-
राजकीय समाजशास्त्र
Rs.225.00जगातील अनेक देशांमध्ये विज्ञान युग आणि त्यासोबत आलेल्या औद्योगिक क्रांतीमुळे अनेक बदल घडुन आले. आर्थिक, सामाजिक आणि परिणामतः राजकीय क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात परिवर्तनाची लाट आली. सामाजिक बदल हा प्रामुख्याने आर्थिक चळवळी आणि राजकीय जनजागृती या क्षेत्रातुन प्रगट होत गेला. राष्ट्रभावना प्रखर होत गेली. प्रस्थापित साम्राज्यवादी सत्ता त्यांची वसाहतवादी राज्ये, यांच्यात वाद निर्माण होऊन महायुद्धे उद्भवली. प्रथमतः पहिल्या महायुद्धानंतर युरोपचा राजकीय आणि आर्थिक नकाशाच बदलुन गेला. दुसर्या महायुद्धानंतर आफ्रिका व आशिया खंडातील नवोदीत राष्ट्रांना राजकीय स्वातंत्र्य मिळाले. प्रस्थापित किंवा परंपरागत राजकीय संकल्पना आणि व्यवस्था या क्षेत्रात संपुर्ण क्रांती झाली. नवोदीत, नवनिर्माण राज्यांनी जरी परंपरागत राजकीय संकल्पना किंवा व्यवस्था यातील काही बाबी कमी-जास्त प्रमाणात स्विकारल्या तरी त्यांच्या समाजातील सांस्कृतीकरणाची तसेच सामाजीकरणाची अवस्था, आर्थिक स्थिती आणि समस्या व त्यांच्या राजकीय समाजाच्या, राज्याच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा व ध्येये यानुसार त्यांच्या राजकीय आचारविचारांची जडणघडण होऊ लागली.
Rajkiya Samajshastra
-