-
राजकीय समाजशास्त्र
Rs.595.00वैज्ञानिक शोध, तंत्रक्रांती, वेगवेगळ्या विचारवंतांनी दिलेले वैचारिक योगदान यातून सामाजिक प्रबोधन घडून आले व त्यासोबत समाजातील विविध स्वरूपाच्या धार्मिक, आर्थिक, सामाजिक व राजकीय संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेत व त्याअनुषंगाने विशेषीकरणाच्या आणि सुक्ष्म अध्ययन पद्धतीद्वारे अध्ययनाच्या नवीन पद्धती विकसित होऊन नवीन ज्ञानशाखा, उपशाखा विकसित झाल्यात. समाजाच्या नवीन गरजा, नवीन प्रश्न, नवे पेच सोडविण्यासाठी नवीन आकलन स्विकारून नवीन ज्ञानशाखा विकसित होतात त्यातून मानवाशी निगडीत भिन्न भिन्न विषय अभ्यासासाठी विशेषीकरणाच्या पद्धतीने नवीन ज्ञानशाखा, राजकीय मानववंशशास्त्र, राजकीय समाजशास्त्र, राजकीय भूगोल, राजकीय अर्थशास्त्र इत्यादीचा उगम प्रामुख्याने 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात झाल्याचे दिसून येते.
प्रस्तुत ग्रंथात राजकीय समाजशास्त्राचा परीचय, राजकीय समाजशास्त्राचे दृष्टीकोन, राजकीय व्यवस्था, राजकीय संस्कृती, राजकीय सामाजीकरण, राजकीय सहभाग, राजकीय अभिजन, राजकीय आधुनिकीकरण, राजकीय विकास, राजकीय संसूचन, राजकीय भरती, राजकीय नेतृत्व, लोकमत, राजकीय विचारसरणी, सत्ता, शक्ती, प्रभाव, अधिमान्यता इत्यादी विविधांगी मुद्द्यांचे सविस्तर विवेचन केले आहे.Rajkiya Samajshastra
-
राजकीय समाजशास्त्राचा परिचय
Rs.395.00दुसर्या महायुद्धानंतर ‘राजकीय समाजशास्त्र’ हा विषय स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून उदयाला आलेला आला. राजकीय समाजशास्त्रात सामाजिक जीवनाचे राजकीय जीवनाशी होणार्या आंतरक्रियाचे विश्लेषण केले जाते. हे विश्लेषण विविध राजकीय आणि सामाजिक स्तरांचे पारस्परिक संबंध व प्रभावाच्या संदर्भात केले जाते. या अध्ययनातून सामाजिक आणि राजकीय यांच्यातील संबंधाची नव्या दृष्टिकोनातून मांडणी केली जाते. राजकीय समाजशास्त्रात राजकीय सामाजिक संरचना, समूह, राजकीय संस्था, संबंध आणि व्यवहाराचे अध्ययन केले जाते. तसेच राजकीय समूहावर पडणार्या सामाजिक प्रभावाचाही अभ्यास केला जातो.
प्रस्तुत पुस्तकात राजकीय समाजशास्त्र विषयाशी निगडित सर्व संकल्पनांची माहिती विविध उदाहरणे आणि आकृत्यांसह दिलेली आहे. तसेच राजकीय समाजशास्त्राचा परिचय, राजकीय व्यवस्था, राजकीय संस्कृती, राजकीय सामाजीकरण, राजकीय सहभाग, राजकीय श्रेष्ठजन, राजकीय नेतृत्व, दुसर्या महायुद्धानंतर उदयाला आलेल्या राजकीय बदल, राजकीय विकास व राजकीय आधुनिकीकरण, राजकीय संसूचन व लोकमत, आधुनिक काळातील महत्त्वपूर्ण सत्ता, प्रभाव, अधिकार आणि अधिमान्यता आणि नोकरशाही या विविधांगी मुद्द्यांचा समावेश केलेला आहे.Rajkiya Samajshastracha Parichay