• ग्रामीण समाज व विकास

    ग्रामीण समाज व विकास

    मानव हा समाजशील प्राणी आहे. मानवाला स्वतःच्या विकासासाठी समाजावरच अवलंबून रहावे लागते. भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार करुन ग्रामीण भागातील शेवटच्या घटकाचाही निर्णय प्रक्रियेत समावेश केला आहे. वैदिक काळापासून ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामीण जनतेचा प्रत्यक्ष ग्रामविकासात सहभाग असल्याचे दिसते. स्वातंत्र्योत्तर काळात खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी ग्रामस्वराज्याची संकल्पना महात्मा गांधीजींनी मांडली. त्यातूनच पुढे त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था अस्तित्वात आली.

    ग्रामीण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी बिगर सरकारी संस्था, शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना मोलाच्या ठरल्या आहेत. कृषीप्रधान अर्थव्यवस्था असलेल्या भारतातील ग्रामीण जनतेच्या विकासात आर्थिक घटकही महत्त्वाचा ठरतो. त्यादृष्टीने त्यांचा अभ्यास व्हावा यासाठी पंचायतराज, बिगर सरकारी संस्था, विविध शासकीय योजना, ग्रामीण अर्थव्यवस्था या ग्रामीण विकासासाठी आवश्यक असलेल्या घटकांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.

    Gramin Samaj V Vikas

    Rs.475.00
    Add to cart
  • ग्रामीण समाजाची मूलतत्त्वे

    ग्रामीण समाजाची मूलतत्त्वे

    प्राचीन भारताची संस्कृती ही परंपरा, शिक्षण व साहित्याच्या वैविध्यामुळे आकारास आली आहे. प्राचीन काळापासून भारताची संस्कृती ग्रामीण भागातूनच मोठ्या प्रमाणात जोपासली गेली आहे. म. गांधींनी ‘खेड्याकडे चला’ हा मंत्र देवून ग्रामीण भागात रुढी, परंपरा जोपासण्याबरोबर खेडी स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. शिक्षणामुळे साहित्याची निर्मिती होण्यास मोठ्या प्रमाणात वाव मिळाला. स्वातंत्र्योत्तर कालखंडात ग्रामीण साहित्याची निर्मिती वाढली असून नव्याने लिहाणारे तरुण आपल्या परिसरातल्या, आपल्या गावातल्या, कुटूंबातील माणसांच्या व्यथा वेदना, विविध समस्या आणि जगण्यासाठी त्यांना घ्याव्या लागणार्‍या संघर्षाचे चित्रण आपल्या लेखनातून करत आहे. ग्रामीण साहित्याच्या निर्मितीचे कारण शोधत असतांना एक गोष्ट लक्षात येते. समाजजीवनातील साचलेपणा समाज आणि साहित्य भाषा आणि जीवन, भाषा, समाज, संस्कृती यांची अतुट अस नातं असतं. समाजाचे प्रतिबिंब शब्दांच्या माध्यमातून साहित्यात चित्रित होत असते. त्या दृष्टिने ग्रामीण समाजाचा अभ्यास व्हावा यासाठी या पुस्तकात त्यांच्या परंपरा, शिक्षण व साहित्य याचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

    Gramin Samajachi Multatve

    Rs.475.00
    Add to cart