• पंढरीनाथ पाटील - राजकीय व सामाजिक कार्य

    पंढरीनाथ पाटील – राजकीय व सामाजिक कार्य

    भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात अनेकांनी नि:स्वार्थीवृत्तीने सहभाग घेवून लाठीमार, तुरुंगवास, गोळीबार सहन केलेला आहे. हे कार्य करत असतांना त्यांनी कुटूंबाचा, नातेवाईकांचा कोणताही विचार न करता स्वातंत्र्य मिळविणे हेच आपले ध्येय असल्याचे सिद्ध करुन दाखविले. अशा सामान्य लोकांसाठी ‘स्वातंत्र्य लढयाचे पाईक’ असा शब्द प्रयोग वापरणे योग्य ठरेल. असे पाईक खेडयांपासून ते शहरीभागांपर्यंत निर्माण झालेले होते. त्याचाच एक भाग म्हणजे बुलडाणा जिल्हयात कार्यरत असणारे पंढरीनाथ पाटील हे गांधीवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते होते. घरातील आर्थिक अडचणींवर मात करुन घेतलेले शिक्षण हे त्यांना पुढील काळात अत्यंत उपयोगी ठरल्याचे दिसून येते. स्वातंत्र्य सैनिक पंढरीनाथ पाटील यांनी गांधी कालखंडातील असहकार, सविनय कायदेभंग व भारत छोडो हया तिन्ही आंदोलनात केलेल्या कार्यावर लेखकांनी दूर्मिळ माहिती उजेडात आणलेली आहे. पंढरीनाथ पाटीलांनी बेळगाव, चिखली, जस्तगाव, कल्याण, वर्धा, पुणे, मुंबई, नागपूर इत्यादी ठिकाणच्या परिषदांमध्ये मांडलेल्या विचारांचा आवर्जून हया संदर्भ ग्रंथात उल्लेख केलेला आहे. त्यावरुन पंढरीनाथ पाटील हे बौद्धिकतेची कास धरणारे व्यक्तीमत्व होते असे निश्चित सांगण्यात येते.

    पंढरीनाथ पाटील हे स्वातंत्र्य आंदोलनाचे पाईक तर होतेच पण त्याच बरोबर सामाजिक जागृतीलाही प्राधान्य देणारे व्यक्तिमत्व होते. विधवा पुर्नविवाह व अस्पृश्योद्धारासाठी केलेल्या कार्याची नोंद घ्यावी लागेल. स्वत:च्या पुढाकाराने त्यांनी दोन बालविधवा मुलींचा पुर्नविवाह घडवून आणला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसमवेत अस्पृश्योद्धाराचे कार्य केले. याशिवाय अंबादेवी मंदिर खुले, वर्‍हाड प्रांतीय अस्पृश्य महार परिषद, तुरुंगात अस्पृश्यांवर होणारा सामाजिक अन्याय, अस्पृश्यता निवारण मंडळाद्वारे कलेले कार्य विस्तृत स्वरुपात मांडलेले आहे. पंढरीनाथ पाटील हयांचे अस्पृश्य समाजातील अनेक मित्र असल्याचे नावानूसार उल्लेख दिल्याने भर पडली आहे. थोडक्यात विदर्भात अस्पृश्य निवारण्यासंदर्भातील एक कृतिशील समाजसुधारक म्हणून पंढरीनाथ पाटीलांचा उल्लेख करावा लागेल.

    Pandharinath Patil – Rajkiya & Samajik Karya

    Rs.350.00
    Add to cart
  • पश्चिम खान्देशातील आदिवासी लोक साहित्य

    पश्चिम खान्देशातील आदिवासी लोक साहित्य

    ‘पश्चिम खानदेशातील आदिवासींचे लोकसाहित्य’ हा ग्रंथ म्हणजे आदिवासींचे लोकजीवन, लोकसाहित्य, संस्कृती, रुढी, परंपरा इत्यादीची ओळख करुन देणारा आहे. आदिवासी जमातीच्या 47 जमाती आहेत. या जमातीपैकी वारली, कोकणा, ठाकर, गोंड, पारधी, प्रधान अशा बर्‍याचशा जमाती पुढे आलेल्या आहेत. म्हणजे शहरी जीवनाशी त्यांचा संपर्क झालेला आहे. जगाची त्यांची ओळख झालेली दिसते. त्यांनी साहित्यामध्येपण आपले स्थान निश्चित केलेले आहे. त्यापैकी भिल्ल ही आदिवासी जमात. पावरा, कोकणा या जमाती पश्चिम खानदेशातील आहेत. त्यासुध्दा आता तसा प्रयत्न करीत आहे. आपआपल्या समाजाजवळ परंपरागत मौखिक भरपूर लोकसाहित्य आहे, व तो आपल्या संस्कृतीचा ठेवा आहे. तो जतन करण्याच्या उद्देशाने काही अभ्यासक अभ्यासूवृत्तीने त्या साहित्याकडे जाणिवपूर्वक पाहून ते जतन करत आहेत. त्यापैकीच प्रा. डॉ. पुष्पा गावीत यांनी पश्चिम खानदेशातील आदिवासींचे लोकसाहित्य या विषयाचे संशोधन करुन या साहित्याला समाजाभिमुख बनवण्याचा प्रयत्न केला आहे. या ग्रंथामध्ये आदिवासींच्या संपूर्ण लोकजीवनाचा अभ्यास त्यांनी केलेला दिसतो. पहिल्या प्रकरणामध्ये भिल्लांचे लोकजीवन यामध्ये त्यांनी विवाहपध्दतींचा सविस्तरपणे असा परिचय आपणास दिला आहे. सर्व जमातींचा आपण आदिवासी जमाती म्हणून उल्लेख जरी करत असलो तरी प्रत्येक जमातीची संस्कृती, रुढी, परंपरा, त्यांचे देवदैवत, आचार, विचार हे आपणास भिन्न भिन्न प्रकारचे दिसून येतात.

    Pahschim Khandes Adivasi Lok Sahitya

    Rs.250.00
    Add to cart