• मार्गदर्शन, समुपदेशन आणि समावेशक शिक्षण (बी.एड.द्वितीय वर्ष)

    आधुनिक माहिती संप्रेषण व तंत्रज्ञानातील विकासामुळे मानवी जीवनातील सामाजिक व वैयक्तिक दोन्ही क्षेत्रात महत्वाचे बदल होत आहेत. सामान्य जीवन गुंतागुंतीचे बनत आहे. बदलत्या परिस्थितीत व्यक्तीच्या जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी मार्गदर्शन महत्वाचे ठरते. शिक्षण क्षेत्रात देखील खूप बदल होत आहेत. नवनवीन अभ्यासक्रम, व्यवसाय, विशेषीकरण यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या समस्यांचे निराकरण करण्यात अडचणी येतात. यासाठी नवीन माध्यमांचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शन उपयुक्त ठरते. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक प्रगतीतील अडथळे, त्याची कारणे, निदान, उपचार मार्गदर्शन आणि समुपदेशनद्वारा होवू शकते. मानव एक अमूल्य संसाधन आहे. या संसाधनाची वाढ, विकास संवेदनशील आणि जाणीवपूर्वक रीतीने होण्याची गरज आहे. शिक्षक प्रशिक्षणात मार्गदर्शन आणि समुपदेशन या विषयाचा समावेश झालेला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व एकमेवद्वितीय असते. त्याचा समस्या व गरजा वेगवेगळ्या असतात. यात सर्व प्रकारचे दिव्यांग विद्यार्थीदेखील आहेत. या सर्वांना समजून घेणे, त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार शिक्षणाची संधी प्रदान करणे, समावेशक शिक्षणाचे उद्दिष्ट्य आहे. वर्तमानकालीन सामान्यांच्या शाळेतच विशेष गरज असलेल्या बालकांना शिक्षण दिले जाणार आहे. कोणत्याही प्रकारची विशेष गरज असणारे बालक सर्वसामान्य शाळेत सामावून घेणे ही शाळा, शिक्षक, प्रशासक यांची जबाबदारी आहे. प्रस्तुत पुस्तकात वरील घटकांची विस्तृत माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

    Margadharshan, Samupdeshan & Samaveshak Shikshan

    295.00
    Add to cart
  • मीडिया लेखन

    आधुनिक काल में विज्ञान एवं प्रौद्योगिकी के क्षेत्र में हमने बहुत प्रगति की है। आज विज्ञान ने हमें नित नवीन, सुविकसित संचार माध्यम प्रदान किए हैं। वर्तमान युग में पत्र-पत्रिकाएँ, आकाशवाणी, दूरदर्शन, कम्प्यूटर, व्हॉस्अप, फेसबुक, ट्वीटर, इंस्ट्राग्राम आदि जैसे जनसंचार के माध्यम अत्यंत प्रभावी रूप से सूचना के प्रसारण का काम कर रहे हैं। हमारी आवश्यकता के अनुसार हम इन संचार माध्यमों का उपयोग करते हैं। लाखों किलोमीटर दूर रहनेवाले विभिन्न जाति, वर्ग, संप्रदाय और भाषाओं के लोग अब एक साथ आसानी से एक दूसरे के साथ इन माध्यमों के माध्यम से संपर्क कर सकते हैं। आधुनिक युग में मीडिया का सामान्य अर्थ समाचार पत्र-पत्रिकाओं, टेलीविजऩ, रेडियो, इंटरनेट आदि से लिया जाता है। मीडिया के लिए लेखन, साहित्यिक लेखन से अलग है। पत्रकारिता के पाठक या दर्शक वर्ग की समझ साहित्यिक पाठक वर्ग की तुलना में कहीं ज्यादा सामान्य होती है।
    ‘मीडिया लेखन’ पुस्तक अध्ययन की सुविधा के दृष्टि से पाच अध्यायों में विभाजित किया हैं। प्रथम अध्याय में पत्रकारिता के स्वरूप, महत्त्व, आवश्यकता एवं उसके प्रकारों का विवेचन किया गया है। द्वितीय अध्याय विज्ञापन के लेकर है जिसमें विज्ञापन को स्वरूप, महत्त्व, आवश्यकता एवं विज्ञापन के प्रकारों को स्पष्ट किया गया है। तृतीय अध्याय प्रिंट मीडिया पर केन्द्रित है। इस अध्याय में फीचर लेखन, यात्रा वृत्तांत, साक्षात्कार एवं पुस्तक समीक्षा का विवेचन किया गया है। चतुर्थ अध्याय इलेक्ट्रॉनिक मीडिया को लेकर है। इस अध्याय में रेडियो, दूरदर्शन, फिल्म एवं पटकथा लेखन की जानकारी दी गयी है। अंतिम अध्याय अर्थात पंचम अध्याय में सोशल मीडिया का विवेचन व्हाट्सप, फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम आदि उसके माध्यमों द्वारा किया गया हैं। प्रस्तुत पुस्तक विद्याथियों के साथ-साथ हिन्दी प्रेमी तथा अध्ययन कर्ताओं को भी निश्चित रूप से उपयुक्त साबित होगी।

    Mediya Lekhan

    120.00
    Add to cart
  • मुलभूत बँकिंग

    भारत सरकारने 2020 मध्ये नवीन शैक्षणिक धोरण जाहिर केले त्यात पदवी अभ्यासक्रम कालावधी चार वर्षाचा करण्यात आला. या धोरणात बहुआयामी, बहुविषयी दृष्टिकोन स्विकारण्यात आला. या मागील उद्देश विद्यर्थ्यांना सर्व विषयाचे किमान व्यावहारिक ज्ञान देवून एक संपन्न मानवी संसाधन निर्माण करणे आहे. विद्यापीठाने 2020 चे नवीन शैक्षणिक धोरण स्विकारुन जुन/जुलै 2024 पासून अभ्यासक्रमांची पुनर्रचना करुन त्यांची कार्यवाही केली. विद्यापीठात मानव्य विद्या शाखा, वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र विद्या शाखा, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा, अशा तीन प्रमुख विद्या शाखा आहेत. यांच्यांत समन्वय निर्माण करण्यासाठी काही विषय Multidisciplinary म्हणून स्विकारणे निश्चित झाले.
    Fundamentals of Banking हा असा विषय आहे. ज्यात सर्व शाखाच्या विद्यार्थ्यांमध्ये सहज रस निर्माण, होईल. खरे तर भारताला जर 5 ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था करायची असेल तर देशातील सर्व नागरिकांमध्ये बँकींग विषयाचे ज्ञान आणि जाण असणे आवश्यक आहे. सदर अभ्यासक्रम विद्यार्थी आणि नागरिकामध्ये जाण निर्माण करण्यात निश्चितच यशस्वी ठरणार.

    220.00
    Add to cart
  • मूलभूत शेअर बाजार

    जगप्रसिद्ध गुंतवणूक तज्ज्ञ आणि मोठा गुंतवणूकदार वारेन बफेट म्हणतात. “जर तुम्हाला झोपण्याच्या वेळेस, झोपेत असताना पैसे कमावण्याची एखादी पद्धत सापडत नसेल तर मग तुम्हाला मरेपर्यंत कामच करत राहावे लागेल.” पैसे कमावण्याच्या संदर्भात एक विधान केले जाते. “जर तुमच्याकडे पैसा आहे तर मग तुम्हाला काम करण्याची गरज नाही. तुम्ही पैशाला कामाला लावा स्वत:ला नाही.” या दोन्ही विधानांचा अंगुली निर्देश शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे आहे. जेव्हा तुम्ही दीर्घकाळासाठी वित्तीय नियोजन करतात, तेव्हा तुमच्यासमोर शेअर बाजार हा सक्षम पर्याय आहे. शेअर बाजारात एकदा का विचारपूर्वक गुंतवणूक केली किंवा शेअर ट्रेडिंग केले की मग शेअर बाजारातील चढ उतारांनी तुमच्या Portfolio मध्ये आणि संपत्तीत वाढ होते. मग तुम्ही काम करा की करु नका, झोपेत असा की जागे असा, सुटीवर असा की पर्यटनाला असा. तुमचा पैसा या बाजारात वाढत जातो आणि तुमच्या दीर्घकालीन योजना यशस्वी होतात. पण यासाठी शेअर बाजाराचे बेसिक नॉलेज असणे, अनुभव व कौशल्य असणे, बाजार विश्लेषण करणे यासारखे बौद्धिक श्रम करण्याची तयारी हे सर्व आवश्यक आहे.

    150.00
    Add to cart
  • मूलभूत समाजशास्त्रीय विचार

    मनुष्य हा समाजशील प्राणी असून तो बुद्धिमान आहे. मानवाला प्रत्येक काळात मानवी जीवनाशी संबंधित समस्यांच्या संदर्भात विचार करण्याची आवश्यकता वाटली. या आवश्यकतेतूनच विशिष्ट अशा सामाजिक विचारांचा उदय झाला. नेहमीच नव्या नव्या समस्यांच्या संदर्भात मानव विचार करीत राहिला म्हणून मानवी समाजाच्या अंतापर्यंत सामाजिक विचार अस्तित्वात राहतील. सामाजिक समस्या या कालसापेक्ष असतात; पण समस्या नाहीत असे कधीच घडत नाही. त्यामुळे सामाजिक विचारही मानवी समाजाइतकेच प्राचीन असून त्यांचा अंतही मानवी समाजाबरोबरच आहे. 19 व्या शतकापर्यंत सामाजिक विचारांचा विकास झाला. ग्रीक सामाजिक विचारवंत प्लेटो आणि अ‍ॅरिस्टॉटल यांच्या काळात सामाजिक विचारांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभाव होता; पण प्रबोधन युग निर्माण झाले. फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांतीमुळे व्यक्तीच्या विचारांमध्ये आमुलाग्र बदल घडून आले आणि यातून सामाजिक विचारांमध्ये शास्त्रीयता येत गेली. सामाजिक विचारांमध्ये ऑगस्त कॉम्त, हर्बर्ट स्पेन्सर, एमिल डरखिम, मॅक्स वेबर, कार्ल मार्क्स या व्यक्तींचेही स्थान महत्त्वपूर्ण आहे.

    Mulbhut Samajshashriy Vichar

    325.00
    Add to cart
  • मौद्रिक प्रणाली

    “मौद्रिक प्रणाली” हा विषय विविध स्पर्धा परीक्षा तसेच अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी या पुस्तकामध्ये नवीन आकडेवारीनुसार मांडणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नोटाबंदीचा मुद्राबाजारावर झालेला परिणाम व त्याचे फायदे आणि तोटे इत्यादी बाबींचे विश्लेषण करण्यात आले आहे. या पुस्तकाची पाच प्रकरणामध्ये विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या प्रकरणामध्ये वस्तुविनिमय आणि त्याच्या अडचणी; मुद्रेचा इतिहास, अर्थ, व्याख्या आणि स्वरूप; मुद्रेची कार्ये आणि महत्व; मुद्रेचे प्रकार आणि निश्चलनीकरणाचे फायदे आणि तोटे बाबींचे विश्लेषण करण्यात आले आहे. दुसर्‍या ‘मुद्रामूल्य’ या प्रकरणात मुद्रेची मागणी व मुद्रेचा पुरवठा त्यांचा अर्थ आणि निर्धारक घटक, मुद्रेचे मूल्य, मुद्रेची मागणी व पुरवठा यांचे संतुलन, फिशरचा मुद्रा परिमाण सिद्धांत याबाबत विश्लेषण करण्यात आले आहे. तिसर्‍या प्रकरणामध्ये स्फिती व अपस्फिती आणि व्यापारचक्र; चौथ्या मुद्राबाजार या प्रकरणामध्ये भारतीय मुद्राबाजार व्यवस्था आणि त्यावर निश्चलनीकरणाचा झालेला परिणाम तर पाचव्या भांडवल बाजारावरील प्रकरणामध्ये भारतीय भांडवल बाजार, त्याचे महत्व आणि कार्य त्याचप्रमाणे सेबीच्या जबाबदार्‍या आणि कार्ये इत्यादीसंदर्भात मांडणी करण्यात आली आहे. नवीन आकडेवारीनुसार लिहिलेल्या या पुस्तकाचे स्वागत प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील अभ्यासक करतील याबद्दल विश्वास आहे.

    Maudrik Pranali

    160.00
    Add to cart
  • यात्रा साहित्य का इतिहास

    भारतीय समाज और साहित्य में स्वतंत्रता के बाद आमूलाग्र परिवर्तन हुआ| परिवर्तन की तेज आँधी ने भारतीय समाज को बहुत ज्यादा प्रभावित किया है| साहित्य में नई विधाओं का जन्म हुआ वैसे-वैसे कई साहित्यकारों ने अपनी तुलिकाओं से इनमें तरह-तरह के रंग भरे| उसी तरह हिंदी साहित्य की महत्त्वपूर्ण विधा यात्रा-साहित्य भी है| कालानुरूप आधुनिक युग के सभी साहित्यकारों ने इस विधा को स्वीकार करते हुए उसके महत्त्व को भी प्रतिपादित किया है|
    मानव जीवन स्वयं एक यात्रा है| देश-विदेश के कई घुमक्कड प्राचीन काल से यात्राएँ करते आ रहे हैं| यात्रा का मानव विकास एवं संस्कृतियों के आदान-प्रदान में बहुत महत्त्व है| ‌‘मेरी जापान यात्रा’ यह यात्रा-साहित्य राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज इनके भारत के प्रतिनिधि के रूप में विश्वधर्म-विश्वशांति परिषद, जापान में सम्मिलित होने का यात्रा-वृत्तांत है| जापान देश की प्रगति का सार भी श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ने बीच-बीच में प्रस्तुत किया है और भारत देश के प्रगति की कामन की है|

    Yatra Sahitya Ka Itihas

    135.00
    Add to cart
  • युद्धाचे वैचारिक पैलू (युद्धाचे संकल्पनात्मक पैलू)

    युद्ध हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. युद्ध राष्ट्राच्या अस्तित्व, स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वासाठी आवश्यक बाब असल्याने प्रत्येक राष्ट्र स्व-संरक्षणाची काळजी घेत असते. देशाची सर्वंकष सुरक्षेची जबाबदारी ही सर्व नागरिकांची असते. प्राचीन काळापासून भारतीयांचे राष्ट्रीय एकता, अखंडता, स्वातंत्र्य, संरक्षण व सुरक्षा याकडे दुर्लक्ष झाल्याने परकियांची सातत्याने आक्रमणे झाली. अनेक मोक्यांच्या वेळी भारतीयांना परकीयांविरुद्ध पराभव पत्करावा लागला. भारत हा जगातील नैसर्गिक-स्वाभाविक दृष्टीने सुरक्षित असूनही सीमेच्या रक्षणाकडे दुर्लक्ष केल्याने, आक्रमकांविरूद्ध योग्य उपाययोजना न केल्याने आपल्याला वारंवार पारतंत्र्यात जावे लागले. प्रस्तुत ग्रंथात युद्ध, संघर्षांची कारणे, परिणामांचे मूल्यमापन, युद्धाच्या प्रगत सैद्धांतिक संकल्पना, युद्धोत्तर निराकरण आणि संघर्षोत्तर शांतता निर्माण करण्यासाठीची धोरणे वगैरे विविधांगी मुद्द्यांचा विश्लेषणात्मक उहापोह केला आहे.

    150.00
    Add to cart
  • राजकारणातील आधुनिक संकल्पना आणि विचार

    राज्यशास्त्रातील आणि राजकारणातील नेतृत्व, आरक्षण, राष्ट्रवाद, जमातवाद आणि दहशतवाद या आधुनिक संकल्पनांची मांडणी तसेच राज्य, लोकशाही, राष्ट्रवाद, समाजवाद आणि सार्वभौमत्व या संकल्पनाविषयी पाश्चात्य तसेच भारतीय राजकिय विचारवंताचे विचार यांची सुसंगत आणि वस्तुनिष्ठ स्वरूपात मांडणी करण्याचा प्रयत्न सदरील पुस्तकात केला आहे. यासोबतच नेतृत्व, आरक्षण, राष्ट्रवाद, जमातवाद, दहशतवाद, राज्य, लोकशाही, राष्ट्रवाद, समाजवाद आणि सार्वभौमत्व या आधुनिक संकल्पनांच्या विविध विचारवंतांनी केलेल्या व्याख्या, अर्थ, स्वरूप, विविध घटक, गुणवैशिष्ट्ये, प्रकार, फायदे व तोटे, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि यथायोग्य ठिकाणी विविध उदाहरणांसह स्पष्टीकरण केलेले असून पुस्तकाची भाषा अत्यंत साधी व सोपी असून सर्वांना सहज समजेल अशी असल्याने प्रस्तुत पुस्तक विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक यासोबतच सर्वांना लाभदायक ठरेल यात शंका नाही.

    Rajkaranatil Aadhunik Sankalpna Aani Vichar

    250.00
    Add to cart
  • राजकीय पत्रकारिता

    आधुनिक काळात पत्रकारितेचे महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढलेले दिसून येते. पत्रकारितेचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाऊ लागले. पत्रकारितेला हे स्थान आपोआप मिळालेले नाही. लोकशाहीला विकसित करण्यात आणि मजबूती प्रदान करण्यात पत्रकारितेने बजावलेल्या भूमिकेवरून हे स्थान देण्यात आलेले आहे. प्रशासन आणि समाज, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वपूर्ण दुवा म्हणून पत्रकारिता कार्य करत असते.
    प्रस्तुत पुस्तकात राजकीय पत्रकारिता विषयाशी निगडित सर्व संकल्पनाचा आढावा घेऊन सविस्तर माहिती दिलेली आहे. आवश्यक तेथे उदाहरणाचा समावेश केलेला आहे. पुस्तकात एकूण सहा प्रकरणाचा समावेश आहे. प्रथम प्रकरणात पत्रकारितेची ओळख करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसर्‍या प्रकरणात जनसंचाराबाबत चर्चा केलेली आहे. तिसर्‍या प्रकरणात पत्रकारिता आणि जनसंचाराचे मूल्यमापन केलेले आहे. चौथ्या प्रकरणात राजकीय पत्रकारिताविषयीची सखोल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाचव्या प्रकरणात पत्रकारितेच्या पद्धतीबाबत सविस्तर चर्चा केलेली आहे. सहाव्या प्रकरणात राजकारण आणि माध्यमे यांच्या परस्परसंबंधाविषयीची माहिती दिलेली आहे. प्रस्तुत पुस्तक विद्यार्थी, प्राध्यापक वर्गांला अध्यापन करताना निश्चितच उपयुक्त ठरेल.

    Rajkiya Patrakarita

    225.00
    Add to cart
  • राजकीय पत्रकारिता

    Rajkiya Patrakarita

    250.00
    Add to cart
  • राजकीय भूगोल

    ‘राजकीय भूगोल’ हा विषय थोडासा क्लीष्ट असल्याने पुस्तकात बर्‍याच ठिकाणी संदर्भ व उदाहरणे देऊन संकल्पना अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. या पुस्तकातून राजकिय भूगोलाचा परिचय, राज्य व राष्ट्र उत्क्रांती व विकास, भूराजनिती सिद्धांत आणि दोन राष्ट्रादरम्यान असलेला सिमा यावर सविस्तर लिखाण या पुस्तकातून आम्ही केला असल्याने ‘राजकिय भूगोलाची व्याप्ती’ आपल्या लक्षात येईलच.
    राजकिय भूगोल म्हणजे राजनैतिक दृष्टिकोनातून संगठित क्षेत्र किंवा राज्यांच्या भौगोलिक रचनेच्या संदर्भात केलेला अभ्यास होय. कोणत्याही राज्याशी संबंधित भौगोलिक क्षेत्र त्या राज्यांची भौगोलिक वास्तविकता असते. राज्य हे राजनैतिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक इ. संदर्भात गुणसंपन्न विभागासोबतच एक जिवंत विभागसुद्धा असतो. त्यावरूनच राजकिय भूगोलाची सार्थकता यावरूनच निश्चित होते.

    Rajkiya Bhugol

    175.00
    Add to cart
  • राजकीय विचारप्रणाली

    आधुनिक राजकीय चिंतनात विचारप्रणाली ही संकल्पना अत्यंत महत्वाची मानण्यात येते. विचारप्रणालीच्या आधारावर राजकीय व्यवस्थेला अधिमान्यता मिळत असते. मध्ययुगात व औद्योगिक क्रांतीनंतर निर्माण झालेल्या ज्या नवीन समस्या किंवा प्रश्नांची उत्तरे धर्म देऊ शकला नाही त्यांची उत्तरे विचारप्रणालींनी दिली. राजकीय सहभागाची व्यापकता जसजशी वाढत गेली तसे विचारप्रणालीचे महत्व वाढले. विचारप्रणालीच्या आधारे समाजात पसंतीच्या स्वरूपाची राजकीय व्यवस्था निर्माण केली जाऊ शकते. विचारप्रणालीमुळे राज्याचे स्वरूप निश्चित होत असते. भारताने समता, स्वातंत्र्य, यावर आधारीत असलेली आणि जातपातविरहीत लोकशाहीचा स्विकार केला असला तरी प्रत्यक्षात पूर्ण समता, पूर्ण स्वातंत्र्य कुठेच आढळून येत नाही. कोणतीही विचारप्रणाली ही एकात्म स्वरूपाची किंवा अंतरिक दृष्टीने सुसंगत नसते. कारण ती स्थिर स्वरूपाची नाही.
    प्रस्तुत ग्रंथात वचारप्रणालीची भूमिका, वैशिष्ट्ये, राष्ट्रवाद, आंतरराष्ट्रीय वाद, विश्वराज्य, लोकशाही समाजवाद, भारतातील लोकशाही समाजवादाचा उदय व विकास, मार्क्स, म. ज्योतीबा फुले व डॉ. आंबेडकर यांचे विचार, संसदीय शासनपद्धती, स्त्री चळवळ, भारतातील स्वीवाद, जात आणि पितृसत्ताक इ. विविधांगी मुद्द्यांचे सविस्तर विवेचन केले आहे.

    Rajkiya Vicharpranali

    275.00
    Add to cart
  • राजकीय समाजशास्त्राचा परिचय

    दुसर्‍या महायुद्धानंतर ‘राजकीय समाजशास्त्र’ हा विषय स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून उदयाला आलेला आला. राजकीय समाजशास्त्रात सामाजिक जीवनाचे राजकीय जीवनाशी होणार्‍या आंतरक्रियाचे विश्लेषण केले जाते. हे विश्लेषण विविध राजकीय आणि सामाजिक स्तरांचे पारस्परिक संबंध व प्रभावाच्या संदर्भात केले जाते. या अध्ययनातून सामाजिक आणि राजकीय यांच्यातील संबंधाची नव्या दृष्टिकोनातून मांडणी केली जाते. राजकीय समाजशास्त्रात राजकीय सामाजिक संरचना, समूह, राजकीय संस्था, संबंध आणि व्यवहाराचे अध्ययन केले जाते. तसेच राजकीय समूहावर पडणार्‍या सामाजिक प्रभावाचाही अभ्यास केला जातो.
    प्रस्तुत पुस्तकात राजकीय समाजशास्त्र विषयाशी निगडित सर्व संकल्पनांची माहिती विविध उदाहरणे आणि आकृत्यांसह दिलेली आहे. तसेच राजकीय समाजशास्त्राचा परिचय, राजकीय व्यवस्था, राजकीय संस्कृती, राजकीय सामाजीकरण, राजकीय सहभाग, राजकीय श्रेष्ठजन, राजकीय नेतृत्व, दुसर्‍या महायुद्धानंतर उदयाला आलेल्या राजकीय बदल, राजकीय विकास व राजकीय आधुनिकीकरण, राजकीय संसूचन व लोकमत, आधुनिक काळातील महत्त्वपूर्ण सत्ता, प्रभाव, अधिकार आणि अधिमान्यता आणि नोकरशाही या विविधांगी मुद्द्यांचा समावेश केलेला आहे.

    Rajkiya Samajshastracha Parichay

    395.00
    Add to cart
  • राज्यशास्त्र आणि भारतीय राजकीय व्यवस्था

    राज्यशास्त्र संविधान, कायदे, नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये याबद्दल सखोल ज्ञान प्रदान करते.
    राज्यशास्त्र शासनयंत्रणा, कामकाज, नागरिक-शासन संबंध, विविध संस्थांची रचना, विधिनियम, न्यायपालिका, आंतरराष्ट्रीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय संघटना यांचा अभ्यास करते. ॲरिस्टॉटलच्या म्हणण्यानुसार, राज्यशास्त्र आदर्श नागरिक घडविते, हे विधान राज्यशास्त्राचे महत्व सिद्ध करते.
    संघ लोकसेवा आयोगा द्वारे आयोजित करण्यात येत असलेल्या नागरी सेवा परीक्षेत राज्यशास्त्र हा विषय प्रथम प्राधान्य क्रमाने निवडला जातो.
    राज्यशास्त्र हे जगातले प्राचीन शास्त्र आहे. राज्यशास्त्राचा जनक ॲरिस्टॉटलने राज्यशास्त्राला इतर सर्व शास्त्रे आणि व्यवहार यांचे नियमन करणारे म्हणून प्रधानशास्त्र (चरीींशी डलळशपलश) म्हटले आहे. प्रस्तुत पुस्तकात राज्यशास्त्राचा परिचय, राजकीय मूल्ये, लोकशाही, संविधान, उद्देशपत्रिका आणि भारतीय राजकीय व्यवस्थेचे स्वरुप याविषयी सविस्तर माहितीचे विवेचन केले आहे. पुस्तकाची साध्या, सोप्या भाषेत व सुलभ पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. प्रस्तुत ग्रंथ विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक यांना निश्चितच उपयुक्त ठरेल.

    180.00
    Add to cart
  • राज्यशास्त्राचा परिचय

    ‌‘राज्यशास्त्राचा परिचय’ या पुस्तकामध्ये पारंपरिक व आधुनिक राज्यशास्त्राचे स्वरूप व वैशिष्ट्ये, राज्यशास्त्राची व्याप्ती महत्त्व, राज्यशास्त्राचे पारंपरिक व आधुनिक दृष्टिकोन, राज्य व राज्याचा विकास, राज्याचे घटक, राज्याच्या उत्पत्तीचे सिद्धांत, सार्वभौमसत्ता, सार्वभौमसत्तेचा एकतावादी व अनेकतावादी सिद्धांत, स्वातंत्र्य व समता संकल्पना, स्वातंत्र्यासाठी आवश्यक अटी. स्वातंत्र्य व समतेचे प्रकार इत्यादी गोष्टी सविस्तर स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे पुस्तक अत्यंत साध्या व सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केला असून अभ्यासक्रमाच्या अनुरूप व्यावहारिक व सैद्धांतिक बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रस्तुत पुस्तक विद्यार्थी, शिक्षक व वाचकांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.

    325.00
    Add to cart
  • राज्यशास्त्रातील संशोधन पद्धती

    संशोधन ही सतत चालणारी बौद्धिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत जुन्या त्रुटी दूर करून नवीन वस्तुस्थिती कोणताही पुर्वग्रह मनाशी न बाळगता मांडली जाते. जे साध्य व सिद्ध करायचे असते यासाठी विशिष्ट साधनांचा अथवा रचनांचा भौतिकशास्त्रात ज्या पद्धतीने अवलंब केला जातो तोच फरक हा संशोधनाचे तंत्र व संशोधन पद्धतीमध्ये दिसून येतो. राजकीय अथवा सामाजिक संशोधनात संशोधनाचा अभ्यास, विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सर्वांचा सारखाच असत नाही. संशोधनात आपल्या उद्दिष्टाशी, दृष्टीकोनाशी नेहमीच कटिबद्ध रहावे लागते. हा दृष्टीकोन ऐतिहासिक, तुलनात्मक, विश्लेषणात्मक, रचनात्मक, कार्यात्मक यापैकी कोणताही असू शकतो. संशोधनात बुद्धीनिष्ठता, वस्तुनिष्ठता, तर्कशुद्धतेचा विशेष अवलंब केला जातो.

    सामाजिक शास्त्रातील संशोधनामध्ये संशोधकाचा संबंध हा वास्तविक घटनांशी तसेच सजीव व्यक्तीशी येत असतो. राज्यशास्त्रातील संशोधनामध्ये प्रतीकांची व तथ्यांची हाताळणी व पडताळणी सहेतुक पद्धतीने करावी लागते. विशिष्ट वस्तू किंवा व्यवस्थेविषयी, समस्येविषयी डोक्यात येणारी कल्पना म्हणजे ढोबळ मानाने संकल्पना होय. या संकल्पनेचे अवलोकन करून संशोधक निष्कर्ष काढत असतो. हे निष्कर्ष संशोधनाचे स्वरूप ठरविण्यासाठी महत्वाचे असते. संशोधनात कोणतीही घटना किंवा प्रसंग भावनेच्या चष्म्यातून पाहिला जात नाही. तर वारंवार त्याची पडताळणी केली जाते आणि मगच तथ्यापर्यंत पोहचता येते.

    सामाजिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घटनांची वास्तवता कशी शोधावी, राजकीय घटना अथवा घडामोडींचा अन्वयार्थ कसा लावावा, राजकीय सिद्धांताची मांडणी कशी करावी, राजकीय तसेच त्या अनुषंगाने सामाजिक स्वरूपाची गृहीतके कशी मांडावीत तसेच त्यांची पडताळणी करून निष्कर्षाची मांडणी कशा पद्धतीने करावी यासाठी प्रस्तुत ग्रंथ उपयोगी आहेच त्याचबरोबर संशोधनाची ओळख, त्यांचे स्वरूप, संशोधनाची वैशिष्ट्ये, आव्हाने, समस्या व संशोधनाच्या पद्धती, त्याची गृहीतके तसेच ध्येय आणि उद्दिष्टांच्या माहितीचे स्पष्टीकरण यांचेही मुद्देसूद विवेचन शास्त्रीय पद्धतीने केले आहे.

    Rajyashastratil Sanshodhan Paddhati

    110.00
    Add to cart
  • ललितरंग

    सदर पुस्तकात सात लेखकांच्या ललित गद्य लेखनाचा समावेश केला आहे. ‘स्त्रीविषयक ललित गद्य’ असे सदर पुस्तकातील ललित गद्याचे विशिष्ट असे सूत्र आहे. स्त्री आणि पुरुष दोहोंचा म्हणजे ‘मी’चा लेखनातून व्यक्त होणारा स्त्रीविषयक दृष्टिकोन, त्या अंगाने घटना-प्रसंग, व्यक्ती याबाबत ‘मी’चे व्यक्त होणे, भावनात्मकता आणि चिंतनशीलता यातून स्त्रीविषयक अनुभवाचा अन्वयार्थ लावू पाहणे या सगळ्या बाबी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून स्त्रीविषयक ललित गद्याचे सूत्र केंद्रस्थानी ठेवून सदर पुस्तक आकारास आले आहे. लेखक स्त्री असो वा पुरुष, दोहोंच्या निवडक ललित गद्य लेखनाचा अंतर्भाव येथे केला आहे. महत्त्वाचे म्हणजे समकाळातील, म्हणजे साधारणपणे 1990 नंतरच्या कालखंडातील लेखकांचे हे ललित गद्य लेखन आहे. साहित्य, सामाजिक चळवळ, चित्रपट, पत्रकारिता अशा जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये आपला स्वयंपूर्ण ठसा उमटविणार्‍या व्यक्तित्वांची-त्यांच्या संवेदना आणि विचारांची ही ललित गद्यात्मक अभिव्यक्ती आहे.

    Lalitrang

    95.00
    Add to cart
  • ललितरंग आकलन व आस्वाद

    ‘आठवणी’, ‘अनुभव’, ‘लघुनिबंध’, ‘प्रवासलेख’, ‘व्यक्तिचित्रे, ‘ललितलेख’ यांचा समावेश ललित गद्यात होतो. ‘ललितरंग आकलन व आस्वाद’ या पुस्तकात ‘ललितरंग’ या पुस्तकातील लेखांचा आढावा घेतला आहे. स्त्री विषयक ललित गद्य हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. या पुस्तकात आलेल्या लेखातून स्त्री व पुरुष या दोघांचा स्त्री विषयक दृष्टीकोन वर्णन केला आहे. यात ‘मी’ अनुभवाचे स्वरूप सांगितले आहे. ‘मी’ ने जे अनुभवले त्याचे वास्तव वर्णन यात केले आहे. प्रस्तुत लेखनातून भावनात्मक व चिंतनशील अशी वर्णने आली आहेत. तसेच राबणारी, कष्ट करणारी, घर-संसार सांभाळणारी अशा वेगवेगळ्या स्वरूपात स्त्री चे दर्शन घडवले आहे. भाषा व शैली विशेष हे या पुस्तकाचे वेगळेपण आहे.

    Lalitrang Aakalan V Aaswad

    135.00
    Add to cart
  • लेखनकौशल्य मुद्रितशोधन व सर्जनशील लेखन

    ‘लेखनकौशल्य – मुद्रितशोधन व सर्जनशील लेखन’ हा ग्रंथ अनेकांगांनी महत्त्वपूर्ण आहे. मुद्रितशोधन हे लेखन कौशल्याचे महत्त्वाचे अंग आहे. किंबहुना ती भाषासंवर्धन व संरक्षण करणारी महत्त्वाची भाषिक संस्था आहे. प्रस्तुत ग्रंथ यशस्वी, उत्तम मुद्रितशोधक घडविण्यासाठीच्या प्रयत्नांचा महाप्रयत्न आहे. मुद्रितशोधन कौशल्यासाठी आवश्यक ज्ञानाच्या बाजू म्हणजे मुद्रितशोधनाचे स्वरूप, मुद्रितशोधनाचा सातत्यपूर्ण सराव यांचा समावेश या ग्रंथात असल्याने मुद्रितशोधन कौशल्याबाबतचे अ ते ज्ञ म्हणजे हा ग्रंथ होय. मुद्रितशोधनाची प्रक्रिया, विरामचिन्हांचे मुद्रितशोधनातील महत्त्व, अचूक शब्दलेखन, लेखनातल्या चुकांमुळे होणारे अर्थबदल, प्रात्यक्षिकांसाठी भरपूर उतारे ही या ग्रंथाची केवळ जमेचीच बाजू नसून मुद्रितशोधनासंदर्भातला ग्रंथ कसा कमाल स्तरावर पूर्णत्व पावलेला असावा, याची साक्ष देणाराही आहे.
    सर्जनशील लेखनाचे स्वरूप, त्याची अंत: व पृष्ठ स्तरावरून सिद्ध होणारी वैशिष्ट्ये वाचक व अभ्यासकांस अवगत व्हावीत, कथालेखनाची, नाट्यलेखनाची निर्मितिप्रक्रिया नेमकी कशी घडून येते हे त्यांस आकलन व्हावे, या विशुद्ध सारस्वतीय भूमिकेतून या ग्रंथाचे लेखन झाले आहे. सर्जनशील लेखनामागील निर्मितिप्रक्रिया, प्रेरणा, याबद्दल फारशी माहिती उपलब्ध होत नाही, ही मोठी उणीव या ग्रंथाने भरून काढली आहे. सर्जनशील लेखनाची पृथगात्मता, सर्जनशीलतेसंदर्भातील संभावित पैलूंची मीमांसा, भाषेतील सर्जनशीलता, कलावंतांची सर्जनशीलता, विज्ञानातील सर्जनशीलता, साहित्यातील सर्जनशीलता, सर्जनशीलतेची वैशिष्ट्ये, सर्जनशीलतेची अभिव्यक्ती, सर्जनशील लेखन करताना येणार्‍या अडचणी असा बहुआयामी सर्जनविचार हा ग्रंथ मांडतो.
    भाषा पदवीधरांना रोजगार मिळणे ही बाब भाषा अध्यापनाच्या अस्तित्वाशी निगडित आहे. त्यासाठी भाषिक कौशल्ये अवगत असणारा विद्यार्थी घडविणे हे सांस्कृतिक कर्तव्य आहे. हे कर्तव्य तत्परतेने पार पाडण्यासाठी डॉ. संदीप माळी आणि प्रा. समाधान पाटील लिखित ‘लेखनकौशल्य : मुद्रितशोधन व सर्जनशील लेखन’ या ग्रंथाचे स्वागत आहे.

    – प्रा.डॉ. फुला बागूल

    Lekhan Kaushalya Mudritshodhan V Sarjanshil Lekhan

    120.00
    Add to cart
  • लोकप्रशासन

    प्रशासनाच्या व्यापक क्षेत्रातील लोकप्रशासन हा एक भाग आहे. लोकप्रशासनाचा सरळ अर्थ म्हणजे सरकारद्वारे केले जाणारे उपक्रम राबविणे. त्यालाच प्रशासकीय उपक्रम असेही म्हणता येते. लोकप्रशासनात ‌‘विकास प्रशासन’ या संकल्पनेचा समावेश दुसऱ्या जागतिक महायुध्दानंतर तुलनात्मक लोकप्रशासनाबरोबर झाला. ही एक गतिशील आणि परिवर्तनशील संकल्पना आहे; जी विशेषत: विकसनशील समाजात आर्थिक, सामाजिक, राजकीय परिवर्तन आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. लोकप्रशासनाच्या अभ्यासात विविध दृष्टीकोनांचा समावेश होतो. या दृष्टीकोनांमुळे लोकप्रशासनाच्या कार्याची व्याप्ती व ओळख होण्यास एकप्रकारे मदतच होते. लोकप्रशासनात सु-शासन, नोकरशाही, सेवक प्रशासन, उत्तरदायित्व आणि नियंत्रण या महत्त्वपूर्ण संकल्पनांचाही समावेश होतो. लोकप्रशासनात आर्थिक प्रशासन (बजेट) हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. प्रशासकीय यंत्रणा संपूर्णपणे आर्थिक प्रशासनावर आधारित असते. सर्व वित्तीय प्रशासनाचे पूर्ण विचार अंदाजपत्रक हे केंद्रस्थानी असते. शासन कार्यात व त्या अनुषंगाने येणाऱ्या लोकप्रशासनाचे दिवसेंदिवस महत्त्व वाढते आहे. त्यामुळे यातील विविध प्रवाहाचा विस्तृत विचार करण्याचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकात केलेला आहे.

    Lokprashasan

    250.00
    Add to cart
  • लोकरंगभूमी

    लोकसाहित्य अभ्यासाची एक महत्वपूर्ण शाखा असलेली ‘लोकरंगभूमी’ आजच्या विज्ञानवादी युगात महत्वाची ज्ञानशाखा म्हणून पुढे आलेली आहे. मानवाच्या सांस्कृतिक उत्क्रांतवस्थेत लोकसाहित्याचा महत्वाचा वाटा आहे. निसर्गाच्या अलौकिक रूपाच्या आर्त आळवणीतून लोकसाहित्य जन्मले. व्यक्त होणे ही मानवी प्रवृत्ती. व्यक्त होण्यामागे मानवी भावनांचा कार्यकारण भाव असतो. भावनांची अभिव्यक्ती केवळ मौखिक नसते तर ती शारीर पातळीवरही असते. म्हणूनच निसर्ग पूजनाच्या मौखिकतेला शारीरिक अभिव्यक्तीने दृश्यरूप दिले. त्यातूनच लोककलांचा म्हणजेच लोकरंगभूमीचा जन्म झाला. रंजन करणे हाच केवळ लोकरंगभूमीचा उद्देश्य नव्हता तर उदात्त मानवी मुल्यांच्या प्रसारासाठी म्हणजेच प्रबोधनासाठीही लोकरंगभूमी झटलेली पाहावयास मिळते. धार्मिक विधीनाट्य ते रिंगणनाट्यापर्यंतचा प्रवास पाहिला तर संत नामदेव म्हणतात त्याप्रमाणे ‘नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ।’ हा प्रबोधनाचा वसा लोकरंगभूमीने सोडलेला नाही.

    – डॉ. अक्षय घोरपडे

    Lokrangbhumi

    175.00
    Add to cart
  • लोकसंख्या भूगोल

    Loksankhya Bhugol

    175.00
    Add to cart
  • लोकसंख्या भूगोल

    पृथ्वी व पृथ्वीवरील विविध घटकांशी भूगोलाचा संबंध आहे. भूगोलाच्या अभ्यासात मानवाचा अंतर्भाव करण्यात आल्यामुळे विषयाचे स्वरूप अधिक गुंतागुंतीचे होत गेले. भारतातील तसेच जगातील वाढत्या लोकसंख्येमुळे अलीकडील काळात लोकसंख्या वाढ हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. कारण लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणार्‍या गंभीर परिणामांना सर्वांनाच सामोरे जावे लागत आहे. लोकसंख्या हा घटक कोणत्याही देशाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा असतो. कारण देशाचे आकारमान, वैशिष्ट्ये, विभाजन, रचना, राहणीमान, प्रगती, विकास, सामाजिक रचना हे घटक लोकसंख्येमुळे प्रभावित होत असतात.
    प्रस्तुत पुस्तकात भारताची जनगणना, लोकसंख्येच्या सर्वेक्षणाच्या पद्धती, लोकसंख्याविषयक मिळालेल्या आकडेवारीचे सादरीकरण, लोकसंख्येवर परिणाम करणारे घटक, स्थलांतर, लोकसंख्येचा मनोरा, वयोगट रचना, व्यवसाय संरचना, अवलंबता गुणोत्तर, दीर्घायुष्य, अपेक्षित आयुर्मान, लोकसंख्या सिद्धांत, लोकसंख्या विषयक समस्या, लोकसंख्या धोरणे, मानव विकास निर्देशांक, आरोग्य निर्देशांक तसेच नागरीकरण व त्यासंबंधित समस्या इ. महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश केलेला आहे.

    Loksankhya Bhugol

    225.00
    Add to cart
  • लोकसंख्याशास्त्र

    लोकसंख्याशास्त्र या पुस्तकाची विभागणी पाच घटकांमध्ये करण्यात आलेली आहे. पहिल्या घटकामध्ये लोकसंख्याशास्त्राचा परिचय, दुसर्‍या घटकामध्ये प्रजनन क्षमता आणि मृत्यू व तत्संबधी मापन पद्धती, तिसर्‍या घटकांमध्ये लोकसंख्येचे स्थलांतर, चौथ्या घटकामध्ये लोकसंख्येचे नागरीकरण तर शेवटच्या पाचव्या घटकामध्ये लोकसंख्या आणि विकास व भारतातील पंचवार्षिक योजना काळातील लोकसंख्या धोरणाबाबत माहिती देण्यात आली आहे. पुस्तकाची घटकनिहाय मांडणी करतांना भारतातील लोकसंख्येच्या संदर्भात अद्ययावत आकडेवारी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रत्येक घटकाच्या शेवटी अभ्यासासाठी प्रश्नसंच देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करतांना या प्रश्नसंचाचा निश्चितच उपयोग होईल. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये अर्थशास्त्र विषयांतर्गत भारताच्या लोकसंख्या संदर्भांतील घटकाची तयारी करतांना या पुस्तकातील माहिती उपयुक्त ठरणार आहे.

    Loksankhayashashra

    180.00
    Add to cart
  • वर्णनात्मक भाषा विज्ञान

    भाषा ही एक सामाजिक संस्था आहे. समाजाने समाजासाठी संदेश देवाण-घेवाण करण्यासाठी लोकांची, लोकांच्या माध्यमातून केलेली एक व्यवस्था आहे, तशी ती मानवेतर प्राण्यांपेक्षा मानवाची एक स्वतंत्र नवनिर्मिती आहे. भाषेशिवाय माणूस ही कल्पनाच करता येणार नाही. भाषा आहे म्हणून माणूस आपले विचार, भावना, कल्पना, संवेदना आणि संदेश मांडतो, स्पष्ट करतो. विचार ही एक मानवी अवस्था असली तरी ती प्रकट करण्याचे समर्थ माध्यम भाषा आहे. विचार जिथे सुरू होतात तिथे भाषेचीही सुरूवात होते. भाषा आणि विचार हे परस्पर निगडित आहेत. माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजाच्या परंपरा, संस्कृती, श्रद्धा, ज्ञान इत्यादींचे सवंर्धन आणि पुढच्या पिढीकडे संक्रमित करण्याचे व समाजाचे अस्तित्व आणि विकासाचे सातत्य टिकवून ठेवण्याचे अविरत कार्य भाषेतूनच होत असल्याने भाषा ही मानवी जीवनाचे अविभाज्य असे अंग आहे. शब्द, वाक्य आणि अर्थ संकल्पना उलगडण्याची एक शास्त्रीय दृष्टी असलेली कला म्हणजे भाषा शास्त्र आहे.

    Varnanatamk Bhasha Vidnyan

    150.00
    Add to cart
  • वर्तनात्मक अर्थशास्त्राचा परिचय

    अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. मानव ज्या समाजात राहतो, त्यात त्याचे आर्थिक व्यवहाराबाबत वर्तन कसे आहे, याचे अध्ययन केले जाते. समाजात प्रत्येकाचे वर्तन वेगवेगळे असू शकते पण आर्थिक वर्तन जवळ जवळ सारखे असते. वर्तन ही एक मानसशास्त्रीय कल्पना आहे. सामान्य व्यक्ती किंवा उद्योजकाची एक प्रवृत्ती असते. किमान देऊन जास्तीत जास्त प्राप्त करणे आर्थिक जगतात उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग या चार आर्थिक क्रिया चालतात. ते करताना उपभोक्ते, उत्पादन घटक, उद्योजक, व्यावसायिक कसे वर्तन करतात. त्याचे अध्ययन अर्थशास्त्रात केले जाते. उपभोक्ता कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त वस्तू व सेवा प्राप्त करुन महत्तम समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतात. तर उद्योजक कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन करुन महत्तम नफा प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. उत्पादनासाठी ते भूमी, श्रम, भांडवल, संयोजन या चार घटकांचा वापर करतात. घटक वापराबद्दल घटक पालकांना खंड, वेतन, व्याज, नफा रूपात मोबदला देतात. सरकार समाजाच्या आर्थिक वर्तनावर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा निर्माण करते.

    275.00
    Add to cart
  • वाणिज्यिक भूगोल

    वाणिज्यातील विविध वस्तू व सेवांचे उत्पादन, उपभोग, व्यापार आणि वितरण भौगोलिक घटकांवर अवलंबून असते. त्यामुळे वाणिज्याचा सर्वांगीण अभ्यास करण्याच्या हेतूने वाणिज्यिक भूगोल ही शाखा निर्माण झालेली आहे. वाणिज्यिक भूगोल ही मानवी भूगोलातील आर्थिक भूगोल या शाखेची उपशाखा आहे. वाणिज्यिक भूगोल ही एक स्वतंत्र ज्ञानशाखा 18 व्या शतकात औद्योगिक क्रांती नंतर प्रचलित झाली. ही भूगोलातील एक विकसित ज्ञानशाखा आहे.
    या पुस्तकात वाणिज्यिक भूगोलाची ओळख, स्वरूप, व्याप्ती आणि विकास, पद्धती, आर्थिक साधनसंपदा-अर्थ आणि व्याख्या, वर्गीकरण, प्रमुख साधनसंपदा : मानवाच्या आर्थिक व व्यापारी क्रियांशी निगडीत, साधनसंपदा संकटे व संवर्धन, मानव साधनसंपदा-लोकसंख्या अर्थ, प्रकार, वैशिष्टे, फायदे आणि तोटे, लोकसंख्येचे समकालीन मुद्दे आणि विकास इत्यादी घटकांची माहिती, आकडेवारी, चित्रे व आकृती यांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत, ज्यामुळे ‌‘व्यावसायिक भूगोल’चा अभ्यास सोपा होईल. या संदर्भ साहित्याच्या सहाय्याने हे कार्य यशस्वी होईल अशी आशा आहे.

    150.00
    Add to cart
  • विकासाचे अर्थशास्त्र

    Vikasache Arthashastra

    225.00
    Add to cart
  • वित्तीय प्रणाली

    वित्तीय प्रणाली (Financial System) यामध्ये बँकव्यवस्था, रचना, विविध बँका कार्य, उद्दीष्टे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सेबी, आयआरडीए, तसेच आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था यामध्ये IMF, World Bank, ADB, Bribkr या घटकांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सदर पुस्तक हे विद्यार्थी, संशोधक यांना अत्यंत उपयुक्त आहे. याशिवाय SET, NET व MPSC साठी उपयुक्त आहे.
    सदर पुस्तक हे अत्यंत साध्या पद्धतीने मांडणी करुन विद्यार्थ्याला सहज कसा समजेल यादृष्टीने मांडणी केली आहे. सदर पुस्तक लिहितांना उपयुक्त संदर्भग्रंथ, इंटरनेट वेब, शासकीय प्रकाशने, वेगवेगळे आर्थिक अहवाल यांचा वापर करण्यात आला असून हे पुस्तक प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक यांना अत्यंत उपयुक्त ठरेल.

    Vittiya Pranali

    200.00
    Add to cart
  • वित्तीय साक्षरता

    वित्तिय साक्षरता आणि वित्तीय समावेशन हा आधुनिक माहिती व तंत्रज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थांचा मुलभूत भाग झाला आहे. आधुनिक काळात प्रत्येक नागरिकास आपली आर्थिक प्रगती करण्याचा ध्यास असतो. प्रत्येक व्यक्ती पैसा/उत्पन्न प्राप्त करण्यासाठी शारीरीक आणि बौद्धिक श्रमात सहभाग घेतात. असं मानलं जात की पैसा कमावण्यापेक्षा तो जतन करणे आणि त्यात वाढ करणं जास्त कौशल्यपूर्ण आहे. हे कौशल्य ज्याने आत्मसात केले तो निश्चितच प्रगती करतो. वर्तमान बरोबर भविष्याची चिंता हा मानवाचा स्थायी भाव आहे. चालू उत्पन्नाचा मोठा हिस्सा उपभोगावर खर्च करुन थोडी-थोडी बचत केली, तिची गुंतवणूक केली, संपत्ती निर्मिती केली. भविष्य निश्चितच उज्वल होईल. याची जाणीव वित्तीय साक्षरता निर्माण करते. वित्तीय साक्षरतेतून व्यक्तीस बँकींग व्यवहार करता येतात, पैशांचे हस्तांतरण करता येते, पैशाची योग्य गुंतवणूक करता येते. पण यासाठी देशातील बँकींग व शेअर बाजाराचा विकास आणि विस्तार आवश्यक आहे. भारताला 2025 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी आणि चौथ्या क्रमांकाची मोठी आर्थिक सत्ता होण्यासाठी वित्तीय साक्षरता आवश्यक आहे.

    250.00
    Add to cart
  • विपणन आणि जाहिरात

    विपणन आणि जाहिरात या पुस्तकामध्ये विपणनाचा परिचय- व्याख्या, महत्व, प्रक्रिया अणि कार्ये, ग्रामीण आणि हरित विपणनाचे स्वरूप, बाजारपेठेचे विभागीकरण व ग्राहक वर्तनाचे विश्लेषण, जाहिरातीचा परिचय – जाहिरात म्हणजे काय, तिचे प्रकार आणि आराखडे, जाहिरात मसुदा आणि अंदाजपत्रकाचे महत्त्व, जाहिरातींवर नियमन आणि नियंत्रण, उत्पादन जीवन चक्र, विपणन व्यूहरचना, आणि नेटवर्क विपणन, जाहिरात क्षेत्रातील नैतिकता आणि नियामक संस्था याबद्दल सखोल माहिती दिली आहे. भारतीय आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या संदर्भात विचारशील बनवण्यास मदत करेल. तसेच विद्यार्थ्यांना विपणन आणि जाहिरात क्षेत्रात ज्ञान मिळवण्यासाठी उपयुक्त ठरेल.

    160.00
    Add to cart
  • विपणन आणि विक्रयकला (भाग – 2)

    Vipananshastra Aani Vikrayakala

    145.00
    Add to cart