• भारतीय आर्थिक पर्यावरण (भाग 1)

    आधुनिक अर्थव्यवस्थांचे स्वरूप अत्यंत गुंतागुंतीचे झाले आहे. उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग या व्यवहारांना आर्थिक व्यवहार असे म्हटले जाते. अर्थव्यवस्थेतील सर्व आर्थिक घटक या आर्थिक व्यवहारांशी निगडित असतात. देशाच्या नैसर्गिक, आर्थिक, तांत्रिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वातावरणातून आर्थिक पर्यावरण निश्चित होत असते. देशातील आर्थिक पर्यावरणाचा देशाच्या आर्थिक विकासावर परिणाम होतो. देशाचे आर्थिक पर्यावरण अनुकूल असेल तर देशाच्या आर्थिक विकासात वाढ घडून येते. तर प्रतिकूल आर्थिक पर्यावरणामुळे देशाच्या आर्थिक विकासात अडथळे निर्माण होतात. सदर पुस्तकामध्ये आर्थिक पर्यावरणाचा अर्थ, परिणाम करणारे घटक, अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने, जगातील प्रमुख अर्थव्यवस्थाशी तुलना, कृषी पर्यावरण, शेतीची भूमिका, आव्हाने व विविध प्रवृत्ती, कृषी-औद्योगिक पर्यावरण, देशांच्या आर्थिक विकासामध्ये उद्योगांची भूमिका, औद्योगिक धोरण 1991, भारतीय उद्योग क्षेत्रापुढील आव्हाने, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, सेवा क्षेत्राची भूमिका व विकास, आव्हाने, बँकिंग क्षेत्र, लघु आणि देय बँका, बँक खाते प्रकार, पद्धती, प्रक्रिया, ई-बँकिंग, ई-वॉलेट, भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने, दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती कार्यक्रम, कृषी विकास वगैरे महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश आहे.

    Bhartiya Arthik Paryavan (Bhag 1)

    275.00
    Add to cart
  • भारतीय आर्थिक पर्यावरण (भाग 2)

    ‘भारतीय आर्थिक पर्यावरण’ यात सेवाक्षेत्रातील आर्थिक पर्यावरण यामध्ये सेवा क्षेत्राची भूमिका व विकास, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, विमा, बँकींग, सेवा क्षेत्रापुढील आव्हाने, बँकिंग पर्यावरण यामध्ये बँक, बँकांची कार्ये, बँकेची बदलती रचना, खाजगी, लघु आणि देय बँका, बँक खाते प्रकार, पद्धती आणि व्यवहार करण्याची प्रक्रिया, ई-बँकिंग, ई-वॉलेट, भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने, दारिद्रय निर्मूलन, रोजगार निर्मिती कार्यक्रम, कृषी विकास इत्यादी घटकांचा विचार केला आहे. त्यांचा आर्थिक विकासावर होणार्‍या परिणामांचे वस्तूनिष्ठ आकलन होऊन, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण व्हावी. देशाच्या आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील आर्थिक पर्यावरणाची स्थिती समजावी, आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता विकसित व्हावी तसेच भारतीय नागरीक म्हणून आपल्या जबाबदार्‍या व कर्तव्यांची जाणीव निर्माण व्हावी. हा हेतू विचारात घेतलेला आहे. सदर पुस्तकाचे लिखान करतांना विविध संकल्पनाची मांडणी अतिशय साध्या व सोप्या भाषेत केली आहे. अलिकडील अद्ययावत सांख्यिकीय आकडेवारी व माहितीचे संदर्भ दिले आहेत. भारताची आर्थिक पाहणी, ठइख चे वार्षिक अहवाल, संकेतस्थळावरील उपलब्ध असलेल्या माहितीचा अवलंब केला आहे. त्यामुळे हे पुस्तक अर्थशास्त्राचे विद्यार्थी व अर्थशास्त्राचे अभ्यासक यांना उपयुक्त ठरेल हा प्रामाणिक हेतू समोर ठेवून पुस्तकाचे लिखाण केले आहे.

    Bharatiya Aarthik Paryavaran (Bhag 2)

    250.00
    Add to cart
  • भारतीय आर्थिक विकास

    Bhartiya Arthik Vikas

    195.00
    Add to cart
  • भारतीय औद्योगिक अर्थशास्त्र

    भारतात औद्योगिक विकासाचा खरा पाया दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत रचला गेला. आज भारतीय औद्योगिक क्षेत्राने लक्षणीय प्रगती केली आहे. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात औद्योगिक क्षेत्राचे महत्त्व वाढत आहे. भारताचा औद्योगिक विकास हा यंत्रनिर्मित वस्तू पर्यंत मर्यादित नसून अभियांत्रिकी, सेवा उद्योग असा विस्तारला आहे.
    प्रस्तुत पुस्तकात भारतातील औद्योगिकीकरण, भारतातील सार्वजनिक व खाजगी उद्योग क्षेत्र, औद्योगिक रुग्णता, प्रादेशिक औद्योगिक असमतोल, भारतीय उद्योगांचे नियमन, भारतीय उद्योगांवरील विनियमनाचा भाग म्हणून खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, भारतीय श्रमिक, त्यांची वैशिष्टे, उत्पादकता, वेतन, सामाजिक सुरक्षा, कामगार कल्याण, कामगार संघटना या महत्त्वपूर्ण मुद्द्यांची विस्तृत आणि मुद्देसूद मांडणी केली आहे. भारतीय औद्योगिक क्षेत्राचा विकास किंवा प्रगती आणि समस्यांचे योग्य आकलन व्हावे म्हणून सांख्यिकीय माहितीचा वापर केला आहे.

    410.00
    Add to cart
  • भारतीय बँकिंग प्रणाली

    Bharatiya Banking Pranali

    525.00
    Add to cart
  • भारतीय राजकीय विचारवंत

    राजकीय तत्वज्ञानाची पायाभरणी ही राजकीय विचारांच्या माध्यमातून होत असते. जगातील; विशेषत प्राचीन भारतातील सर्व प्राचीन धर्मग्रंथ अथवा अन्य ग्रंथसंपदा अभ्यासल्यास हे त्वरीत लक्षात येईल. आधुनिक भारताचा प्रारंभच मुळी भारतात ब्रिटीशांच्या आगमनानंतरचा आहे. ब्रिटीशांचे विचार अथवा सुधारणा ह्या भारतीयांसाठी अकल्पनीय अशा होत्या. परिणामी भारतीयांमध्ये विचारमंथनास सुरुवात झाली. राजा राममोहन रॉय यांनी त्यास वैचारिक आधार देऊन प्रबोधन काळाचा प्रारंभ केला. म. ज्योतीराव फुले, स्वामी दयानंद सरस्वती, ना. गोखले, आगरकर, न्या. रानडे, दादाभाई नौरोजी, लो. टिळक, म. गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. आंबेडकर, पं. नेहरू, अरविंद घोष, एम.एन. राय, मौलाना आझाद इत्यादी विचारवंतांनी भारतातील बदलत्या परिस्थितीला अनुरूप व भविष्यकालीन उपाय योजना म्हणून तत्कालीन आवश्यकतेतून व जतनेचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी – सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, राष्ट्रवादी, आंतरराष्ट्रवादी, शांतता, सहअस्तित्व, भारताचे स्वातंत्र्य इ. विविध विषयांवर चिंतन करून वैचारिक मांडणी केली. प्रस्तुत पुस्तकात या विविधांगी निवडक घडामोडींचा समावेश केलेला आहे.

    Bhartiya Rajkiya Vicharvant

    235.00
    Add to cart
  • भारतीय राजकीय व्यवस्था

    प्रत्येक देशाला स्वतःचे संविधान असणे आवश्यक आहे. या संविधानात त्या देशाच्या शासनकारभारविषयक बाबींची तरतूद असते. पण त्याबरोबरच त्या देशातील जनतेच्या आशाआकांक्षेचे व त्या देशाने स्वीकारलेल्या ध्येयाचे निदर्शनही असते. स्वतंत्र राष्ट्रातील नागरिकांना स्वतःचे संविधान निर्माण करण्याचा अधिकार असतो व ते, तो अधिकार संविधानसभा नेमून बजावतात. संविधानसभेत जनतेचे प्रतिनिधी चर्चा करुन संविधान तयार करतात व अशा संविधानानुसार त्या देशाचा शासनकारभार चालतो. जनतेच्या प्रतिनिधींनी संविधानसभेत एकत्र तयार केलेले संविधान म्हणजे त्या राष्ट्राच्या राज्यकारभाराविषयीचा वेदग्रंथ होय. त्याचे प्रामाण्य सर्वश्रेष्ठ असते. संविधान हा मूलभूत कायदा असतो. त्याचे मांगल्य व पावित्र्य कायम राखण्याची जबाबदारी त्या देशातील सर्व नागरिकांवर असते.
    सदर ग्रंथात भारतीय संविधान निर्मितीची संक्षिप्त माहिती, नागरिकांचे मूलभूत अधिकार व कर्तव्ये, संविधानाचा सरनामा, कार्यकारी मंडळ, विधिमंडळ आणि न्यायमंडळ, निर्वाचन आयोग या संदर्भातील संविधानात्मक तरतुदींची अभ्यासपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

    Bharatiy Rajkiya Vyavastha

    350.00
    Add to cart
  • भारतीय राज्यघटना आणि राजकारणाची ओळख

    भारतीय राज्यघटनेची निर्मिती 1946 ते 1950 या कालखंडात घटना समितीकडून झालेली असली तरी राज्यघटना निर्मिती पूर्वी ब्रिटिश राजवटीने केलेल्या कायद्याच्या माध्यमातून लोकशाहीपूरक वातावरण भारतात निर्माण होण्यास प्रारंभ झालेला होता. राज्यघटना निर्मितीवेळी प्रत्येक व्यक्तीच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक विकास साध्य करणे आधुनिक लोकशाही शासन व्यवस्थेचे ध्येय मानले गेले. नागरिकांना मूलभूत अधिकार व हक्क प्रदान करताना मार्गदर्शक तत्त्वांचेही आरेखन केले गेले. भारतीय घटनेद्वारा नागरिकाचे अधिकार आणि कर्तव्ये परिभाषित करताना भविष्यकालीन जीवनाची पूर्ती करण्यासाठी आवश्यक मूल्यांचा समावेश करतेवेळी घटनेत वेळोवेळी दुरुस्तीदेखील केली गेली. भारताने संसदीय लोकशाहीचा स्वीकार केल्याने देशाची सत्ता कार्यकारी मंडळाकडे आली. भारताचे कार्यकारी मंडळ सामुहिकरीत्या संसदेला जबाबदार असते. लोकशाहीची संस्थात्मक चौकट यशस्वी व गतिमान बनविण्यासाठी न्यायव्यवस्था व निवडणूक आयोग ही महत्त्वपूर्ण साधने मानली जातात. हे निकोप लोकशाहीचे प्रमुख अंग मानले गेले.

    Bhartiya Rajyaghatana Aani Rajkaranachi Olakh

    395.00
    Add to cart
  • भारतीय राज्यघटना शासन आणि राजकीय व्यवस्था

    26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वतंत्र भारताच्या घटना समितीने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला. घटनाकारांनी संसदीय लोकशाहीचा स्वीकार केल्याने कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यामध्ये विभागणी करतानाच मूलभूत अधिकार व हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वांचेही समावेशन केले गेले. अधिकार-कर्तव्ये परिभाषित करतानाच भारतीयांच्या भविष्यकालीन जीवनाची पूर्ती करण्यासाठी आवश्यक मूल्यांचा समावेश करतेवेळी घटनेत वेळोवेळी दुरुस्ती देखील केली गेली. राष्ट्रपती हे संविधानात्मक प्रमुख असले तरीही पंतप्रधानांचे महत्त्व ठळकपणे दिसून येते. निवडणूक आयोगाद्वारे आयोजित केलेल्या निवडणूकांमध्ये मतदानाद्वारे निवड झालेल्या लोकप्रतिनिधींकडून मंत्रिमंडळाची नियुक्ती होते. लोकसभेमध्ये बहूमत असेपर्यंत मंत्रिमंडळ सत्तेवर राहू शकते. याप्रकारे लोकशाहीत जबाबदारीचे तत्त्व विकसित झाल्याने कायदेमंडळांकडून कायदे केले जातात, कार्यकारी मंडळाकडून कायद्यांची अंमलबजावणी होते आणि न्यायमंडळ अंमलबजावणी प्रक्रियेची पाहणी करते म्हणजे न्याय देते. स्वातंत्र्य, समता, बंधुता या लोकशाही तत्त्वांसाठी हे आवश्यक ठरते.

    Bharatiya Rajyaghatana – Shasan ani Rajkiya Vyavastha

    375.00
    Add to cart
  • भारतीय राज्यघटनेची तोंडओळख

    भारताची राज्यघटना म्हणजे देशाचा मुलभूत व सर्वोच्च असा कायदा होय. राज्याच्या शासनाची मुलभूत बैठक निश्चित करणारी, शासनाचे अधिकार व जनतेचे हक्क स्पष्ट करणारी एक सुत्रबद्ध नियमावली म्हणून राज्यघटनेकडे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेत मुलभूत हक्क, मुलभूत कर्तव्ये व राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे यांचा समावेश असून ब्रिटीश राजवटीतील विविध कायदे, प्रशासकीय रचना व नियमावली यांचा प्रभाव भारतीय राज्यघटनेवर पडलेला दिसतो. म्हणूनच प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ प्रो. ग्रॅनव्हिले ऑस्टिन यांनी भारतीय राज्यघटनेला ‘महत्त्वपूर्ण असा सामाजिक दस्ताऐवज’ म्हटले.

    प्रस्तुत पुस्तकात राज्यघटनेच्या निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, घटनासमिती, राज्यघटनेचा सरनामा, राज्यघटनेची वैशिष्ट्ये, राज्यघटनेची मुलभूत चौकट, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व निवडणूक पद्धती तसेच राज्यघटनेतील विविध कलमे, भाग व परिशिष्ट्ये यांची अद्ययावत व अचूक माहिती देण्यात आली आहे.

    225.00
    Add to cart
  • भारतीय राज्यव्यवस्था

    भारतीय राज्यव्यवस्था या पुस्तकात केंद्रीय कार्यकारी मंडळ, केंद्रीय कायदेमंडळ, राज्य कार्यकारी मंडळ, राज्य कायदे मंडळ, भारतीय न्यायव्यवस्था, निवडणूक प्रक्रिया या विषयी विस्तृत माहितीचा देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय संविधान आणि राजकीय व्यवस्थेशी निगडीत अनेक घटक पदवी, पदवीत्तर अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, नेट/सेट परीक्षेतील अभ्यासक्रमात देखील समाविष्ट आहेत. म्हणून उपरोक्त पुस्तकाची रचना विद्यापीठीय अभ्यासक्रम व स्पर्धा परीक्षा या दोन्हीसाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ ठरेल या हेतूने केलेली आहे. प्रस्तुत पुस्तकाच्या माध्यमातून भारतीय राज्यव्यवस्थेशी निगडीत संकल्पना समजण्यास मदत होईल. तसेच अभ्यासू प्राध्यापक व विद्यार्थ्यांना अध्यापन करताना संदर्भ ग्रंथ म्हणून पुस्तक उपयुक्त ठरेल.

    250.00
    Add to cart
  • भारतीय राष्ट्रीय चळवळ (इ.स. 1857 ते 1950)

    इ. स. 1757 मध्ये झालेल्या प्लासीच्या युद्धाने ब्रिटिशांनी भारतात पाय रोवले. बंगालमध्ये आपले बस्तान बसविले. बक्सारच्या लढाईने ब्रिटिशांचे राज्य पक्के झाले. भारत ब्रिटीशांच्या गुलामगिरीत पडला. याची जाणीव भारतीयांना होताच त्यांनी 1857 मध्ये ब्रिटीशांविरूद्ध उठाव केला. या उठावात जरी भारतीय अपयशी झाले तरी या स्वातंत्र्य संग्रामाने भारतीयांच्या मनात राष्ट्रवादाची बीजे पेरल्या गेली. 1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रीयवाद फोफावू लागला. त्यातून मवाळ आणि जहाल असे गट निर्माण झाले. दोन्ही पक्षांना स्वातंत्र्य हवे होते. पण त्यांचे ध्येय प्राप्त करण्याचे मार्ग वेगळे होते. यांतून दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य शब्दाची देणगी भारतीयांना देताच बंगालच्या फाळणीने अगोदरच पेटलेला भारत आणखी पेटला. वसाहतीच्या स्वातंत्र्याची स्वप्ने त्याला पडू लागली. लोकमान्य टिळकांनी ‌‘स्वराज्य’ हा आपला जन्मसिद्ध अधिकार असल्याचे सांगितले. महात्मा गांधीयुगात सत्याग्रह, अहिंसा या मार्गाने स्वातंत्र्याची चळवळ चालू राहिली आणि शेवटी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेद्वारे तिच्यावर आघात करताच ‌‘चले जाव’ चळवळीने ब्रिटीशांना भारत सोडावा लागला. त्याची ही कहानी म्हणजेच भारतीय राष्ट्रीय चळवळ होय.

    325.00
    Add to cart
  • भारतीय राष्ट्रीय चळवळ व स्वातंत्र्योत्तर भारत (1885-1991)

    इ.स. 1857 साली झालेला भारतातील उठाव हा ब्रिटिश सत्तेविरुद्धचा पहिला संघटीत प्रयत्न होता. या उठावातून भारतीय लोकांमध्ये राजकीय जागृतीची सुरुवात झाली. पाश्चात्य शिक्षणाने प्रभावित झालेल्या सुशिक्षित मध्यमवर्गाने समाजाचे नेतृत्त्व केले व कालांतराने स्वातंत्र्याची चळवळ उभारली. लो. टिळक यांच्या निधनानंतर 1919 ते 1947 पर्यंतच्या काळात म. गांधीजींचा भारतीय राजकारण व समाजकारण यावर प्रभाव कायम राहीला. म. गांधींनी केलेल्या विविध चळवळींबरोबरच शेतकरी-कामगार, वंचित-शोषितांच्या चळवळींना देखील सुरुवात झाली. 19 व्या शतकातील मुस्लिम जमातवादाचा उदय, द्विराष्ट्रवादाचे कट्टर समर्थन, इंग्रजांचे फोडा-झोडा धोरण व काँग्रेसी नेत्यांची हतबलता वगैरे कारणांनी 1947 मध्ये भारताची फाळणी झाली. वसाहतवादाच्या जोखडाखाली भरडून निघालेल्या, नव्याने स्वतंत्र झालेल्या खंडित भारतासमोर अनेक आव्हानांचा सरदार पटेलांनी यशस्वीपणे सामना केला. डॉ. आंबेडकरांनी राज्यघटना बनविण्यात सिंहाचा वाटा उचलला. पं. नेहरूंनी अलिप्ततावादाचे समर्थन केले. मात्र चीनसोबतच्या संघर्षात भारताचा लाजिरवाणा पराभव झाला. स्वातंत्र्योत्तर भारताने विविध योजना, कायदे करून उत्तरोत्तर प्रगतीकडे वाटचाल सुरू केली.

    Bhartiya Rashtriya Chalval V Swatantyottar Bharat (1885-1991)

    295.00
    Add to cart
  • भारतीय लष्करी इतिहास

    भारतीय युद्धकला अत्यंत समृद्ध असून ती अतीप्राचीन आहे. प्राचीन भारतीय इतिहास हा भारतीय संस्कृतीच्या प्रगल्भतेच्या खुणा जपणारा आहे. मानवी उत्क्रांतीच्या बरोबर संस्कृतीचा जसजसा विकास होत गेला तसतशी मानवनिर्मित सर्वच तंत्राची, विज्ञानाची व कलांची प्रगती झालेली दिसते. आधुनिक संरक्षणशास्त्राचा विकास होण्यासाठी लष्करी इतिहासाचा संशोधनात्मक अभ्यास उपयुक्त ठरतो. युद्धकलेच्या अभ्यासाने, संशोधनाने ज्ञान समृद्ध होते. तसेच आत्मविश्वास वाढतो. वेद, पुराणशास्त्रे आणि उपनिषदे इत्यादी साहित्यातून आणि लोकपरंपरातून आजच्या विकसीत मानवी जीवनाच्या खाणाखुणा अभ्यासताना वैशिक विकासाची दिशा स्पष्ट होते. प्राचीन लढायातून युद्धकला स्पष्ट होते. प्राचीन भारतातील युद्धनीती, डावपेच, युद्धयोजना सैनिक, शस्त्रास्त्रे इत्यादी संदर्भातील माहिती सर्वच प्रकारच्या लष्करासाठी उपयुक्त आहे. प्रस्तुत ग्रंथात युद्धविषयक निरनिराळे घटकांचे योग्य विश्लेषण करून, आकलन करून लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

    150.00
    Add to cart
  • भारतीय वित्तीय प्रणाली

    पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या सर्वच विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचा आणि व्यावसायिक दृष्टीकोनातून ठरणारा ‘भारतीय वित्तीय प्रणाली’ या विषयावरील अतिशय सुलभ व सोप्या शब्दात मांडणी केलेली हे पुस्तक आपल्या हाती देतांना आम्हाला आनंद होत आहे.

    आधुनिक काळात बँकांची भूमिका अतिशय महत्त्वाची समजली जाते. तसेच बँकेत्तर वित्तीय संस्था सूक्ष्म वित्त पुरवठा आणि त्यांचे कार्ये तितकेच उपयुक्त आहे. देशाच्या औद्योगिकरणासाठी वित्त पुरवठा करण्याच्या दृष्टीकोनातून वित्तीय संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे. नाणेबाजार आणि भांडवल बाजारात अनेक नवीन साधने प्रविष्ट झाली. अनेक संस्था नव्याने उदयास आल्या. यात भाडेपट्टा वित्त संस्थांपासून ते गृह वित्त पुरवठा संस्था, परस्पर निधी संस्था यांचा समावेश होतो. या बदलत्या परिस्थितीत नियंत्रणे सक्षम करण्यासाठी ‘सेबी’ सारख्या संस्था, क्रिसीलसारख्या पत मोजमापनाच्या श्रेणी जाहीर करणार्‍या यंत्रणांची गरज निर्माण झाली, आणि तशा तरतूदीही क्रमाक्रमाने गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकात केल्या गेल्या.

    Bhartiya Vittiya Pranali

    250.00
    Add to cart
  • भारतीय वित्तीय बाजार आणि संस्था – II

    Bhartiya Vittiya Bajar Ani Sanstha – II

    225.00
    Add to cart
  • भारतीय समाज संरचना व बदल

    Bharatiya Samaj Sanrchna V Badal

    280.00
    Add to cart
  • भारतीय संरक्षण यंत्रणा आणि संघटना

    देशाचे संरक्षण आणि सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी जशी सैन्यदलाची गरज असते. त्याचप्रमाणे सैन्याला दिशा देण्यासाठी संघटनेची गरज असते आणि ही संघटना उत्तम अशा प्रशासनाचा मूलभूत स्वरूपाचा पाया समजला जातो. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराचे पद देशाची अंतर्गत व बाह्य सुरक्षा निश्चित करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे.
    भारताचे परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे आणि अंतर्गत कलहापासून राष्ट्रहित जोपासणे ही तिन्ही सेनादलांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यासाठी भूदल, नौदल आणि हवाई दल या तिघांचीही भूमिका स्वागतार्ह अशी आहे. यातील एकाही दलाचा निर्णय चुकल्यास राष्ट्राला फार मोठी किंमत मोजावी लागते. कुशलता आणि चातुर्य लाभलेल्या संरक्षक घटकास चांगल्या प्रकारे प्रशिक्षणही प्राप्त झालेले असते. भारताच्या तिन्ही दलांमध्ये चांगल्या लष्करी संघटनेसाठी उद्देश, सहकार्य, लवचिकता, समतोलपणा, काटकसर, विकेंद्रीकरण, प्रयत्नाची एकता आणि अचूकपणा या तत्त्व समरसून भरलेले आहे असल्यामुळे आज तिन्ही दले भारताची मान जगात उंचावताना दिसून येते. सावध भूमिका घेतानाच वेळप्रसंगी आक्रमकपणाचेही दर्शन तिन्ही दलांनी विविध प्रसंगी घेतलेल्या भूमिकांवरून दिसून येते.

    275.00
    Add to cart
  • भारतीय संविधान

    ‌‘भारतीय संविधान’ या पुस्तकाच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेची तोंडओळख करून देण्यात आली आहे. राज्यघटना बारकाईने समजून घेण्यासाठी राज्यघटनेच्या निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, राज्यघटना निर्मितीसाठी घटना समितीची मागणी, घटना समितीची निर्मिती, घटना समितीचे कामकाज, स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार राज्यघटनेत घडून आलेले बदल, घटना समितीच्या समित्या, घटनेची स्वीकृती, घटना समितीचा कार्यकाळ, राज्यघटनेचा सरनामा, राज्यघटनेचे उगमस्थान, सरनाम्याचे महत्त्व, भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये यांची साध्या व सोप्या शब्दांत मांडणी केली आहे. त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे यांचे सहज सोप्या भाषेत सविस्तर विश्लेषण करण्यात आलेले आहे. पुस्तकाच्या शेवटी भारतीय राज्यघटनेतील सर्व कलमांची यादी संक्षिप्त स्वरूपात देण्यात आलेली आहे. प्रस्तुत पुस्तकात 2024 पर्यंतची भारतीय राज्यघटनेची अद्यावत आणि अचूक माहिती देऊन हे पुस्तक परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या पदवी आणि पदव्युत्तर विभागांच्या राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना तसेच केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल याबद्दल आम्हाला विश्वास वाटतो.

    110.00
    Add to cart
  • भारतीय संविधान मूलभूत तत्त्वे आणि स्वरूप

    संविधान म्हणजे एक देशाच्या राजकीय व्यवस्थेचा आधारस्तंभ. ते राज्याच्या कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, व न्यायमंडळ यांची स्थापना करतो, त्यांच्या अधिकार व कार्ये स्पष्ट करतो, व त्यांची मर्यादा ठरवतो. संविधान जनतेच्या सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे आणि त्यात सुसंगत व न्यायसंगत शासनाची रूपरेषा असते.
    लोकशाहीत, राज्यघटनेचा आधार म्हणजे जनता स्वसंविधान तयार करते आणि विविध शासन अंगांना अधिकार प्रदान करते. संविधान हा संस्थात्मक आरसा आहे, जो समाजाच्या विविध स्तरातील मूल्यांचे प्रतिबिंब असतो. त्याच्या अंमलबजावणीवर आणि न्यायालयीन निर्णयांवर संविधानाचा प्रभाव आहे.

    450.00
    Add to cart
  • भारतीय संविधानाची ओळख

    भारतीय राज्यघटनेत ‘भारत हा राज्यांचा संघ असेल’ असा उल्लेख आहे. संघराज्यपद्धती ही केवळ संरचनात्मक व्यवस्था नसते; तर तिच्यात विविध लोकगट व त्यांच्या संस्था आपापली वैशिष्ट्ये कायम ठेवून समान उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी एकत्र येवून शाश्वत व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. भारतीय राज्यघटनेत उदारमतवाद, मिश्र अर्थव्यवस्था, सत्तेचे विकेंद्रीकरण, कायदेशीर वा कार्यालयीन भाषेची तरतूद, स्वतंत्र निर्वाचन आयोग इत्यादींची तरतूद आढळते. परिणामी भारतीय राज्यघटना ही सर्वसमावेशक ठरते.

    प्रस्तुत ग्रंथात भारतीय संविधानाची निर्मिती, मूलभूत हक्क, कर्तव्ये, मार्गदर्शक तत्वे, भारतीय संघराज्यवाद, कायदेमंडळ, संविधानिक दुरुस्त्या, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि निवडणूक व्यवस्था अशा मूलभूत व राज्यघटनेची ओळख होण्यासाठी आवश्यक घटकांचा समावेश करण्यात आलेला असल्याने भारतीय राज्यघटनेची ओळख करून घेतानाच लोकशाही प्रक्रियेचाही अभ्यास होणार आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी कोणकोणत्या आवश्यक बाबी आहेत यांचाही उहापोह सदरील ग्रंथात आहे. भारतीय राज्यघटनेची ओळख होण्याच्या दृष्टीने सोपी, सुटसुटीत अशी ग्रंथरचनेची मांडणी करण्यात आली आहे.

    Bharatiya Sanvidhanachi Olkha

    395.00
    Add to cart
  • भारतीय सामाजिक समस्या

    मानव समाजाच्या उत्पत्तीपासून तर आजपर्यंतचा समाजाचा कोणताही कालखंड घेतला तर असा कोणताच कालखंड नाही की ज्यात सामाजिक समस्या नव्हत्या. प्राचीन काळापासून तर आधुनिक काळापर्यंत, आदीम समाजापासून तर 21 व्या शतकातल्या प्रगत समाजापर्यंत सामाजिक समस्या नेहमीच आढळून येतात.

    मात्र सामाजिक समस्या सार्वत्रिक व सार्वकालीन असल्या तरी स्थळ व काळानुसार त्याचे स्वरुप बदलत जाते. आदिवासी समस्या प्रगत समाजाच्या समस्यापेक्षा वेगळ्या असतात. ग्रामीण समाजाच्या समस्या नागरी समाजाच्या समस्येपेक्षा भिन्न असतात भारतीय सामाजिक समस्यांची ओळख व्हावी.

    सदरील पुस्तकात सामाजिक समस्या, कौटुंबिक समस्या, भारतातील लोकसंख्येची समस्या, ग्रामीण भारतातील समस्या, मद्यपानाच्या समस्या, भ्रष्टाचार, दहशतवादाची समस्या, भारतातील दुर्बल घटकांच्या समस्या, नागरीकरणाशी संबधित समस्या, असहिष्णुता दंगली आणि गुन्हे इ. घटकांची विद्यार्थ्यांना समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून ओळख व्हावी या दृष्टीने महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश करण्यात आला आहे.

    Bhartiy Samajik Samasya

    375.00
    Add to cart
  • भारतीय सेनादलांच्या विद्यमान घडामोडी

    आजच्या काळात भारत आणि जगातील अनेक देशांच्या लष्करी पद्धतींमध्ये ग्रीक-रोमन युद्धपद्धतीचा प्रभाव आहे. एकविसाव्या शतकात युद्धतंत्रात माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विविध आधुनिक शस्त्रे यांचा समावेश झाला आहे, ज्यामुळे भारतीय सेनादलांच्या घडामोडींचा अभ्यास महत्त्वाचा आहे.
    प्राचीन भारतात संरक्षण आणि युद्धकला प्रगल्भ होती. रामायण, महाभारत आणि कौटिल्याचे अर्थशास्त्र यामध्ये याबाबतच्या महत्त्वाच्या विचारांची माहिती आहे. दुर्दैवाने, भूतकाळातील या ज्ञानाकडे दुर्लक्ष केल्यामुळे भारताला अनेक वेळा पराभव भोगावे लागले.
    समरांगण सूत्रधारासारख्या ग्रंथांमधून प्राचीन भारतीय सैन्याची रचना, युद्धकलेची तत्त्वे आणि तंत्रज्ञान समजून घेता येते. भारताच्या संरक्षण यंत्रणेची रचना सरंजामशाहीवर आधारित होती, ज्यामुळे समाजातील इतर घटक संरक्षण कार्यात कमी सहभागी झाले.
    भारतीय सेनादलांच्या विद्यमान घडामोडी या पुस्तकात विद्यार्थ्यांना सेनादलांच्या नावीन्यपूर्ण बाबी, भारतीय लष्करी दलांशी संबंधित वस्तुस्थिती आणि तथ्ये, आधुनिक युद्धाच्या आवश्यकतेनुसार होणारे बदलही याविषयी माहिती तसेच राष्ट्रप्रेमाचे कर्तव्य लक्षात घेऊन, राष्ट्ररक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि तरुणांना सेनादलांमध्ये सामील होण्यास प्रवृत्त करणे आवश्यक आहे.

    170.00
    Add to cart
  • भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (1885 ते 1947)

    1885 मध्ये हिंदुस्थानात राष्ट्रीय सभेची स्थापना झाली आणि सनदशीर मार्गाने पुण्याऐवजी मुंबई येथे राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरुन राष्ट्रीय चळवळीला प्रारंभ झाला. 1905 पर्यंत राष्ट्रीय सभेने हा मार्ग स्वीकारला. त्याला मवाळांची चळवळ म्हणतात. परंतु 1905 नंतर लाल, बाल आणि पाल यांना हा मार्ग योग्य वाटला नाही. त्यांतून जहालांची चळवळ सुरु झाली. विसाव्या शतकाच्या प्रारंभी सशस्त्र क्रांतीकारकांचा उदय झाला. श्यामजी वर्मा, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर आणि गदर क्रांतीकारकांनी परदेशात राहून भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. लोकमान्य टिळकांच्या मृत्युनंतर गांधी युग अवतरले. याकाळात असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग चळवळ, वैयक्तिक सत्याग्रह आणि चले जाव आंदोलनासारख्या चळवळी निर्माण झाल्या. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची उभारणी करुन ब्रिटीश सत्तेला मोठे आव्हान दिले. यातून शेवटी ब्रिटीशांना फाळणी करुन हिंदुस्थान सोडावा लागला. हा सारा रोमहर्षक इतिहास या ग्रंथात ग्रथीत केला आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा हा इतिहास सर्वांना नक्कीच आवडेल.

    Bhartiya Swantraya Chalvalicha Itihas (1885 Te 1947)

    225.00
    Add to cart
  • भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (इ.स. 1857 ते 1950)

    स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतांना आपलाही काहीतरी खारीचा वाटा असावा म्हणून प्रस्तुत ग्रंथलेखनाचे प्रयोजन केले. आधुनिक भारताच्या इतिहासातील विविध घडामोडींची माहिती या ग्रंथातून होणार आहे. या ग्रंथाची मांडणी अगदी सोप्या, सुटसुटीत भाषेत, मुद्देसूद केलेली आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्ये म्हणजे विद्यार्थी, वाचकांना समजण्यास सोपे जावे म्हणून प्रत्येक ठिकाणी चौकटींची रचना करून त्यात मुद्दे दिले आहेत. चित्रांचा वापर केलेला आहे. प्रस्तुत ग्रंथात भारतात ब्रिटिशांच्या आगमनापासून तर त्यांच्या सत्तास्थापनेपर्यंतचा, 1857 चा उठाव, कारणे आणि परिणाम, भारतातील सामाजिक, धार्मिक, सुधारकांचे कार्य, काँग्रेसची स्थापना, मवाळ-युग, टिळक युग, गांधी युग, भारतातील क्रांतीकारक, मुस्लिम लिग व भारताची फाळणी आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांनी पाठविलेल्या विविध समित्या, यांची माहिती देण्यात आली आहे. शिवाय भारताची फाळणी आणि स्वातंत्र्याचा कायदा, भारतीय राज्यघटनेची निर्मिती व वैशिष्ट्यांचीही माहिती आलेली आहे. एकूणच भारतात ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेपासून तर 15 ऑगस्ट 1947 पर्यंत स्वातंत्र्य मिळून 1950 मध्ये घटना लागू होऊन भारत लोकशाहीप्रधान देश बनण्यापर्यंतची ऐतिहासिक माहिती म्हणजे हा ग्रंथ!

    Bharatiy Swatantrya Chalwalicha Itihas (1857-1950)

    295.00
    Add to cart
  • भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (इ.स.1857 ते इ.स.1950)

    भारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. अशाप्रसंगी भारताला स्वातंत्र्य कसे मिळाले याचा वेध घेणे आवश्यक ठरते. इ.स.1757 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने प्लासीचे युद्ध करून बंगालमध्ये प्रथमच कंपनीची सत्ता स्थापन केली. बक्सारच्या युद्धाने त्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना होवून तिने ब्रिटीशाविरूद्ध सनदशीर मार्गाने चळवळ सुरू केली. 1905 पर्यंत हे ठीक होते. पण त्यानंतर जहाल मतवाद भारतात निर्माण झाला. चतुःसूत्रीचा स्वीकार करावा असा गजर जहालवाद्यांनी सुरू केला. त्यातून सुरत येथे काँग्रेस फुटली. 1916 मध्ये लखनौच्या अधिवेशनात मवाळ आणि जहाल एकत्र आले. 1920 मध्ये म.गांधीजी युगाला प्रारंभ झाला. अहिंसा, सत्याग्रहाचे पर्व सुरू झाले. असहकार, कायदेभंगाचे युग अवतरले. अनेकांना फासावर लटकावले. कारण त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला. म.गांधीजींना तो मार्ग पसंत नव्हता. 1942 मध्ये दुसरे महायुद्ध चालु असतांना म.गांधीजी यांनी चलेजाव आंदोलनाची घोषणा केली तर तिकडे जपानचे सहाय्य घेवून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना करून जय हिंदची घोषणा केली. अशा अनेक घटना हिंदुस्थानात घडल्या. त्यातून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्य लढ्याची कहानी म्हणजे हा ग्रंथ होय.

    Bharatiya Swatantrya Chalwalicha Itihas (1857-1950)

    365.00
    Add to cart
  • भाषा : लेखनकौशल्य आणि शासनव्यवहार

    बदलत्या काळानुसार जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्येही स्थित्यंतर होत जाते. काही क्षेत्रात हे स्थित्यंतर जलद गतीने होते तर काही क्षेत्रात गरजेनुसार पण धीम्या गतीने होत असते. शिक्षणक्षेत्रातही होत जाणारा बदल यास अपवाद नाही. पारंपरिक शिक्षणाच्या चौकटीबाहेर आता कौशल्याधारित शिक्षणाचा आग्रह धरला जात आहे. तो कालसुसंगत आणि अनिवार्य असाच आहे. भाषा आणि साहित्य या विद्याशाखांत आता आंतरविद्याशाखीय अभ्यासाची गरज वाढू लागली आहे. तिची उपयुक्तताही सर्वमान्य झाली आहे. भाषाव्यवहारात तर लेखनकौशल्याला पर्याय नाही. हे लेखनकौशल्य कोणकोणत्या प्रकारचे असते आणि त्याची बलस्थाने काय असू शकतात याचा परिचय ‌‘भाषाः लेखनकौशल्य आणि शासनव्यवहार’ या ग्रंथात वाचायला मिळतो. विशेषतः मुद्रित माध्यमासाठी आणि त्यातही जनसामान्यांशी घट्ट नाळ जोडल्या गेलेल्या वृत्तपत्रासारख्या माध्यमात कोणत्या प्रकारची लेखनकौशल्ये आवश्यक आहेत, त्याचे विवेचन या पुस्तकात आढळते. वृत्तपत्रीय लेख, अग्रलेख, स्तंभ वा सदरलेखन, परीक्षण या लेखनप्रकाराचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये नव्या पिढीतील अभ्यासक डॉ. संदीप कडू माळी यांनी सहजगत्या उलगडून दाखवली आहेत.
    भाषिक कौशल्यविकास आणि शासनव्यवहार, मराठी राजभाषा अधिनियम यासंबंधी मौलिक माहिती या ग्रंथात वाचायला मिळते. मराठीविषयक कार्य करणाऱ्या शासकीय संस्थांचा परिचय प्रत्येक मराठी भाषकाला असायलाच हवा. त्यासंबंधीचा तपशील माहितीपूर्ण असाच आहे.
    डॉ. संदीप कडू माळी हे बहुश्रूत आणि व्यासंगी प्राध्यापक आहेत. अध्यापनाच्या क्षेत्रात जबाबदारीने वावरताना कर्तव्यबुद्धीने परिश्रमपूर्वक कार्यरत राहायला हवे, असा त्यांचा प्रयत्न असतो. त्या प्रयत्नाचा भाग म्हणूनच या ग्रंथाकडे पाहायला हवे.

    – डॉ. मनोहर जाधव
    प्रमुख, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन
    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे-411007

    Bhasha – Lekhankaushalya Aani Shasanvyavhar

    135.00
    Add to cart
  • भाषा आणि कौशल्य विकास

    21 व्या शतकात प्रगत कौशल्ये विकसित होत आहेत. तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे आपल्या सर्वांच्या व्यावहारिक जीवनातही दिवसेंदिवस अमूलाग्र बदल होत आहेत. संपूर्ण जीवनच जणू आधुनिक तंत्रज्ञानाने व्यापलेले आहे. असे असताना आपला मराठी विषय आणि भाषा त्यास अपवाद कशी असेल? या जाणिवेने डॉ. संदीप कडू माळी यांच्या अथक प्रयत्नांतून प्रस्तुत ग्रंथ साकारला गेला. वाङ्मयीन मराठीसह काळाची गरज ओळखून महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठे आणि शैक्षणिक परिघामध्ये सध्या व्यावहारिक आणि उपयोजित मराठीचे प्रस्थ वाढलेले आहे, याचे आपण सर्वांनीच स्वागत केले पाहिजे. भाषेच्या संदर्भातील प्रगत कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्यासाठी प्रस्तुत ग्रंथ प्रेरणादायी ठरेल. याशिवाय प्रशासकीय आणि विविध भाषिक कौशल्ये समजून घेण्यासाठी व उपयोजनासाठी विद्यार्थांना आकलन सुलभ होईल अशा पध्दतीने केलेले हे लेखन भाषा आणि कौशल्ये विकासाच्या संदर्भात दिशादर्शक ठरेल, अशी खात्री आहे.

    – प्रा. डॉ. संदीप विठ्ठलराव सांगळे

    Bhasha Ani Kaushalya Vikas

    125.00
    Add to cart
  • भाषिक कौशल्य विकास

    भाषा हे प्रामुख्याने संपर्क साधन असले तरी त्याचा शिक्षण, ज्ञानवृद्धी आणि राष्ट्रविकासात महत्त्वाचा वाटा आहे. आजच्या ज्ञानाधिष्ठित समाजाच्या निर्मितीत भाषेचे महत्व अनन्यसाधारण आहे. समृद्ध भाषेमुळे संस्कृती विकासाला चालना मिळते. तंत्रज्ञान विकासाला जशी भाषेची गरज असते. तशीच भाषेला तंत्रज्ञानाची गरज असते. कायदाच्या शोधामुळे भाषेचे झालेले संवर्धन आणि विकास हे त्याचे उदाहरण आहे. अनेक शतके कागद आणि लेखणी ही भाषा विकासाची प्रमुख साधने राहिली. गेल्या शतकाच्या अखेरीस इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या विकासामुळे त्यात बदल झाला. संगणक, इंटरनेट या बरोबरच माहिती तंत्रज्ञानाचा विकास त्यास कारणीभूत ठरला. भाषा विकासासाठी ते एक समृद्ध आणि परिणामकारक साधन ठरु पाहत आहे. त्यासाठी प्रत्येक भाषा अभ्यासकाबरोबरच भाषा विकास करणार्‍यांनी ते आत्मसात करणे आवश्यक आहे.

    डॉ. पंडित विद्यासागर
    माजी कुलगुरू
    स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड

    Bhashik Kaushalya Vikas

    125.00
    Add to cart
  • भाषिक कौशल्य विकास आणि एकांकिका

    साहित्याचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांजवळ वाचन, चिंतन, मनन, लेखन करण्याच्या क्षमता असणे गरजेचे असते. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांचा स्वतःचा दृष्टीकोन आपल्या आकलनाच्या आधारे तयार करणे, साहित्यकृतींची समीक्षा, चिकित्सा करणे किंवा तिचा वेगवेगळ्या पद्धतीने विचार करणे अशा गोष्टी विद्यार्थ्यांकडून अपेक्षित असतात. आजच्या काळात हे चित्र आभावानेच दिसते. वरील अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांनी कोणती भाषिक कौशल्ये आत्मसात केली पाहिजे या विषयीचे विवेचन डॉ. हरेश शेळके यांनी या पुस्तकात केले आहे. श्रवण, संभाषण, वाचन, लेखन इ-संवादकौशल्य यासंबंधीची आवश्यकता, फायदे यासंबंधी उहापोह केला आहे. विद्यार्थ्यांना निश्चितच या विवेचनाचा फायदा होईल.
    याच पुस्तकातील दुसरा उपविभाग हा नेमलेल्या एकांकिकांची मीमांसा करणारा आहे. एकांकिकेचे स्वरूप घटक संहितामूल्य आणि प्रयोगमूल्य यांसह अनेक अनुषंगिक बाबींची चर्चा लेखकाने केलेली आहे. ही चर्चा एकांकिका हा वाङ्मयप्रकार समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
    सदर पुस्तक प्रथम वर्ष बी. ए. च्या अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असले तरी भाषेच्या उपयोजित विविध घटकांचा अभ्यास करणार्‍या सर्वच विद्यार्थ्यांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल यात शंका नाही.

    डॉ. मनोहर जाधव
    वरिष्ठ प्राध्यापक, मराठी विभाग आणि अधिसभा सदस्य,
    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे 411007

    Bhashik Kaushalya Vikas Aani Ekankika

    195.00
    Add to cart
  • भाषिक संप्रेषण : एक कला

    Bhashik Sanpreshan : Eka Kala

    150.00
    Add to cart