• कंपनी कायद्याची मूलतत्त्वे (भाग 1)

    Kanpani Kayadyachi Multatve (Bhag 1)

    135.00
    Add to cart
  • कार्यक्रम व्यवस्थापन आणि योजना प्रणाली

    गृहअर्थशास्त्र या विषयाअंतर्गत विचार करता हा विषय मानवी जीवन सुबद्ध करण्यास फार उपयुक्त ठरतो. या अनुषंगाने या विषयांमध्ये मानवी जीवनात येणाऱ्या बऱ्याचशा घटकांचे अध्ययन केले जात असते. त्यापैकी कार्यक्रम व्यवस्थापन, कार्यक्रमाची गरज, महत्व, कार्यक्रम व्यवस्थापनाचा आधुनिक काळातील कल, कार्यक्रम व्यवस्थापनाचे प्रकार यामध्ये सार्वजनिक कार्यक्रम, वैयक्तिक कार्यक्रम, सहकारयुक्त कार्यक्रम, व्यावसायिक कार्यक्रम, कार्यक्रम व्यवस्थापनाची तत्वे, कार्यक्रमाचा आराखडा, कार्यक्रम व्यवस्थापनाचे औद्योगिक स्थान, कार्यक्रम व्यवस्थापन नियोजन प्रक्रिया, कार्यक्रम व्यवस्थापनाद्वारे नोकरीचे मार्ग, नोकरीचे आवश्यक मार्गदर्शन, कार्यक्रम व्यवस्थापनाची जाळे या बऱ्याच विषयाचे अध्ययन समाविष्ट असून हा विषय मानवी जीवनाला परिपूर्ण करण्यासाठी फार उपयुक्त आहे.
    सदर पुस्तकात कार्यक्रम संघ, कार्यक्रम प्रशिक्षण, व्यवसाय आणि कल, शैक्षणिक, राजकीय, वैज्ञानिक कार्यक्रम, समिती, त्याची रचना, कार्य, जबाबदारी, कार्यक्रम व्यवस्थापकाचे गुण, कार्यक्रम व्यवस्थापन प्रणालीचा विकास, कार्यक्रम नियोजनाचे मूल्यांकन आदि विषयाची मांडणी सोप्या भाषेत मुद्देसूदरित्या करण्यात आली आहे.

    170.00
    Add to cart
  • काव्यशास्त्र और साहित्य के भेद

    काव्यशास्त्र की सुदीर्घ परम्परा है। इसका इतिहास लगभग दो हजार वर्षों में फैला हुआ है। ईसा पूर्व दूसरी-तीसरी शताब्दी से लेकर सत्रहवीं शताब्दी तक भारतीय तथा पाश्चात्य काव्यशास्त्रीय चिंतन की परंपरा पल्लवित और विकसित होती रही। जीवन का प्रवाह अनन्त है। अनादि काल से आज तक मानव जीवन के इस अनन्त प्रवाह ने अपने भाव और बुद्धि प्रवाह की असीमितता को मापने-जोखने के लिए अनवरत अध्यवसायपूर्ण कर्म के माध्यम से अनेक प्रकार के घाट निर्मित किए है। शास्त्र, साहित्य, कला, ज्ञान, विज्ञान कोई भी ऐसा क्षेत्र नहीं है कि जिसे मानव के भाव और बुद्धि से संचालित कर्म ने अपने स्पर्श द्वारा अलौकिक एवं उपयोगी न बना दिया हो।
    प्रस्तुत ग्रंथ में चिंतन की इस सुदीर्घ परम्परा के प्राय: सभी महत्वपूर्ण मोडों को समेटने का प्रामाणिक प्रयास किया गया है। साथ ही भारतीय तथा पाश्चात्य काव्यशास्त्र के महान आचार्यो से लेकर बीसवी शताब्दी के आलोचकों के प्रमुख काव्य-सिद्धांतों का विवेचन-विश्लेषण किया गया है। नि:संदेह यह ग्रंथ छात्रोपयोगी बनाने की दिशा में तथा जिज्ञासु छात्रों को दृष्टिगत रखते हुए लिखा गया है।

    Kavyashastra Aur Sahitya Ke Bhed

    250.00
    Add to cart
  • किरकोळ विक्री व्यवस्थापन

    Kirkol Vikri Vyavsthapan

    195.00
    Add to cart
  • किरकोळ विक्री व्यवस्थापन (भाग 2)

    Kirkol Vikri Vyavsthapan (Bhag 2)

    145.00
    Add to cart
  • किरकोळ विक्री व्यवस्थापन सिद्धांत आणि प्रक्रिया

    अंतर्गत व्यापारातील किरकोळ विक्री महत्त्वपूर्ण असा अविभाज्य घटक आहे. उपभोक्त्यांना हवी असलेली वस्तू किंवा सेवा त्यांच्या मागणीनुसार किरकोळ विक्रीद्वारे उपलब्ध करून दिल्या जातात. किरकोळ विक्रेता वस्तूंची विक्री लहान-लहान प्रमाणात करून एक प्रकारे तुकडे किंवा छोटे भागच विक्री करीत असतो. किरकोळ विक्रेता घाऊक व्यापारी किंवा उत्पादक किंवा वितरक यांच्याकडून वस्तूंची खरेदी करतो आणि अंतिम ग्राहक किंवा उपभोक्ता यांना पाहिजे त्या प्रमाणात हवी असलेली वस्तू उपलब्ध करवून देत असतो. किरकोळ विक्रेता हा वस्तू वाटप साखळीतील घाऊक विक्रेता आणि अंतिम ग्राहक (उपभोक्ता) यांच्यातील महत्वाचा दुवा आहे. किरकोळ विक्रेता हा एखादी कंपनी, अभिकर्ता किंवा संस्था स्वरूपात कार्यरत असू शकतो. सद्य:स्थितीत किरकोळ विक्री ही केवळ दुकानांद्वारेच केली जाते असे नव्हे, तर इंटरनेट, पोस्ट किंवा मार्केटिंगद्वारे केली जाते. वाणिज्य आणि व्यवस्थापन शिक्षणाचे बदलते व आधुनिक स्वरूप विचारात घेऊन सदरील पुस्तकात किरकोळ विक्री, विक्री व्यवस्था, विक्री पध्दती, विक्री व्यवस्थेचा आकृतीबंध, विक्रीचे अर्थशास्त्र, बाजारपेठेचे प्रभागीकरण, ग्राहक संबंध व्यवस्थापन, उपभोक्ता वर्तणूक, विक्री विपणन मिश्र, मॉल व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञानाचा वापर तसेच आधुनिक विचारप्रवाहात ग्राहकानंद, ई-रिटेलिंग अशा विविध विषय व तंत्र याविषयी सविस्तर चर्चा केली आहे.

    Kirkol Vikri Vyavasthapan Siddhant Aani Prakriya

    450.00
    Add to cart
  • कृषी अर्थशास्त्र

    भारत हा शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. ग्रामीण भागात शेतीक्षेत्राचा विस्तार मोठ्या प्रमाणात आहे. भारतातील एकूण लोकसंख्येपैकी जवळपास 68% जनता या क्षेत्रात गुंतलेली आहे. जगातील कोणत्याही राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत शेतीला महत्वाचे स्थान असते.

    20 व्या शतकाच्या सुरूवातीला अर्थशास्त्राची एक स्वतंत्र शाखा म्हणून ‘कृषी अर्थशास्त्र’ कार्यरत झाले. दुसर्‍या जागतिक महायुद्धानंतर या शाखेचे महत्व मोठ्या प्रमाणात वाढले. सध्या जगातील बहुसंख्य विकसनशील अर्थव्यवस्थांमधील उदा. राष्ट्रीय उत्पन्न, निर्यात, अन्नधान्य, कच्चा मालाचा पुरवठा, रोजगार वगैरे क्षेत्रात कृषी क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावत आहे. वाढत जाणार्‍या लोकसंख्येची अन्नधान्याची आणि सातत्याने वाढत जाणार्‍या विविध उद्योगांच्या कच्च्या मालाची गरज शेती क्षेत्राकडूनच पूर्ण होत आहे.

    कृषी आधारीत अर्थव्यवस्थेचे रूपांतर उद्योगाधारीत अर्थव्यवस्थेत होण्यासाठी शेतीबद्दलचा पारंपारिक दृष्टीकोन बदलवून आधुनिक दृष्टीकोनाचा स्विकार होणे काळाची गरज ठरते. संसाधनाचा योग्य वापर, घटकांचा युक्त संयोग, पर्यायी उत्पादन तंत्राची निवड, विपणनाच्या समस्या, व्यवस्थापन, उत्पादन फलन इत्यादी अनेक बाबतीत कृषी अर्थशास्त्र महत्वाची भूमिका निभावू शकते. शेती क्षेत्रात व्यापारी दृष्टीकोन रुजवण्यात शेतीच अर्थशास्त्र महत्वपूर्ण योगदान देवू शकते.

    Krushi Arthashastra

    225.00
    Add to cart
  • कृषी भूगोल

    कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील OE/GE पेपरच्या अभ्यासक्रमानुसार ‌‘कृषी भूगोल’ हे पुस्तक वाचकांपुढे येत आहे.
    कृषी व्यवसाय जगातील महत्त्वाचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय अजूनही काही देशात फारसा विकसित नाही. परंतु काही देशांनी या व्यवसायात खूपच प्रगती केली आहे. भारतासारख्या विकसनशील देशात कृषी व्यवसायाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या व्यवसायाचे महत्त्व पाहता भूगोल अभ्यासमंडळाने कृषी भूगोलाचा अभ्यासक्रमात समावेश केला. ही अतिशय चांगली बाब आहे.
    पुस्तक लिहिताना अभ्यासक्रमातील विषय वेगवेगळे करुन त्याचे विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यापीठ अभ्यासक्रमानुसार प्रकरणामध्ये विषय विवेचन करण्यात आले आहे.
    सदरचे पुस्तक लिहिताना आमचे सहकारी मित्रांनी खूपच उपयुक्त सूचना केल्या. त्याचा आम्ही पुस्तक लिहितांना विचारात घेतल्या.

    110.00
    Add to cart
  • कृषी भूगोल आणि प्रात्यक्षिके

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 2024-25 पासून बदललेल्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार (NEP 2020) OE (Open Elective) प्रथम वर्ष विज्ञान शाखेतील भूगोल या विषयामधून घेतलेल्या प्रथम वर्षे कला व वाणिज्य या विद्यार्थ्यांसाठी (सेमिस्टर 1 व 2) कृषी भूगोल व कृषी भूगोलाचे प्रात्यक्षिक हे क्रमिक पुस्तक सर्व स्तरातील विदयार्थी, प्राध्यापक बंधूं व भूगोल प्रेमी यांना सुपूर्द करताना आम्हाला विशेष आनद होत आहे. हे पुस्तक महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील प्राध्यापक व सर्व शाखेतील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल याचा विचार करून सदर लिखाण करण्यात आलेले आहे.
    भूगोल विषयाची बांधिलकी, अध्ययन व अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव, तज्ञ तसेच अनुभवी व्यक्तींशी चर्चा-संवाद, चालू घडामोडी व मूळ संदर्भ ग्रंथांच्या आधारे हे पुस्तक लिहिलेले आहे. कृषी भूगोल या विषयाचा अभ्यास केल्या नंतर आपल्या सर्वांच्या मनामध्ये कृषी भूगोल विषया विषयी गोडी निर्माण होईल. प्रस्तुत पुस्तकात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार सर्व प्रकरणे साध्या, सोप्या व परीणामकारक भाषेत मांडण्याचा आम्ही प्रामणिक प्रयत्न केला असून योग्य ठिकाणी आकृत्या, तक्ते, विविध अभ्यास क्रमाशी निगडीत संज्ञा यांचा समावेश केलेला आहे. सदरचे पुस्तक सर्व विद्यार्थी व प्राध्यापक मित्रांना तसेच स्पर्धात्मक परीक्षा या शिवाय नेट/सेट परीक्षांना जास्तीत जास्त उपयुक्त होईल असाही प्रयत्न केलेला आहे. प्राध्यापक मित्र, अभ्यासक व विद्यार्थ्यांनी या पुस्तकात सुधारणा करण्याच्या दृष्टीने काही सूचना केल्यास त्यांचे स्वागतच केले जाईल व पुढील आवृत्तीत निश्चितपणे यथायोग्य बदल केले जातील.

    130.00
    Add to cart
  • कौटुंबिक संसाधनांचे व्यवस्थापन आणि आंतरिक सजावट

    गृहव्यवस्थापन आणि अंतर्गत सजावट करतांना महिलांना अनेक प्रश्न पडतात. अशा वेळी महाविद्यालयीन स्तरापासूनच विद्यार्थिनींना व भावी गृहिणींना तसेच स्वतः व्यवसाय उभारणाऱ्या गृहिणीना सहकार्य करण्याच्या उद्देशाने लिखित हि पुस्तिका असून यामध्ये गृहअर्थशास्त्राचे महत्व, विविध शाखा, कौटूंबिक साधन संपत्ती व्यवस्थापन, निर्णय प्रक्रिया, रंग व रंग योजना, पुष्परचना, कार्यक्रमाचे व्यवस्थापन, कार्यसरलीकरणाचे महत्त्व, घरगुती कामात कार्यसरलीकरणाचे तंत्र, फर्निचर मांडणी, फर्निचर निवड व त्याची काळजी, जलसंधारण सांडपाण्याचे निष्कासन, कचऱ्याची विल्हेवाट, स्वयंरोजगार, गृहअर्थशास्त्रातील रोजगार संधी, महिला सक्षमीकरणात जिल्हा उद्योग केंद्र, स्वसहाय्यता गटाचे योगदान, महिला आर्थिक विकास मंडळाची भूमिका ब्लॉकचा परिचय, ब्लॉक प्रिंटींग तयार करणे, स्कार्फ, उशी, टेबल क्लॉथ हे सर्व प्रात्यक्षिक या सर्वभागाचा या पुस्तकात समावेश केला आहे. याचा उपयोग करुन उत्सुक महिला आवडीप्रमाणे व्यवसाय सुरु करुन आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करु शकतील. सदर पुस्तक हे विद्यार्थिनी, गृहिणी तसेच अध्यापकाकरिता उपयुक्त ठरणार आहे.

    Kautubik Sansadhanache Vyavsthapan V Antarik Sajawat (Part 1)

    525.00
    Add to cart
  • क्षेत्रतंत्र आणि प्रकल्प अहवालाची तोंडओळख

    ‘क्षेत्राभ्यास’ हे भूगोल विषयातील संशोधनातील एक महत्वाचे अंग आहे. योग्य शास्त्रीय तंत्र व तंत्रज्ञान वापरुन क्षेत्राचा पद्धतशीरपणे अभ्यास करता येतो. क्षेत्रकार्य करतांना संशोधकाला किंवा अभ्यासकाला भौगोलिक व वैज्ञानिक दृष्टीकोन वापरता आला पाहिजे. क्षेत्रकार्यामुळे चिकित्सक वृत्तीचा विकास होतो. क्षेत्रकार्य करतांना काही नितीमूल्यांचे पालन करणे आवश्यक असते. अभ्यासक्षेत्र हे कोणत्या स्वरूपाचे आहे हे क्षेत्रकार्य करण्यापूर्वी जाणून घेणे महत्वाचे असते. क्षेत्राभ्यास हा निरिक्षण पद्धतीने, प्रश्नावलीच्या आणि मुलाखतीच्या माध्यमातून पार पडतो.
    ‘नमुना संकलन’ हे क्षेत्रकार्या दरम्यानचे एक महत्वाचे कार्य आहे. नमुना निवडीच्या अनेक पद्धती आहेत. समग्रातून निवडलेल्या नमुन्याच्या विश्लेषणावरुन संपूर्ण सामग्रीबद्दल निष्कर्ष मांडता येतो. लघु संशोधन सादरीकरण हे प्रकल्प अहवालाच्या माध्यमातून करतात. प्रकल्पाचे सादरीकरण अनेक मुद्द्यांमधून मुद्देसूदपणे करतात. ध्येय, उद्दीष्ट्ये, गृहीततत्वे, अभ्यासपद्धती, विवेचन, निष्कर्ष, अनुमान इत्यादी मुद्द्यांच्या आधारे प्रकल्पाचे सादरीकरण केले जाते.

    95.00
    Add to cart
  • खानदेश रत्नावली आस्वाद व रसग्रहण

    Khandesh Ratnavali : Aswad v Rasgrahan

    250.00
    Add to cart
  • खानदेशचा इतिहास

    आम्ही ज्या मातीत वाढलो, घडलो त्या मातीला उतराई होण्याच्या निमित्ताने खानदेशचा इतिहास लिहिण्याची कदाचित ही सुवर्णसंधी मला लाभली म्हणून कृतकृतार्थ वाटतेय किंबहुना ती जबाबदारी जाणीवपूर्वक मी घेतली. सदर अभ्यासक्रमाच्या पुस्तकात मानवी वसाहतपूर्व, ताम्रपाषाण वसाहतीपासून तर आजच्या सुवर्णनगरी जळगांव पर्यंत विविध कालखंडातील खानदेशचा इतिहास समाविष्ट केला आहे.
    अभिमानाची गोष्ट म्हणजे प्राचीन काळी सम्राटांनी आपल्या मांडलिकांच्या मार्फत (निकुंभ, मौर्य, आभीर, गवळी), तर सुलतान काळात फारुकी सुलतानांनी, मुघलकाळात दख्खनच्या सुभेदारांनी, मराठाकाळात कमाविसदार-सरंजामदारांनी प्रशासन करत राज्यकारभार खानदेशात चालवला. त्यानंतर कंपनी व ब्रिटिश सरकारने राज्यकारभार केला.
    या विविध कालखंडात सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक व राजकीय प्रभावाची घुसळण (मिश्रण) खानदेशात फार मोठ्या प्रमाणात दिसून येते. सातपुडा पर्वत ते सातमाळ्याची डोंगर रांग, तापी व तिच्या उपनद्यांचे खोरे(पांबोगिता-पांझरा, बोरी, गिरणा, तापी), कान नदी, कानबाईचा उत्सव, कान्हाचा जागर आणि अहिराणी लोकबोली इत्यादीने समृध्द प्रदेश म्हणजे खानदेश.
    इथला भिल्ल, कोळी व तत्सम आदिवासी ते बारा बलुता-अठरा अलुता तसेच कुणबी-मराठा, गुजर, लेवा, राजपूत, माळी इ. कृषक जाती-जमाती, मुस्लिम व व्यापारी ज्ञातीसमूह या सगळ्यांच्या सहिष्णू, सर्वसमावेशक व सलोख्याचा, गर्वाने मन फुलावे असा हा उज्वल इतिहास विद्यार्थ्यांसमोर सादर करण्याचा आनंद काही औरच आहे.

    350.00
    Add to cart
  • खान्देश कथाप्रबोध

    या सर्वच कथा खान्देश परिसरातल्या आहेत. बोली भूगोलाचा विचार केला तर ह्या कथा मध्यप्रदेश, गुजराथी प्रदेशातील सीमेलगतच्या बोलीच्या भूगोलातील आहेत. त्यामुळे जशा त्या आशयाने नाविन्यपूर्ण आहेत तशाच त्या अभिव्यक्ती शैलीनेही नाविन्यपूर्ण आहेत.
    सदर संग्रहातल्या कथा वाचताना आपण खान्देशच्या बोलीतील किती मोठी श्रीमंती हरवून बसत आहोत, याची तीव्र जाणीव होते. ही जाणीव हा कथासंग्रह तरूण्ा वाचकांच्या मनात रुजवल्याशिवाय राहणार नाही, याची मला खात्री आहे.

    – दत्ता भगत

    120.00
    Add to cart
  • खान्देश का लोकसाहित्य

    भाषा और साहित्य यह एकमात्र ऐसा साधन होता है जिसके माध्यम से हम किसी भी प्रांत अथवा भूप्रदेश की लोक-भाषा, लोक-साहित्य, लोक-संस्कृति तथा लोक-परंपराओं का अध्ययन अध्यापन कर सकते है । वैश्वीकरण या भूमंडलीकरण के इस युग में जब एक विश्वग्राम, एक विश्वबाजाऱ की तरह एक विश्वभाषा की कल्पना संजोयी जा रही है तब उसके परिणामस्वरूप हम देख रहे है कि आए दिन किसी न किसी लोक-भाषा और लोक-संस्कृति का कैसे लोप होता जा रहा है । सुप्रसिध्द भाषाविद् डॉ. गणेश देवी द्वारा किए गए ‘भाषा सर्वेक्षण’ से प्राप्त निष्कर्ष इस बात के प्रत्यक्ष प्रमाण है । इसलिए ऐसी विपरित परिस्थितियों में अपने-अपने भूप्रदेश और प्रांत की लोक-भाषा और लोक-संस्कृति का संरक्षण और संवर्धन करना तथा आने वाली नई पीढ़ी को इससे अवगत कराना यह हर एक का कर्तव्य बन गया है। इसी उद्देश्य को केंद्र में रखकर विश्वविद्यालय अनुदान आयोग, नई दिल्ली ने तथा भारत सरकार द्वारा प्रस्तावित नई शिक्षा नीति ने लोक-भाषा और लोक-संस्कृति का संरक्षण और संवर्धन करने हेतु उसे पाठ्यक्रम में समाविष्ट करने के निर्देश भारत में स्थित सभी विश्वविद्यालयों को दिए हैं । उन्हीं निर्देशों का अनुपालन करते हुए कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विश्वविद्यालय, जलगांव के हिन्दी अध्ययन मंडल ने स्नातक स्तर (बी.ए.) तृतीय वर्ष के षष्ट सत्र के अंतर्गत हिंदी विषय का चयन करने वाले छात्रों के लिए खान्देश का लोक साहित्य यह प्रश्नपत्र रखने का क्रांतिकारी निर्णय लिया । यह निर्णय आगत भविष्य काल में ग्लोबल के साथ-साथ लोकल का नारा बूलंद करेगा यह हमें पूर्णरूपेण विश्वास है ।

    Khandesh Ka Loksahitya

    125.00
    Add to cart
  • खान्देश रत्नावली

    Khandesh Ratnavali

    100.00
    Add to cart
  • गणित अध्यापन पद्धती व आशयज्ञान (बी.एड.द्वितीय वर्ष)

    Ganit – Abhyasakram Aani Adhyapanshastriya Abhyas (B.Ed. Second Year (CPS 3 & 4))

    425.00
    Add to cart
  • गुंतवणूक आणि संपत्ती व्यवस्थापन

    ‌‘गुंतवणूक आणि संपत्ती व्यवस्थापन’ या पुस्तकात गुंतवणूक, प्रकार, वैशिष्ट्ये, उद्दिष्ट्ये, गुंतवणुकदरांचे प्रकार, पोर्टफोलिओ व्यवस्थापन, जोखीम आणि परतावा, वित्तीय संपत्तीवरील परतावा, जोखीमेचे मोजमाप, पद्धतशीर जोखमीचे स्रोत, गुंतवणूकीचे पर्याय, गुंतवणूकीचे मूल्यमापन, किंमत-उत्पन्न संबंध, व्याज दराची संरचना, संपत्ती व्यवस्थापन, व्याप्ती, घटक, प्रक्रिया, गरज, पक्षकाराच्या अपेक्षा, वैयक्तिक आर्थिक विवरण, वित्तीय साक्षरता, रोख प्रवाह, वित्तीय नियोजन बांधणी, वैयक्तिक आर्थिक नियोजन, गरज, फायदे, तत्वे इत्यादी मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यात आलेले आहेत. योग्य त्या ठिकाणी आकृत्या काढून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. पुस्तकाची अत्यंत साध्या व सोप्या भाषेत मांडणी केलेली आहे.
    प्रस्तुत पुस्तक वाणिज्य आणि व्यवस्थापन विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना निश्चितच उपयुक्त ठरेल.

    Guntavnuk Ani Sampatti Vyavsthapan

    175.00
    Add to cart
  • गृहअर्थशास्त्र आणि रोजगार संधी

    संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बीए प्रथम वर्षाच्या गृहअर्थशास्त्र विषयाच्या प्रथम व द्वितीय सत्र अभ्यासक्रमामध्ये विद्यापीठाने नेऊन दिल्यानुसार प्रस्तुत ‌‘गृहअर्थशास्त्र व रोजगार संधी’ या पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे. प्रस्तुत पुस्तक हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) नुसार तयार केलेले असून यामध्ये गृहअर्थशास्त्राचा इतिहास, गृहअर्थशास्त्र परिभाषा, गृहअर्थशास्त्र शिक्षण हे जीवन शिक्षण, गृहअर्थशास्त्रात नोकरीच्या संधी, गृहअर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखा, कौटुंबिक संसाधने, घर आणि कार्यक्रम व्यवस्थापन, कुटुंबनिवास, फर्निचर, अंतर्गत सजावट, पुष्परचना याविषयीचे शास्त्रशुद्ध ज्ञान देऊन त्यामध्ये आवड निर्माण होऊन हा विषय सोपा करण्याचा या पुस्तकामध्ये प्रयत्न करण्यात आला आहे. हे पुस्तक विद्यार्थिनी व अध्यापकांच्या पसंतीला उतरेल अशी अपेक्षा आहे.
    गृहअर्थशास्त्र आणि अंतर्गत सजावट याचा एकंदरीत विचार करता, गृहअर्थशास्त्र म्हणजे काय ते प्रथम पाहायला हवे गृह आणि अर्थ याचा शास्त्रीयदृष्ट्या योग्य तो ताळमेळ बसवणारे शास्त्र म्हणजे गृहअर्थशास्त्र होय. गृहअर्थशास्त्राचा प्रारंभ हा बऱ्याच कालावधीपासून झालेला असून विकास प्रक्रियेचा प्रारंभ हा आणखी विस्तारित होत आहे. मानवाचा विकास ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, यामध्ये मानवाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टी येणाऱ्या सर्व प्रक्रियेचा अंतर्भाव गृहअर्थशास्त्र विषयांमध्ये होत असतो. मानवाचा विकास व्हावा याकरिता मानवी जीवनामध्ये अनेकविध घटक असतात. त्यापैकी गृहव्यवस्थापन, अन्न व आरोग्यशास्त्र, वस्त्रशास्त्र, निर्णय प्रक्रिया, गृहव्यवस्थापन प्रक्रिया, जलसंधारणाची गरज, कचरा विल्हेवाटेची गरज, अंतर्गत सजावटीची संकल्पना, घरगुती पोशाख निवड व काळजी, पुष्परचनेचे विविध प्रकार या सर्वांचे अध्ययन यामध्ये अंतर्भूत असल्याने हा विषय गृहिणीबरोबर विद्यार्थिनी, अध्यापक वर्ग व सर्वसामान्य पातळीवर सर्व स्त्रियांसाठी उपयुक्त ठरणारा आहे. या अनुषंगाने या विषयाची मांडणी केलेली असून ही पुस्तिका सामान्य वाचकांना सुद्धा उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.

    375.00
    Add to cart
  • ग्राहक संरक्षण व व्यावसायिक नीतिमूल्ये

    Grahak Sanrkshan V Vyavasayik Nitimulye (Bhag 2)

    250.00
    Add to cart
  • छत्रपती शिवाजी महाराज : एक राष्ट्रनिर्माते

    शिवपूर्वकाळ व शिवकाळातसुद्धा इस्लामी शासकांच्या अन्यायांनी, अत्याचारांनी कहर केला होता. ते पदोपदी हिंदू बहुजन समाजाला पायदळी तुडवीत. हिंदू बहुजन, कष्टकर्‍यांना, शेतकर्‍यांना कोणीही वाली नव्हता. हिंदू स्त्रियांची अब्रू दिवसाढवळ्या लुटली जाई. हिंदू समाज परक्यांची चाकरी पत्करण्यात स्वत:ला धन्य समजत होता. महाराष्ट्रातील मराठ्यांजवळ पराक्रम होता, शौर्य होते, कष्ट करण्याची, प्रसंगी जीव धोक्यात घालून काम पूर्ण करण्याची धमक होती. परंतु त्यांच्यात एकी नव्हती. शहाजी राजे, जिजाबाई व छत्रपती शिवाजी महाराजांनी आपापसात झगडणार्‍या, वतनासाठी व क्षुद्र स्वार्थासाठी एकमेकांचा खून व मारामार्‍या करणार्‍या, मुसलमानी सत्तांची सेवा-चाकरी करण्यात स्वतःला धन्यता मानणार्‍या मराठा सरदारांसोबतच सर्वसामान्य मराठी माणसांनाही एकत्र आणले. प्रसंगी साम, दाम, भेद, दंड या नीतीचा अवलंबही केला. शिवाजी महाराजांनी अज्ञानी बहुजन समाजाला जागृत करून त्यांना स्वराज्यकार्यासाठी प्रेरित केले. अन्यायी, अत्याचारी इस्लामी आक्रमणाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. परिणामी बहुजन समाजातील सामान्य माणसांनी असामान्य कामगिरी केली. छत्रपती शिवरायांनी केलेले उदात्त कार्य भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा महामंत्र ठरले.

    Chhatrapati Shivaji Maharaj : Eka Rashtranirmate

    425.00
    Add to cart
  • छात्रसेवाकाल (बी.एड.द्वितीय वर्ष)

    एनसीटीईच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सर्व विद्यापीठातील बी.एड. छात्राध्यापक आपल्या प्रशिक्षणाचा एक मोठा कालावधी शाळांमध्ये कार्यरत राहणार आहे. या कालावधीत त्यांनी कोणकोणती कामे करावीत, काय काय उपक्रम राबवावेत, शाळेशी संबंधित घटकांशी आंतरक्रिया करणे, शाळेचे दप्तर विविध नोंदी, मूल्यमापन, शासन व अन्य घटकांशी पत्रव्यवहार अशा सर्व बाबींचा परिचय छात्राध्यापकाला व्हावा असा छात्रसेवाकालाचा हेतू आहे. हा हेतू लक्षात घेवून प्रस्तुत पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे.
    प्रस्तुत पुस्तकात छात्रसेवाकालाचा अर्थ, संकल्पना, वैशिष्ट्ये, नियोजन व अंमलबजावणी, शाळेचा परिचय, कार्ये, विविध उपक्रम, शाळा व समुदाय, मुख्याध्यापकाची भूमिका, शिक्षकाची भूमिका, शैक्षणिक संशोधन, छात्रसेवाकालचे अहवाललेखन अशा सर्व मुद्द्यांचा उहापोह केलेला आहे.

    Chhatrasevakal

    225.00
    Add to cart
  • जीवन कौशल्य शिक्षण

    जीवनकौशल्ये ही प्रत्येक मानवाची गरज आहे. त्यातून आपल्या क्षमतांची जाणीव होते. तसेच आपल्या जीवनातील अपयशासाठी इतरांना दोषी ठरविले जात नाही. कारण प्रत्येक समस्येचे उत्तर शोधण्याची क्षमता यातून विकसित होते. सर्जनशील विचारांची शृंखला निर्माण होते. वैयक्तीक जीवनात समायोजन क्षमता वाढून बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. जीवन कौशल्यांमधून विविध मानसिक क्षमतांचा विकास नकळतपणे होतो. सकारात्मकता वाढीस लागते. आधुनिकीकरणाने भारावलेल्या समाजाला जीवनकौशल्ये शिक्षणाची आवश्यकता आहे. शालेय स्तरावर जीवनकौशल्य शिक्षणाचे महत्व अनन्यसाधारण आहे. प्रस्तुत पुस्तकात जीवन कौशल्ये शिक्षणाचे स्वरूप संकल्पना सोबतच थकज ने पुरस्कृत केलेल्या दहा गाभाभूत जीवनकौशल्यांचे विवेचन केलेले आहे. आंतरवैयक्तीक नातेसंबंध मजबूत करण्यासाठी कुटुंबाची भूमिका नेहमीच महत्वाची आहे. परंतु आज कुटुंबातील सदस्यदेखील एकमेकांपासून दुरावत आहे. विद्यार्थीदशेतच ही बाब समजणे व त्यात सुधारणा आवश्यक आहे. तणाव आणि भावना यावरील नियंत्रण राखणे आज गरजेचे आहे. जीवन कौशल्यांचे शिक्षण यासाठी अत्यंत गरजेचे आहे. तसेच विद्यार्थीदशेत जीवन कौशल्यांचे शिक्षण देण्यासाठी शिक्षकाला काय करता येईल यासंदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

    Jeevan Kaushaly Shikshan

    175.00
    Add to cart
  • जीवन कौशल्ये

    Jivan Kaushalya

    275.00
    Add to cart
  • जेनेरिक इलेक्टिव्ह कोर्स

    21 व्या शतकात माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीची अनेकतम उत्तुंग शिखरे पादाक्रांत केल्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची शक्ती निश्चितच लक्षात घ्यावी लागते त्याचबरोबर सामाजिक समस्या सोडवण्यासाठी सरकारी, विविध व्यावसायिक क्षेत्र, विविध सामाजिक संघटना इत्यादींना कार्यप्रवण करण्यामागे सामाजिक नवकल्पनांची भूमिका देखील समजून घ्यावी लागते. सामाजिक उद्योजकता ही सामाजिक नव्या कल्पनांना बळ देणारी, सामाजिक समस्यांचे निराकरण करणारी समाज उपयोगी प्रक्रिया म्हणून निर्माण झाली आहे. सद्य:स्थितीत स्टार्ट अप या संकल्पेचा उदय झालेला असून साधारणत: नवीन कल्पनेवर आधारित कोणताही व्यवसाय कल्पनेची निर्मिती केली जाते. नागरी शिक्षणातून सक्रीय सहभाग घेणारे, राजकीय व सामजिक जाणीव-जागृती असणारे आणि लोकशाही व्यवस्थांना बळकटी देणारे नागरीक घडवीता येत असल्याने, नागरी शिक्षणाचे महत्व अत्यावश्यक ठरते. माहिती तंत्रज्ञान युगात दैनंदिन कामासाठी कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाइल, इंटरनेट यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. व्यापक लोकसंख्येमुळे दारिद्र्य, बेरोजगारी, कुपोषण, अनारोग्य, अस्वच्छता, निवार्‍याची व्यवस्था नसणे अशा कितीतरी समस्या निर्माण झाल्या आहेत. ही सद्य:स्थिती नवभारताची वास्तविक ओळख आहे.

    185.00
    Add to cart
  • दूरसंवेदन आणि जागतिक स्थान निश्चिती प्रकल्प अहवाल

    दूर संवेदन हे तंत्रज्ञान संगणक व अवकाश विज्ञानातील एक प्रभावी असे तंत्र आहे. पहिल्या महायुद्धानंतर हवाई छायाचित्रापासून सुुरुवात झालेल्या या तंत्राचा वापर आज शेती, खाणकाम, संरक्षण, बांधकाम, सर्वेक्षण, हेरगिरी, खाजगी उद्योग अशा अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होत आहे. आज उपग्रहाच्या मदतीने सगळ्या पृथ्वीचे व इतर ग्रहांचे, अवकाशातील तार्‍यांचे सेकंद आणि सेकंद चित्रण सुरू आहे. त्यातून भरपूर माहितीचे संकलन होत आहे.
    दूर संवेदन तंत्रज्ञानाची वाढती गरज व त्याचा होणारा मोठ्या प्रमाणावरील उपयोग यासाठी हे तंत्र नेमकेपणाने कळणे महत्वाचे आहे. यासाठी या प्रगत तंत्रज्ञानाची मराठी भाषेतून ओळख करण्याचा या पुस्तकाद्वारे प्रयत्न केलेला आहे.
    दूर संवेदन या विषयाचा अभ्यास करणार्‍या आमच्या विद्यार्थी मित्रांना व अभ्यासकांना या पुस्तकाचा निश्चितपणे उपयोग होईल अशी आशा आहे.

    Dursanvedan

    125.00
    Add to cart
  • नागरी सेवा आणि सुशासन

    भारतात नागरीसेवेचा (लोकसेवा) विकास वा प्रारंभ प्राचीनकाळी झालेले पहावयास मिळते. ज्याचे वर्गीकरण प्राचीनकाळ, राजपूतकाळ, सल्तनत काळ, मूगलकाळ, ब्रिटीशकाळ, स्वातंत्रोत्तर काळात झालेले आढळते. सन 1919 ते 1947 पर्यंंतच्या कालावधीत केंद्रिय सचिवालयातील बदल वा जडणघडण विशेष महत्वाचे होते. ब्रिटीश शासन कालखंडात प्रशासनिक व्यवस्थेचे महत्व लक्षात घेऊन लोकसेवेची स्थापना करण्यात आली. लोकप्रशासन मध्ये कर्मचारी हे मुख्य तत्व आहेत. नागरी सेवा म्हणजे नोकरशाही या अर्थानेही ही संकल्पना परिचित आहे. जर्मन तत्ववेत्ता ‘मॅक्सवेबर’ या प्रशासकीय अभ्यासकाने ‘नोकरशाही’ ही संकल्पना उपयोगात आणली. धोरणे आणि प्रशासन या संदर्भात नागरी सेवेची भूमिकाही खुप महत्वाची असते. तसेच जागतिकीकरणात विशेषतः 1990 नंतर सु-शासन ही संकल्पना अध्ययनाद्वारे चर्चेत आली. सु-शासन ही संकल्पना मानव समुदायाच्या हिताशी वा विकासाशी संबंधित आहे. ती एक बहुआयामी प्रक्रिया सुध्दा आहे. आजच्या परिप्रेक्ष्यात बहुतांश राष्ट्रांनी या संकल्पनेचा स्विकार हा स्वच्छेने व स्वंयप्रेरणेने केले आहे.

    Nagari Seva and Sushasan

    275.00
    Add to cart
  • निर्णयनासाठी वित्तीय व्यवस्थापन

    निर्णयनासाठी वित्तीय व्यवस्थापन या पुस्तकाची अत्यंत साध्या व सोप्या भाषेत मांडणी केलेली आहे. ‌‘वित्तीय व्यवस्थापन’ हा शब्द दोन शब्द ‌‘वित्तीय’ आणि ‌‘व्यवस्थापन’ ह्या शब्दांनी बनला आहे. ‌‘वित्तीय’ शब्दाचा अर्थ हा धन प्राप्तीच्या साधनांना एकत्रित करणे तथा व्यवसायाच्या मौद्रिक आवश्यकतांचे पूर्वानुमान करणे. त्याचे आधारावर ह्या साधनांचे वितरण करणे असा आहे. तर ‌‘व्यवस्थापन’ शब्दाचा अभिप्राय हा एखाद्या संस्थेचे उद्देश प्राप्त करण्यासाठी मानवीय क्रिया आणि भौतिक संसाधनांचे नियोजन, संगठन, समन्वय आणि निर्णय ह्यांच्याशी संबंधित आहे. अशा प्रकारे ‌‘वित्तीय व्यवस्थापन’ ही व्यावसायिक व्यवस्थापनाची ती शाखा आहे जी संस्थेच्या वित्तीय संसाधनांचे नियोजन आणि नियंत्रणाच्या संबंधित आहे अर्थात वित्त कार्याचे व्यवस्थापन.
    आधुनिक विचारधारेनुसार वित्तीय व्यवस्थापनाला सामान्य व्यवस्थापनाचेच एक अभिन्न असे मानले जाते. वस्तूत: ते सामान्य व्यवस्थापनाच्या कार्यात्मक क्षेत्राचे स्वरूप आहे. उत्पादन व्यवस्थापन, विपणन व्यवस्थापन, सेवावर्गीय व्यवस्थापनाप्रमाणेच वित्तीय व्यवस्थापन हे कार्यात्मक व्यवस्थापनाच्या श्रेणीत येते. सामान्यत: वित्तीय व्यवस्थापनाचा आशय हा वित्तीय नियोजन, वित्त प्राप्ती, संपत्ती व्यवस्थापन तसेच विविध वित्तीय क्षेत्रात संतुलन स्थापित करणे असा आहे. ह्यात पुंजी, रोख प्रवाह, प्रत्याय, मूल्य आणि लाभ निती, निष्पत्ती नियोजन आणि मूल्यांकन तथा आयव्ययक नियंत्रण निती आणि प्रणाली यांचा समावेश होतो. प्रस्तुत पुस्तक वाणिज्य आणि व्यवस्थापन विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना निश्चितच उपयुक्त ठरेल.

    175.00
    Add to cart
  • निवडक अभंग – ज्ञानेश्वर ते तुकाराम

    अभंग आणि ओवी या लोकाविष्काराचे माध्यम स्वीकारून संतकवींनी आपले अनुभव शब्दांकित केले. संतांचे साहित्य अध्यात्मपर, परमार्थपर असले तरी ते ज्या वास्तव जीवनातून बहरले, फुलले त्या वास्तव जीवनाचे रूप, रंग आणि गंध त्याला सहजच लाभले. सामाजिक वास्तवाचे भान त्यातूनच प्रकटले. विठ्ठलभक्तीबरोबरच दु:खमुक्ती आणि ऐहिक जीवनातील ताण-तणाव, संघर्ष यांचे चित्र त्यातून साकार झाले. यादव काळात महानुभाव आणि वारकरी असे दोन संप्रदाय उदयाला आले. वारकरी संप्रदाय अधिक खोलवर रुजला. संतवाङ्मयाच्या मागे वारकरी पंथाचे तत्त्वज्ञान होते. पंथीय प्रेरणा असूनही हे वाङ्मय केवळ प्रचारकी बनले नाही. ही चळवळ वाङ्मयीन बनली, जीवनस्पर्शी बनली. चळवळीचे साहित्य म्हणून त्याकडे पाहता येते. सभोवतालचे वास्तव, मध्ययुगीन गतिरुद्धता आणि भक्तीच्या निमित्ताने व्यक्तिस्वातंत्र्याचा केलेला पुकारा या सर्वांचा वाङ्मय निर्मितीवर काय परिणाम झाला हे तपासणे आज गरजेचे आहे. संत साहित्य केवळ अध्यात्मपर आहे, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. संतांच्या अभंगातील आकृतीसौंदर्य, रचना विशेष, गेयगुण यांच्या बरोबरच त्यातील आशयसंपन्नता, परिवर्तनवादी विचारशक्ती यांचाही परामर्ष घेणे मला आवश्यक वाटते.
    मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा अभ्यास आज दुर्लक्षित होत आहे. वारकरीपंथीय तत्त्वज्ञानातील परिवर्तनवादी विचार व संतसाहित्य यांचा परस्पर संबंध समजून घेतल्यास चळवळीतून साहित्यसृजन कसे होते व ते त्या चळवळीला व परंपरेला बळ देत देत पुढील साहित्य निर्मितीस कसे प्रेरक ठरू शकते, याचाही हिशेब मांडणे आजच्या संदर्भात शक्य होईल. विशिष्ट कालखंडाचा साहित्यावर प्रभाव व त्या साहित्यातून निर्माण झालेल्या विचारांचा कालखंडावर परिणाम असे परस्पर संबंधाचे स्वरूपही यातून पाहता येईल. साहित्य आणि समाजजीवन यांचे नाते तपासणे व साहित्य निर्मितीमागील प्रेरक शक्ती समजावून घेणे एवढे जरी भान या निमित्ताने आले तरी पुरेसे आहे. अभ्यासक, विद्यार्थी, रसिक या प्रयत्नाचे स्वागत करतील असा विश्वास वाटतो.

    Nivadak Abhang – Dnyaneshwar Te Tukaram

    110.00
    Add to cart
  • निवडक दलित एकांकिका : एक चिंतन

    दलित रंगभूमीला सशक्त, संपन्न आणि प्रयोगक्षम बनविणारे संवेदनशील नाटककार प्रा. दत्ता भगत यांनी संपादित केलेल्या ‘मराठी दलित एकांकिका’ यावरील परिचयात्मक लेखन म्हणजे प्रस्तुत पुस्तक होय. शाळा, महाविद्यालय, शासन व विविध संस्थांच्या माध्यमातून घेतल्या जाणार्‍या अनेक स्पर्धांमधून ‘एकांकिका’ जनसामान्यांपर्यंत पोहचली. तरुणाईचा तर जिव्हाळ्याचा विषय झाली. ‘एकांकिका’ हा शिकण्याचा, समजून घेण्याचा आणि स्वत:ला घडवून घेण्याचा कला प्रकार आहे. स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा आग्रह धरीत मराठी दलित एकांकिकांची निर्मिती झाली.
    प्रस्तुत पुस्तकातील एकांकिकांचा अभ्यास करताना, समीक्षा करताना नाट्य वाङ्मयाच्या सर्व प्रकारच्या आकृतिबंधांना जाणीवपूर्वक महत्त्व दिले, त्याचप्रमाणे विषय आणि तंत्र दृष्ट्याही दिलेले महत्त्व लक्षणीय असेच आहे. समीक्षेच्या अंगाने किचकट करण्यापेक्षा एकांकिकांचे सहज, सोप्या पद्धतीने आकलन होईल अशाच पद्धतीने प्रस्तुत पुस्तकाची प्रामाणिक मांडणी केलेली आहे. मानवी मनाच्या समृद्धीसाठी, वाङ्मयीन परिघाच्या विस्तारण्यासाठी तसेच वाङ्मयाभिरुचीच्या समृद्धीसाठी सदर पुस्तक बहुमूल्य ठरेल यात शंका नाही.

    Nivadak Dalit Ekankika : Samiksha

    150.00
    Add to cart
  • निवडक राज्यघटना आणि आंतरराष्ट्रीय संबंध (ब्रिटन, अमेरिका व सार्क)

    सदर पुस्तक एकूण पाच घटकांमध्ये ग्रेट ब्रिटन, अमेरिका आणि सार्क परिषद यांच्या राजकीय व्यवस्थेचे, घटनेचे व आंतरराष्ट्रीय संबंधच्या प्रयत्नांचे विभाजन करण्यात आले आहे. त्यात निवडक राज्यघटनेमध्ये ग्रेट ब्रिटन दोन घटकांमध्ये विभागण्यात आले असून ग्रेट ब्रिटनमध्ये 2005, 2010, 2014, 2016 पर्यंत जे महत्वपूर्ण राजकीय बदल झाले त्यास संविधानाचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्याचा अंतर्भाव सुरूवातीच्या दोन घटकांमध्ये करण्यात आला. न्यायपालिकेचे स्वतंत्र अस्तित्व, त्यामुळे लॉर्डस सभागृहाच्या कार्यकक्षेवर झालेला परिणाम, लॉर्डस सभेच्या सदस्यांच्या उपस्थिती कक्षेत झालेले महत्वपूर्ण निर्णय आदि मुद्दे घेऊन त्यावर संक्षिप्तपणे चर्चा केली आहे तर पुढच्या दोन घटकांमध्ये संयुक्त राज्य अमेरिकेच्या राज्यघटनेपासून तर तेथील राजकीय व्यवस्थेच्या जडणघडणीच्या बदलत्या परिणामाचा परामर्श घेण्यात आला आहे तर शेवटच्या घटकामध्ये दक्षिण आशियायी देशांनी एकत्रित येऊन विभागीय सहकार्य संघटना स्थापन केली. ज्याची ओळख ङ्गसार्कफ म्हणून आंतरराष्ट्रीय राजकीय पटलावर झाली आहे. आर्थिकर सहकार्य आणि एक दुसर्‍यांच्या देशामध्ये बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या मुख्य उद्देशाने आणि उद्योगांना प्रोत्साहन देण्यासोबतच इतरही सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक बाबींच्या वाढीसाठी एकत्रिपणे प्रयत्न करण्यासाठी विचार विमर्श, निर्णय आणि करारांसाठी सुरू झालेल्या सार्क संघटनेच्या वाटचालीचा आढावा, सार्कच्या स्थापनेमागील उद्देश कार्यपद्धती आणि स्वरूपाबाबत मांडणी करण्यात आली आहे त्या निमित्ताने विद्यार्थ्यांना सार्कची आणि त्यांच्या कार्यपद्धतीची ओळख अभ्यासातून होईल अशी आशा आहे.

    Nivadak Sanvidhane ani Antarrashtriya Sanbandha (Britan, Amerika V Sark)

    150.00
    Add to cart
  • निवडक संविधाने आणि आंतरराष्ट्रीय संघटना

    ग्रेट ब्रिटन, अमेरिका, चीन या देशांचे संविधान व दक्षिण आशियाई विभागीय सहकार्य संघटना (सार्क), यूनो यांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. ग्रेट ब्रिटनच्या शासनव्यवस्थेत संविधानात्मक सुधारणा कायदा-2005 मंजूर केल्यानंतर या शासनव्यवस्थेतील संरचनामध्ये काही महत्वाचे बदल झाले आहेत. विशेषत: ‘हाऊस ऑफ लार्डस’ सभागृहाचे न्यायविषयक अधिकार नव्याने स्थापन करण्यात आलेल्या सर्वोच्च न्यायालयास देण्यात आले आहे तसेच या सभागृहाचा पदाधिकारी ‘लॉर्ड स्पीकर’ हे पदही निर्माण करण्यात आले आहे. संविधानात नवीन झालेल्या बदलांची नोंद या पुस्तकात घेण्यात आली आहे.

    जगात आर्थिक व सामाजिक विकासासाठी अनेक आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्यात आलेल्या आहेत. दक्षिण आशियाई विभागीय सहकार्य संघटना (सार्क) दक्षिण आशियातील राष्ट्रांच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे. या संघटनेची उद्दिष्ट्ये, रचना आणि कार्याचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. तसेच यूनो संदर्भातही माहिती दिली आहे.

    सदरील पुस्तकात ग्रेट ब्रिटनचे संविधान, ग्रेट ब्रिटनची संसदीय पद्धत, अमेरिकेचे संविधान, अमेरिकेचे कायदेमंडळ – काँग्रेस, दक्षिण आशियाई विभागीय सहकार्य संघटना, चीनचे संविधान, चीनचे अध्यक्ष, संयुक्त राष्ट्र संघ, सुरक्षा परिषद : रचना आणि कार्य, भारत-चीन संबंध महत्त्वाचे वाद प्रश्न या घटकांचा सविस्तर परामर्श घेण्यात आलेला आहे.

    Nivadak Savidhane Aani Antarrashtriya Sanghatna

    350.00
    Add to cart
  • निवडणूक व्यवस्थापन

    निवडणुका हा लोकशाही गाभा आहे. लोकशाहीचा डोलारा निवडणुकीवर आधारलेला आहे. निवडणुका शांतता आणि योग्य मार्गांने पार पाडण्यासाठी निवडणूक व्यवस्थापनाची गरज असते. निवडणुका योग्य, पारदर्शी आणि लोकशाही मार्गांने पार पाडल्या नाहीत तर अयोग्य प्रतिनिधी निवडून येण्याची शक्यता आहे. निवडणुकाच्या माध्यमातून अपेक्षित राजकीय बदल वा परिवर्तन घडवून आणता येते. आधुनिक काळात निवडणूक प्रक्रियेत अनेक तांत्रिक गोष्टीचा समावेश करण्यात आलेला आहे. 1990 ते 1996 या काळात भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून टी.एन. शेषन यांची कारकिर्द विशेष गाजली. त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील अनेक गैरमार्गांना दूर केले. अनेक सुधारणा घडवून आणल्या. परिणाम त्यांचे व राजकीय पक्षांचे वारंवार खटके उडाले. सद्यकाळात राजकीय पक्षांनी देखील निवडणूक आचारसंहिता व सुधारणांना मान्यता प्रदान केलेली आहे.

    सदरील पुस्तकात निवडणूक व्यवस्थापनाशी निगडित सर्व संकल्पनांचा यथायोग्य आढावा घेवून निवडणूक प्रक्रिया संबंधित सर्व घटकांचा साकल्याने विचार केलेला आहे. पुस्तकातील एकूण चार प्रकरणात अनुक्रमे निवडणूक व्यवस्थापनाशी संबंधित मुद्दे, निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व घटक, निवडणूक प्रक्रिया आणि प्रचारासाठी संबंधित माहिती आणि निवडणुकीसंबंधित मतदान प्रक्रिया आणि राजकीय सहभाग इ. माहितीचा समावेश असून प्रस्तुत पुस्तकलेखनातून विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासकांना निवडणूक व्यवस्थापनातील प्रमुख संकल्पना समजण्यास हातभार लागेल यात शंका नाही.

    Nivadnuk Vyavsthapan

    185.00
    Add to cart
  • परिचयात्मक अर्थशास्त्र

    सदरील ‌‘परिचयात्मक अर्थशास्त्र’ या पुस्तकात विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल अशी सोपी व सुटसुटीत भाषा वापरलेली आहे. आवश्यक तेथे कोष्टके, आकृत्या, भरपूर मुद्दे व व्यावहारिक उदाहरणे दिलेली आहेत. त्यामुळे हा कठीण वाटणारा विषय विद्यार्थ्यांना सहजपणे समजेल व सोपा वाटेल अशी खात्री आहे.

    130.00
    Add to cart
  • परिचयात्मक अर्थशास्त्र

    मानवाच्या आर्थिक वर्तणूकीचं अध्ययन करण्याचं महत्त्वाचं कार्य अर्थशास्त्र करते. ही मानवी वर्तणूक उपभोक्ते, उत्पादक, वितरक अशी वेगवेगळी भूमिका पार पाडत असते. त्यांचे कार्य अर्थव्यवसथेला गतिमान करणार ठरते. यातून अर्थशास्त्रीय ज्ञानशाखा उत्पादन, उपभोग, विनिमय, वितरण यांचे सैद्धांतिक विश्लेषण करतात. यासाठी रॅग्नर फ्रिश यांनी 1933 मध्ये अर्थशास्त्रीय अभ्यास शाखांचे दोन भागात विभाजन केले आहे. (1) सूक्ष्मलक्षी अध्ययन (2) समग्रलक्षी अध्ययन. हे विभाजन आर्थिक विकासाची धोरणे निश्चित करण्यासाठी व त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. या दोन्ही अभ्यासशाखांच्या आधारावरच ‌‘परिचयात्मक अर्थशास्त्र’ या क्रमिक पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना सैद्धांतिक संकल्पनांची व त्यांची व्यावहारिक प्रासंगिकता कशी महत्त्वपूर्ण आहे याचा थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामुळे त्यांच्यात अर्थशास्त्राच्या अध्ययनाची गोडी निर्माण व्हावी, त्याला आपल्या भविष्याला आकार देता यावा व सामान्य माणसांच्या आर्थिक प्रश्नांची त्याच्यात समज निर्माण व्हावी, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्याने धडपड करावी हा प्रयत्न आहे.
    म्हणून या पुस्तकात मागणी, पुरवठा, रोजगार, पैसा, आधुनिक बँकींग, व्यापार, सरकारचे उत्पन्न-खर्च, आर्थिक विकास, नियोजन आयोग, निति आयोग, व्यावसायिक जीवनातील सांख्यिकीचे योगदान, या संकल्पनांची त्याला ओळख होण्यास मदत होईल. हे पुस्तक निश्चितच विद्यार्थ्यांना दिशादर्शक ठरेल यात शंका नाही.

    Parichyatmak Arathashastra

    395.00
    Add to cart