतो. म्हणूनच त्यांच्या विचारांचा, तत्वज्ञानाचा अभ्यास आजही आवश्यक व म्हणून महत्वपूर्ण आहे.
प्रस्तुत पुस्तकात पाश्चिमात्य देशातील प्रगल्भ विचारवंत, तत्वज्ञानी असलेल्या अॅरिस्टॉटल, मॅकॅव्हली, रुसो, जॉन स्टुअर्ट मिल, कार्ल मार्क्स, हॅराल्ड जे लास्की यांचा समावेश करण्यात आला असून आजही त्यांचे विचार नेहमीच मार्गदर्शक ठरतील यात तीळमात्र शंका नाही.Pashchimatya Rajkiya Vicharwant


