• प्रात्यक्षिक भूगोल

    पृथ्वीची निर्मीती, वातावरणाची निर्मीती, सागराची निर्मीती तसेच निसर्गातील घडणार्‍या अनेक घटनांबद्दल मानवाला जिज्ञासा व कुतूहल वाटणे स्वाभाविक आहे. प्राचीन काळापासून ग्रीक व रोमन भूगोलकारांनी भौगोलिक ज्ञानाचा प्रसार केला. मध्ययुगीन काळात भूगोलाची पिछेहाट झाल्याने त्यास ‘अंधारयुग’ असे संबोधले जाते. 15 व्या शतकाच्या अखेरीस धाडसी प्रवाशी आणि योद्धा मोहिमेवर निघाल्याने नविन भूप्रदेशाची माहिती मिळू लागली. कालांतराने 18 व्या व 19 व्या शतकात जर्मन शास्त्रज्ञ अलेक्झांडर, हंबोल्ट, कार्ल रिटर, रॅटझेल त्याचप्रमाणे फान्स, अमेरिकन शास्त्रज्ञ व्हि दाल द ब्लाश, कुमारी एलन सेंपल इ. शास्त्रज्ञांनी भूगोलाच्या अनेक शाखा विकसित केल्याने उत्तरोत्तर त्यात वाढ होत गेली. आज भूगोल ही विज्ञानाची एक प्रगत व स्वतंत्र अस्तित्व असणारी प्रमुख शाखा आहे.
    प्रस्तुत पुस्तकात विषयाचे आकलन होण्यासाठी जास्तीत जास्त आकृत्या व नकाशांनुसार स्पष्टीकरण करून माहिती देण्याचा प्रयत्न केल्याने प्राध्यापकांना, विद्यार्थ्यांना व वाचकांना निश्चित उपयुक्त ठरेल, यात शंका नाही.

    Pratyakshik Bhugol

    175.00
    Add to cart
  • प्रात्यक्षिक भूगोल – II

    आज भूगोल ही विज्ञानाची एक प्रगत व स्वंतत्र अस्तीत्व असणारी प्रमुख शाखा आहे. पृथ्वीची निर्मीती, वातावरणाची निर्मीती, सागराची निर्मीती तसेच निसर्गातील घडणाऱ्या अनेक घटनाबद्दल मानवाला जिज्ञासा व कुतूहल वाटणे स्वाभाविक आहे. प्राचीन काळापासून ग्रीक व रोमन भूगोलकारांनी भौगोलीक ज्ञानाचा प्रसार केला. मध्ययुगाच्या काळात रोमन संस्कृती लयाला गेली. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात कांट या जर्मन तत्ववेत्याच्या भौगोलिक विचारांचा विशेष प्रभाव दिसून आला. त्याचप्रमाणे बफन व बूचर यांचेही भौगोलिक विचारांचे योगदान महत्वाचे ठरले. कालांतराने अठराव्या-एकोणाविसाव्या शतकात भूगोलकारांनी भूगोलाच्या विकासात वैज्ञानिक पद्धतीने सहभाग घेतला. सहाजिकच भूगोलाच्या अभ्यासात वाढ होत जाऊन भूगोलाच्या विस्तारात वाढ होत गेली. त्याचप्रमाणे पृथ्वीगोलावरील असलेली वेगवेगळी स्थळे, भूरूपे, वस्त्या, त्याच्यातील अंतरे, त्याचा आकार, विस्तार, त्या स्थळाची लांबी व रूंदी, प्राकृतिक व सांस्कृतिक सांकेतिक चिन्हे, इत्यादीची मोजमाप करत असतांना त्यातूनच प्रात्यक्षिक भूगोलाचा उगम होवून विस्तार होत गेला. प्रस्तुत पुस्तकात प्रत्येक घटकांचा ऊहापोह साध्या व सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केल्याने विषय समजण्यास मदत होईल. आवश्यक तेथे आकृत्या व माहिती देण्याचा प्रयत्न केला असल्याने प्रात्यक्षिक भूगोलाचे ज्ञान व आकलन सहजतेने होईल.

    Pratyakshik Bhugol

    295.00
    Add to cart
  • प्रादेशिक नियोजन आणि विकास

    प्रादेशिक संकल्पनाच्या विकासातील महत्वाचा टप्पा म्हणजे 20व्या शतकाचा प्रारंभ होय. या शतकात प्रादेशिक भूगोलांच्या अध्ययनावर मोठ्या प्रमाणावर भर दिलेला होता. 20 शतकाच्या उत्तरार्धात फ्रान्स मधील प्रसिद्ध तज्ज्ञ विदाल-द-ला-ब्लाश, यांनी प्रादेशिक भूगोलाच्या अध्ययनावर लक्ष केंद्रीत करून या शाखेचा विकास घडवून आणला.

    प्रादेशिक नियोजनाच्या संदर्भात नियोजन प्रक्रियांचा विचार करताना त्यामध्ये सर्व समावेशक घटकांची एकत्रित मांडणी आवश्यक असते. नियोजनाचा उपयोग वेगवेगळ्या विषयामध्ये अनेक वर्षापासून होत असला तरी प्रादेशिक नियोजन ही संकल्पना मात्र 20व्या शतकात प्रामुख्यान विकसित झालेली संकल्पना होय. सर्व साधारणपणे गेल्या 50 वर्षात जगातील विविध देशांनी सामाजिक व आर्थिक पातळ्यांवर एकत्र येऊन नियोजनाच्या माध्यमातून विकासाच्या संदर्भात विविध योजना तयार करण्यास सुरुवात केलेली दिसते. यातूनच प्रादेशिक नियोजनाची आवश्यकता दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. जागतिक स्तरावर वेगवेगळ्या प्रादेशिक योजनाचा उपयोग विकसित व विकसनशील देशात मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.

    प्रादेशिक नियोजनाची संकल्पना, वैशिष्ट्ये, महत्व, प्रादेशिक नियोजनाचे प्रकार, प्रादेशिक विकास, प्रादेशिक विकासाची आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय निर्देशके, प्रादेशिक विकासाचे सिद्धांत व प्रतिमाने, या सोबतच भारतातील प्रादेशिक नियोजन व विकासाशी संबंधित घटकांचा उहापोह या पुस्तकात करण्यात आलेला आहे. निती आयोगाची सखोल माहिती देखील विविध संदर्भांच्या सहाय्याने नमूद करण्यात आली आहे.

    Pradeshik Niyojan aani Vikas

    150.00
    Add to cart
  • प्रादेशिक नियोजन आणि विकास

    प्रादेशिक नियोजनाकरीता भूमी उपयोग, कृषी क्षेत्राचे संरक्षण, ग्रामीण व शहरी भागांचा विकास, औद्योगिक वसाहती, दळणवळणाचे मध्यवर्ती स्थान, पायाभूत सुविधा, लष्करी तळ आणि रिकाम्या जमिनी किंवा क्षेत्रांची आवश्यकता असते. यांच्या आधारे प्रादेशिक नियोजन साधले जाते. प्रादेशिक नियोजन हे एखाद्या क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी पायाभूत सुविधा व पट्ट्यांची कार्यक्षमप्रणाली राबविणारे शास्त्र आहे. नियोजनांतर्गत एखादा ‘प्रदेश’ प्रशासकिय किंवा अंशतः कार्यशील असू शकतो आणि त्यात वस्ती आणि क्षेत्रीय नेटवर्कची वैशिष्ट्ये समाविष्ट असतात. एखाद्या प्रदेशाचे नियोजन हे त्या प्रदेशातील प्रादेशिक गरजा व उपलब्ध संसाधने यांना विचारात घेऊन केले जाते.

    भारतातील प्रादेशिक विकासात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, हरियाणा, पंजाब, प.बंगाल, केरळ व तामिळनाडू ही राज्ये आघाडीवर आहेत तर मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार, झारखंड, आसाम, उत्तरप्रदेश व ओरीसा ही राज्ये मागासलेली आहेत. या सर्व राज्यांना समान पातळीवर आणण्याकरीता प्रादेशिक नियोजनाच्या माध्यमातून संतुलित विकास साधण्याचा प्रयत्न भारत सरकारकडून केला जात आहे. प्रादेशिक नियोजन ही अलीकडच्या काळात प्रगत झालेली एक लोकप्रिय व आधुनिक संकल्पना आहे. ज्यात मर्यादित साधनांचा जास्तीत जास्त व पर्यायी उपयोग करून अधिकाधिक गरजांची पूर्तता करणे व जास्तीत जास्त लोकांना मुलभूत सुविधा पुरवून त्यांचे जीवन सुखमय करयाच्या हेतूने संतुलित विकास साधून संबंधित प्रदेशातील लोकांच्या समस्या व प्रश्न सोडविण्याचा स्वीकृत मार्ग म्हणजे ‘प्रादेशिक नियोजन’ होय.

    ‘प्रादेशिक नियोजन व विकास’ या विषयावरील शक्यतो प्रत्येक घटकावर या पुस्तकात चर्चा करण्यात आलेली आहे. पुस्तकात बर्‍याच ठिकाणी संदर्भ व उदाहरणे देऊन संकल्पना अधिक सोप्या करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. या पुस्तकातून आपल्याला हे कळेलच. याशिवाय नियोजनाचे प्रकार, उद्देश, दृष्टीकोन, विकास योजना, ग्रामीण विकास, आदिवासी विकास व विकासाचे प्रतिमान व सिद्धांत या बाबतीतले लिखाण या पुस्तकातून आम्ही केले असल्याने प्रादेशिक नियोजनाची व्याप्ती आपल्या लक्षात येईल.

    Pradeshik Niyojan aani Vikas

    150.00
    Add to cart
  • प्रारंभिक भारत (प्रागैतिहासिक काळ ते राष्ट्रकुट काळ)

    इतिहास हा विषय सर्वसामान्यांच्या दृष्टीने मनोरंजक, गोष्टीरूप व आनंददायी आहे. म्हणूनच तो लहानांपासून थोरांना आवडणारा विषय आहे. प्राचीन भारताच्या इतिहास अध्ययनातून आपल्याला भारतीय संस्कृतीची जडणघडण कशी झाली, याची माहिती प्राप्त होते. प्राचीन काळी या भूमीस ‘भारतवर्ष’ असे म्हटले गेले. प्राचीन भारताच्या इतिहासाची सुरुवात अश्मयुगापासून झाली. ताम्रपाषाण युगाच्या अखेरच्या काळात हडप्पा संस्कृतीचा उदय झाला. प्राचीन भारताची सांस्कृतिक दृष्टीने जडणघडण होण्यास प्रामुख्याने आर्यांच्या काळात सुरुवात झाली. राजकीय दृष्टीकोनातून टोळ्यांचा काळ संपून विभाजित लोकसमूह एकत्र येण्याला या काळात सुरुवात झाली. याच कालखंडात प्राचीन भारताच्या सांस्कृतिक जीवनास चालना प्राप्त झाली. भगवान गौतम बुद्ध व वर्धमान महावीर यांनी अनुक्रमे बौद्ध व जैन धर्माची स्थापना केली. याच काळात बलाढ्य अशा मगध साम्राज्याचा उदय, अलेक्झांडरची स्वारी या महत्वपूर्ण घटना घडल्या. मौर्य युगापासून प्राचीन भारताच्या राजकीय इतिहासास सुरुवात झाली. मौर्य, कुशाण, सातवाहन, गुप्त, वाकाटक, हर्षवर्धन तर दक्षिणेत चालुक्य, पल्लव, राष्ट्रकुट, चोल इत्यादी कर्तबगार अशी राजघराणी प्राचीन भारतात होऊन गेली. भारतात वेळोवेळी आलेल्या ग्रीक, शक, पहलव, हूण इ. परकीय सत्तांनी भारतीय समाजव्यवस्था, कला, वास्तुशास्त्र, साहित्य यांच्या विकासात मोठी भर घातली. वैदिक, बौध्द, जैन, द्रविड यांच्या सांस्कृतिक देवाणघेवाणीतून संयुक्त स्वरुपाची भारतीय संस्कृती उदयाला आली. म्हणून भारताच्या प्रारंभिक इतिहासाचे महत्व अनन्यसाधारण आहे.

    Praranbhik Bharat (Progaitihasik Kal te Rashtrakut Kal)

    250.00
    Add to cart
  • प्रारंभिक भारत (प्रागैतिहासिक काळ ते राष्ट्रकुट काळ)

    प्राचीन काळी भारत सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात असे. त्याचा व्यापार दूरदूरच्या देशांबरोबर चालत असे. त्याच्या संस्कृतीची किर्ती संपूर्ण जगात पसरली होती. कलाकौशल्य, साहित्य, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि व्यापार यांच्या बाबतीत हा देश जगाला मार्गदर्शक होता. असे असतानाही आपणास मोठ्या दु:खाने सांगावे लागते, की आज या देशाचा प्राचीन गौरवशाली इतिहास उपलब्ध नाही. जो उपलब्ध आहे तो फारच अल्प आहे, म्हणून प्राचीन भारताचा अभ्यास करताना इतिहासकाराला मोठा त्रास पडतो. आज भारताचा जो इतिहास उपलब्ध आहे त्याच्या कैकपटीने प्राचीन भारताचा इतिहास स्मृतीच्या गर्तेत नष्ट झाला. त्यामुळे बरेच इतिहासकार भारताचा इतिहास किंवा भारतीय संस्कृती ही आधुनिक संस्कृती आहे, असा समज करून घेतात. भारतीयांनी तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी अनेक विभागांत कार्य केले. परंतु इतिहासाबाबत संपूर्ण दुर्लक्ष केले. त्यामुळे फारच अशी थोडी प्राचीन इतिहासविषयक साधने उपलब्ध आहेत, की त्यांच्यावर विसंबूनच आपणास प्राचीन भारताचा इतिहास जाणून घ्यावा लागतो.

    प्रस्तुत पुस्तकात प्राचीन भारतीय इतिहासाची साधने, हडप्पा किंवा सिंधू संस्कृती, पूर्व वैदिक काळ, धर्मक्रांतीचे युग, मौर्य साम्राज्य व मौर्योत्तर काळ, गुप्त साम्राज्य, वर्धन घराणे, दक्षिण भारत या घटकांची अचूक माहिती देण्यात आली आहे.

    Praranbhik Bharat Progaitihasik Kal te Rashtrakut Kal

    375.00
    Add to cart
  • बँक व्यवसायाची मुलतत्त्वे (भाग 1)

    Bank Vyavasayachi Multattve (Bhag 1)

    115.00
    Add to cart
  • बँक व्यवसायाची मूलतत्त्वे (भाग 2)

    Bank Vyavsayachi Multatve (Bhag 2)

    120.00
    Add to cart
  • बँकिंग आणि वित्त

    Banking ani Vitta

    395.00
    Add to cart
  • बँकिंगची तत्त्वे आणि व्यवहार

    बँकिंगची तत्त्वे आणि व्यवहार या ग्रंथात बँकिंगचा अर्थ, व्याख्या, उद्गम, कार्ये व सेवा, आर्थिक विकासातील भूमिका, भारतीय बँकींग प्रणालीची रचना, बँकांचे रचनात्मक, कार्यात्मक, मालकीनुसार, आधुनिक बँका, पेमेंट व सेटलमेंट सिस्टिम अंतर्गत इलेक्ट्रानिक बँकिंग, नेट बँकिंग व बँकिंगच्या नवीन उत्पादनाचा समावेश केला आहे. तसेच पतनिर्मिती प्रक्रिया, सुदृढ बँकिंगची रोखता, सुरक्षितता आणि लाभप्रदता तत्त्वे, रोखता आणि लाभप्रदता तत्वातील आंतरविरोध, अनुत्पादक मालमत्ता, मध्यवर्ती बँक, तिचा अर्थ, कार्ये अर्थव्यवस्थेतील भूमिका आणि मध्यवर्ती बँक व व्यापारी बँक यांच्यातील फरक या मुद्द्यांचे विस्तृत विवेचन केलेले आहे.
    प्रस्तुत पुस्तकाची साध्या, सोप्या भाषेत मांडणी केली असून सदर पुस्तक विद्यार्थी मित्र, प्राध्यापक बंधू व भगिनी आणि वाचक, अभ्यासक निश्चितच उपयुक्त ठरेल.

    225.00
    Add to cart
  • बँकिंगची मूलभूत तत्त्वे

    भारत सरकारच्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून लागू केले आहे. या धोरणानुसार ‌‘बँकिंगची मूलभूत तत्त्वे’ या क्रमिक पुस्तकाचे प्रथम प्रकाशन करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. बँक व्यवसायासाठीचे प्राथमिक व मूलभूत ज्ञान यावर विशेष प्रकाशन टाकणारे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचा वापर करून प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग बँकेच्या मूलभूत संकल्पनांचा अभ्यास विस्तृतपणे करू शकतील याची आम्हा सर्वांना खात्री आहे.
    सदर पुस्तकामध्ये एकूण 4 प्रकरणे असून प्रथम प्रकरणामध्ये बँकेची पार्श्वभूमी, स्थापना, प्रकार याबद्दल माहिती दिलेली आहे. प्रकरण क्र. 2 व 3 मध्ये बँकेत खाते उघडण्याची प्रक्रिया, खातेदारांचे प्रकार, कर्जवाटप, ताळेबंद, ग्राहकाची क्रेडिटीबीलीटी इ. ची माहिती आहे. चलनक्षम दस्ताऐवजांच्या प्रकाराचा अभ्यास प्रकरण क्र. 4 मध्ये विस्तृतपणे दिलेला आहे.
    पुस्तक लेखन करत असताना लेखकांनी अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकांचा सखोल अभ्यास करून सर्व संकल्पना साध्या, सोप्या व विद्यार्थ्यांना सहज आकलन होतील अशा भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासाठी तज्ञांचे संदर्भग्रंथ, हस्त प्रकाशने, इतर संबंधीत पुस्तके इ. चा आधार घेण्यात आलेला आहे.

    195.00
    Add to cart
  • बँकींगची तत्त्वे आणि व्यवहार

    बँकींग हा वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्या शाखेचा आत्मा आहे. व्यावसायिक / उद्योजक कितीही हुशार, कार्यक्षम आणि त्याच्या व्यवसायासाठी पुरेसे भांडवल नसेल तर तो यशस्वी ठरु शकत नाही. बँकींग हा व्यवसायाचा असा एक भाग आहे जो जनतेकडून ठेवी स्विकारुन उद्योग-व्यवसायाला भांडवल उपलब्ध करुन देण्याचे मध्यस्थ म्हणून कार्य करतो. ज्या देशातील बँकींग आणि वित्तीय प्रणाली विकसित आहे त्या देशाचा आर्थिक विकास वेगाने होतो. बँकींग प्रणाली ही अर्थव्यवस्था रुपी शरीराला रक्त पुरवठा करण्याचे कार्य करते.

    Bankingchi Tatve ani Vyavhar

    450.00
    Add to cart
  • बजेट मसुदा आणि बचत धोरण

    संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील नवीन अभ्यासक्रमानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) बी.ए. प्रथम वर्षाच्या वैकल्पिक गृहअर्थशास्त्र विषयाच्या बजेट मसुदा आणि बचत धोरण हे पुस्तक प्रथम सत्राकरिता असून प्रस्तुत पुस्तक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या अनुषंगाने या विषयांमध्ये संसाधनाच्या वर्गीकरणाची गरज, अमानवीय संसाधनांचा परिचय, उत्पन्नाच्या स्त्रोताचे मार्ग, अंदाजपत्रक, अंदाजपत्रक संकल्पना, अंदाजपत्रकावर परिणाम करणारे घटक, अंदाजपत्रकाचे घटक, अंदाजपत्रकाचे प्रकार, बचत, बचतीचे महत्त्व, बचत आणि गुंतवणूक, उत्पन्नाच्या आधारावर अंदाजपत्रकाची तयारी या बऱ्याच विषयाचे अध्ययन समाविष्ट असून हा विषय मानवी जीवनाला परिपूर्ण करण्यासाठी फार उपयुक्त आहे.
    सदर पुस्तकात बजेट मसुदा आणि बचत धोरण याची सर्वांगाने चर्चा करण्यात आली आहे. यात बचत, गुंतवणुक, बचतीचे प्रकार, स्व सहाय्यता गट, स्वउद्योग, स्वयम रोजगार इत्यादी विषयाची मांडणी सोप्या भाषेत मुद्देसूदरित्या करण्यात आली आहे.

    160.00
    Add to cart
  • बाजार संरचना आणि घटक किंमतीचे अर्थशास्त्र

    ‌‘बाजार संरचना आणि घटक किंमतीचे अर्थशास्त्र’ या ग्रंथात बाजाराचे स्पर्धेनुसार पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, अल्पविक्रेताधिकार आणि द्विविक्रेताधिकार असे प्रकार पडतात. बाजारात पूर्ण स्पर्धा किंवा अपूर्ण स्पर्धा असताना उद्योग संस्था आणि उद्योगाचे वर्तन वेगवेगळे असते. कोणत्याही बाजारात उद्योग संस्था किमान खर्च घटक संयोगाच्या साहाय्याने जास्तीत जास्त उत्पादन करुन नफ्याचे महत्तमीकरण करण्याचा प्रयत्न करते. प्रत्येक बाजारात उद्योग संस्था उत्पादन आणि किंमत निश्चिती करते. उत्पादनाबरोबरच भूमी, श्रम, भांडवल, संयोजन या घटकांना त्यांच्या वापराबद्दल खंड, वेतन, व्याज आणि नफा रुपात मोबदला दिला जातो. म्हणजेच वस्तू प्रमाणेच घटकांचीही किंमत निश्चित केली जाते.
    प्रस्तुत पुस्तकात या सर्व प्रमुख व उपमुद्द्यांची पुस्तकाची साध्या, सोप्या भाषेत मांडणी केली असून सदर पुस्तक विद्यार्थी मित्र, प्राध्यापक बंधू व भगिनी आणि वाचक, अभ्यासक निश्चितच उपयुक्त ठरेल.

    225.00
    Add to cart
  • भांडवल बाजार आणि वित्तीय सेवा

    Bhandwal Bajar ani Vittiy Seva

    150.00
    Add to cart
  • भारताचा इतिहास (इ.स. 1206 ते 1756)

    इ.स.1206 मध्ये कुतुबुद्दीन ऐबक यांनी भारतात सर्वप्रथम मुस्लिम सत्तेची स्थापना केली. त्यांनी स्थापना केलेले राज्य सुलतानशाही या नावाने ओळखले जाते. जहिरूद्दीन बाबर यांनी दिल्लीच्या सुलतानशाहीचे राज्य इ.स.1526 मध्ये जिंकून घेतले व त्याठिकाणी मुघल वंशाची स्थापना केली. दिल्लीचे सुलतान आणि मुघल सम्राटांनी संपूर्ण भारतावर राज्य केले. त्यांच्या काळात जी प्रादेशिक राज्ये होती ती सुलतानशाही व मुघलांची मांडलीक राज्ये होती. मुघल साम्राज्य इ.स.1857 पर्यंत अस्तित्वात असले तरी ते इ.स.1707 पर्यंतच प्रबळ व शक्तीशाली होते. यानंतर मात्र या साम्राज्याचा र्‍हास झाला. मध्ययुगात जी अनेक राज्ये स्वतंत्रपणे राज्य करीत होती. त्यापैकीच एक दक्षिण भारतातील मराठा राज्य होते. हे राज्यही शक्तिशाली राज्य होते. मुघल बादशाहाने सुद्धा स्वत:च्या संरक्षणाची जबाबदारी मराठा राज्यावर टाकली होती. तसा त्यांच्यात इ.स.1752 मध्ये एक करारही झाला होता. मुघल बादशाहाच्या संरक्षणासाठीच मराठ्यांनी अहमदशहा अब्दाली विरूद्ध युद्ध केले व ते त्यांच्याकडून पराभुत झाले. या पराभवामुळे व युद्धातील जीवित हानीमुळे मराठा राज्याचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले. एवढेच नव्हे तर येथून पुढे मराठा राज्यही र्‍हासाकडे वाटचाल करू लागले. इ.स.1818 मध्ये ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने मराठा राज्य जिंकून घेतले. मध्ययुगात दिल्लीचे मुघल व महाराष्ट्रातील मराठा राज्य महत्वाचे होते. या दोन्ही राज्याच्या कालखंडातील भारतातील राजकीय, सामाजिक, धार्मिक व आर्थिक इतिहासाची सविस्तर माहिती या ग्रंथात दिली आहे.

    Bharatacha Itihas (1206-1756)

    495.00
    Add to cart
  • भारताचा इतिहास (इ.स. 1750 ते 1857)

    प्राचीन काळापासून भारताचे पाश्चिमात्य देशांशी व्यापारी संबंध होते. 18 व्या शतकाच्या मध्यकाळात भारतीय समाज एकसंघ नव्हता तो अनेक गटात विखुरलेला होता. निरनिराळ्या जातींच्या गटात रोटी-बेटी व्यवहार बंद होते. तरी देखील आर्थिक क्षेत्रात भारत संपूर्ण जगात संपन्न राष्ट्र गणले जात होते. भारतातील राजकीय स्थिती अनुकूल असल्याने इ.स. 1526 मध्ये बाबरने सुलतान इब्राहीम खान लोदीचा पराभव करून भारतात मुघल साम्राज्याची स्थापना केली. मुगलांच्या सततच्या आक्रमणाने भारताची स्थिती अत्यंत दयनीय झाली. ब्रिटिशांनी भारतावर कब्जा केल्यानंतर 1757 ते 1857 या काळात त्यांनी अनेक बदल केले. मात्र प्रशासकीय व कायदेशीर सुधारणा राबवत असतांना आपल्या स्वार्थाकडे त्यांनी दुर्लक्ष केले नाही. ब्रिटीशांच्या हिंदुस्थानातील आगमनानंतर पन्नास वर्षात ग्रामीण अर्थव्यवस्थेचे समीकरण बिघडून हजारो लाखो कामगार, शेतकरी व कष्टकरी वर्गाची अक्षरक्ष: वाताहत झाली. याची परिणती 1857 च्या स्वातंत्र्यसंग्रामात झाली, पण त्यात अपयश आले.
    प्रस्तुत पुस्तकात ईस्ट इंडिया कंपनीच्या बंगालमधील सत्ता स्थापनेच्या अगोदरपासून ते भारतातील इ.स. 1857 च्या उठावाच्या समाप्तीपर्यंतचा इतिहास अतिशय मुद्देसूदपणे मांडला आहे.

    Bharatacha Itihas – Ad 1750 to 1857

    – डॉ. गोकूळ पाटील

    275.00
    Add to cart
  • भारताचा इतिहास (इ.स. 1757 ते 1947)

    ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने इ.स.1757 मध्ये प्रथम बंगाल प्रांतात सत्तेचा पाया घातला. पुढे हळूहळू संपूर्ण भारत देशावर आपली सत्ता स्थापन केली. इ.स.1857 मध्ये भारतीयांनी कंपनी सरकारच्या विरोधात उठाव केला. त्यामुळे भारतात कंपनीची सत्ता संपुष्टात आली व त्याठिकाणी ब्रिटिश सम्राटाची सत्ता आली. ब्रिटिश सरकारने इ.स. 1947 पर्यंत भारतावर राज्य केले. या कालखंडात भारताची भौतिक प्रगती झाली असली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषणही झाले. परिणामी क्रांतिकारकांनी क्रांतिकारी चळवळ करून आणि जनतेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढा देऊन भारत देशाला ब्रिटनच्या राजकीय वर्चस्वातून मुक्त केले. याच काळात भारतात सामाजिक व धार्मिक चळवळीही झाल्या. या सर्व घटकांचा इतिहास या ग्रंथात दिला असून हा ग्रंथ विद्यापीठ स्तरावरील परिक्षा, नेट, सेट व तत्सम स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे.

    Bharatacha Itihas (1757-1947)

    375.00
    Add to cart
  • भारताचा इतिहास (इ.स. 701 ते 1525)

    प्राचीन काळापासून भारतावर शक, हूण, कुशाण, ग्रीक, अरबांनी आक्रमणे केली. अरबांचे आक्रमण इस्लाम धर्माचा प्रचार करण्यासाठीच असल्यामुळे तुर्की व मोगल आक्रमकांकरिता मार्गदर्शक ठरले. मुस्लिम आक्रमकांना तत्कालिन भारतीय सत्ताधिशांनी वीरतेने तोंड दिले, पण गझनी, घोरी, ऐबक, खिलजी, तुघलक यासारख्यां आक्रमकांच्या कपटनीतीला ते बळी पडले. तत्कालिन भारतीयांमध्ये एकतेचा, दूरदर्शीपणाचा प्रचंड अभाव होता. हिंदूंचा वारंवार पराभव का होतो आहे याचे योग्य विश्लेषण ते करू शकले नाही. आपापसातील भाऊबंदकी, सत्तासंघर्ष, हेवेदावे यातच भारतीयांची प्रचंड शक्ती खर्च झाली. मुस्लिम आक्रमणामुळे सामान्य जनता कंगाल झाली. भयभीत झाली. त्यांच्या धर्मप्रसार, राजकीय हेवेदावे, सततचा रक्तरंजीत संघर्षामुळे सामान्यांना कोणीही वाली राहिला नाही. स्त्रियांची अवस्था आणखीनच भयावह झाली. आक्रमकांसोबतच आलेल्या स्थापत्य, कला, उद्योगधंदे, आर्थिकता व तांत्रिकता, समाजमान्य पद्ध्ातींचा भारतीय संस्कृतीबरोबर सरमिसळ झाली.

    295.00
    Add to cart
  • भारताचा इतिहास (प्रारंभापासून ते इ.स. 700 पर्यंत)

    प्राचीन काळी भारत सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात असे. त्याचा व्यापार दूरदूरच्या देशांबरोबर चालत असे. त्याच्या संस्कृतीची किर्ती संपूर्ण जगात पसरली होती. कलाकौशल्य, साहित्य, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि व्यापार यांच्या बाबतीत हा देश जगाला मार्गदर्शक होता. इ.स.पू. सहावे शतक हे भारताच्या इतिहासात धार्मिक क्रांतीचे युग म्हणून ओळखले जाते. मौर्य काळात भारतात एकछत्री साम्राज्य निर्माण झाले. शक, हूण, कुषाण यांची आक्रमणे झालीत. पण ते भारतीय संस्कृतीतच विलीन झाले. इस्लामची आक्रमणे मात्र केवळ राजकीयच नव्हती तर ती भारतीय संस्कृतीवर आक्रमण करणारी होती. दक्षिणेत राष्ट्रकूट, चालुक्य, चोल व पांड्य यांची राज्ये निर्माण होवून शिल्पकलेला नवा आयाम मिळाला. शेकडो सुंदर देवालयांची निर्मिती झाली. सदरील पुस्तकात प्राचीन भारतीय इतिहास साधने, सिंधू संस्कृती, पूर्व वैदिक काळ व उत्तर वैदिक काळ, परकियांची आक्रमणे, मौर्यकाल व मौर्येात्तर कालखंड, गुप्त साम्राज्य, वर्धन साम्राज्य, दक्षिणेकडील महत्त्वाची घराणी तसेच प्राचीन भारतातील शिक्षण पद्धती, स्त्रीयांचे जीवन, न्यायपद्धती, सामाजिक, धार्मिक व राजकीय परिस्थितीचा समावेश आहे. सदरील ग्रंथ इतिहास वाचकांसाठी तसेच पदवी, पदव्युत्तर, नेट/सेट आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयुक्त आहे.

    Bharatacha Itihas (Praranbhapasun Te C.E. 700 Paryant)

    350.00
    Add to cart
  • भारताचा भूगोल

    भारत हा एक प्राचीन संस्कृती व वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक परंपरा लाभलेला महान देश आहे. भारताचा इतिहास गौरवशाली आहे. भारत हा विशाल खंडप्राय देश असून विविधतेने नटलेला आहे. भारताच्या उत्तरेला हिमालय, दक्षिणेस विस्तृत हिंदी महासागर, पूर्वेस बंगालचा उपसागर व पश्चिमेस अरबी समुद्र शिवाय अंतर्गत भागातील भूरचनेतील विविधता यामुळे भारताचे हवामान वैविध्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतात जगातील बहुतेक सर्व प्रकारच्या हवामानाचे आविष्कार पाहायला मिळतात. पश्चिम आशिया व पूर्व आशियाच्या मध्यभागात भारत स्थित असून हिमालय पर्वताच्या दक्षिणेस हिंदी महासागरपर्यंत पसरलेला भारत हा आशिया खंडाचा एक उपखंड समजला जातो. भारताचा लोकसंख्या बाबतीत जगात चीन नंतर दूसरा क्रमांक लागतो. भारतातील खनिज व शक्ती साधनसंपत्तीचे वितरण विषम झालेले आहे. भारताचे शेजारील देशांदरम्यान भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिकदृष्ट्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध आहेत.

    Bharatacha Bhugol

    275.00
    Add to cart
  • भारताचा भूगोल

    भारत हा जगातील विविधेत एकता दर्शविणारा एकमेव देश आहे. जगातील ङ्गप्रमुख लोकशाही राष्ट्रफ म्हणून भारताचा उल्लेख केला जातो. भौगोलिकदृष्ट्या भारतातील सर्व प्रकारची विविधता अधिक महत्त्वाची आहे. जगातील विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी, पक्षी, भारतात आढळतात. प्राकृतिकदृष्ट्या भारतातील पर्वत, पठारे, मैदाने, दर्‍या, वाळवंट, इत्यादीबाबतची विविधता भारतात आढळते. हवामानातील विविधता भारतात आढळते. हवामानातील विविधता तर तीव्रतेने जाणवते. भौगोलिक आणि प्राकृतिक विविधतेबरोबर भारतातील वांशिक, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक विविधताही मोठ्या प्रमाणात आहे. जगातील सर्व वंशाचे धर्मांचे लोक भारतात आहेत. सामाजिक आणि आर्थिक विषमताही भारतात आढळते. अनेक भाषा, बोलीभाषा, वेगवेगळ्या रुढी, परंपरा, सण, उत्सव, इत्यादीबाबत भारतात विविधता आढळते. अशा विविधतेतून एकता साध्य करणारे राष्ट्र म्हणून भारताचा उल्लेख केला जातो. सदरील पुस्तकातून भारताच्या अभ्यासासोबत जगातील देशांचाही तोंडओळख सहजपणे होईल.

    Bharatacha Bhugol

    225.00
    Add to cart
  • भारताचा भूगोल

    भारत हा जगातील सर्वात जास्त भौगोलिक विवीधता असणारा देश आहे. भारत हा उत्तरेकडील हिमालयाच्या हिमाच्छादित पर्वतराजीपासून दक्षिणेस हिंदी महासागराच्या किनाऱ्यापर्यंत विस्तीर्ण अशा भुभागावर पसरलेला आहे. भारताच्या विस्तृतपणामुळे व नैसर्गिक विविधतेमुळे भारताच्या हवामानाला एक वेगळेच वैशिष्टे व विविधता प्राप्त झाली आहे. जगातील विविध प्रकारच्या हवामानाचे अविष्कार भारतात आढळतात. भारताचे प्रमुख पाच प्राकृतिक विभाग आहेत. भारतीय उपखंड हे जगातील चार प्रमुख धर्मांचे जन्मस्थान आहे. सद्य:स्थितीत भारत हा सामाजिक, आर्थिक व तांत्रिक क्षेत्रात आघाडीवर आहे.
    सदरील पुस्तकात भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी, भारताचा प्राकृतिक विभाग, हवामान, नदीप्रणाली, मृदा, वनसंपदा, विविध धर्म, धर्माचे प्रकार, भाषा भाषाकुळे, भारतातील आदिवासी जमाती, जीवन पद्धती, त्यांचे वितरण, भारतातील रस्ते लोहमार्ग हवाईमार्ग, दळणवळण, खनिजसंपत्ती व त्यांचे वितरण, भारतातील शेती व तिचे प्रकार, समस्या इत्यादी विविधांगी बाबींचा सखोल परामर्श घेतलेला असून नकाशे व आकृत्यांचा आवश्यक तेथे समावेश केलेला आहे.

    Bhartacha Bhugol

    225.00
    Add to cart
  • भारताचा शोध

    भारतवर्ष भारतीय संस्कृतीच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. भारतवर्षाची संकल्पना, वेद उपनिषदे, हिंदू, जैन, बौद्ध साहित्य, भारताची ज्ञानपरंपरा कला आणि संस्कृतीत हडप्पा, सिंधु संस्कृतीमधील स्थापत्यकला, शिल्पकला, मुर्तीकला, चित्रकला तसेच निरनिराळ्या कालावधीमधील कलासंस्कृती विकासाचा समावेश केला आहे. भारतीय ज्ञानपरंपरेत प्राचीन विद्यापीठे, तक्षशिला विद्यापीठ, मदुरा विद्यापीठ, वल्लभी विद्यापीठ आणि नालंदा विद्यापीठाचा परिचय देऊन भारतीय शिक्षणपद्धती स्पष्ट करण्यात आलेली आहे. भारतीय धर्म, तत्त्वज्ञान आणि ग्रामीण संस्कृती विकासातील सर्वधर्मीय विचार, विस्तार, जनपद, ग्रामस्वराज्याबद्दल माहितीचे संकलन केलेले आहे. प्राचीन भारतातील विज्ञान, पर्यावरण आणि औषधीशास्त्राची माहिती देताना पर्यावरण जाणीव जागृती, आयुर्वेद, योग विपश्यना आणि निसर्गोपचारांची ओळख करून दिलेली आहे. भारतीय आर्थिक परंपरा आणि ज्योतिषशास्त्र विकासात भारतीय व्यवसाय, उद्योग समुद्री व्यापार तसेच अर्थतज्ज्ञांच्या आर्थिक विचारांचा समावेश केलेला आहे.

    Bhartach Shoda

    135.00
    Add to cart
  • भारताची राष्ट्रीय सुरक्षा

    उपग्रहवेधी क्षेपणास्त्राची चाचणी, आक्रमक व शत्रुला विस्मयाचा धक्का देणार्‍या सर्जिकल स्ट्राईक्स, बालाकोट एअरस्ट्राईक आणि डोकलाम विवादात घेतलेल्या ठाम व कणखर भूमिकेमुळे चीनी सैन्याला घ्यावी लागलेली माघार या प्रासंगिकतेतून भारताने आज आक्रमक व वास्तववादी सुरक्षा धोरणाचा अंगिकार केल्याचे स्पष्ट होते. परिणामी ‘सॉफ्ट स्टेट’ ही भारताची आजवरची प्रतिमा पुसून टाकण्यात आपण बर्‍यापैकी यशस्वी झालो आहोत.
    राष्ट्रीय सुरक्षा ही देशासाठी प्राधान्यक्रमाची बाब असून कोणतीही आर्थिक, औद्योगिक प्रगती किंवा विकास हा पुरेशा सुरक्षेशिवाय निरर्थक आहे. प्रादेशिक समस्यांमध्ये भाषा, सामाजिक, राजकीय, भौगोलिक, धार्मिक व आर्थिक समस्या तसेच सांप्रदायिकता, स्थलांतर, निरक्षरता, लिंगभेद, नव्याने प्रस्थापित झालेली समाज माध्यमे व त्यापासून होणारे दुष्परिणाम, आरोग्य, पर्यावरण, माओवादी चळवळी, शेजारील राष्ट्रांचा अमानुष दहशतवाद, सायबर गुन्हेगारी आणि भारताच्या सीमा समस्या व सुरक्षा या सर्व समस्या आणि नव्याने उभ्या ठाकलेल्या आव्हानांचा यथायोग्य परामर्श ‘भारताची राष्ट्रीय सुरक्षा’ या ग्रंथात घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर राष्ट्रशक्तीवर विविध समस्यांचा परिणाम होऊन देश दुबळा कसा बनतो व त्याचबरोबर करावयाच्या उपाययोजनाही सूचविण्यात आलेल्या आहेत.

    Bharatachi Rashtriya Surksha

    250.00
    Add to cart
  • भारताची संरक्षण संघटना आणि राष्ट्रीय सुरक्षितता

    1947 मध्ये परकीयांचे जोखंड दूर करून भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर काही समस्या निर्माण झाल्या त्या दूर करण्याच्या हेतूने भारताने प्रयत्न करायला सुरूवात केली. भारताच्या उत्तरेला चीन, पश्चिमेला पाकिस्तान, पूर्वेच्या अंतर्गत भागात असलेला बांगला देश व बाहय भागात असलेला म्यानमार या सर्वच देशाबरोबरचे भारताचे संबंध म्हणावे तेवढे चांगले नाहीत त्याचप्रमाणे भारताच्या तिन्ही बाजूला सागरी संपदा लाभलेली आहे. आजच्या परिस्थितीमध्ये राष्ट्राची सुरक्षितता हा प्रश्न राष्ट्रीय जीवनाशी अविभाज्य घटक बनला आहे. राष्ट्राच्या राष्ट्रीय सुरक्षिततेचा ज्यावेळी आपण विचार करतो, त्यावेळी सर्वप्रथम आपल्यासमोर संबंधीत राष्ट्राचे राष्ट्रीय हित येते. राष्ट्रीय हिताच्या पर्यायाने राष्ट्रीय सुरक्षिततेच्या संरक्षणाची जबाबदारी फक्त सशस्त्र सेनेवरच नाही तर देशातील सर्व कर्तव्यदक्ष आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांची सुद्धा आहे.कोणत्याही देशाची राष्ट्रीय सुरक्षितता किंवा सुरक्षा संबंधित देशाच्या सामाजिक व आर्थिक घटकावर ही अवलंबून असते.

    सदर पुस्तकात 1947 नंतरचे भारतीय सशस्त्र दलांचे पुनर्निर्माण, भारतीय उच्चस्तरीय संरक्षण संघटना, सशस्त्र दलाची संरक्षण यंत्रणा/यांत्रीकीकरण, गुप्तचर संघटना, सुरक्षेपुढील पारंपरिक व अपारंपरिक आव्हाने, हिंदी महासागराविषयीचे भारताचे धोरण वगैरे विविध मुद्दयांचा उहापोह केलेला आहे.

    Bharatachi Sanrkshan Sanghatna Aani Rashtriya Surkshitta

    350.00
    Add to cart
  • भारतातील प्रवास आणि पर्यटन

    प्राचीन काळापासून ‘प्रवास’ ही मानवाची नैसर्गिक प्रवृत्ती आढळून येते. हळू-हळू मानव उत्क्रांत होत गेला, प्रगत होत गेला, तसतसे त्याचे भ्रमंतीचे उद्देश्य तसेच वाहतूकीची साधनेही बदलत गेलीत. मोटारी, रेल्वे, विमान, जहाज इ. प्रगत व आधुनिक वाहतूकीची साधने उपलब्ध होत गेल्याने जगभर प्रवास करणे सुकर होत गेले. परिणामतः पर्यटन हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक महत्त्वपूर्ण आर्थिक उद्योगक्षेत्र म्हणून विकसित झाले. सुक्ष्म नियोजन केल्यास पर्यटन क्षेत्राच्या साहाय्याने देशाचा आर्थिक व एकूणच सर्वांगीण विकास साध्य करणे कठीण नाही. भारतासारख्या भौगोलिक विविधता, ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्वप्राप्त देशात पर्यटकांना आकर्षित करणारी असंख्य स्थळे आहेत.
    प्रस्तुत पुस्तकात पर्यटनाचा अर्थ, स्वरूप, उद्दिष्ट्ये, प्रकार, भूमिका, नियोजन, वाहतूक साधने, निवास व्यवस्था, मार्गदर्शक या संबंधीचे सचित्र विवेचन सविस्तररित्या केलेले असून भारतातील महत्त्वपूर्ण व निवडक अशा धार्मिक स्थळे, लेण्या, किल्ले, स्मारके इत्यादींची उपयुक्त अशी माहिती दिलेली आहे.

    Bharatatil Pravas And Paryatan

    250.00
    Add to cart
  • भारतातील वस्तुसंग्रहालयांचा परिचय

    वस्तुसंग्रहालयाचा उदय प्रथम ग्रीस व रोममध्ये घडून आला. युरोपात कालांतराने अनेक खाजगी वस्तुसंग्रहालये स्थापन झाली. फे्ंरच राज्यक्रांतीनंतर फ्रान्समध्ये खाजगी संग्रहालयाचे रूपांतर सार्वजनिक संग्रहालयात करण्यात आले आणि ही प्रथा कालांतराने भारतात सुरू झाली. भारतामध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालने इ.स. 1814 मध्ये पहिले वस्तुसंग्रहालय कलकत्ता येथे स्थापन केले आणि या संग्रहालयात सर्व प्राचीन वस्तूंचा संग्रह करून ठेवण्यात आला. यानंतरच्या काळात वस्तुसंग्रहाच्या कक्षा रुंदावल्या आणि पारंपरिक संग्रहालयाची जागा आधुनिक संग्रहालयाने घेऊन पारंपरिकरीत्या वस्तूंचा संग्रह करण्याची पद्धती मागे पडून राष्ट्रीय, प्रांतीय, स्थानिक, संस्थात्मक पातळीवर वस्तूंचा संग्रह करून वस्तुसंग्रहालये हे ज्ञान देणार्‍या संस्था बनलेल्या आहेत. भारतातील विविध वस्तुसंग्रहालयात पाच हजार वर्षांच्या कलाविषयक, सांस्कृतिक व समृद्ध इतिहासाचा ठेवा जपून ठेवलेला आहे. त्यात शास्त्रशुद्ध पद्धतीने व विषयवार आकर्षक पद्धतीने वस्तूंची मांडणी करण्यात आली आहे. संग्रहालयामध्ये मानवाच्या दैनंदिन जीवनाचे दर्शन घडण्यास मदत होते. मानवी स्वभाव, संस्कृती, राहणीमान, वेशभूषा, केशभूषा, अलंकार, करमणुकीची साधने, आहार-विहार इत्यादींसारख्या सामाजिक परिस्थितीचे दर्शन घडते. प्रस्तुत ग्रंथात ऐतिहासिक व पुरातत्वविषयक वस्तुसंग्रहालयाचा परिचय देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

    Bharatatil Vastusangrahalyancha Parichay

    350.00
    Add to cart
  • भारतीय अर्थव्यवस्था (1980 पासून) (भाग – 2)

    भारताचा विदेश व्यापार प्राचीन व अर्वाचीन काळापासून अनेक देशांशी चालत आलेला आहे. अर्थव्यवस्थेत अतिरिक्त निधी गोळा करण्याचे व तो गतिशील करण्याचे कार्य बँका व वित्तीय संस्था करीत असतात. गोळा झालेला निधी कर्ज, उधारी, गुंतवणूक रूपाने उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात.अर्थव्यवस्थेत आर्थिक स्थैर्यासह आर्थिक विकास साध्य करण्यासाठी किंमत स्थैर्य आणि बँकींग क्षेत्राचा विकास आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात ज्या वस्तू किंवा सेवांचा उत्पादनखर्च तुलनात्मकदृष्ट्या कमी असतो, अशा वस्तू उत्पादनात श्रम विभागणी आणि विशेषीकरण केले जाते, श्रम विभागणी आणि विशेषीकरणातून उत्पादनात वाढ होते. जागतिक पातळीवर जगातील बहुतांश देशांनी 1970 च्या दशकापासून आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतली आहे. आर्थिक सुधारणांमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, जागतिक व्यापार संघटना बहुराष्ट्रीय कंपन्या महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत. भारताने जुलै 1991 पासून आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
    प्रस्तुत पुस्तकात भारतीय वित्तीय प्रणाली, बँकिंग, विदेश व्यापार व व्यवहारतोल, जागतिकीकरण, संघीय वित्तीय प्रणाली, सरकारचा महसूल, खर्च, कर्ज आणि तुटीचा अर्थभरणा इ. मुद्द्यांची सविस्तर चर्चा केलेली आहे.

    Bharatiya Arthavyavastha

    425.00
    Add to cart
  • भारतीय अर्थव्यवस्था (भाग 1 व 2)

    राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 नुसार नवीन अभ्यासक्रमातील ‌‘भारतीय अर्थव्यवस्था भाग -1 व 2′ पुस्तकातील भाग – 1 यामध्ये अर्थव्यवस्था आणि भारतातील कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्राची भूमिका, अर्थव्यवस्थेची क्षेत्रीय रचना याबद्दल सबांधित इ. माहिती दिलेली आहे. तसेच भाग – 2 मध्ये प्रात्यक्षिक पेपर – 2 एले 102 (झ) साठी आवश्यक लोकसंख्या अभ्यासक्रम तसेच शिक्षक, विद्यार्थी, महाविद्यालय विभाग यासाठीची मार्गदर्शनपर माहिती, नमुना प्रात्यक्षिक आराखडा, मूल्यमापन पद्धती सविस्तर पणे दिलेली आहे.
    प्रस्तुत पुस्तकात संदर्भ साहित्यावर आधारित अभ्यासक्रमाची घटकानुसार तपशीलवार चर्चा केलेली आहे. अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक आणि संकल्पना सखोल आणि तपशीलवार मांडलेली आहे. सर्व संदर्भ अद्ययावत माहितीसह तयार केलेले असून तसेच तक्ते, आलेख, आकृत्या आवश्यक तेथे वापरलेल्या आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या च्या शेवटी, परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने वस्तुनिष्ठ बहु-निवडीचे प्रश्न दिलेले आहे. त्यामुळे हे पुस्तक सर्व अभ्यासू शिक्षकांना तसेच परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल या प्रामाणिक हेतूने हे पुस्तक लिहिलेले आहे.

    210.00
    Add to cart
  • भारतीय अर्थव्यवस्थेची सद्य:स्थिती (1990-1991 पासून)

    1947 नंतर भारतात आर्थिक नियोजनामुळे विकासाला सुरवात झाली. कृषी उद्योग व सेवा क्षेत्रात आमुलाग्र बदल व्हायला लागले परंतु काही चुकीच्या निर्णयांमुळे, राजकीय धोरणकर्त्यांमुळे 1990 मध्ये देश आर्थिक संकटाच्या खाईत लोटला गेला. जुलै 1991 मध्ये जागतिक बँकेच्या रेट्यामुळे आर्थिक सुधारणांना सुरवात करावी लागली. आर्थिक सुधारणामुळे मुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे भारताची वाटचाल सुरू झाली. भारतात आर्थिक प्रगतीच्या दिशेने आर्थिक बदलांची प्रक्रिया सुरू झालेली असून आज भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत असून जगातील तिसर्‍या क्रमांकाचा एक सामर्थ्यशाली देश अशी गणना होऊ लागली आहे. सध्या सत्तेत असलेल्या ‘मोदी इकॉनॉमिक्स’मुळे भारताची शाश्वत विकासाकडे वाटचाल सुरू झालेली असून 2025 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न भारतीय जनता पाहात आहे.
    प्रस्तुत पुस्तकात भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, समस्या, जागतिकीकरण, जागतिक आर्थिक विकास, लोकसंख्या रचना व लाभांश, कृषी, उद्योग व सेवा क्षेत्रांचा विकास, कृषी वित्तपुरवठा, विपणन, शेतमजूर समस्या, भारतीय अर्थव्यवस्थेचे बाह्यक्षेत्र अंतर्गत परकीय व्यापार, व्यवहारतोल, भांडवल, सेझ, भारतीय संघराज्य पद्धती, वित्त आयोगाच्या शिफारशी, आर्थिक नियोजन, नियोजनाची वैशिष्ट्ये इ. अर्थविषयक विविध मुद्यांची सोप्या शब्दांत मांडणी केलेली आहे.

    Bhartiya Aarthvyavsthechi Saddyasthiti (1990-91 Pasun)

    350.00
    Add to cart
  • भारतीय आर्थिक धोरण

    राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 नुसार नवीन अभ्यासक्रमातील ‌‘भारतीय अर्थव्यवस्था भाग -1 व 2′ पुस्तकातील भाग – 1 यामध्ये अर्थव्यवस्था आणि भारतातील कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्राची भूमिका, अर्थव्यवस्थेची क्षेत्रीय रचना याबद्दल सबांधित इ. माहिती दिलेली आहे. तसेच भाग – 2 मध्ये प्रात्यक्षिक पेपर – 2 एले 102 (झ) साठी आवश्यक लोकसंख्या अभ्यासक्रम तसेच शिक्षक, विद्यार्थी, महाविद्यालय विभाग यासाठीची मार्गदर्शनपर माहिती, नमुना प्रात्यक्षिक आराखडा, मूल्यमापन पद्धती सविस्तर पणे दिलेली आहे.
    प्रस्तुत पुस्तकात संदर्भ साहित्यावर आधारित अभ्यासक्रमाची घटकानुसार तपशीलवार चर्चा केलेली आहे. अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक आणि संकल्पना सखोल आणि तपशीलवार मांडलेली आहे. सर्व संदर्भ अद्ययावत माहितीसह तयार केलेले असून तसेच तक्ते, आलेख, आकृत्या आवश्यक तेथे वापरलेल्या आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या च्या शेवटी, परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने वस्तुनिष्ठ बहु-निवडीचे प्रश्न दिलेले आहे. त्यामुळे हे पुस्तक सर्व अभ्यासू शिक्षकांना तसेच परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल या प्रामाणिक हेतूने हे पुस्तक लिहिलेले आहे.

    160.00
    Add to cart
  • भारतीय आर्थिक पर्यावरण (भाग 1)

    देशातील वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, उपलब्ध संसाधनाचा वापर, तंत्रज्ञान विकास, भांडवलाची उपलब्धता, विकसित मनुष्यबळ, पायाभूत सेवा व सुविधांचा विकास, सरकारचे समग्र आर्थिक धोरण इत्यादीचा आर्थिक पर्यावरणावर प्रभाव पडून शेती, उद्योग, सेवा आणि विदेशी व्यापार क्षेत्र इत्यादीच्या कामगिरीत व सध्यस्थिती संरचनात्मक बदल झाले आहेत. त्याचा आर्थिक विकासावर होणार्‍या परिणामांचे वस्तूनिष्ठ आकलन होऊन, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण व्हावी. देशाच्या आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील आर्थिक पर्यावरणाची स्थिती समजावी, आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता विकसित व्हावी तसेच भारतीय नागरीक म्हणून आपल्या जबाबदार्‍या व कर्तव्यांची जाणीव निर्माण व्हावी. हा हेतू अभ्यासक्रमाची पुनर्रचना करतांना विचारात घेतला आहे.

    प्रस्तुत पुस्तकात अभ्यासक्रमानुसार घटकनिहाय, संदर्भसाहित्याच्या आधारे ‘भारतीय आर्थिक पर्यावरणाचे’ सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. अर्थशास्त्राच्या विद्यार्थी व अभ्यासकांमध्ये विषयासंबंधी जाणीव निर्माण होऊन त्यांची रुची वाढवी हा प्रामाणिक हेतू समोर ठेवून सदर पुस्तकाचे लिखान करतांना विविध संकल्पनाची मांडणी अतिशय साध्या व सोप्या भाषेत केली आहे. अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक व संकल्पनेची क्रमबद्ध, सखोल व विस्तृतपणे मांडणी केली आहे.

    Bharatiya Aarthik Paryavaran (Bhag 1)

    210.00
    Add to cart