-
निसर्गोपचार : निरामय, निरोगी जीवनाचा लाभ करून देणारी जीवनपध्दती
Rs.225.00निसर्गोपचार ही एक उपचार पध्दती आहे. आपल्याला नेहमी माहिती असलेल्या औषधोपचार पध्दती म्हणजे आयुर्वेद, अॅलोपॅथी/इलेक्ट्रोपॅथी, होमिओपॅथी ह्या होत. याशिवाय अॅक्युप्रेशर चिकित्सा व अॅक्युपंक्चर, चुंबक चिकित्सा, योगोपचार आणि निसर्गोपचार या नवीन उपचार पध्दती आहेत. सध्या अलिकडच्या प्रदुषित वातावरणात, रोगट परिस्थितीत निसर्गोपचार चिकित्सा सर्वांना माहिती होणे ही काळाची गरज आहे.
मानवी शरीर आणि मानवी मन यावर ताबा मिळविता येतो, नियंत्रण ठेवता येते. नैसर्गिक आणि सात्विक आहारामुळे शरीरामध्ये बदल घडवून आणता येतात; तर प्राणायाम, ध्यानसाधना, योगासने, दिर्घश्वसन याद्वारे मन बदलविता येते. म्हणजेच निसर्गोपचारामध्ये शरीरावर व मनावर नियंत्रण घालून रोग विकारापासून स्वत:चे संरक्षण करता येते. सध्याच्या युगात निसर्गोपचार पध्दतीमध्ये आहार चिकित्सा, उपवास चिकित्सा, अॅक्युप्रेशर/अॅक्युपंक्चर, योगोपचार, वनौषधी, पुष्पौषधी इत्यादी चिकित्सांचा समावेश केला जातो. याचाच अर्थ असा की, पर्यावरणात, निसर्गसृष्टीत जे काही चांगले आहे त्या सर्वांचा समन्वय यामध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळेच निसर्गोपचार पध्दती ही अत्यंत गुणकारी, चमत्कारी, क्रांतीकारी उपचार पध्दती तयार झालेली आहे. ही पध्दती मानवी जीवनाच्या कल्याणासाठी एक दैवी शक्ती आहे.Nisargapachar : Niramay, Nirogi Jeevanacha Labha Karun Denari Jeevanpaddhati
-
प्रतिशोध : यौन शोषणाचा
Rs.110.00जात, धर्म, रूढी, परंपरा, लिंग यांच्या नावावर होणारे शोषण व त्यांचे समाजातले दृश्य रूप सर्वांनाच लाजविणारे आहे. हे आपण युगे न युगे बघतो आहोत. दलित समाजाचा सुशिक्षित वर्ग आपल्या लेखणीतून अनुभव व्यक्त करू लागला. सर्वप्रथम आत्मकथनांची लाटच या शोषितांच्या वेदनेतून विकसित झाली. दिवसेंदिवस आधुनिकीकरणाच्या नावाखाली, शिक्षणाच्या, पैशाच्या, राजकीय सत्तेच्या बळावर पद्दलितांवरील अत्याचार वाढतच आहेत. पूर्वीतरी त्याचे स्वरूप सौम्य होते मात्र आज वासनांधांची पहिली नजर ही दलित, पिडीत, मागासवर्गातील स्त्रीकडेच वळते. स्त्रीयांच्या शारीरिक, मानसिक पिंडाचे पृथ्थकरण शब्दरूपात कुणालाही करणे अशक्य आहे. स्त्रीच्या वेदना ह्या पुरूषांना, स्त्रीला व समाजाला कधीही समजू शकणार नाहीत. बलात्कारीत स्त्रीची वेदना दुसरी स्त्री समजून घेत नाही याचे दाखले आपणाला साहित्यात मिळतात. एवढेच नव्हे तर न्यायालयीन संघर्षात दाद मागताना सर्वांसमक्ष असो वा ‘इन कॅमेरा’ बंद खोलीत असो. धारदार प्रश्नांची सरबत्ती असतेच. एकवेळेस बलात्काराची वेदना कमी, मात्र या प्रश्नांची वेदना आयुष्यभर टोचणारी ठरते.
स्त्री आज प्रतिकार करताना दिसते, मात्र हा प्रतिकार किती व कसा दडपला जातो याची उदाहरणेदेखील आपल्या आजूबाजूला, परिसरात, गावात; कदाचित आपल्या घरातदेखील आहेतच. मात्र हिच स्त्री जेव्हा प्रतिकारातून प्रतिशोध घेण्याचं ठरवते तेव्हा मात्र ती स्वत:ला देखील संपवून टाकते. तिचा प्रतिशोध तर पूर्ण होतो मात्र तिला तिचे स्थान मिळत नाही- समाजात व घरात देखील. न्यायालयीन प्रक्रियेत तिला आत्मरक्षणाचा हक्क तर आहे मात्र प्रतिशोधाचा नाही. आत्मरक्षणात समोरच्या व्यक्तीच्या वासनेला अधिक महत्त्व व स्त्रीच्या प्रतिकाराला नगण्य. असे का? याचे उत्तर शोधता शोधता या हिंदी भाषेतील नावाजलेल्या कथांचा स्वैर अनुवाद करून आपल्या जाणकार वाचकांसमोर आम्ही ठेवीत आहोत.Pratishodh : Yaun Shoshanacha