-
महिला आणि मानवी हक्क
Rs.425.00आज भारताला स्वातंत्र्य मिळून 67 वर्षे पुर्ण झालीत. परंतू आज भारतीय स्त्रीच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, आरोग्यविष्यक, शैक्षणिक स्थितीचा आढावा घेताना धक्कादायक चित्र समोर येते. भारतीय महिला आजही मानवी हक्काच्या समान हक्कांसंदर्भात पिछाडीवर आहेत हे कटू वास्तव डोळ्याआढ करता येवू शकत नाही. आपल्या अधिकाराप्रती महिलांना अधिक संघर्ष करावा लागत आहे. संवैधिानिक तरतूदी आणि कायदे असून सुद्धा महिलांचे शोषण आणि अत्याचाराच्या प्रकरणात दिवसेंदिवस वाढच होत आहे.
भारतात एकीकडे महिलांच्या समान हक्कांच्या, विकासाच्या दृष्टीने कायदे केल्या जात आहेत, योजना आखल्या जात आहेत. तर दुसरीकडे महिलांवरील होणार्या विविध अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. बलात्कार, अपहरण, लैंगिक शोषण, कौटुंबिक हिंसाचार, शारिरिक मानसिक अत्याचार अशा विविध अत्याचारांचे प्रमाण वाढत आहे. या अत्याचारांपासून स्त्रियांचे संरक्षण करणारे कायदे आहेत परंतू त्यांच्यातील त्रुटीमुळे अपराध्यांना कठोर शिक्षा होत नाही. त्यामुळे गुन्हेगारांना कायद्याची भितीच वाटत नाही.
Mahila Ani Manvi Hakk
-
महिला व बालक समस्या, परिणाम आणि उपाययोजना
Rs.275.00ज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दररोज नवनवीन गोष्टी घडून आर्थिक क्षेत्रात जागतिक पातळीवर प्रचंड उलाढाली होत आहेत. त्याचे पडसाद स्त्रियांच्या जीवनावर पडत आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या विस्तारणाच्या क्षेत्राने तिच्या दैनंदिन जीवनावर परिणाम स्वरूप अनेक कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय आव्हानेे स्त्रिया मोठ्या कुशलतेने पेलवत आहे. स्त्रियांची जीवनातील भूमिका तपासून बघता तिच्या जबाबदारीत वाढ होत असल्याचे दिसून येते. आधुनिकता स्वीकारतांना नितीमूल्य जोपासून स्वतःचे व्यक्तीमत्व उत्तरोत्तर विकसित करण्याकडेही त्यांचे लक्ष वेधलेले दिसून येते.
भारतात 21 व्या शतकामधील स्त्री सावित्रीबाईच्या आसिम कृपेने शिकली, सवरली, बहरली तिला स्वतःची अशी एक स्पेस मिळाली. या विश्वातल्या प्रत्येक क्षेत्रात तिने उतुंग भरारी घेतली आहे. फक्त ‘चूल आणि मूल’ ही संकल्पना तिने केव्हाच मोडीत काढली आहे तर आजची स्त्री चूल, मूल सांभाळण्याबरोबर आपले करिअर तेवढ्याच प्रभावीपणे सांभाळते.Mahila & Balak Samasya, Parinam and Upayyojna