-
-
-
-
Investment and Wealth Management
Investment may be defined as an activity that commits funds in any financial / physical form in the present with an expectation of receiving additional return in the future. The expectation brings with it a probability that the quantum of return may vary from a minimum to a maximum. This possibility of variation in the actual return is known as investment risk. Thus every investment involves a return and risk. A portfolio is a combination of various assets and / or instruments of investments.
Wealth management is a high-level professional service that combines financial / investment advice, accounting / tax services, retirement planning and legal / estate planning for one fee. Therefore, it is more than just investment advice, as it can encompass all parts of investor‘s financial life. It’s never to early or too late, to start about investment and wealth management. -
-
आंतरराष्ट्रीय व्यवसाय
सध्याच्या युगाच्या मागणीनुसार आपण अनुकूलन स्वीकारले पाहिजे. म्हणून, एखाद्या विषयाच्या अभ्यासक्रमातील कोणताही बदल हा विकासाची नैसर्गिक प्रगती आहे. जेव्हा तो विषय नवीन विविध मार्गांनी शिकवला आणि शिकला जातो तेव्हा ज्ञान विकसित होते. कवयित्री बहिणबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने प्रथम वर्षातील एम. कॉमच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रमाचा अवलंब केल्यामुळे, विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण साहित्य प्रदान करणे ही आमची जबाबदारी आहे.
प्रथम वर्षातील एम. कॉमच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले “आंतरराष्ट्रीय व्यवसाय” हे पाठ्यपुस्तक सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. स्वयं-शिक्षण स्वरूपातील हे पुस्तक, विद्यार्थी-अनुकूल दृष्टिकोनाचे काटेकोरपणे पालन करते. यात कवयित्री बहिणबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि इतर विद्यापीठांमधील परीक्षा प्रश्नांचा समावेश आहे, जे सर्वसमावेशक परीक्षेची तयारी सुलभ करते. -
गुंतवणूक आणि संपत्ती व्यवस्थापन
‘गुंतवणूक आणि संपत्ती व्यवस्थापन’ या पुस्तकात गुंतवणूक, प्रकार, वैशिष्ट्ये, उद्दिष्ट्ये, गुंतवणुकदरांचे प्रकार, पोर्टफोलिओ व्यवस्थापन, जोखीम आणि परतावा, वित्तीय संपत्तीवरील परतावा, जोखीमेचे मोजमाप, पद्धतशीर जोखमीचे स्रोत, गुंतवणूकीचे पर्याय, गुंतवणूकीचे मूल्यमापन, किंमत-उत्पन्न संबंध, व्याज दराची संरचना, संपत्ती व्यवस्थापन, व्याप्ती, घटक, प्रक्रिया, गरज, पक्षकाराच्या अपेक्षा, वैयक्तिक आर्थिक विवरण, वित्तीय साक्षरता, रोख प्रवाह, वित्तीय नियोजन बांधणी, वैयक्तिक आर्थिक नियोजन, गरज, फायदे, तत्वे इत्यादी मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यात आलेले आहेत. योग्य त्या ठिकाणी आकृत्या काढून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. पुस्तकाची अत्यंत साध्या व सोप्या भाषेत मांडणी केलेली आहे.
प्रस्तुत पुस्तक वाणिज्य आणि व्यवस्थापन विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना निश्चितच उपयुक्त ठरेल.Guntavnuk Ani Sampatti Vyavsthapan
-
भारतीय औद्योगिक अर्थशास्त्र
भारतात औद्योगिक विकासाचा खरा पाया दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत रचला गेला. आज भारतीय औद्योगिक क्षेत्राने लक्षणीय प्रगती केली आहे. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात औद्योगिक क्षेत्राचे महत्त्व वाढत आहे. भारताचा औद्योगिक विकास हा यंत्रनिर्मित वस्तू पर्यंत मर्यादित नसून अभियांत्रिकी, सेवा उद्योग असा विस्तारला आहे.
प्रस्तुत पुस्तकात भारतातील औद्योगिकीकरण, भारतातील सार्वजनिक व खाजगी उद्योग क्षेत्र, औद्योगिक रुग्णता, प्रादेशिक औद्योगिक असमतोल, भारतीय उद्योगांचे नियमन, भारतीय उद्योगांवरील विनियमनाचा भाग म्हणून खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, भारतीय श्रमिक, त्यांची वैशिष्टे, उत्पादकता, वेतन, सामाजिक सुरक्षा, कामगार कल्याण, कामगार संघटना या महत्त्वपूर्ण मुद्द्यांची विस्तृत आणि मुद्देसूद मांडणी केली आहे. भारतीय औद्योगिक क्षेत्राचा विकास किंवा प्रगती आणि समस्यांचे योग्य आकलन व्हावे म्हणून सांख्यिकीय माहितीचा वापर केला आहे. -
मानव संसाधन व्यवस्थापन-II
सदर पुस्तक लिहिताना लेखकांनी एम.कॉम.-भाग एक द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या सर्व घटकाची रचना अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सदर पुस्तकात मानव संसाधन विकास, मानव संसाधन व्यवस्थापनातील आर्थिक समस्या, मानवी संबंध आणि प्रोत्साहन, आंतरराष्ट्रीय मानव संसाधन व्यवस्थापन, मानव संसाधनातील नवीन संकल्पना आणि नवीन तंत्रज्ञानाच्या प्रवाहाच्या संकल्पनावर विशेष भर देऊन वाचकांना समजण्यासाठी विविध आकृत्या आणि उदाहरणाचा उपयोग केला आहे. त्यामुळे वाणिज्य विषयातील विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक निश्चितच फलदायी ठरेल. या अपेक्षेने प्रयत्न करून हे पुस्तक वाचकांच्या हाती देत आहोत. या पुस्तकाविषयी आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया आम्हांला अवश्य कळवाव्यात; त्याचे नेहमी स्वागतच होईल.
Manav Sansadhan Vyavsthapan – II
-
वाणिज्य आणि व्यवसायातील अलीकडील कल
सध्याच्या युगाच्या मागणीनुसार आपण अनुकूलन स्वीकारले पाहिजे. म्हणून, एखाद्या विषयाच्या अभ्यासक्रमातील कोणताही बदल हा विकासाची नैसर्गिक प्रगती आहे. जेव्हा तो विषय नवीन विविध मार्गांनी शिकवला आणि शिकला जातो तेव्हा ज्ञान विकसित होते. कवयित्री बहिणबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने प्रथम वर्षातील एम.कॉमच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रमाचा अवलंब केल्यामुळे, विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण साहित्य प्रदान करणे ही आमची जबाबदारी आहे.
प्रथम वर्षातील एम. कॉमच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले “वाणिज्य आणि व्यवसायातील अलीकडील कल” हे पाठ्यपुस्तक सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. स्वयं-शिक्षण स्वरूपातील हे पुस्तक, विद्यार्थी-अनुकूल दृष्टिकोनाचे काटेकोरपणे पालन करते. यात कवयित्री बहिणबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि इतर विद्यापीठांमधील परीक्षा प्रश्नांचा समावेश आहे, जे सर्वसमावेशक परीक्षेची तयारी सुलभ करते. -
विपणन व्यवस्थापन-II (ग्राहक वर्तणूक)
आजच्या जागतिक स्पर्धेच्या युगात विपणन व्यवस्थापनाचे महत्व सर्वमान्य आहे आणि विपणनाचा गाभा म्हणजे ग्राहक होय. अस्तित्वात असलेले आणि संभाव्य ग्राहककेंद्रित असे विपणन धोरण आखावे लागते. त्यासाठी ग्राहक वर्तणूकीला वाढते महत्व प्राप्त झालेले आहे.
ग्राहक वर्तणूकीची संकल्पना अतिशय व्यापक आहे. ग्राहकांचे मानसशास्त्र, विपणन संदेशवहन आणि ग्राहक वर्तणूकीला प्रभावित करणारे घटक यांच्यावर प्रकाशझोत टाकण्याचा या पुस्तकाचा हेतू आहे. यामध्ये व्यक्तिगत आणि औद्योगिक ग्राहक निर्णय प्रक्रिया, ग्राहक मूल्य, ग्राहकांचे विवध प्रकार, ग्राहक वर्तणूक आणि पर्यावरणीय घटक इ बाबींचे सविस्तर विवेचन दिलेले आहे. त्याचबरोबर खरेदी, विक्री, ग्राहक, उपभोक्ता, मूल्य, किंमत, समाधान, ग्राहक भूमिका यासारख्या संकल्पना सोप्या भाषेत मांडण्याचा हा एक प्रयत्न आहे.Vipanan Vyavsthapan – II (Grahak Vartanuk)
-