
आधुनिक राजकीय विचार प्रणाली
Rs.450.00राज्यशास्त्रात राजकीय, सामाजिक विचार प्रणालीची सुरवात हॉब्ज, लॉक, रुसो, नंतर हेगेल, मॅक्स वेबर, बेर्थेम सारख्या विचारवंतानी केली आहे. या विचारसरणीला एक वैचारिक व सोबत नैतिक स्वरुपाचे अधिष्ठान होते. नंतरच्या कालखंडात विचारसरणीतील अतिरेकी भूमिका, हिंसात्मकतेला देण्यात आलेले पाठबळ दुसर्याच्या विचारांना तुच्छ लेखने यासारख्या आत्मकेंद्रीत विचारांमुळे विचारसणींना विरोध हेऊ लागला. यामुळे वैचारिक प्रगती ऐवजी वैचारिक संघर्षाचे रुपांतर व्यावहारिक संघर्षात होऊन वैचारिक सहिष्णूता अमान्य करण्यात येऊ लागली. त्यातुनच विचारसरणीवर टीका होऊन तिला नाकारणे यासारखा विचार पुढे येऊन ‘विचारसरणीचा अंत’ यासारखा विचार पुढे आला.
‘विचार हा मानवी ठेवा’ असून त्याचा सर्वाधिक प्रभाव हा राज्यशास्त्रावर पडतो. विचारसरणीचे ऐतिहासिक संदर्भ उत्क्रांतत्वानुसार त्यात झालेले बदल, त्यातील विविध प्रवाह व उपप्रवाह, सातत्य वस्तुस्थिती तसेच प्रत्येक विचारसरणीचे महत्त्व तिच्या मर्यादा आणि त्या विचारसरणीवर होणारी टीका या सर्वाच्या अभ्यासासाठी प्रस्तुतचा प्रयत्न यशस्व्ी होईल ही अपेक्षा…
Aadhunik Rajkiya Vichar Pranali



