• निरामय चैतन्य

    निरामय चैतन्य

    निरामय आनंदी जीवनाचे रहस्य जाणून घेऊन समाधानी, सुखी जीवन जगण्यातच बुद्धीकौशल्य आहे. आयुष्याच्या सर्वच वाटा सरळ नाहीत. त्या मार्गावर अनेक वळणेही आहेत. वळणावर योग्यरित्या वळणे, प्रसंगावधान राखण्यातच शहाणपणा आहे. मानवी शरीरशास्त्रातील सर्वच ज्ञान मानवाला गवसले आहे, हे म्हणणे अतिशयोक्तीच होईल. परमेश्वराने सुप्त सामर्थ्याने पुनरुत्पादनाची प्रक्रिया सुरु ठेवलेली आहे. मानवी जीवनात जन्मास आलेले बाळ, त्याचे शारिरीक अवयव आणि सुरक्षा परंपरेने विकसीत होत आलेले आहेत. पूर्वी बाळाच्या जन्माच्यावेळी कापलेली नाळ निरुपयोगी समजून फेकून दिली जात असे. पण त्या नाळेत बाळाचे आणि त्यांच्या कुटूंबियांचे सुरक्षाकवच दडलेले आहे, याची जाण अलीकडेच झालेली आहे. बाळाच्या नाळेत सुमारे 300 विकाररोग दूर करण्याची क्षमता आहे; म्हणूनच तिची साठवण महत्वाची आहे. शरीरातील सर्व नियंत्रक नाड्या नाभीरत केंद्रीत आहेत आणि त्या नाभीचे महत्व जाणून त्याप्रमाणे आचरण करणे म्हणजेच निरामय आनंदी जीवनाचे फलीत आहे.

    Niramay Chaitanya

    Rs.150.00
    Add to cart
  • निरोगी स्वास्थ्य

    निरोगी स्वास्थ्य

    निर्मळ आनंदी-समाधानी जीवनासाठी स्वत:चे आरोग्य शारीरिक, मानसिक दृष्ट्या उत्तम, सक्षम असणे अत्यावश्यक आहे. शारीरिक संतुलनासाठी, प्रत्येक आनंदी क्षणासाठी अन्नाचे व्यवस्थापन अत्यावश्यक आहे. आहार, विहार-निद्रा यांचा योग्य समन्वय साधला गेला तर विकाराचा आकारच नष्ट होतो. ‌‘अन्न हे पूर्ण ब्रम्ह’ आहे. शरीराचे पोट आणि मेंदू ही दोन्ही ‌‘ऊर्जा निर्मिती केंद्रे’ आहेत. त्यांचे सुस्थितीतील कार्य व गती आपल्या सात्त्विक आहाराशीच संबंधित आहे. शरीराला ‌‘चैतन्य ऊर्जा’ अन्नातूनच प्राप्त होते. त्याच ऊर्जेतून वासना निर्मिती आणि मेंदू कार्य सुरू होते. शरीर ही एक नैसर्गिक रसायनशाळाच आहे. मानसिक ताण-तणावामुळे रसायनीच संतुलन बिघडते. आहाराचाच सौंदर्याशी घनिष्ठ संबंध आहे. ‌‘तूप खाल्ल्यानेच रूप येतं’ हा अनुभव जोपासा. चेहराच आपल्या मनाचा आरसा असल्याने बाह्य सौंदर्याबरोबर मनाचे सौंदर्य कायम करणे गरजेचे आहे.
    रोग, त्याची लक्षणे आणि त्यावरील औषधे ही माहिती देताना चौधरी दांपत्याचे व डॉ. हर्षल यांनी खूप मेहनत घेतलेली दिसते. त्यांचा या विकारासंबंधीचा अभ्यास सखोल असून तो समाजोपयोगी ठरणार आहे. आयुर्वेद आणि ॲलोपॅथी या दोहोंचा सुंदर समन्वय ‌‘निरोगी स्वास्थ्यात’ झालेला आहे.

    Rs.375.00
    Add to cart