• व्यावसायिक अर्थशास्त्र (भाग-1)

    वाणिज्य अर्थशास्त्र ही अर्थशास्त्र या विशाल वृक्ष अभ्यास विषयाची अशी शाखा आहे, की जी सैध्दान्तिक अर्थशास्त्राला (Theoretical Economics) व्यावहारीक अर्थशास्त्राचे (Applied Economics) रुप प्रदान करते. अर्थशास्त्र हे एक असे सामाजिक विज्ञान आहे, की जे मानवाच्या व्यावहारिक वर्तणूकीचे अध्ययन करते. समाजात मानव दुहेरी भूमिका पार पाडतो. एक उपभोक्त्याची आणि दुसरी उत्पादकाची. जेव्हा तो उपभोक्त्याच्या भूमिकेत असतो तेव्हा तो कमीत कमी खर्चात/किंमतीत जास्तीत जास्त वस्तू आणि सेवा प्राप्त करुन म्हणजे मागणी करुन त्यांचा उपभोग आणि त्यातून महत्तम समाधान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. उपभोक्ता आज कोणत्या वस्तू/सेवांची मागणी करत आहे, त्या कोणत्या वस्तूची मागणी करेल याचा अंदाज करुन (Demand Forecasting) कोणत्या वस्तूचे, किती प्रमाणात, कोठे आणि कसे उत्पादन करायचे याचा निर्णय उद्योजक घेतो. त्याचा निर्णय अचूक ठरला तर नफा अन्यथा तोटा सहन करावा लागतो. व्यावसायिक अर्थशास्त्राचा हा पहिला भाग उपभोक्त्याच्या वर्तणूकीशी संबधित आहे.

    Vyavsayik Arthashastra (Bhag 1)

    325.00
    Add to cart
  • व्यावसायिक अर्थशास्त्र (भाग-2)

    Vyavasayik Arthashastra (Bhag 2)

    210.00
    Add to cart
  • व्यावसायिक अर्थशास्त्र (भाग-2)

    व्यावसायिक अर्थशास्त्राचा हा दुसरा भाग उत्पादनाच्या वर्तणूक / निर्णयाशी संबधित आहे. एक कुशल उद्योजक तोच जो कमीत कमी उत्पादन खर्चात, मर्यादित साधन सामग्रीचा कार्यक्षम वापर करुन जास्तीत जास्त उत्पादन आणि नफ्याचे महत्तमीकरण करतो. उद्योजक जेव्हा उत्पादन विषयक निर्णय घेतो तेव्हा तो अर्थशास्त्राच्या खर्च विषयक आणि उत्पादन विषयक सिद्धान्ताचे पालन करतो. एक उद्योजकाचा अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्रज्ञांवर दृढ विश्वास असतो. तो मनतो की, अर्थशास्त्रज्ञ जे सांगतात तेच सत्य आहे. वेगवेगळ्या बाजारात उत्पादन आणि किंमत कशी निश्चित करायची, उत्पादन घटकांचा मोबदला कसा ठरवायचा याबाबत मार्गदर्शन अर्थशास्त्र करते. उद्योजकाने अर्थशास्त्रातील मागणी-पुरवठा बाजूकडे दुर्लक्ष केले तर अर्थव्यवस्थेत तेजी-मंदीची व्यापार चक्रे निर्माण होतात. व्याचार चक्रे निर्माण होवू न देण्यासाठी उद्योजकांनी अर्थशास्त्रज्ञांच्या विचारांचा आदर केला पाहिजे.

    Vyavsayik Arthashastra

    225.00
    Add to cart
  • व्यावसायिक उद्योजकता

    Vyavsayik Udyojakta

    350.00
    Add to cart
  • व्यावसायिक उद्योजकता

    Vyavasayik Udyojakta

    225.00
    Add to cart
  • व्यावसायिक कौशल्ये (भाग-2)

    Vyavasayik Kaushalye (Bhag – II)

    175.00
    Add to cart
  • व्यावसायिक पर्यावरण आणि उद्योजकता

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या प्रथम वर्ष वाणिज्य अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून बदल केलेला आहे. प्रथम वर्ष वाणिज्य (F.Y.B.Com.) वर्गाच्या अभ्यासक्रमात व्यावसायिक पर्यावरण हा विषय मेजर स्तरावर महत्वाचा आहे. प्रस्तुत पुस्तक हे एन.ई.पी. पॅटर्न-2020 अभ्यासक्रमानुसार आम्ही लिहिलेले आहे. या विषयाचे अध्यापन करणारे प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी वर्ग यांच्या व्यापक हिताचा विचार पुस्तक लिहितांना करण्यात आला आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विदयाशाखेतील विद्यार्थी व अभ्यासकांना या विषयाचे चांगल्या प्रकारे आकलन व्हावे तसेच या विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय कौशल्ये निर्माण व्हावी, याचाही विचार आम्ही केलेला आहे.
    प्रस्तुत पुस्तक वाचकांच्या हाती देतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे, कारण यामध्ये विषयाच्या संबधीत जास्तीत जास्त संकल्पना, साधी सरळ व सर्वांना समजेल-उमजेल अशी भाषा वापरुन लिहिलेले आहे, प्रत्येक मुद्याचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांची तयारी व्हावी यासाठी तयार केलेले प्रश्न याचा यात समावेश आहे. त्यामुळे सदर पुस्तकाचा केवळ या विषयाच्या विद्यार्थ्यांनाच फायदा होईल असे नाही तर संशोधक विद्यार्थ्यांना व संशोधक मार्गदर्शकांना व प्राध्यापकांना देखील हे पुस्तक उपयुक्त ठरेल अशी आम्हाला निश्चितच खात्री वाटते.

    175.00
    Add to cart
  • व्यावसायिक पर्यावरण व उद्योजकता (भाग 1)

    Vyavasayik Paryavaran aani Udyojakata (Bhag 1)

    125.00
    Add to cart
  • व्यावसायिक पर्यावरण व उद्योजकता (भाग २)

    Vyavasayik Paryavaran aani Udyojakata (Bhag 2)

    115.00
    Add to cart
  • व्यावसायिक वित्तपुरवठा

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या एम.कॉम अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2023-2024 पासून बदल केलेला आहे. एम.कॉम वर्गाच्या तिसऱ्या सत्राच्या अभ्यासक्रमात व्यवसाय वित्तपुरवठा हा विषय सक्तीचा केलेला आहे.
    प्रस्तुत पुस्तक हे एन.ई.पी. पॅटर्न अभ्यासक्रमानुसार आम्ही लिहिले आहे. या विषयाचे अध्यापन करणारे प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी वर्ग यांच्या व्यापक हिताचा विचार पुस्तक लिहितांना करण्यात आला आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील विद्यार्थी व अभ्यासकांना या विषयाचे चांगल्या प्रकारे आकलन व्हावे तसेच या विषयाचे कौशल्य निर्माण व्हावे, याचाही विचार आम्ही केला आहे. प्रस्तुत पुस्तक वाचकांच्या हाती देतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे, कारण यामध्ये विषयाच्या संबधीत जास्तीत जास्त संकल्पना, साधी सरळ व सर्वांना समजेल-उमजेल अशी भाषा वापरुन लिहिले आहे, केवळ या विषयाच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल असे नाही तर संशोधक विद्यार्थ्यांना व संशोधक मार्गदर्शकांना व प्राध्यापकांना याचा उपयोग होणार आहे, तसेच स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांची तयारी व्हावी यासाठी तयार केलेले प्रश्न याचा यात समावेश आहे.

    210.00
    Add to cart
  • व्यावहारिक व उपयोजित मराठी

    ‘भाषा आणि जीवन व्यवहार’ यांची सांगड घालणार्‍या या नवीन अभ्यासक्रमात परिभाषेच्या उपयुक्ततेबरोबर औपचारिक व अनौपचारिक लेखन प्रकारांचा परिचय विद्यार्थ्यांना होणार आहे. नोकरी प्राप्त करून घेण्यासाठीचे अर्जलेखन तंत्राबरोबर ‘स्वयंरोजगार प्राप्तीसाठी’ करावयाच्या ‘स्वपरिचय पत्र’ लेखनाचे तंत्र व उपयुक्तता लक्षात आणून देण्याचा प्रयत्न आहे. इतिवृत्त व टिप्पणी लेखन तंत्राचा परिचय करून देतांना विद्यार्थ्यांना कार्यालयीन संज्ञापनाबरोबर संगणक क्षेत्रातील मुलस्त्रोत साधनांची ओळख उपयुक्त ठरणारी आहे. कोशलेखन प्रकारांचा परिचय त्यांना नवीन ज्ञानप्राप्तीला मार्गदर्शन करणारा आहे. भविष्यात व्याख्यानक्षेत्रात किंवा नवीन माहितीचे सादरीकरणासाठी ‘पॉवर पॉईंट’ तंत्राच्या उपयोजनाचा वापर आवश्यक ठरणार आहे. त्या तंत्राचाही वस्तुनिष्ठ पद्धतीने परिचय करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे ती शैक्षणिक क्षेत्रात उपयुक्त ठरणारी क्षमता विद्यार्थी आत्मसात करतील. तसेच मायक्रोसॉफ्ट, एक्सेल या घटकांबरोबरच विकिपीडियासाठी लेखन तंत्र इ. घटकांचा समावेश प्रस्तुत अभ्यासक्रमात असल्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या क्षमतांचा विकास साधता येईल.

    Vyavaharik v Upyojit Marathi

    225.00
    Add to cart
  • व्यावहारिक व उपयोजित मराठी (भाग 3)

    शिक्षणाने केवळ ज्ञानसंक्रमण होत नाही तर विद्यार्थांच्या बुध्दी, आकलन व विचारशक्तीचा विकास होतो. त्यांना अनेक कौशल्यांची प्राप्ती होते, त्यांना चांगल्या सवयी लागतात. त्यांच्या अभिरूचीचा व सौंदर्यदृष्टीचा विकास होतो. जीवनविषयक दृष्टीकोनाची व मूल्यांची जोपासना करायला शिकतात. त्यांच्या सर्जनशील शक्तीचा आणि विवकेशीलबुद्धीचा विकास होतो. म्हणून ज्ञानप्राप्तीबरोबर ज्ञानाचे दृष्टीकोन, मूल्ये आणि कौशल्यांची प्राप्ती व उपयोजन शिकविणारे अभ्यासक्रम तयार करावे लागतात. कालसापेक्ष त्यात बदलही करावे लागतात. आजच्या नवसमाज माध्यमांच्या गरजा भागाव्यात आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात हा प्रधान हेतू यामागे असतो. मराठी भाषेबाबतचा न्यूनगंड, अल्पसंतुष्टता वृत्ती, विचारांतील साचलेपणा, संकुचितपणा, यापेक्षा येणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन, ज्ञान-कौशल्यांतील आधुनिकता आणि संकटातून संधी शोधण्याचे कौशल्य जर आपल्याकडे असेल तर भाषेच्या भवितव्याची उगा चिंता करण्याची गरज नाही.

    Vyavharik V Upyojit Marathi (Bhag 3)

    175.00
    Add to cart
  • व्यूहरचनात्मक व्यवस्थापन

    Vyuhrachnatmak Vyavsthapan

    325.00
    Add to cart
  • शालेय व्यवस्थापन

    Shaley Vyavasthapan

    165.00
    Add to cart
  • शालेय शिक्षणातील मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन (बी.एड.द्वितीय वर्ष)

    अनेक संशोधकांच्या मते वारंवार दिल्या जाणाऱ्या चाचण्या ह्या यशस्वी अध्यापनासाठी आणि त्याचबरोबर विद्यार्थी कितपत योग्य कृती करत आहेत यांसाठी उपयोगी पडतात. मानसशास्त्रातील चाचण्या आणि मापन यांच्या चळवळीमुळे ‌‘शैक्षणिक मापन आणि मूल्यमापन’ याला महत्त्व प्राप्त झाले. ‌‘शालेय शिक्षणातील मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन’ या विषयाचा बी.एड्. अभ्यासक्रमात समावेश केलेला आहे. या नवीन अभ्यासक्रमावर आधारित प्रस्तुत पुस्तकात मूल्यमापनाची संकल्पना आणि हेतू, मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन संबंध दृष्टिकोन, अध्ययनाचे मूल्यनिर्धारण, मूल्यमापनाची तंत्रे आणि साधने, शाळांमधील मूल्यनिर्धारणासाठी चाचण्या, शिक्षक निर्मित संपादन चाचणी, मूल्यनिर्धारणाचे नियोजन, संरचना, अंमलबजावणी आणि अहवाल, मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापनातील सुधारणा या घटकांची सखोलपणे मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बी.एड्.चे प्रशिक्षणार्थी व प्राध्यापक यांना योग्य दिशा मिळावी या हेतूने सदर पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे.

    Shaleya Shikshanatil Mulynirdharan Ani Mulyamapan

    295.00
    Add to cart
  • शाश्वतता आणि विकास

    अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व आरोग्य या मानवाच्या मूलभूत गरजा असून त्या पूर्ण करणारा विकास म्हणजे शाश्वत विकास होय. शाश्वत विकासात चैनीच्या गरजा अंतर्भूत नसतात. शाश्वत विकासाची संकल्पना व्यापक असून त्यात सर्व व्यक्तींच्या कल्याणाची कल्पना अभिप्रेत आहे. या शाश्वत विकासात केवळ वर्तमान पिढीचे कल्याण नसून भावी पिढ्यांच्या कल्याणाकरिता नियोजन व व्यवस्थापनसुद्धा अंतर्भूत आहे. विकासाची पद्धत अशी असली पाहिजे की, तिच्यामुळे भावी पिढ्यांच्या गरजा भागविणार्‍या क्षमतेस ठेच पोहचायला नको; तर ती अबाधित राहिली पाहिजे. त्या क्षमतेस धोका निर्माण होता कामा नये. वर्तमान काळातील पिढ्यांच्या गरजा पूर्ण करताना भावी पिढ्यांच्या गरजांकडे लक्ष ठेवून उपयुक्त साधनसंपदा त्यांच्यापर्यंत कशी अबाधित राहिल याकडेही लक्ष दिले गेले पाहिजे. असा विकास म्हणजेच शाश्वत विकास होय.

    Shashwatata and Vikas

    110.00
    Add to cart
  • शिक्षणातील नाट्य आणि कला

    Shikshanatil Natya Aani Kala

    180.00
    Add to cart
  • शेअर बाजार परिचय

    शेअर बाजार हा एक सट्टा बाजार आहे. ज्यात गुंतवणूक करणे मोठी जोखीम आहे. ज्यांची जोखीम पत्करण्याची तयारी आहे, त्यांनीच या बाजाराकडे वळावे. ज्यांच्याकडे अतिरिक्त पैसा आहे, जोखीम वहन क्षमता आहे, More risk more profit, No risk no profit हे या बाजाराचे तत्त्व स्विकारणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी शेअर बाजारातील गुंतवणूक हा चांगला पर्याय आहे. कमकुवत मनाच्या लोकांनी या बाजारात गुंतवणूक न करणेच योग्य. पण जर शेअर बाजाराचे चांगले ज्ञान असेल, बाजार विश्लेषण करता येत असेल, बाजार हालचालीवर चांगले लक्ष असेल, प्रॉफिट बुक करण्यात तत्परता असेल तर हा बाजार चांगला परतावा प्राप्त करून देतो.

    160.00
    Add to cart
  • सकारात्मक मानसशास्त्र

    सकारात्मक दृष्टीकोनाचा आपल्या एकंदरीत जीवनावर फार चांगला प्रभाव पडत असतो. त्यामुळे आपले मानसिक व शारीरिक आरोग्य स्वस्थ ठेवले जाते. सकारात्मक भावनांमुळे मनुष्याच्या सुस्थितीत सतत वाढ होत असते. आपल्या आनंदी राहण्यामागे आपला आयुष्याकडे बघण्याच्या वृत्तीचा महत्त्वाचा सहभाग असतो. सकारात्मक मानसशास्त्र मनुष्याच्या चांगल्या व सशक्त बाजूंवर लक्ष केंद्रित करते. सकारात्मक मानसशास्त्रज्ञांनी बर्‍याच व्यक्तिभेदाचा अभ्यास आणि अध्ययन केले आहेत. त्यामुळे व्यक्ती आरोग्यदायी व आनंदी राहते, याबद्दल त्यांनी विश्लेषण केले. आनंदी असण्यामागे सकारात्मक परिणामाचा फार मोठा हातभार असतो. सकारात्मक दृष्टीकोन असेल तर आनंदी राहाल. आनंदी व्यक्तीच्या जीवनामधील कारण हे फक्त सकारात्मक परिणाम होय. आनंदीवृत्ती आणि सकारात्मक परिणाम ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सकारात्मक परिणामाचा संबंध हा व्यक्तीची आय, शिक्षण वय, लिंग यावर आधारित नाही परंतू सकारात्मक परिणाम हे घनिष्ठ आणि समाधानी नातेसंबंध राखण्यास मदत करतात. सदरील पुस्तकात सकारात्मक मानसशास्त्राचा शास्त्रीय उहापोह करण्यात आलेला आहे.

    Sakaratmak Manasashatra

    195.00
    Add to cart
  • संक्षिप्त मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास

    मध्ययुगीन कालखंडात मराठी वाङ्मय हे वेगवेगळ्या रूपांत अवतरलेले दिसते. या काळात मराठी वाङ्मयनिर्मितीला सुरुवात झाली. मराठी भाषेतील पहिला गद्यग्रंथ ‘लीळाचरित्र’ व पहिला पद्यग्रंथ ‘ज्ञानेश्वरी’ यांची याच काळात रचना झाली. महानुभाव संप्रदाय व वारकरी संप्रदाय या दोन महत्त्वाच्या संप्रदायांचा उगमही याच काळात झाला. महाराष्ट्राचे सामाजिक-सांस्कृतिक जीवन या संप्रदायांनी समृद्ध केले आहे. त्यातून समाजात मानवी जीवनमूल्ये रुजली. शाहिरी वाङ्मय हा संत-पंत वाङ्मय प्रवाहांपेक्षा एक वेगळाच वाङ्मयप्रवाह मध्ययुगात जन्माला आला. बखर वाङ्मयाने इतिहास आणि वाङ्मय यांचे अनोखे नाते निर्माण केले. महानुभाव संप्रदायाचे वाङ्मय, वारकरी संप्रदायाचे वाङ्मय, पंडिती वाङ्मय, शाहिरी वाङ्मय व बखर वाङ्मय अशी विविध प्रकारची वाङ्मयनिर्मिती या कालखंडात विपुल प्रमाणात झाली.प्रस्तुत पुस्तकात महानुभाव संप्रदायाचे गद्य-पद्य वाङ्मय, वारकरी संप्रदायाचे पद्य वाङ्मय, शाहिरी वाङ्मय व बखर वाङ्मय यासोबतच या वाङ्मय प्रवाहांमधील काही निवडक ग्रंथकार व काही निवडक साहित्यकृती तसेच महत्त्वाचे ग्रंथकार व त्यांच्या साहित्यकृती, ग्रंथकाराचे लौकिक जीवन व वाङ्मयीन कर्तृत्व यांचा विस्ताराने परामर्श घेतला आहे. प्रस्तुत पुस्तक हे वाचकांना व अभ्यासकांना वाङ्मयेतिहासाच्या अभ्यासासाठी निश्चितच लाभदायक ठरेल यात शंका नाही.

    Madhyayugin Marathi Vangmayacha Itihas

    250.00
    Add to cart
  • संघटनात्मक कौशल्य विकास

    Sangathanatmak Kaushalye Vikas

    145.00
    Add to cart
  • संघटनात्मक कौशल्य विकास (भाग २)

    Sangathanatmak Kaushalye Vikas (Bhag 2)

    145.00
    Add to cart
  • संघटनात्मक वर्तणूक

    Sanghatnatam Vartnuk

    250.00
    Add to cart
  • संघटनात्मक व्यवहार

    Sanghatnatmak Vyavahar

    525.00
    Add to cart
  • सनदी सेवा, व्यवस्थापन आणि सुशासन

    लोकप्रशासनाच्या क्षेत्रात प्राचीन काळापासून सनदी सेवेला महत्त्वाचे मानले जाते. प्रशासनाचे यश सनदी सेवकांच्या पात्रता व निष्ठेवर अवलंबून असते. जगातील प्रत्येक देशात सनदी सेवेचे अस्तित्व दिसून येत असली तरी त्यांचे स्वरूप आणि रचना भिन्न भिन्न स्वरूपाची दिसून येते. व्यवस्थापन ही एक प्रक्रिया असते. उद्देशपूर्तीसाठी कार्याचे नियोजन, योग्य पर्यायाची निवड, साधनसामुग्रीची जुळवाजुळव व प्रत्यक्ष कार्याला मार्गदर्शन आणि नियंत्रण हे व्यवस्थापनाचे कार्य आहे. सुशासन संकल्पना शासनाच्या अशा व्यवहाराशी संबंधित आहे की राज्याची मशीनरी आणि संस्था उत्कृष्ठता प्राप्त करण्याचा करतात.
    सदर पुस्तकात सनदी सेवा आणि सुशासनाशी निगडित सर्व संकल्पनाचा आढावा घेण्यात आला आहे. यात सनदी सेवेचा अर्थ, भरती, प्रशिक्षण आणि बढती, संघ आणि राज्य लोकसेवा आयोगाची रचना आणि भरती, सुशासन, ई-प्रशासन, प्रशासकीय नेतृत्व, प्रदत्त विधिनियम, प्रशासकीय न्यायाधिकरण, प्रशासकीय उत्तरदायित्व, मनोधेर्य, प्रशासकीय नितीमत्ता, सामाजिक जबाबदारी आणि जनसंपर्क इ. विविधांगी मुद्द्यांचा उहापोह केला आहे.

    Sandi Seva Vyavasthapan Ani Sushasan

    325.00
    Add to cart
  • संपादन, लेखन और साहित्य

    संचार व्यवस्था समाज की प्रगति, सभ्यता और संस्कृति के विकास, संरक्षण और संवर्धन का माध्यम है। समाज तभी विकासशील, परिवर्तनशील रहेगा जब उसे सही ढंग से स्थानिय, राष्ट्रीय, अंतर्राष्ट्रीय, सामाजिक, राजनीतिक आदि घटनाओं की सही और स्पष्ट जानकारी होगी। इलेक्ट्रॉनिक माध्यम और नव इलेक्ट्रॉनिक माध्यम का आज सर्वत्र वर्चस्व स्थापित हो रहा है, लेकीन इस बीच भी प्रिंट माध्यम अपनी साख बनाए हुए है। क्योंकि समाचार लेखन एक विशिष्ट कला है। समाचार दुनिया की खबरें घरों मे पहुँचाता है। लेख के माध्यम से किसी एक विषय पर विचारप्रधान बातें पाठकों तक पहुँचाई जाती है। इसलिए आधुनिकता के इस दौर में मुद्रण माध्यम (प्रिंट मीडिया) का प्रभाव बरकरार है।

    Sampadan Lekhan Aur Sahitya – Mudrit Madhyam

    110.00
    Add to cart
  • समकालीन युद्धपद्धती

    मानवी संस्कृतीच्या क्रमविकासात वेगवेगळ्या स्वरूपात टिकून राहिलेली अत्यंत महत्त्वाची आणि व्यापक परिणाम करणारी संस्था म्हणजे युद्ध होय. संरक्षणव्यवस्था हा कोणत्याही सार्वभौम राज्यसंस्थेचा अंगभूत विभाग असतो. दोन व्यक्ती किंवा राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक विचार वा तत्त्वप्रणाली यांनी संघटित झालेले दोन अथवा अधिक गट, समाजातील भांडवलदार व कामगार यांसारखे किंवा स्त्री आणि पुरुष यांसारखे वर्ग, अथवा माणसाच्या मनातीलच दोन परस्परविरोधी प्रवृत्ती यांच्यातील संघर्षालाही युद्ध या संज्ञेने संबोधण्यात येते. जीवसृष्टीतील अस्तित्वाचा झगडा हा युद्धाचा मूलभूत प्रकार होय. युद्ध ही संकल्पना अत्यंत गुंतागुंतीची असून या संकल्पनेकडे पाहण्याचे तात्त्विक, राजकीय, आर्थिक, तंत्रविज्ञानात्मक, कायदेशीर, समाजशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय असे विविध प्रकारचे दृष्टिकोन असून त्यांनुसार मानवी समाजातील या सनातन संस्थेचे विविध अंगांनी विश्लेषण करण्यात येते.

    प्रस्तुत पुस्तकात अभ्यासक्रमात समाविष्ट सर्व मुख्य आणि उपमुद्यांची विस्तृत, सखोल आणि मुद्देसुद मांडणी केलेली असून विद्यार्थी, शिक्षक व अभ्यासक तसेच सर्वांना सदरील पुस्तक उपयोगी ठरेल यात शंका नाही.

    Samakalin Yuddhapaddhati

    185.00
    Add to cart
  • समग्रलक्षी अर्थशास्त्र

    समग्रलक्षी अर्थशास्त्र/स्थूल अर्थशास्त्र या विषयाचा यात स्थूल अर्थशास्त्रचे स्वरूप आणि व्याप्ती, महत्व आणि मर्यादा, राष्ट्रीय उत्पन्न, रोजगार व उत्पादनाचे सिद्धांत, उपभोग आणि गुंतवणूक, पैसा, चलनवाढ, व्यापारचक्रे, समग्रलक्षी आर्थिक धोरणे या घटकांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सदर पुस्तक हे विद्यार्थी, संशोधक यांना अत्यंत उपयुक्त आहे. याशिवाय SET, NET व MPSC साठी उपयुक्त आहे.
    सदर पुस्तक हे अत्यंत साध्या पद्धतीने मांडणी करुन विद्यार्थ्याला सहज कसा समजेल यादृष्टीने मांडणी केली आहे. सदर पुस्तक लिहितांना उपयुक्त संदर्भग्रंथ, इंटरनेट वेब, शासकीय प्रकाशने, वेगवेगळे आर्थिक अहवाल यांचा वापर करण्यात आला असून हे पुस्तक प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक यांना अत्यंत उपयुक्त ठरेल.

    Samagralakshi Arthashastra

    225.00
    Add to cart
  • समग्रलक्षी अर्थशास्त्र (S.Y.B.A.)

    अर्थशास्त्र हे एक मानवी जीवनाशी निगडीत असे मानवी वर्तणूकीचे अध्ययन करणारे सामाजिक शास्त्र आहे. आज जगातील प्रमुख अर्थव्यवस्था आर्थिक सुधारणांच्या माध्यमातून आपला विकास साध्य करीत आहेत. खासगीकरण, उदारीकरण जागतिकीकरण माध्यमातून जगाच्या अर्थव्यवस्था एकमेकांमध्ये मिसळत आहेत, जगाचे जागतिक खेड्यात रूपांतरण होत आहे. अर्थशास्त्र या अभ्यास विषयाचा विकास हा व्यापारवादी विचारसरणी, निसर्गवादी विचारसरणी, सनातनपंथीय विचारसरणी, नवसनातनपंथीय विचारसरणी, आधुनिक विचारसरणी, नव-नव सनातनपंथीय विचारसरणी अशा अनेक परस्पर पुरक आणि परस्परविरोधी विचारसरणीतून झालेला आहे. ‘समग्रलक्षी अर्थशास्त्रा’मध्ये समग्र मागणी, समग्र पुरवठा, एकूण उत्पादन, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण रोजगार/बेरोजगारी, सामान्य किंमत पातळी या समग्रलक्षी चलांच्या वर्तणूकी व त्यांचे परस्पर संबंध या महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश होतो. समग्रलक्षी अर्थशास्त्र व्यक्तीगत वा विशिष्ट घटकाचा अभ्यास न करता समुच्चय आणि समुच्चयाच्या वर्तणुकीचा अभ्यास करते त्याचप्रमाणे समग्रलक्षी अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेला विकासाची दिशा दर्शनाचे कार्य करते.
    प्रस्तुत पुस्तकात राष्ट्रीय उत्पादन व राष्ट्रीय उत्पन्न, समग्र मागणी, समग्र पुरवठा, एकूण रोजगार, एकूण उत्पन्न, एकूण उपभोग खर्च, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, आर्थिक विकास, आर्थिक वृद्धी, व्यापार चक्रे, भाववाढ व भावघट, विदेश व्यापार, विदेश चलन विनिमय दर, समग्रलक्षी चल, त्यांचे परस्पर संबंध, एकमेकांवरील प्रभाव, बेरोजगारी, दारिद्य्र, विषमता ह्या समग्रलक्षी समस्या, त्यांचा उत्पादन, रोजगार, प्रभावी मागणी, पुरवठा बाजूवर पडणारा प्रभाव, समस्या सोडविण्यासाठी वित्तीय धोरण, चलन विषयक धोरण, विदेश व्यापार धोरण या महत्त्वपूर्ण घटकांचा सर्वांगीण समावेश केला आहे.

    Samagralakshi Arthashastra – SYBA

    395.00
    Add to cart
  • समग्रलक्षी अर्थशास्त्र (S.Y.B.Com.)

    अर्थशास्त्र हे एक मानवी जीवनाशी निगडीत असे मानवी वर्तणूकीचे अध्ययन करणारे सामाजिक शास्त्र आहे. आज जगातील प्रमुख अर्थव्यवस्था आर्थिक सुधारणांच्या माध्यमातून आपला विकास साध्य करीत आहेत. खासगीकरण, उदारीकरण जागतिकीकरण माध्यमातून जगाच्या अर्थव्यवस्था एकमेकांमध्ये मिसळत आहेत, जगाचे जागतिक खेड्यात रूपांतरण होत आहे. अर्थशास्त्र या अभ्यास विषयाचा विकास हा व्यापारवादी विचारसरणी, निसर्गवादी विचारसरणी, सनातनपंथीय विचारसरणी, नवसनातनपंथीय विचारसरणी, आधुनिक विचारसरणी, नव-नव सनातनपंथीय विचारसरणी अशा अनेक परस्पर पुरक आणि परस्परविरोधी विचारसरणीतून झालेला आहे. ‘समग्रलक्षी अर्थशास्त्रा’मध्ये समग्र मागणी, समग्र पुरवठा, एकूण उत्पादन, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण रोजगार/बेरोजगारी, सामान्य किंमत पातळी या समग्रलक्षी चलांच्या वर्तणूकी व त्यांचे परस्पर संबंध या महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश होतो. समग्रलक्षी अर्थशास्त्र व्यक्तीगत वा विशिष्ट घटकाचा अभ्यास न करता समुच्चय आणि समुच्चयाच्या वर्तणुकीचा अभ्यास करते त्याचप्रमाणे समग्रलक्षी अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेला विकासाची दिशा दर्शनाचे कार्य करते.
    प्रस्तुत पुस्तकात राष्ट्रीय उत्पादन व राष्ट्रीय उत्पन्न, समग्र मागणी, समग्र पुरवठा, एकूण रोजगार, एकूण उत्पन्न, एकूण उपभोग खर्च, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, आर्थिक विकास, आर्थिक वृद्धी, व्यापार चक्रे, भाववाढ व भावघट, विदेश व्यापार, विदेश चलन विनिमय दर, समग्रलक्षी चल, त्यांचे परस्पर संबंध, एकमेकांवरील प्रभाव, बेरोजगारी, दारिद्य्र, विषमता ह्या समग्रलक्षी समस्या, त्यांचा उत्पादन, रोजगार, प्रभावी मागणी, पुरवठा बाजूवर पडणारा प्रभाव, समस्या सोडविण्यासाठी वित्तीय धोरण, चलन विषयक धोरण, विदेश व्यापार धोरण या महत्त्वपूर्ण घटकांचा सर्वांगीण समावेश केला आहे.

    Samagralakshi Arthashastra – SYBCOM

    395.00
    Add to cart
  • समग्रलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण – 1 (M.A. II, SEM 3)

    समग्रलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण या पुस्तकात समग्रलक्षी अर्थशास्त्रीय पारंपारीक दृष्टिकोन – सनातन दृष्टिकोन / सनातन पंथ : प्रस्तावना व मुख्य वैशिष्ट्ये, केन्सचा दृष्टिकोन : प्रस्तावना व मुख्य वैशिष्ट्ये, नवसनातन दृष्टिकोन – प्रस्तावना व मुख्य वैशिष्ट्ये, राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा – राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह, राष्ट्रीय उत्पन्न लेखाच्या विविध पद्धती, पैशाची मागणी आणि पुरवठा – व्याख्या, रँडक्लिफचा रोखता सिद्धांत, गुर्ले-शॉ दृष्टिकोन, पैशाची मागणी पैशाचा पुरवठा – वित्तीय मध्यस्थ, बँक ठेव निश्चितीचे यांत्रिक प्रतिमाण, पैशाच्या पुरवठ्याच्या निश्चितीचे वर्तनवादी प्रतिमान, मागणी निश्चित पैसा पुरवठा प्रक्रिया, रिझर्व बँकेचा पैशाच्या पुरवठ्यासंबंधीचा दृष्टीकोन, उच्च शक्ती पैसा, पैसा गुणक, अर्थसंकल्पीय तूट व पैशाचा पुरवठा, पैशाचा पुरवठा आणि मुक्त अर्थव्यवस्था, पैशाच्या पुरवठ्यांवरील नियंत्रण या घटकांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
    सदर पुस्तकाची मांडणी अत्यंत साध्या पद्धतीने केली आहे. सदर पुस्तक लिहितांना उपयुक्त संदर्भग्रंथ, इंटरनेट वेब, शासकीय प्रकाशने, वेगवेगळे आर्थिक अहवाल यांचा वापर करण्यात आला असून हे पुस्तक प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक यांना अत्यंत उपयुक्त ठरेल.

    Samgarlakshi Arthashastriya Vishelshan – 1

    150.00
    Add to cart